मुमुक्षुसखः (सार्थः मराठी)

मुमुक्षुसखः (सार्थः मराठी)

प्रस्तावना

॥ श्रीराम समर्थ ॥ नमः शान्ताय दिव्याय सत्य धर्म स्वरूपिणे । स्वानन्दामृततृप्ताय श्रीधराय नमो नमः ॥ ॥ श्रीधरो विजयतेतराम् ॥ जयाचे दर्शने स्पर्शने पुण्य जोडे । अशी ज्यांची ख्याति आहे व ज्यांना त्यांच्या सद्गुरुनीच (श्रीसमर्थ रामदासांनी) आपल्या लाडक्या शिष्याला भगवान या नावाने गौरविले अश्या महान दत्तावतारी संत श्रीमद्परमहंस परिव्राजकाचार्य श्री भगवान श्रीधरस्वामी यांच्या दिव्य चरणी आपण सर्वजण विनम्रभावाने वंदन करुया । सत्पुरुषांच्या मंगलाचरणाने वाचकाच्या पारमार्थिक विघ्नांचा नाश होतो असे शास्त्र सांगते. हृदयी वेदगर्भ विलसे । मुखीसरस्वती विलासे । साहित्य बोलता जैसे । भासती देवगुरु ॥ जे अखंड सावधान । जयास त्रिकालाचे ज्ञान । सर्वकाल निरभिमानी । आत्मज्ञानी ॥ शांति क्षमा दयाशील । पवित्र आणी सत्त्वशील । अंतर बुद्ध ज्ञानशील । ईश्वरी पुरुष ॥ धर्म स्थापनेचे नर । ते ईश्वराचे अवतार ॥ श्रीसमर्थ रामदास स्वामीनी श्रीदासबोधात वर्णिलेले आदर्श दिव्य जीवनाचे साक्षात् दर्शन म्हणजे भगवान श्रीधरच होत. ``ऐशी कळवळ्याची जाती । लाभाविण करी प्रीति ।'' या तुकोबांच्या वचनाप्रमाणे प्रत्येक आत्मसाक्षात्कारी संताला शाश्वत सुखाचा ठेवा सापडल्यावर, सर्वही जीवमात्रांना अधिकाराप्रमाणे या सुखाची प्राप्ती व्हावी अशी सद्भावना असते. ``सेवितो हा रस वाटितो आणिक'' या वचनाप्रमाणे श्री भगवान श्रीधरांचे आजीवन कार्य होते. अध्यात्ममार्गाने जाणाऱ्या मुमुक्षु साधकांच्या (मग तो गृहस्थ असो वा ब्रह्मचारी साधक असो) उद्धार होण्यासाठी ``बुडते हे जन देखवेना डोळा । म्हणुनि कळवळा येत असे ।'' या भावनेने भगवान श्रीधरांनी आपल्या दिव्य आचरणाने, तपाच्या सामर्थ्याने, वेळोवेळी उत्स्फूर्त दिव्य वाणीने बोध केला, लोकोद्धार केला. श्री रविन्द्रनाथ टागोर म्हणतात तसे ``आमार जीवनही आमार बानी ।'' तसे भगवान श्रीधरांचे जीवन बोधप्रद आहे. लोकोद्धाराचे कठीण कार्य जन्मसिद्धांनाच शक्य असते. भगवान श्रीधर हे त्यापैकीच होत. मुमुक्षु सखा- मोक्षाची इच्छा करणारा तो मुमुक्षु आणि त्याचा सखा म्हणजे मित्र हितचिन्तक तो दूसरा अर्थ- मोक्षैच्छुक असा मित्र ज्याचा आहे. अर्थात्- समानशीले व्यसनेषु सख्यम् । ह्या उक्तिप्रमाणे दोघांची एकच आवड असल्याने ते सखा होतात. त्याप्रमाणे मोक्षाची इच्छा करणारे त्याला पोषक असे दोन तत्त्व- मनोवृत्ति ह्या सखा होतात. मोक्ष म्हणजे बंधनापासून (जन्म-मरणाच्या फेऱ्याच्या) सुटका. मुमुक्षुसखा काव्यात भगवान श्रीधरस्वामी यांनी मोक्षप्राप्तीसाठी आत्मनात्मविवेक हा त्यांचा सखा असून त्या ज्ञानविचारात निमग्न राहून निरंतर ब्रह्मभाव धारण करुन रहावे असा अनेक रीतिने बोध केला आहे. मोक्ष म्हणजे काय? आत्यंतिक दुःखनिवृत्ती व आत्यंतिक शाश्वत सुखप्राप्ती म्हणजे मोक्ष होय. शुद्धब्रह्मच अंतःकरणाच्या उपाधीने युक्त होऊन अनेक जीवीत्वास प्राप्त होते. अंतःकरण हे मायेचे कार्य होय. ही अंतःकरणाची उपाधी ज्ञानविचाराने (आत्मानात्मविवेकाने) निघून जाते तेव्हा उरते ते शुद्ध ब्रह्म अर्थात् शुद्धात्मा. तत्त्वमसि, प्रज्ञानं ब्रह्म, सर्व खल्विदं ब्रह्म, इत्यादि महावाक्यांचा सद्गुरुकृपेने परिपूर्ण बोध होऊन जो स्वतःला मी ब्रह्म आहे, असे अनुभवतो त्याला जीवनमुक्त म्हणतात. त्यालाच मोक्ष प्राप्त झाला असे म्हटले जाते. भगवान श्रीधरांनी आधी केले मग सांगितले या समर्थोक्तिप्रमाणे प्रथम या अंतर्यात्रेचा अनुभव घेतला व नंतर साधकांना बोध केला आहे.

पूर्वपीठिका

॥ श्रीगुरवे नमः ॥ मुमुक्षु-सखः अश्या शके १८८६-१८८७ या वर्षात वरदपूरी श्रीधराश्रमांत श्रीमत् प. प. भगवान् सद्गुरु श्रीधरस्वामी महाराजांनी एकांतांत असतांना सर्व मुमुक्षुंच्या उद्धारासाठी मार्गदर्शक ``मुमुक्षुसखः'' या संस्कृत ग्रंथाची रचना केली. त्यावेळी मौन असून लेखणी किंवा तुळशीच्या काडीने लिहिणेही बंद होते. फक्त हाताच्या बोटानें जमीनींवर लिहून देत असत व ते सेवेकरी लिहून घेत. पण असे लिहिणें सेवेकऱ्यांना कांही वेळी घोटाळ्यात टाकित असल्याने सेवेकऱ्यांच्या प्रार्थनेनुसार जमिनीवर किंवा भिंतीवर गेरूने लिहून देण्यास सुरुवात झाली. ध्यानधारणा, समाधि या अवस्थेतून बाहेर आल्यानंतर उरणाऱ्या अत्यंत अल्प अश्या वेळांत हें लिखाण होत असें. एकांताचा अवधि संपण्याची वेळ येतांच लिखाण पूर्ण व्हावे या हेतूनें जास्त खोल विचार न करतां लेखन पूर्ण करण्यात आले. एकांतातून बाहेर पडल्यावर श्रीनीं या लेखनांत सुधारणा करावयाची असून त्यात अद्याप कांही विषयांचा समावेश करावयाचा आहे. तूर्त हे बांधून ठेवा ! पुढच्या चातुर्मासांत किंवा एकांतांत जेव्हा वेळ मिळेल तेंव्हां यांत सुधारणा करुं, असे सांगितले. ---सच्चिदानन्दस्वामि

मुमुक्षुसखा

मुमुक्षु म्हणजे मोक्षाचा इच्छुक. मोक्षप्राप्तीची इच्छा करणारा साधक. जन्म मरणाच्या फेऱ्यामधून सुटका करवून घेणारा तापसी आणि चिर-सौख्याच्या शोधांत प्रयत्नशील असा साधक. जन्मोजन्मीच्या पुण्यशील सात्त्विक कर्मांनी पुष्ट होता होता जो साधक वैराग्यप्रवृत्तिच्या सुवर्णशिखरापर्यंत चढाई करून, ब्रह्मतत्त्वाचा मकरंद चाखण्याचा परमोच्च आनंद मिळवतो आणि अनंत अश्या प्रमुदित स्थितित अखंड विहार करतो, त्यास मोक्षप्राप्ती झाली असे म्हणतात. ही मोक्षप्राप्तीची अवस्था प्राप्त करण्यासाठी त्याचा मार्ग फार खडतर आणि काट्या कुटयांनी भरलेला असतो. त्यांत कांही अत्यंत प्रबळ असे शत्रू मोहक रूप घेवून त्याला वारंवार पथभ्रष्ट करितात. त्यातिल सर्वात बलशाली शत्रू जो अजेयच म्हणावा लागेल, तो म्हणजे काम हा आहे. ह्याच्या मोहमय हल्यापासून ह्या जगांत लाखांत एखादाच साधक वाचू शकतो. काम हा आल्याबरोबर क्रोध आणि लोभ या दोन महामल्लांना पण आणतो आणि सहजच विजयी होतो. परमहंस परिव्राजकाचार्य श्रीधरस्वामींनी या ग्रंथात मोक्षविघ्नकराः म्हणून श्लोक नं. ३२, ३३ मध्ये याचा उल्लेख केला असून गीतेचा पण आधार दिला आहे. ये हि संस्पर्शजा भोगा दुःखयोनय एव ते । आद्यन्तवन्तः कौन्तेय न तेषु रमते बुधः ॥ ३२॥ ज्ञानं वैराग्यमेवं च कामनाशाय साधनम् ॥ ३३॥ आणि परब्रह्माचे ज्ञान हेच त्या कामाचे नाश करण्यास समर्थ आहे. हे ज्ञान म्हणजे ह्या मुमुक्षुचा खरा सखा म्हणजे मित्र आहे. ते ज्ञान त्याला त्यांच्या यशोमंदिरापर्यंत पोहोचविते. प्रकरण ६ वे श्लोक ४० मध्ये त्यांनी स्पष्ट केले आहे कीं कांटयानेच कांटा काढावा,- अनेक जन्म संस्काराद्देहतारुण्यतोऽपि च । विषयीजनसंसर्गात् कामोत्पत्तिः प्रजायते ॥ ४०॥ त्याप्रमाणे क्रोधाचाच क्रोध करुन त्याला आपल्या मनामधून उपटून टाकावा. (सातवें प्र. श्लो. २३) क्रोधेन कामं चोत्पाट्य कण्टकेनैव कण्टकम् । पश्चात् क्रोधोऽपि त्यक्तव्यः सोऽप्येवं कण्ट कायते ॥ २३॥ मी व माझे ही भावनाच नष्ट झाल्यावर ज्ञानप्राप्ती होते. (सातवे प्र. श्लो. नं. ४०) देहेन्द्रियेष्वहम्भाव इदं भावस्तदन्तिके । यस्य नो भवतः क्वापि स जीवन्मुक्त इष्यते ॥ ४०॥ जगाचे मिथ्यातत्त्व हे आठव्या प्रकरणांत सांगितले आहे. ज्याप्रमाणे स्वप्नांत सर्व कांही जे दिसते, ते सत्य वाटते, परंतु जाग्रत अवस्था प्राप्त झाल्यावर ते सर्व दृश्य लुप्त होते. परंतु त्याची स्मृति सांगणारा एक साक्षी आमच्या हृदयांत द्रष्टा (बघणारा) म्हणुन हजर (उपस्थितच) असतो. तोच आमचे आत्मतत्त्व आहे. तो स्वप्न-जागृति आणि सुषुप्ति (गाढ निद्रा ज्यात स्वप्न पण दिसत नाहीं) ह्या तिन्ही परिस्थितित दृष्टा साक्षीतत्त्व आहे. साधकाला हे सर्व जग आपल्याला ज्याप्रमाणे स्वप्नसृष्टी ही मिथ्या भासते, त्यांप्रमाणे जगत् हे मिथ्या रूपच भासते. पुढे अकराव्या प्रकरणांत गुरु हाच खरा साधकाला भवसागर पार करवून देतो, हे सांगितले आहे. गुरुद्वारे जे कथन केले जाते ते श्रवण-मनन करुनच साधक पुढे वाटचाल करु शकतो. नित्य अनित्य ह्यातील विवेक, आसक्ति रहित राहणे आणि शमदमादि षट्सम्पत्ति हीच मुमुक्षुची साधने अर्थात् सखा आहेत. असे बाराव्या अध्यायात स्पष्ट केले आहे. गुरु हेच साक्षात् परब्रह्म असून त्याशिवाय आणखी कुणीही परमात्मा नाहीं असे श्रुति म्हणते. हे शेवटी तेराव्या अध्यायांत सागून हा ``मुमुक्षुसखा'' पूर्ण विराम घेतो. --- सौ. नलिनी प्रभाकर पाटील

अनुक्रमणिका

१. श्री सद्गुरुस्तवननाम प्रकरणं प्रथमम् (४६) २. ब्रह्मणः परमकारणत्वं नाम प्रकरणं द्वितीयम् (५०) ३. भोगानां दुःखकारणत्वं नाम प्रकरणं तृतीयम् (३६) ४. ब्रह्मज्ञानेन परमानन्दप्राप्तिनाम प्रकरणं चतुर्थम् (७६) ५. संसारस्य दुःखमूलत्वनाम प्रकरणं पञ्चमम् (३६) ६. मोक्षविघ्नकराः नाम प्रकरणं षष्ठम् (४५) ७. देहजुगुप्सितत्त्वं तथा कामनिन्दा प्रकरणं सप्तमम् (८४) ८. जगन्मिथ्यात्वं नाम प्रकरणमष्टमम् (५९) ९. मायारूपसृष्टिक्रमः नाम प्रकरणं नवमम् (११२) १०. गुरुकृपया देहाध्यसनाशः नाम प्रकरणं दशमम् (४५) ११. श्रवणादीनां मोक्षराधनत्वं नाम प्रकरणमेकादशम् (५४) १२. सृष्टिस्वरूपं नाम प्रकरणं द्वादशम् (१०१) १३. श्रीसद्गुरुस्तुतिर्नाम प्रकरणं त्रयोदशम् (१३)

१. श्री सद्गुरुस्तवननाम प्रकरणं प्रथमम् ।

(श्री सद्गुरुस्तुतिनामक पहिले प्रकरण) सर्वातिशय आनन्दी यस्य देहो स्वयं प्रभः । सर्वमङ्गलरूपी यः सद्गुरुं तं भजामहे ॥ १॥ अर्थ - ज्यांचा देह अतिशय आनंददायक, स्वयंप्रकाशी (तेजस्वी) असून जे पूर्णप्रकारे पावनकारक, मंगलदायक आहेत अश्या सद्गुरुंचे मी स्मरण करतो. ॥ १॥ संसारवारिधेः पारं नेतुं सेतुर्यमुन्नतः । तमाश्रयेम नित्यं हि चिदानन्दं गुरुं परम् ॥ २॥ अर्थ - संसाररूपी सागर तरुन जाण्यासाठी जे उत्कृष्ट सेतुच आहेत, अश्या परमानंददायक सद्गुरुचा मी सतत आश्रय घेतो. ॥ २॥ गुरुर्ब्रह्मा गुरुविष्णुर्गुरुर्देव सदाशिवः । गुरुरिष्टो गुरुर्बन्धुर्गुरुर्माता गुरुः पिता ॥ ३॥ अर्थ - गुरु हेच माता पिता आणि बंधु आहेत, गुरु हेच ब्रह्मा विष्णु आणि महेश आहेत. ( गुरु हे इष्ट इच्छित असे योग्य आहेत) ॥ ३॥ क्षुधितानां सुदिव्यान्नं तृषितानां सुजीवनम् । मुमुक्षुणां सुपीयूषं यस्तं गुरुं भजामहे ॥ ४॥ अर्थ - भुकेलेल्यांचे सुग्रास अन्न, तहानलेल्यांसाठी उत्तम जल, मोक्षेच्छा असणाऱ्यांचे अमृत, अश्या गुरुंचे मी स्तवन करतो. ॥ ४॥ तृष्णावर्ते भ्राम्यमाणान् दीनान्यो भवसागरात् । निजानन्दविभौ नित्यं स्थापयेत्तं गुरुं नमः ॥ ५॥ अर्थ - सुखाच्या इच्छेने व्याकुळ होवून जे भवसागरांत गटांगळया खात असतात, दिशाहीन असे भटकत असतात, त्या लोकांना आत्मानंदामध्ये स्थिर करुन दिशादर्शन करविणारे जे सद्गुरु, त्यांना मी नमन करतो. ॥ ५॥ संसारदावतप्तानां स्वबोधामृत वृष्टिभिः । सञ्जीवयति नमामस्तं चिदानन्दघनं गुरुम् ॥ ६॥ अर्थ - संसाररूपी दावानलामध्ये होरपळून निघणाऱ्या जीवांवर, स्वबोधामृतरूपी आत्मज्ञानाची शीतल वर्षा करणाऱ्या, चिदानंदघन अर्थात् अखण्ड आनंदाचे मेघच अश्या सद्गुरुंना मी वंदन करतो. ॥ ६॥ येन दत्तो निजानन्दो मुमुक्षूणां विमुक्तये । य आनन्दसुधासिन्धुर्ब्रह्म तं सद्गुरुं नमः ॥ ७॥ अर्थ - ज्यांनी मोक्षाची इच्छा करणाऱ्यांना, ह्या जीवनमरणाच्या बंधनापासून सुटका करुन घेण्यासाठी आत्मानंद प्रदान केला आहे. अश्या आनंदमय अमृताचा समुद्रच, ब्रह्मरूप सद्गुरुंना मी वंदन करतो. ॥ ७॥ कामरावणरामो यो हनुमान्ब्रह्मचर्यपः । समर्थ सर्वदृष्ट्या यो नमस्तं गुरुसत्तमम् ॥ ८॥ अर्थ - कामरूपी रावणाचा नाश करणारे जणू श्रीरामच, तसेच ब्रह्मश्चर्याचे पालन करुन सर्व दृष्टीने समर्थ असे जणू हनुमानच, अश्या सद्गुरुंना मी वंदन करतो. ॥ ८॥ शिवं भवति यस्मान्नः शङ्करो यश्च सर्वतः । यतो मुक्तावयं स्यामस्तं नमामि गुरुं सदा ॥ ९॥ अर्थ - ज्यांच्यामुळे आमचे सतत मंगलच होते, जे सदा शुभकर्ताच असे आहेत आणि ज्यांच्यामुळे आम्ही सदा मुक्तिचा आनंदच प्राप्त करतो, त्या सद्गुरुंना मी वंदन करतो ॥ ९॥ देहद्रोण्योपविष्ठान्नां संसाराब्धितितीर्षुणाम् । ध्रुववद्यो दिशेन्मार्गं तं गुरुं सततं नमः ॥ १०॥ अर्थ - देहरूपी कुंडांत अडकलेल्यांना, तसेच संसारसागरांतून तरुन जाण्यास जे निश्चित पावन दिशादर्शक आहेत, त्या गुरुंना मी वंदन करतो ॥ १०॥ माया नारेति सम्प्रोक्ता तस्या आयतनं बृहत् । तेन नारायणं यस्तं प्रणमामि गुरुं हृदा ॥ ११॥ अर्थ - मायारूपी जलामध्ये पहुडलेला आणि सीमाहीन असे व्यापकत्व ज्यांचे आहे, म्हणून त्यांस नारायण असे म्हणतात. त्या परमेश्वराचे मी वंदन करतो. ॥ ११॥ भवाब्धिरेव मोहाब्धिस्तत्पारयितु मञ्जसा । यत्कृपापोतवन्नित्यं शरण्यं तं गुरुं नमः ॥ १२॥ अर्थ - संसार सागर म्हणजेच मोहरूपी समुद्र पार करण्यास जो आपल्या नित्य कृपादृष्टिरूपी जहाजाने अचूक तारणकर्ता आहे त्या सद्गुरुस मी वंदन करतो. ॥ १२॥ पतन्बिन्दुश्च सिन्धौ स्यात्सिन्धुरेव यथा तथा । यत्पदे पतिताः शिष्या ब्रह्मैव तं गुरुं नमः ॥ १३॥ अर्थ - ज्याप्रमाणे समुद्रांत पडल्यानंतर जलबिंदु त्यातच विलीन होवून जातो, त्याप्रमाणे गुरुचरणी आश्रय घेतल्या नंतर शिष्य हा गुरुप्रमाणे ब्रह्मरूपच होतो. ॥ १३॥ शिष्यसन्तापचन्द्रो यः शिष्याज्ञानतमो रविः । भवकर्पूरवदाहो यस्तं गुरुं सततं नमः ॥ १४॥ अर्थ - शिष्याच्या संतप्त मनास चंद्राप्रमाणे शीतलता देणाऱ्या, शिष्याच्या अज्ञानरूपी अंधःकाराचा ज्ञानरूपी सूर्याने नाश करणाऱ्या, भवसागररूपी बंधनाला कर्पूरा प्रमाणे सर्वांगाने नष्ट करणाऱ्या गुरुला मी वंदन करतो. ॥ १४॥ काममत्तेभ सिंहो यो मोहाहिगरुडस्तथा । शिष्यास्यपूर्णचन्द्राब्धिस्तं गुरु सततं नमः ॥ १५॥ अर्थ - कामरूपी हत्तीच्या समोर सिंहच की काय आणि मोहरूपी महासर्पाला गरुडाप्रमाणे भासणारे आणि शिष्याच्या मुखचंद्राला पाहून ज्ञान प्रदान करण्याच्या इच्छेने उंचबळून भरती येणारा समुद्रच की काय, अश्या सद्गुरुला मी वंदन करतो ॥ १५॥ शिष्यदुःखाऽब्ध्यगस्तिस्तु भक्तहृत्पद्मषट्पदः । शिष्यचकोरचन्द्रो यस्तं गुरुं सततं नमः ॥ १६॥ अर्थ - शिष्याच्या दुःखरूपी सागराला अगस्ती ऋषिंप्रमाणे पिऊन समाप्त करणाऱ्या, भक्ताच्या हृदयरूप कमलावर भुंगाप्रमाणे गुंजन करणाऱ्या, शिष्यरूपी चकोर पक्ष्यास चंद्राप्रमाणे हवाहवासा वाटणाऱ्या, अश्या श्री गुरुला मी सतत वंदन करतो. ॥ १६॥ वैराग्यस्य वसन्तो यो ज्ञानवर्षर्तुरेव हि । तृप्तेः शरद् ऋतुर्यस्तं सद्गुरुं सततं नमः ॥ १७॥ अर्थ - वैराग्य भावनेवर वसंतरूप, ज्ञानरूपी वर्षाऋतु आणि तृप्तीसाठी शरदऋतु (ज्याप्रमाणे शांत उज्वल चांदण्याने शरदऋतुतील चंद्र अत्यंत आल्हाददायक आनंदाचा वर्षाव करतो त्याप्रमाणे) अश्या ह्या सद्गुरुला मी सतत वंदन करतो. ॥ १७॥ ब्रह्मज्ञान सुरम्यं यन्मुक्तिसाधनपादपैः । सगन्धमोक्षपुष्पैस्तद् गुरुरूपेण राजते ॥ १८॥ अर्थ - मुक्तिकरिता साधन म्हणजे ब्रह्मज्ञान ! त्या सुरम्यज्ञानाचे हे वृक्षच असे गुरु आणि सुगंधित मोक्षरूपी पुष्पांनी बहरलेले हे वृक्षरूपी गुरु अत्यंत शोभायमान दिसतात. अश्या गुरुला मी वंदन करतो ॥ १८॥ उपसाधनरूपा याः लताः संवेष्ट्य पादपान् । पुष्पैः पर्णेश्च नित्यं हि बहुशोभां वितन्वते ॥ १९॥ अर्थ - ज्याप्रमाणे वृक्षांना आपल्या फुलापानांनी वेष्टित करुन, ह्या लता त्यांची शोभा द्विगुणित करितात, त्याप्रमाणे उपसाधनांनी गुरु सुशोभित होतात. (गुरुवचन गुरुग्रंथ हे उपसाधन) ॥ १९॥ जीवन्मुक्तफलानाञ्च राशयोऽत्रामृतोपमाः । इतस्ततश्च वर्तन्ते मुमुक्षूणाङ्कृते सदा ॥ २०॥ अर्थ - अमृताप्रमाणे अत्यंत शुभफलदायक अश्या जीवनमुक्तीच्या फळांच्या राशि मोक्षाची इच्छा ठेवणा-यांकरीता, यथातथा (इतस्ततः) विराजमान झालेल्या दिसतात ॥ २०॥ अतीवसुन्दरोऽत्रैकः कासारो हृदयङ्गमः । वर्तते यस्य पानीयं भवरोगविनाशम् ॥ २१॥ अर्थ - येथे अत्यंत हृदयंगम असे तळे शोभायमान झालेले आहे, ज्याचे जल हे भवरोगाचा विनाश करणारे आहे (जन्म मृत्यु च्या चक्रातून बाहेर काढणारे आहे) ॥ २१॥ सुवासनासुकल्हारै राजितं यस्य दर्शनम् । निष्कामताशिलाभिश्च नेत्रानन्दकरं महत् ॥ २२॥ अर्थ - शुभवासना आणि हितकारी आशीर्वादांसहित ज्यांचे दर्शन आहे, निष्कामभाव हा शिलेप्रमाणे स्थित आणि पक्का आहे (ते वितरागी आहेत) असे गुरुजी आपल्या नेत्रांना अत्यंत आनंददायक वाटतात ॥ २२॥ ब्रह्मज्ञानं नामधेय यस्य कर्ण रसायनम् । तेनोद्यानमिदं नित्यं तृप्यते शोभतेऽपि च ॥ २३॥ अर्थ - ज्याप्रमाणे कानांसाठी अमृत रसायनच असे ज्यांचे ज्ञानामृत वचन आहे, ज्याचे नाव ``ब्रह्मज्ञान'' आहे, त्यामुळे हे उद्यान नित्य तृप्ती करुन फारच रमणीय असे वाटते. ॥ २३॥ सर्व सौन्दर्य सारैका मातैवास्त्यत्र सौख्यदा । परामर्शकरी सौम्या दैवीसम्पदलङ्कृता ॥ २४॥ अर्थ - (श्री गुरु) सर्व सौंदर्याचे सारच अशी सौख्य प्रदान करणारी माताच आहे असे वाटते. दैवी संपत्तीने अलंकृत अशी सौम्य आणि सर्वप्रकारचा उपदेश देणारी अशी मार्गदर्शिकाच आहे. ॥ २४॥ बहुतृप्तिकरा नित्या, शान्तिनाम्नी मनोहरा । दर्शनादेव साधुभ्यो ज्ञानवैराग्यदा शुभा ॥ २५॥ अर्थ - सदा खूप तृप्ती प्रदान करणारी ``शांती'' नामक मनोहर ज्ञान आणि वैराग्य उत्पन्न करुन (भव सागरांतील माया आणि मोह ह्यांपासून वाचवणारी) केवळ संत सज्जनांच्या दर्शनानेच शुभकारी अशी, गुरुमाऊली ची वाणी आहे. ॥ २५॥ शरच्चन्द्रनिभः स्वच्छः प्रकाशोऽस्याश्च सर्वतः । आनन्दयति सर्वेषां सुगन्धश्चाप्यनुपमः ॥ २६॥ अर्थ - शरद ऋतुतील चंद्र ज्याप्रमाणे सर्वत्र स्वच्छ प्रकाश वितरित करतो त्याप्रमाणे गुरुमाऊलीची कृपामयवाणी सर्वत्र सुखमय सुगंधित अनुपमेय असा आनंद प्रसारित करते. ॥ २६॥ सर्वाः सत्कृतयो नित्यं रूपं धृत्वातिशोभनाः । परिचरन्ति सर्वत्र मनःशुद्धिं वितन्वते ॥ २७॥ अर्थ - सर्व सत्कृती या अत्यंत सुशोभित रूप धारण करुन, नित्य मनःशुद्धिकारक सुविचार प्रसारित करितात. ॥ २७॥ भक्तिश्चात्मानुभूतिश्च तासु मुख्ये समादृते । मुमुक्षूणां हितार्थाय यततेऽत्र दिवानिशम् ॥ २८॥ आत्मानात्मविवेकोऽत्र सतां मांलिहिते रतः । नित्यानित्यविचारोऽपि तेन साकं प्रवर्तते ॥ २९॥ अर्थ - भक्ति आणि अनुभूति ह्या (मनःशुद्धि साठी) विशेष महत्वाच्या आहेत. त्या आत्म -अनात्म -विवेक करण्यांत सतत गुंतलेल्या असतात. रात्रंदिवस त्या मुमुक्षुंच्या हितासाठी प्रयत्न करीत असतात. नित्य शाश्वत् आणि अनित्य अशाश्वत ह्याचा पण विचार ह्या बरोबरच होत असतो. (२८ -२९) दिव्याऽत्रस्था हरिद्वर्णा पावना बहुशर्मदा । विरक्तिरिति विख्याता मुमुक्षाप्रसवैकभूः ॥ ३०॥ अर्थ - ह्या स्थळी अत्यंत तेजस्वी हरिद्वर्णा (हिरव्या आणि सोनेरी रंगाची) पवित्र अत्यंत सुखदायक अशी विरक्ती नामक धरा (जमीन) मुमुक्षु (वितरागी, निर्मोही) रत्नांना प्रसवते. अतीव शोभमाना सा समाधान तृणाङ्कुरैः । आत्मानन्द विधात्री च मृदुस्पर्शा हितावहा. ॥ ३१॥ अर्थ - समाधानरूपी तृणांकुरांनी अतीव नटलेली अतीव सुखावह शुभफलदायी अशी आत्मानंद रूपी देवता विराजित असते. ॥ ३१॥ सुसौम्यवृत्तयः सर्वौः कुरङ्गाश्च समन्ततः । स्वाद्यन्त्यो विचरन्तीह सुकोमलतृणाङ्कुरान् ॥ ३२॥ अर्थ - सुसौम्य वृत्ती अर्थात् सत्त्वगुणी अश्या हरिणशावकांचे येथे अर्थात् मुमुक्षु जनांचे आपल्या (स्वाद्यंत अर्थात स्व+आदि+अंत ह्या वेदांत) विचारांमध्ये बागडणे चालू असते. ॥ ३२॥ किमप्यपूर्व सौन्दर्यं मयूरा निजनर्तनैः । विचरन्तीह ये प्रोक्ता सद्भावा मोक्षमार्गिणाम् ॥ ३३॥ अर्थ - मोक्षमार्गी अर्थात वितरागी वेदांत अभ्यासू जनांचे सुविचाररूप मयूर येथे अत्यंत अपूर्व सौंदर्याने नटून नर्तन करीत असतात. ॥ ३३॥ श्रुतयः कोकिलारूपैर्गायन्ति बहुसुस्वरम् । तत्त्वमसीति वाक्यं तत्स्मारयन्त्येवमेव हि ॥ ३४॥ अर्थ - श्रुति अर्थात वेदशास्त्ररूपी कोकिळा अति मधुर स्वरामध्यें गायन करीत असतात. त्यांत ``तत् त्वं असि'' ह्या मधुर वाक्याचे त्या सतत स्मरण करवीत असतात. त्याचे स्मारक भजन आळवीत असतात. ॥ ३४॥ सत्सङ्कल्प शुकानां यदागतानाञ्च स्वागतम् । हर्षो विवर्धयन्नास्ते मृदुकर्णामृतं मधु ॥ ३५॥ अर्थ - येथे येणाऱ्या सत्संकल्परूपी शुकांचे (पोपटाचे) अर्थात वेदज्ञानेच्छुजनांचे त्या कोकिळा आपल्या सुमधुर कर्णामृताच्या कुकजनाने अत्यंत हर्ष व उल्हासाने स्वागत करीत असतात. ॥ ३५॥ षड्गुणैश्वर्यसम्पन्नश्चेश्वरी ह्यस्य चालकः । येनैव सर्वसौकर्यं प्राप्नुवन्ति मुमुक्षुवः ॥ ३६॥ अर्थ - षड्गुणांनी युक्त (यश श्री ज्ञान वैराग्य सामर्थ्य औदार्य) असा परमेश्वरच ह्यांना चालक आहे. (येनैव -त्याच्या मुळेच भगवत्-कृपा-लेशात वा इति. नारद भक्ति सूत्र) सर्व मुमुक्षुजन आपले कार्य सुलभ रितीने करितात. ॥ ३६॥ शमदमावुभावत्र सूद्यानद्वारि तिष्ठतः । ययो प्रसादतोऽन्तः स्यात्प्रवेशः सुमुमुक्षूणाम् ॥ ३७॥ अर्थ - ह्या अत्यंत पवित्र अश्या उद्यानाच्या दारामध्ये ``शम'' आणि ``दम'' हे दोन नियंत्रक उभे असतात. ह्यांच्या संतुष्टीकरणानंतरच आंत ह्या उद्यानांत प्रवेश मिळतो. ॥ ३७॥ श्रद्धाकार्यलयस्यान्तर्भवेत् प्रथमदर्शनम् । मुमुक्षुरत्र गत्वैव पुरः सरति तत्त्ववित् ॥ ३८॥ अर्थ - श्रद्धा ठेवण्या विषयी निःशंक झाल्यावरच प्रथम दर्शनी स्थिर बुद्धि होवून तत्त्वज्ञानी पुढे पाऊल टाकतो. त्याला भक्तिप्राप्तीचा प्रसाद प्राप्त होवूनच पुढे प्रवेश मिळतो. ॥ ३८॥ अत्र कार्यालये सुप्यग् तितिक्षैका परीक्षिका । तस्याः परीक्षणादूर्ध्व भगिनीवोपरतिर्हि सा ॥ ३९॥ अर्थ - ह्या कार्यालयांत तितिक्षा नावाची एक परिक्षीका आहे. त्या परिक्षीकेनंतर तिचीच एक भगिनी ``उपरति'' ही आहे. ॥ ३९॥ उपसर्प्य मुमुक्षुं तं प्रेम्णा मधुरया गिरा । समाश्वास्य हितोक्त्यैव कारयेच्छान्ति दर्शनम् ॥ ४०॥ अर्थ - ह्या परिक्षेमधून पुढे सरकल्यानंतर मुमुक्षुला आपल्या प्रेमळ वाणीने हितकारी कल्याणकारी अश्या आपल्या वचनांनी आश्वासन देऊन शांति देवता आपले दर्शन देते. ॥ ४०॥ गुरुभक्तेः कुटीराणि सुरम्याणि समन्ततः । मुमुक्षूणां कृते यत्र चिदानन्दायते मनः ॥ ४१॥ अर्थ - त्याच्या आसमंतांत अत्यंत रम्य असे गुरुभक्तिरूपी आश्रम मुक्तिप्राप्तेच्छु (मुमुक्षु) जनांच्या मनाला शाश्वत आनंद प्राप्त करवून देतात. ॥ ४१॥ ब्रह्मानन्दप्रकाशोऽत्र सर्वत्र समवस्थितः । येनात्र परिवर्तन्ते शरीराणि मुमुक्षूणाम् ॥ ४२॥ अर्थ - ब्रह्मानंदाचा प्रकाश येथे सर्वत्र पसरलेला असतो. तो आनंद मुमुक्षु जनांच्या शरीरांत परिवर्तित होतो. ॥ ४२॥ धन्या मुमुक्षुवो येऽत्र स्वेच्छयैव वसन्ति ते । अनन्तानन्दसम्प्राप्तावर्हा भाग्यैकशालिनः ॥ ४३॥ अर्थ - ते मुमुक्षु जन धन्य आहेत की जे येथे स्वेच्छेने परिभ्रमण करतात. त्यांची अखण्ड आनंद प्राप्त करण्याची योग्यता असते. ते अत्यंत भाग्यशाली असतात. गौरवत्वात् गुरुश्चापि बृहत्वात् ब्रह्मचेति वा । अञ्चतिं काशते नित्यं किमप्यात्मेति श्रूयते ॥ ४४॥ अर्थ - गुरुत्वामुळे अर्थात् मोठेपणामुळे जे आहे ते गुरु म्हटले जाते. ब्रह्मत्वामुळे जे आहे ते ब्रह्म म्हटले जाते. आणि सत्कार केले जाते (अंचति) सत् रूपाने असते, तसेच जे प्रकाशित होते ते ``आत्मतत्त्व'' आहे. ॥ ४४॥ सदानन्दघनं स्वच्छमवाङ्मानसगोचरम् । वयं मुमुक्षवः सर्वे तत्साक्षात्कर्तुमुद्यताः ॥ ४५॥ अर्थ - आम्ही सर्वे मुमुक्षुजन त्या निर्मल शाश्वत नित्य आनंदाच्या जे की वाणी आणि मन ह्यापासून अनिवर्चनीय आहे, त्याच्या आकलनकक्षे बाहेर आहोत. त्याचा साक्षात्कार करवून घेण्यास उद्युक्त आहोत. ॥ ४५॥ ब्रह्मज्ञानं विरक्तिर्यद् ब्रह्मानुभवकारणम् । अस्माभिस्तद्विचारोऽत्र क्रियते बालभाषया ॥ ४६॥ अर्थ - त्या ब्रह्मतत्त्वाचा अनुभव होण्यास ब्रह्मज्ञान आणि विरक्ति हे आवश्यक तत्त्व कारणीभूत आहेत. त्याचा आम्ही ह्या बाल भाषेत (अपरिपक्व) भाषेत समजण्याचा दुर्बल प्रयत्न केला आहे. इति श्रीसमर्थरामदासानुगृहित श्रीरामपदपङ्कजभृङ्गायमान श्रीमत्परमहंस परिव्राजकाचार्य भगवता श्री श्रीधरस्वामिना विरचिते मुमुक्षुसखः ग्रन्थे श्रीसद्गुरुस्तवः नाम प्रथम प्रकरणं सम्पूर्णम् ।

२. ब्रह्मणः परमकारणत्वं नाम प्रकरणं द्वितीयम् ।

(ब्रह्मतत्त्वाचे मुख्य कारण, प्रकरण दुसरे) यतो भूतानि जायन्ते येन जीवन्ति सर्वदा । यद्विशन्ति स आनन्दो ब्रह्मैवाहं श्रुतिर्मुदा ॥ १॥ अर्थ - ज्या मुळे सर्व जीव उत्पन्न होतात, ज्या मुळेच सर्व जीव जीवित राहतात, ज्यामध्येच सर्व जीव शेवटी विलीन होतात, तोच परम आनंद म्हणजे ब्रह्मतत्त्वच आहे. असे श्रुति म्हणजे वेद सांगतात (ध्वनित करतात) ॥ १॥ द्विव्याद्यनेकसङ्ख्यानां पूर्वेका वर्तते यथा । भिन्नत्वस्य बहुत्वस्य पूर्वमेकं हि कारणम् ॥ २॥ अर्थ - दोन तीन आदि अनेक संख्यांच्या पूर्वी एकच संख्या असते, त्याप्रमाणे भिन्नता आणि विविधता ह्यापूर्वी सुद्धा एकत्व हेच कारण आहे. ॥ २॥ ब्रह्मैकानन्दरूपं यत्तदुपादानकारणम् । जगतोऽस्य जगच्चैवं कार्यं बहुविधं भिदा ॥ ३॥ अर्थ - ब्रह्मानंदरूपाने जे कारण आहे, तेच ह्या सर्व जगाचे पूर्वी, आणि ह्या सर्व जगतांत आता, त्याचे उत्पत्तीकारण म्हणजे उपादान कारण आहे. जे आता बहुविध प्रकारांत विभाजित दिसत आहे. ॥ ३॥ सर्वपूर्वं भवेद्यत्तत् सर्वकारणमीरितम् । स्वपूर्णे कारणे कार्यं हाटके कटकादिवत् ॥ ४॥ अर्थ - सर्व चराचराचे जे आद्य कारण परिवर्तित झाले आहे ते ब्रह्मतत्त्वच आहे. ज्याप्रमाणे एका सुवर्णापासून कडे (हातांतील एक अलंकार ``कटक'') आदि बनविले जातात जे, ते विविध रूप धारण करतात. अलङ्कारे सुवर्णं सदस्तिभातिप्रियत्वतः । नामरूपादलङ्कारः सोऽपि नेव पृथक्स्थिति ॥ ५॥ अर्थ - ज्याप्रमाणे अलंकारांमध्ये सोने हा मूळ धातु (अस्ति भाति -प्रियत्वं) ह्या मूल तत्त्वातच विद्यमान असतो आणि केवळ त्याचे नाव आणि रूप ह्या वरुनच त्यास वेग वेगळे मानले जाते, परंतु त्यांत सोने हेच एक विद्यमान असते. ॥ ५॥ अस्ति भाति प्रियत्वेन कारणं लक्ष्यते यतः । कारणं हि भवेद् ग्राह्यं कार्यं स्यान्निष्प्रयोजकम् ॥ ६॥ अर्थ - असणे प्रकाशित होणे, प्रिय वाटणे (अस्ति भाति -प्रियत्वं) ह्या प्रकाराने कारण हेच विद्यमान असते. परंतु त्यांचे जे कार्य असते ते ग्राह्य नसून कारण हेच ग्राह्य असते, विचार करण्यास योग्य असते. ॥ ६॥ आनन्दाप्तिहिं हेतुःस्यात् सर्वेषां कर्मणां यतः । आनन्दस्तत एवायं जगत्कारणमुच्यते ॥ ७॥ अर्थ - आनंद प्राप्त करणे हाच सर्व कार्यांचा हेतु असतो, त्याच प्रमाणे ह्या जगांत निर्मितीचा सुद्धा आनंदप्राप्ती हाच हेतु असतो. ॥ ७॥ कार्यं कारण सापेक्षं मृत्सापेक्षो यथा घटः । कार्यान्नानन्दलाभः स्यादानन्दाप्तिस्तु कारणात् ॥ ८॥ अर्थ - कार्य आणि कारण ह्यांत ज्याप्रमाणे (उदा० -घट आणि मृत्तिका दिसते, म्हणजे माती हेच कारण आणि घट हे कार्य ह्यात सुद्धा घट हा नश्वर आणि माती हीच शाश्वत) असा अर्थ आहे. त्याप्रमाणे कार्यामध्ये आनंदप्राप्ति नसून कारणातच आनंद आहे, असे म्हटले आहे. ॥ ८॥ अस्ति भातिप्रियञ्चैव नामरूपञ्च पञ्चकम् । आद्यं त्रयं ब्रह्मरूपं कार्यरूपं ततो द्वयम् ॥ ९॥ अर्थ - अस्ति, भाति, प्रियं, रूपं, नाम ह्या पंचकामध्ये पहिले तीन जे आहेत (अस्ति, भाति, प्रियं) हे ब्रह्मरूप असून नंतरचे दोन नाम रूप हे (अर्थात् सर्व प्राणिमात्रांचे नाम रूप हे) कार्यरूप आहेत. ॥ ९॥ उपेक्ष्य नामरूपे द्वे ह्यधिष्ठानस्य संश्रयात् । अस्तिभाति प्रियत्वं तदानन्दब्रह्मणो भवेत् ॥ १०॥ अर्थ - त्यांतील शेवटचे दोन (नाम, रूप) हे जर सोडले, वगळले तर प्रथम भागांतील तीन (अस्ति, भाति, प्रियं) हे चैतन्यमय आत्मतत्त्वच आहे, हे सदा ``अस्ति'' ह्या रूपांत आहेत. ते जन्माला येते, तेंव्हा त्या रूपात येते. आणि ते ज्याचे त्याला फार प्रिय असते, म्हणून ``प्रियत्व'' रूपांत येते. तर हे ब्रह्मतत्त्वाच्या आनंदांत सम्मिलित होतात, म्हणून हे ब्रह्मानंदच म्हटले जाईल ॥ ११०॥ उत्पत्तिमद्भवेत्कार्यं मनुत्पन्नं तु कारणम् । यज्जन्यं तदनित्यञ्च दुःखं विकृतिमज्जडम् ॥ ११॥ अर्थ - उत्पत्ति रूपाने कार्य प्रकट होते आणि कारण रूपाने जे अनुत्पन्न असते ते सद्रूपाने अस्तित्वातच असते. जे उत्पन्न होणारे असते, ते नाश पण पावतेच, ते अनित्यरूपाने असते, ते दुःख आणि विकृति उत्पन्न करणारे असून त्यांचा तसाच शेवट असतो. ॥ ११॥ एतत्तदुत्तमं सत्यं यत्र किञ्चिन्न जायते । दुःखाभावार्थमेवायं कार्याभावः प्रचक्ष्यते ॥ १२॥ अर्थ - ज्या ठिकाणी कांही उत्पन्न होत नाही ते नित्य विद्यमान असते, ते उत्तम आणि सत्य (सत् अर्थात अविनाशी तत्त्व) असते. जे सत् तत्त्व असते ते चिर असून त्यांत कांहीही कार्य उत्पन्न होत नसून ते उत्तम आहे. त्यांत दुःखाचा अभाव असून तेथे कोठलेच कार्य उत्पन्न होत नाही. ते केवळ आनंद रूपच आहे. ॥ १२॥ यद्यद्धि क्रियते सर्वेशनन्दाप्त्यै तथैव च । दुःखस्य हि निवृत्यर्थ नान्यो हेतुर्हि कर्मणः ॥ १३॥ अर्थ - जे जे कार्य केले जाते ते केवळ आनंदप्राप्ति साठीच केले जाते. दुःखाची निवृत्ती अर्थात दूर करण्यासाठीच केले जाते. आणि दुसरा कोठलाच हेतु नसतो. ॥ १३॥ एकमेवाद्वितीयं यद्ब्रह्मणो लक्ष्यमीयते । तस्मिन्निस्फूर्तिके नित्ये निष्क्रिये किं प्रजायते ॥ १४॥ अर्थ - एकच एक ब्रह्मतत्त्वाने हे सर्व व्याप्त केलेले आहे. त्यांत जर कांहीच स्फुरण उत्पन्न झाले नाहीं, तर काय कार्य उत्पन्न होणार. ॥ १४॥ यदि दुःखनिवृत्यर्थं कार्यं किमपि चेत्तदा । आनन्दब्रह्मणा क्वापि दुःखस्य न हि शक्यता ॥ १५॥ आनन्दे दुःखसद्भावस्तेजसीव तमो यथा । वन्ध्याकुमारवन्नैव मन्तुं सङ्घटते कदा ॥ १६॥ अर्थ - त्या आनंदमय तत्त्वातं दुःख कसे उत्पन्न होईल, तर अंधारत्व आणि प्रकाश हे बरोबर सहकार्याने राहतील कां? किंवा वांझ स्त्रीचा पुत्र हे म्हणजे बरोबर होईल कां? तद्वत् च आनंदस्वरूप ब्रह्मतत्त्वापासून दुःखनिवृत्तिसाठी कांही कार्य संभवत नाहीं. ॥ १५ -१६॥ आनन्दरूपं यद्ब्रह्म तत्कार्यं स्यादसम्भवम् । स्वपूर्णानन्दरूपस्य किं कार्येण प्रयोजनम् ॥ १७॥ अर्थ - नित्य चिर शाश्वत आनंदरूप अखण्ड ब्रह्मापासून कांही कार्य उत्पन्न होणे शक्य नाहीं. जो स्वतःच आनंदरूप आहे, त्यापासून कार्य निष्पत्ति संभवत नाहीं. (कारण कार्य हे नेहमीच आनंद निर्माण व्हावा म्हणून केले जाते) ॥ १७॥ यतः प्रयोजनाभावः कार्योत्पत्ति सम्भवेत् । यदि कार्य विभाव्येत भ्रमपात्रं हि तद्भवेत ॥ १८॥ अर्थ - जर कार्याचे प्रयोजन नाही, हेतुच नाही तर कार्य संभवत नाहीं. आणि जर आहे असे वाटत असेल तर तो भ्रमच असेल. ॥ १८॥ स्थाणौ पुरुषभ्रान्तिस्तु नाधिष्ठानात्पृथक् स्थिता । स्थाणुरेव भवेत्सत्यः पुरुषो रज्जुसर्पवत् ॥ १९॥ अर्थ - एखाद्या लाकडाच्या खोडावर पुरुषाची भ्रांति उत्पन्न झाली (अंधारांत एखादे शुष्क झाडाचे खोड उभं पाहून तेथे कोणी भूतच उभे आहे असा भ्रम उत्पन्न झाला) तर ते त्या ठिकाणी लाकडाचे खोडच उभे आहे, हे खरे अस्तित्व असते आणि पुरुष किंवा भूत हे खरे नसते. ते एखाद्या दोरीलाच साप, साप म्हणून भ्रमित व्हावे तसे असते. ॥ १९॥ रज्जवामसर्पभूतायां रज्जवज्ञानाद्यथा त्वहिः । कार्यशून्ये तथाऽऽनन्देतदज्ञानाज्जगस्त्स्थितिः ॥ २०॥ अर्थ - रज्जु म्हणजे एखाद्या दोरी मध्ये सर्पाचा भ्रम होतो. त्यांतील (सत्य) दोरी असणे हे ज्ञान नसल्यामुळे आम्हास ह्या कार्यशून्य अश्या जगात त्या (भ्रामक) आनंद आणि जगताची प्रतीती होते. खरा आनंद ब्रह्मतत्त्व हे समजत नाही आणि भ्रामक असे हे दुःखपूर्ण जगतच खरे वाटते. ॥ २०॥ एकमेवाद्वयं ब्रह्म स्वतः आनन्दरूपकम् । तदज्ञानावशात्तस्मिन्नत्कार्य प्रतीयते ॥ २१॥ अर्थ - एकमेव ब्रह्मतत्त्वच आनंदरूप आहे. त्याच्या अस्तित्वाच्या अज्ञानानेच त्यातच कार्याचा भास होतो. ॥ २१॥ यदिदं दृष्यते किञ्चिञ्जगत्स्थावरजङ्गमम् । तत्सुषुप्ताविवस्वप्नः सत्यं नैव कदाचन ॥ २२॥ अर्थ - जे कांही स्थावर जंगम जगत (चर, अचर असे) आम्हास दिसते ते सत्य नसून ज्याप्रमाणे आम्हाला झोपेमध्ये स्वप्नसृष्टी दिसते किंवा गाढ झोपेमध्ये ज्याप्रमाणे आम्हाला आपला विसर पडतो तद्वतच भ्रामक आहे. ॥ २२॥ आवृत्या ज्ञानविक्षेपैर्भ्रमकार्यस्य संस्थितिः । आवृत्याज्ञानविक्षेपैर्विहीनं ब्रह्म निष्क्रियम् ॥ २३॥ अर्थ - अज्ञानाच्या विभ्रमस्थितिची पुनरावृत्ति होत राहून ती एक भ्रामक स्थिती बनते. मात्र त्या स्थितित ब्रह्म हे निष्क्रीयच असते आणि भ्रमाचा निरास (निष्कासन) होवून गेल्यावरसुद्धा ते ब्रह्मतत्त्व अविकारीच असते. ॥ २३॥ सच्चिदानन्दरूपत्वादद्वयत्वाच्च सर्वदा । आगमापाय्यसत्कार्यमाकाशकुसुमोपमम् ॥ २४॥ अर्थ - आकाश कुसुम हे ज्याप्रमाणे एक अप्राप्य वस्तु आहे, त्याप्रमाणे सत् चित् आनंदमय असे तत्त्व आहे. त्याचा अनुभव घेणे हे वेदज्ञानप्राप्तिविना असंभव आहे. (न हि ज्ञानेन सदृशं पवित्रमिह विद्यते ॥ गीता ४-३८॥) ॥ २४॥ अज्ञाने बुद्धिविलये जीवेशजगदादयः । सूप्तो नैव प्रतीयन्ते किमुतानन्द ब्रह्मणि ॥ २५॥ अर्थ - अज्ञानाचा ज्ञानामध्ये विलय झाल्याशिवाय जीव -ईश्वर ह्यांतील ब्रह्मानंद कसा प्राप्त होणार? निद्रित अवस्थेत हा ब्रह्मानंद प्राप्त होणार नाहीं. ॥ २५॥ असत्कल्पो विकल्पोऽय विश्वमित्येकवस्तुनि । निर्विकारे निराकरे व्योमवत् कल्पना कुतः ॥ २६॥ अर्थ - अशाश्वत आणि भ्रमपूर्ण अश्या जगामध्ये निर्विकार गगनसदृश असीम अश्या (अफाट ब्रह्मतत्त्वाची) कल्पना कशी करणार? ॥ २६॥ द्रष्टुदर्शन दृष्यादि भावशून्ये निरञ्जने । अद्वितीये परे तत्त्वे निर्विशेषे भिदा कुतः ॥ २७॥ अर्थ - दृष्य दृष्टा आणि दर्शन ह्या विभाजित तीन गोष्टी (दृष्य बघणारा आणि बघण्याची क्रिया) त्या अद्वितीय भावशून्य आणि निर्मल (निरंजन) अश्या ब्रह्मतत्त्वांत कश्या शक्य आहेत. ॥ २७॥ एकात्मके परे तत्त्वे भेदकर्ता कथं वसेत् । सुषुप्तौ सुखमात्रायं भेदः केनावलोकितः ॥ २८॥ अर्थ - एकात्मक अश्या परमतत्त्वामध्ये भेद उत्पन्न करणारा कसा विराजमान होईल? सुषुप्त अश्या गाढ स्पप्नरहित निद्रेमध्ये दुसरा कोणी अनुभूत होतो कां? मायावरणरुढोऽयं त्वज्ञानभवपादपः ईशः प्रकाण्डयुक्तोऽयं त्वज्ञानभवपादपः ॥ २९॥ अर्थ - अज्ञानरूपी वृक्ष (अहं आणि ब्रह्माचे ज्ञान नसलेले) म्हणजे हे भव म्हणजे अर्थात आम्हाला आमच्या चर्मचक्षूंना जे अनुभवास येते ते जग मायारूपी पडद्याआड जो भ्रामक आहे अश्या पडद्याआड गुंडाळलेले असून तसे भासते. ह्या प्रचण्ड वृक्षाच्या विशाल खोडावर ईश्वर जीवरूपाने आवेष्टित होवून विराजित असतो. ॥ २९॥ बहुभिः पदार्थपर्णेश्च वासनापुष्पसुन्दरः । बहुजन्मफलोत्कीर्णः संसार इति विश्रुतः ॥ ३०॥ अर्थ - अनेक पदार्थरूपी पत्र (पाने) अनेक वासनारूपी पुष्प आणि बहुतसे जन्म घेणारी जीवयोनी ह्यांनी नटलेला हा वृक्ष संसार म्हणून प्रसिद्ध आहे. ॥ ३०॥ ईक्षणादि प्रवेशान्ता सृष्टिरीशेन कल्पिता । जागृदादि विमोक्षान्तः संसारी जीवकल्पिता ॥ ३१॥ अर्थ - ईश्वराने ईक्षणाने संकल्पाने ही सृष्टी निर्माण केली. जागृति आदि अवस्थेनंतर मोक्षादि कल्पनांची सृष्टी निर्माण झाली. ही जीवकल्पना म्हणजे संसार आहे. ॥ ३१॥ कल्पनामात्रका सृष्टिर्नानन्दाय कदाचन । कल्पितान्नेन किं तृप्तिर्भजते कोऽपि मानवः ॥ ३२॥ अर्थ - भ्रामक अशी ही कल्पनामय सृष्टी आनंदप्राप्तीसाठी, शाश्वत् आनंद प्रदान करायासाठी समर्थ नाहीं. ह्या अशाश्वत अश्या कल्पित जगापासून तृप्ती कशी मिळणार? अज्ञानोभ्दासितावेतौ जीवेशाविति विभ्रमौ । निर्विकारेऽखिलाधारे न स्तस्तौ ब्रह्मणि क्वचित् ॥ ३३॥ अर्थ - अज्ञानांत उत्पन्न होणाऱ्या ह्या जीवाला आणि संसाराला (जे की भ्रमानेच उत्पन्न झाले आहेत) त्यांत ब्रह्मतत्त्व सांपडत नाही. (अर्थात् ते ब्रह्मतत्त्वांत बसत नाहीं।) ॥ ३३॥ तस्मान्मुमुक्षुभिर्नेवमतिर्जीवेशवादयोः । कार्या किन्तु ब्रह्मतत्त्वं निश्चलेन विचार्यताम् ॥ ३४॥ अर्थ - मुमुक्षुद्वारे त्या ब्रह्मतत्त्वाचा निश्चल, अविचल दृष्टीने विचार करावयास हवा. अर्थात् त्यांनी जीव आणि जगत् ह्या विचारांत गुंतून पडू नये. ॥ ३४॥ अद्वितीय ब्रह्मतत्त्वं न जानन्ति यथातथा । भ्रान्ता एवाखिलास्तेषां क्व मुक्तिः क्वे ह वा सुखम् ॥ ३५॥ अर्थ - अद्वितीय ब्रह्मतत्त्व जे जाणत नाहीं त्यांना (अर्थात जे शरीर हेच जीव आहे, असे मानतात) सुख व मुक्ति कोठून मिळणार? ते सर्व जीवनभर ह्या संसारांत आणि शरीरांतच भ्रमण करीत राहतात. ॥ ३५॥ कार्याभावः स्वाभावोऽयं ब्रह्मणः खलु शाश्वतः । तथापि भाति चेत्कार्यमन्यथा भाव एव सः ॥ ३६॥ अर्थ - शाश्वत ब्रह्माचा कार्य न करणारा असा (अकर्तृत्वभाव) नित्यच आहे. तरीही हे पण त्याचे कार्य आहे, असा भास होतो. ते एक वेगळेच वाटणे (भाव) आहे. ॥ ३६॥ अन्यथा भाव एवं हि भ्रम इत्युच्यते बुधैः । न भूत्वा भासते यच्च भ्रमकार्यं हि तन्मतम् ॥ ३७॥ अर्थ - दुसरा जो हा भाव आहे त्याला ज्ञाते लोक भ्रम असे म्हणतात. जे अस्तित्वांत नसूनही भासते, त्यास भ्रम असे म्हणतात. ॥ ३७॥ न भासतेऽन्यथा कार्यं सत्यस्यावरणं विना । तस्माद् ब्रह्मणोऽवरणं विश्वकार्यंस्य कारणम् ॥ ३८॥ अर्थ - सत्य अर्थात् जे निश्चितरूपाने आहे, ते ब्रह्मतत्त्व, त्यावरील आवरणामुळे भ्रमरूपी पडदा पडल्यामुळे जाणवत नाही, आणि विश्व भासण्याचे कारण हा भ्रमरूपी पडदाच आहे. ॥ ३८॥ इदमावरणं केश्चिन्मायेति प्रविभाव्यते । नावृत्ति ब्रह्मणः काचिदन्याभावादनावृतम् ॥ ३९॥ अर्थ - कुणी ह्या आवरणास (कैःचित्) माया असे म्हणतात. ही ब्रह्मतत्त्वाची पुनरावृत्ति नसून ते भ्रमरूपी पडद्यामुळे झांकलेले तत्त्व म्हणजे ``माया''च आहे. ॥ ३९॥ तथापि भान्ति चेदस्य स्यादज्ञानं हि कारणम् । विश्वसर्जनसङ्कल्पे विक्षेपोऽज्ञानतस्ततः ॥ ४०॥ अर्थ - तथापि ते प्रकाशित होते, अर्थात आम्हास दिसते ते अज्ञान, ह्या कारणामुळेच ! विश्वोत्पत्तिच्या वेळी (जो निर्मितीस कारण संकल्प होता) तो विक्षेप अज्ञानामुळेच उत्पन्न झाला. ॥ ४०॥ अज्ञान ब्रह्मणश्चैवं जगत्कारणमीर्यते । इतो दुःखस्य सम्प्राप्तिरानन्देच्छा च जायते ॥ ४१॥ अर्थ - ब्रह्मतत्त्वाचे अज्ञान हेच जगताचे कारण आहे. त्यामुळेच जगामध्ये दुःखप्राप्ती आणि आनंदाची इच्छा उत्पन्न होते. ॥ ४१॥ आनन्दस्य हि सम्प्राप्तिर्जगत्कारण ब्रह्मणः । कार्यान्नैवेति या बुद्धिस्तज्ज्ञानमिति कथ्यते ॥ ४२॥ अर्थ - जगताचे कारण जे ब्रह्मतत्त्व तेच आनंदाचे मूळ (स्रोत) कारण आहे, आनंदाच्या उत्पत्तिचे उगमस्थान आहे, हे समजले म्हणजे ज्ञान असे म्हटले जाते. कोठल्याही कार्यापासून त्या आनंदाची प्राप्ती होत नाही. (अर्थात् वेदांत विषयांत महान् मनीषींद्वार असे म्हटले जाते।) ॥ ४२॥ कार्यादेव भवेत्प्राप्तिरानन्दस्य न चान्यथा । मत्वेत्थं भोगबुद्धिर्या सैवाज्ञानमिहोच्यते ॥ ४३॥ अर्थ - कार्यापासूनच आनंदाची प्राप्ती होते, अन्यथा नाही. अशी जी भोग बुद्धि तिलाच अज्ञान असे म्हटले आहे. ॥ ४३॥ सर्वदुःखनिधानन्तत्कारणाज्ञानमेव हि । तेनानन्दस्य सम्प्राप्तेर्भ्रमःकार्ये प्रजायते ॥ ४४॥ अर्थ - सर्व दुःखाचे घर म्हणजे अज्ञानच आहे. त्यामुळे सर्व आनंदप्राप्तीचे भ्रामक कार्य उत्पन्न होते. अर्थात तसे प्रयत्न केले जातात. ॥ ४४॥ गुञ्जापुञ्जो न चाग्निः स्यादन्यारोपित वन्हिना । तथानन्दो न कार्यं स्यात्तस्मिन्नारोपितेऽपि च ॥ ४५॥ अर्थ - लाल रंगाची कंदमुळे म्हणजे कांही नेहमी अग्निच नसतो. कांही गाजर, लसूण आदि लाल रंगाची कंदमुळे असतात. तो रंग अग्निचा भ्रम पण उत्पन्न करु शकतो. त्याप्रमाणे (एखादा कार्याचा परिणाम) हा , आपण त्यावर जरी आनंद आहे, असा आरोप केला तरी, म्हणजे चुकून त्यांत आनंद मानला तरी तो खरा आनंद नसतो. ॥ ४५॥ (गीता १८ -३८) आनन्दावरणेनैव कार्योत्पत्तिर्यदा भवेत् । आनन्दावृत्तिवृद्धिः स्यात्कार्यस्य सुखबुद्धितः ॥ ४६॥ अर्थ - वरवर जरी आनंदाचे आवरण असले तरी असे कार्य केल्यावर त्या कार्यापासून सुख वाढेल असे वाटते . (राजस वृत्ती) ॥ ४६॥ आनन्दावरणाद्दुःखः सहजं भवति ध्रुवम् । तस्मादावृत्तिनाशार्थ यत्नः कार्यो मुमुक्षुभिः ॥ ४७॥ अर्थ - वरवर जरी आनंदाचे आवरण असले तरी त्या खालील दुःख हे कार्यानंतर निश्चितच असते. सुखप्राप्तीच्या बुद्धिने ते कार्य केले जाते. त्यासाठी मुमुक्षु साधकाला शाश्वत सुखासाठी त्या भ्रामक आवरणाच्या भेदनाचा प्रयत्न केला पाहिजे. ॥ ४७॥ आनन्दावरणापाये मेघापाये यथा रविः । प्रत्यक्षं भवति बह्म स्वयमानन्दरूपतः ॥ ४८॥ अर्थ - आनंदावरील भ्रामक आवरण दूर झाल्यावर ज्याप्रमाणे मेघांमुळे सूर्य आच्छादित झाल्यावर दिसत नाही, पण त्यावरील ते झाकण अभ्रे दूर झाल्यावर सूर्यदर्शन स्पष्ट होते, (कारण सूर्य हा तेथेच स्थित असतो पण आपल्या दृष्टिसमोर ढगांचा पडदा पडतो।) त्याप्रमाणे खरे सुख म्हणजे ब्रह्मतत्त्व स्पष्ट व स्वतःच आनंदस्वरूप असते जेव्हां ते अनुभूत होते. जाणवते. ॥ ४८॥ आवृत्तेनशिनादूर्ध्वं नो यत्नोऽज्ञाननाशने । स्वयं दर्शनिशान्ते तु तत्तमोऽपि हि नश्यति ॥ ४९॥ अर्थ - अज्ञाननाशासाठी केलेला आमचा प्रयत्न जेंव्हा त्या भ्रमरूप पडद्याला वर उचलतो तेंव्हा स्वतः रात्र समाप्तीनंतर अंधःकार दूर होतो तद्वत अज्ञान लुप्त होवून ज्ञान अवतरते. ॥ ४९॥ तावद्विषयभोगेच्छां यावदज्ञानसंस्थितिः । नष्टेऽज्ञाने स्वयं नश्येच्छान्ताग्नौ च यथेन्दनम् ॥ ५०॥ अर्थ - जोपर्यंत अज्ञानाचा पडदा आपल्यावर असतो. तो पर्यंत भोगेच्छा (पंचज्ञानेंद्रियांना खाद्य पुरविण्याची हाव) असते. अज्ञान नष्ट झाल्यावर त्या स्थितीत आपोआपच नैसर्गिकरीत्या शांति प्राप्त होते. अर्थात भडकलेल्या अग्नित आपण आहूती (इंधन, जळण) देणे बंद केल्यावर तो अग्नि शांतच होतो. (तद्वत आपल्या मनाला शांति प्राप्त होते।) ॥ ५०॥ इति श्रीसमर्थरामदासानुगृहित श्रीरामपदपङ्कजभृङ्गायमान श्रीमत्परमहंस परिव्राजकाचार्य भगवता श्री श्रीधरस्वामिना विरचिते मुमुक्षुसखः ग्रन्थे ब्रह्मणः परमकारणत्वं नाम द्वितीय प्रकरणं सम्पूर्णम् ।

३. भोगानां दुःखकारणत्वं नाम प्रकरणं तृतीयम्

(भोगांमधीन दुःखाचे कारणः -) (भोग म्हणजे उपभोग घेणे, त्यांतील आनन्द घेणे व नन्तर परिणामी दुःख सहन करणे ।) भोग एव महारोगा विषं विषयजं सुखम् । वासनावृद्धितो भोगः भोगवृद्ध्याच वासना ॥ १॥ अर्थ - भोग म्हणजे विषयांपासून मिळणारा आनंद घेणे व परिणामी दुःख भोगणे हाच एक महारोग असून पंचेंद्रियांना ते ते भोग पुरविल्याने त्या -त्या वासनांची वृद्धि होते आणि त्या -त्या वासनांमुळे तो तो भोग पण वाढतो. ॥ १॥ जनिमत्पदार्थभोगेच्छा या सा विषयवासना । अनेक जन्म हेतुःस्याज्जन्मतो दुःखमेव हि ॥ २॥ अर्थ - भौतिक पदार्थांच्या भोगाची इच्छा ही ती वासना असते. आणि अनेक जन्म घ्यावे लागण्याची ती एक निश्चत कारणीभूत होणारी गोष्ट असून तेच खरे दुःखाचे कारण आहे. ॥ २॥ घटियन्त्रामिवावृत्तिर्दुःखानां जन्मनां यतः । कार्यमात्रे सुखेच्छा या त्याज्यैव भवति ध्रुवम् ॥ ३॥ अर्थ - घड्याळाचा काटा ज्याप्रमाणे पुनःपुनः त्याच चक्राकार स्थानावर फिरतो त्याप्रमाणे दुःख आणि पुनर्जन्म ह्याची पुनःपुनः आवृत्ति होते. ॥ ३॥ विहाय ब्रह्मचैतन्य सुखार्थं यद्बहिर्मुखम् । मनोविषयमन्वेति तद्दुःखाय प्रकल्पते ॥ ४॥ अर्थ - ब्रह्मचैतन्यरूपी सुख सोडून विषयांपासून सुखप्राप्ती करण्याच्या मागे लागलेले मन हे अंतराबाहेरील गोष्टींचा पाठलाग करुन दुःखच प्राप्त करते. मनो हि द्विविधं प्रोक्तं शुद्धी चा शुद्धमेव च । अशुद्धं कामसङ्कल्पं शुद्धं कामविवर्जितम् ॥ ५॥ अर्थ - मन हे दोन प्रकारचा संकल्प करीत असते, एक तर शुद्ध संकल्प आणि दुसरा अशुद्ध संकल्प. जो संकल्प काम म्हणजे वासनेसाठी असतो तो अशुद्ध संकल्प होय, आणि जो निष्काम वासनारहित तो शुद्ध संकल्प म्हटला जातो. ॥ ५॥ मन एव मनुष्याणां कारणं बन्धमोक्षयोः । बन्धाय विषयासक्तं मुक्त्यैनिर्विषयः स्मृतम् ॥ ६॥ अर्थ - मन हेच माणसाच्या बद्ध आणि मुक्त अवस्थेला कारण समजले जाते. बद्ध मन हे विषयांमध्येच गुंतलेले असते. आणि मुक्तमन हे विषयांपासून वासनारहित राहून अविकारी राहते. ॥ ६॥ यतो निर्विषयस्यास्य मनसो मुक्तिरिष्यते । तस्मान्निर्विषयस्यास्य नित्यं मनः कार्यं मुमुक्षुणा ॥ ७॥ अर्थ - निर्विषय झालेले मन हे मुक्तिसाठी प्रयत्न करुन त्या दिशेने वाटचाल करते. आणि म्हणून मुमुक्षुने नेहमी निर्विषय राहूनच कार्य करावे. ॥ ७॥ निरस्त विषयासङ्ग सान्निरुद्धं मनो हृदि । यदा यात्युन्मनीभावं तदातत्परमं पदम् ॥ ८॥ अर्थ - ज्या वेळेस मन हे विषयांचा संग सोडून हृदयामध्ये उन्मनी भाव धारण करुन स्थित होते तेंव्हाच ते परमपद प्राप्त करते. ॥ ८॥ तावदेवनिरोद्धव्यं यावद् हृदिगतं क्षयम् । एतज्ज्ञानं च मोक्षं च अतोऽन्यो ग्रन्थविस्तरः ॥ ९॥ अर्थ - तो पर्यंत हा निरोध करावा, जो पर्यंत खोलवरच्या हृदयांतील वासना नष्ट होत नाहीत. आणि त्या कामनांचा त्याग करावा आणि हीच ती ज्ञानप्राप्तीची अवस्था आहे, बाकी सगळा नुसता ग्रंथविस्तारच आहे. ॥ ९॥ यन्मनस्त्रिजगत्सृष्टि स्थितिव्यसनकर्मकृत । तन्मनो विलय याति तद्विष्णोः परमं पदम् ॥ १०॥ अर्थ - ज्या स्थितिमुळे त्रिलोकांत (स्वर्ग, भू, पाताळ) जन्म येतो तो आपल्या कर्मामुळे येतो. पण जर मन इच्छारहित झाले तर जी निर्विकार स्थिती निर्माण होते, त्यामुळे विष्णुचे परमपद म्हणजे स्थिर ध्रुव स्थिति प्राप्त होते. ॥ १०॥ सङ्कल्पप्रभवान्कामांस्त्यक्त्वा सर्वानशेषतः । मनसैवेन्द्रियग्रामं विनियम्य समन्ततः ॥ ११॥ शनैः शनैरुपरमेद बुद्ध्या धृतिगृहितया । आत्मसंस्थं मनःकृत्वा न किञ्चिचदपि चिन्तयेत् ॥ १२॥ अर्थ - सर्व कामनांचा त्याग करुन वासनाशून्य अश्या मनाचा लाभ घेण्यास मनाचा पक्का निश्चय करुन, मनानेच सर्व इंद्रिय समूहाचा ताबा घेवून (नियंत्रित करुन) हळूं हळूं बुद्धिमध्यें धैर्य प्राप्त करुन कोंडून (धारण करुन) दुसरे कांही ही चिंतन करु नयें ॥ ११ -१२॥ यतो यतो निश्चिरति मनश्चञ्चलमस्थिरम् । ततस्ततो नियम्यैतदात्मन्येव वशं नयेत् ॥ १३॥ अर्थ - जसजसे मन चंचलपणा सोडून स्थिर होत जाते, तसतसे ह्याला नियंत्रित करुन आत्मस्थिति मध्ये विलीन करावें. ॥ १३॥ प्रशान्तमनसं ह्येनं योगिनं सुखमुत्तमम् । उपैति शान्तरजसं ब्रह्मभूतमकल्मषम् ॥ १४॥ अर्थ - प्रशांत अश्या निष्काम मनाच्या अवस्थेतच योगी लोकांचे मन आनंदित होते आणि राजस् गुण (चंचलता) शांत होवून निर्मल अश्या शांत ब्रह्मस्थितित ते स्तब्ध होते. ॥ १४॥ आत्मानं रथिनं विद्याच्छरीरं रथमेव तु । बुद्धि तु सारथिं विद्यान्मनः प्रग्रहमेवच ॥ १५॥ अर्थ - बुद्धिला सारथी म्हणून मन हाच लगाम आहे. इंद्रिय हे घोडे असून विषय हे त्यांचे (चरण्याचे) कुरण आहे. शरीर हा रथ असून आत्मा हा त्यांतील सवार यात्री आहे. अशी कल्पना आहे. ॥ १५॥ इन्द्रियाणि हयान्नाहुर्विषयांस्तेषु गोचरान् । आत्मेन्द्रियमनोयुक्तं भोक्तेत्याहुर्मनीषिणः ॥ १६॥ अर्थ - इंद्रिय (नेत्र, घ्राण, कर्ण, रसना, स्पर्श) हे पंचेंद्रिय, हे त्या रथाचे घोडे असून त्यांना चरण्यासाठी विषय हे हिरवेगार रान, मैदान आहे. आत्मा हा इंद्रिय आणि मनोयुक्त होवून त्यांचा भोग घेणारा म्हणजे भोक्ता आहे, असे ज्ञानी मनीषी म्हणतात. ॥ १६॥ यस्त्वविज्ञानवान्भवत्ययुक्तेन मनसा सदा । तस्येन्द्रियाण्यवश्यानि दुष्टाश्वा इव सारथेः ॥ १७॥ अर्थ - जो सदा अविद्यायुक्त अज्ञानी मनाने नित्य वेगळयाच प्रकारे म्हणजे विषयी होवून राहतो, तो मोकाट आणि बेभान घोड्यावर बसून दिशाहीन यात्री स्वारासारखा भटकत जातो. ॥ १७॥ यस्तु विज्ञानवान्भवति युक्तेन मनसा सदा । तस्येन्द्रियाणि वश्यानी सदश्वा इव सारथेः ॥ १८॥ अर्थ - जो विद्यावान् होवून योग्य अश्या मनःस्थितिने इंद्रियांना आपल्या ताब्यात ठेवून राहतो, तो नियंत्रीत घोड्यावरील स्वारासारखा योग्य दिशेला जातो. ॥ १८॥ यस्त्वविज्ञानवान्भवत्यमनस्कः सदाऽशुचिः । न स तत्पदमाप्नोति संसारं चाधिगच्छति ॥ १९॥ अर्थ - जो अविद्याग्रस्त होवून नित्य विमनस्क आणि अपवित्र अश्या मनःस्थितित राहतो, तो ते विष्णुपद प्राप्त करीत नाहीं. आणि पुनःपुनः संसार चक्रांत फसतो. ॥ १९॥ यस्तु विज्ञानवान्भवति समनस्कः सदा शुचिः । स तु तत्पदमाप्नोति यस्माद्भूयो न जायते ॥ २०॥ अर्थ - जो आत्मविद्या प्राप्त करुन सत्त्वयुक्त अंतःकरणाने पवित्र व विचारी होवून ते ध्रुवपद प्राप्त करतो तो पुनःपुनः जन्ममरणाच्या चक्रांत पडत नाहीं. ॥ २०॥ विज्ञानसारथिर्यस्तु मनः प्रग्रहवान्नरः । सोऽध्वनः पारमाप्नोति तद्विष्णोः परमं पदम् ॥ २१॥ अर्थ - विज्ञानयुक्त असा जो सारथी असतो तो, आणि ज्याचे मन हे नियंत्रित अश्या लगामाने (दोरीने) बरोबर ताब्यात आहे, तो महान् अश्या मार्गाने जाऊन तो परम पद म्हणजे विष्णुपद प्राप्त करतो. ॥ २१॥ इन्द्रियेभ्यः पराह्यर्था अर्थेभ्यश्च परं मनः । मनसस्तु परा बुद्धिर्बुद्धेरात्मा महान्परः ॥ २२॥ अर्थ - इंद्रियांपेक्षा कामना इच्छा ह्या समर्थ आहेत, कामनांपेक्षा मन हे श्रेष्ठ आहे आणि मनापेक्षा बुद्धि श्रेष्ठ आहे, बुद्धिपेक्षा आत्मतत्त्व श्रेष्ठ आहे. ॥ २२॥ महतः परमव्यक्तमव्यक्तात्पुरुषः परः । पुरुषान्नपर किञ्चिचत्सा काष्ठा सा परा गतिः ॥ २३॥ अर्थ - महत् तत्त्वापेक्षा अव्यक्त तत्त्व श्रेष्ठ आहे. आणि त्या पुरुषतत्त्वापेक्षा कांहीही श्रेष्ठ नसून ती स्थितीच परमगति आहे. ॥ २३॥ एष सर्वेषु भूतेषु गुढोऽऽत्मा न प्रकाशते । दृष्यते त्वय्यया बुद्ध्या सूक्ष्मया सूक्ष्मदर्शिभिः ॥ २४॥ अर्थ - गूढ असे आत्मतत्त्व ह्या सर्वप्राणीमात्रांमध्ये एकदम असे दिसत नाहीं. सूक्ष्मदर्शी अश्या तीक्ष्ण बुद्धिनेच ते जाणवते. ॥ २४॥ यच्छेद्वाङ्मनसी प्राज्ञस्तद्यच्छेज्ज्ञान आत्मनि । ज्ञानमात्मनि महति नियच्छेच्छान्त आत्मनि ॥ २५॥ अर्थ - जर प्राज्ञ आणि ज्ञानवान साधक (उपर्युक्त गूढ आत्मतत्त्व) आपल्या वाणीत आणि मनांत शोधू इच्छित असेल तर त्याने आपले मन शांत स्थितित धारण करावें. ॥ २५॥ इन्द्रियाणां विचरतां विषयेष्वपहारिषु । संयमे यत्नमातिष्ठेद्विद्वान यन्तेव वाजिनाम् ॥ २६॥ अर्थ - मनोमनी विषयां मध्ये विहार करतांना त्या मनाचेच अपहरण होते, त्या मनात ज्याप्रमाणे मोकाट सुटलेल्या घोडयांना त्यावरील चतुर स्वार आपल्या ताब्यामध्ये नियंत्रणांत ठेवतो तसे विद्वानाने आपले मन नियंत्रित ठेवावे. ॥ २६॥ इन्द्रियाणां प्रसङ्गेन दोषमृच्छत्यसंशयम् । सान्नियम्य तु तान्येव ततःसिद्धिं नियच्छति ॥ २७॥ अर्थ - इंद्रिय सक्रिय झाल्यावर दोष उत्पन्न होतात, दिसू लागतात, त्यांचे संयमन करुन नंतरच सिद्धि प्राप्त होते. ॥ २७॥ न जातु -कामःकामानामपभोगेन शाम्यति । हविषा कृष्णवर्त्मेव भूय एवाभिवर्धते ॥ २८॥ अर्थ - केंव्हाही काम आणि कामना ह्या उपभोगाने शमित होत नाहीत. आहुति दिल्यावर अग्नि हा जास्तच भडकतो. ॥ २८॥ यश्चैतान्प्राप्नुयात्सर्वान् यश्चैतान्केवलांस्त्यजेत् । प्रापणात्सर्वकामानां परित्यागो विशिष्यते ॥ २९॥ अर्थ - जो ह्या कामनांना सर्वर्थाने प्राप्त करुन घेतो आणि जो ह्यांचा सर्वशः त्याग करतो त्या दोघांमध्ये त्यागी हाच सर्वश्रेष्ठ आहे. ॥ २९॥ न तथैतानि शक्यन्ते सन्नियन्तुमसेवया । विषयेषु प्रजुष्टानि यथा ज्ञानेन नित्यशः ॥ ३०॥ अर्थ - हे विषय (वासना) केवळ त्यांचे सेवन करुन आनंदप्राप्ती करुन देत नाहीं, त्यांचे नियंत्रण होत नाही, तर केवळ ज्ञानानेच त्यांचे शमन होते. ॥ ३०॥ श्रुत्वा स्पृष्ट्वा च दृष्ट्वा च भुक्त्वा ध्रात्वा च यो नरः । न हृष्यति ग्लायति वा स विज्ञेयो जितेन्द्रियः ॥ ३१॥ अर्थ - जो माणूस ह्या विषयांचे ऐकून, बघून, स्पर्शकरुन, धारण करुन आनंदित होत नाहीं किंवा त्यास ग्लानी होत नाहीं तो स्थिरधी, जितेंद्रीय जाणावा. ॥ ३१॥ इन्द्रियाणां तु सर्वेषां यद्येकं क्षरतीन्द्रियम् । तेनास्य क्षरति प्रज्ञा दृतेः पादादिवोदकम् ॥ ३२॥ अर्थ - सर्व इंद्रियांमधून एक जरी इंद्रिय ढळले, अर्थात त्यांत विकार उत्पन्न झाला, तर ज्याप्रमाणे पायावर टाकलेले पाणी थेट खाली जमीनीकडेच येते, त्याप्रमाणे त्या साधकाची बुद्धि क्षरित (क्षीण) होते. ॥ ३२॥ यस्तुजातपदार्थेभ्यः सुखमिच्छति मानवः । ग्राहं दारुधिता धृत्वा तर्तुमब्धिं स ईहते ॥ ३३॥ अर्थ - मनुष्य जर ह्या भौतिक युगात (जात- उत्पन्न झालेले - ऐहिक) पदार्थापासून सुख मिळेल असे समजून त्याच्या मागे लागला तर एखादा माणूस आत्मघातकी होईल. कसा? तर ज्याप्रमाणे समुद्रांत पडल्यावर (जीव वाचवण्यासाठी) पोहत जातांना एखाद्या काळया व कठिण धोंडाला लाकूड म्हणून समजला आणि भ्रमित होवून मगरालाच जाऊन पकडू लागला तर तो आत्मघाती होईल व तसे ते अशक्य आत्मघातकी होईल. ॥ ३३॥ आदिमध्यावसानेषु दुःखं सर्वमिदं यतः । तस्मात्सर्वं परित्यज्य तत्त्वनिष्ठो भवेत्सुधीः ॥ ३४॥ अर्थ - आदि, मध्य आणि अंत ह्या तिन्ही स्थितित हे दुःख पर्यवसायीच आहे, म्हणून तत्त्वनिष्ठ सुबुद्ध साधकाने ह्या सर्वांचा त्याग करुन सुखी व्हावें. ॥ ३४॥ अविद्यातिमिरातीतं सर्वाभासविवर्जितम् । आनन्दममलं नित्यं मनोवाचामगोचरम् ॥ ३५॥ सत्यं ज्ञानमनन्तं यत् परब्रह्मसनातनम् । तदहं तदहं चेति स्वात्मानं भावयेत्सुधीः ॥ ३६॥ अर्थ - अविद्या आणि अंधकाराच्या पलीकडील सर्व भ्रमापासून दूर शाश्वत निर्मळ अश्या वाणी आणि मनाला अनाकलनीय ते सत्य अनंत परब्रह्म सनातन ``ब्रह्मतत्त्वच''मी आहे (तदहम्) तेच माझ्या अंतरंगात आहे, असे सुबुद्ध साधकाने जाणावें ॥ ३५ -३६॥ इति श्रीसमर्थरामदासानुगृहित श्रीरामपदपङ्कजभृङ्गायमान श्रीमत्परमहंस परिव्राजकाचार्य भगवता श्री श्रीधरस्वामिना विरचिते मुमुक्षुसखः ग्रन्थे भोगानां दुःख कारणत्वं नाम तृतीय प्रकरणं सम्पूर्णम् ।

४. ब्रह्मज्ञानेन परमानन्दप्राप्तिनाम प्रकरणं चतुर्थम्

(ब्रह्माज्ञानाने आनन्दाची प्राप्ती - प्रकरण चौथे) स एष जगतः साक्षी सर्वात्मा विमलाकृतिः । प्रतिष्ठा सर्वभूतानां प्रज्ञानघलक्षणः ॥ १॥ अर्थ - तो सर्वात्मा निर्मळ, अश्या शुद्ध स्वरूपाचा असून ह्या जगाचा साक्षी आहे. सर्वप्राणीमात्रांमधील प्रज्ञारूप असे मोठे प्रतिष्ठापूर्ण लक्षण म्हणजे आपल्या मधील आत्मतत्त्वाचे भान होवून ``अहं अस्मि''हे वाटणे जाणवते. ॥ १॥ न कर्मणा न प्रजया न चान्येनापि केनचित् । ब्रह्मवेदनमात्रेण ब्रह्मात्नोत्येव मानवः ॥ २॥ अर्थ - कुठल्याही कर्माने नाहीं, किंवा कुठल्याही जन्मयोनी मुळे नाहीं, पण केवळ ब्रह्मतत्त्व जाणल्यामुळे, त्या तत्त्वाचे ज्ञान अनुभवल्यामुळे तो साधक ब्रह्मतत्त्व प्राप्त करुन घेतो. ॥ २॥ तद्विद्याविषयं ब्रह्म सत्यज्ञानसुखाद्वयम् । संसारे च गुहावाच्ये माया ज्ञानादि संज्ञके ॥ ३॥ अर्थ - त्या ब्रह्मतत्त्वाचा विषय म्हणजे सत्य आणि अद्वय ज्ञान. आणि हेच अद्वय ज्ञान अर्थात् एकमात्र सौख्य आहे. परंतु संसाररूपी गुफे मध्ये भौतिक ज्ञान हे एक ज्ञान म्हटले जाते. ॥ ३॥ निहितं ब्रह्म यो वेद परमे व्योम्निसंज्ञिते । सोऽश्नुते सकरान्कामान् क्रमेणैव द्विजोत्तमः ॥ ४॥ अर्थ - तो द्विजोत्तम म्हणजे, विद्वानांतील, महाविद्वान - हा त्या परमव्योमामधील अदृश्य अश्या ब्रह्मतत्त्वाला जाणतो आणि तोच क्रमाने त्या ब्रह्मतत्त्वांतील आनंदाचा आस्वाद घेतो. ॥ ४॥ प्रत्यगात्मानमज्ञान मायाशक्तेश्च साक्षिणम् । एकं ब्रह्माहमस्मीति ब्रह्मैव भवति स्वयम् ॥ ५॥ अर्थ - माया शक्तिचे जे साक्षी आहे, ते ``अहं'' तत्त्व (जे आमच्यामध्ये ``मी आहे''असे जे भान) ते ब्रह्मतत्त्वाचा साक्षात्कार झाल्यावर केवळ एक ब्रह्मतत्त्वच अस्तित्वांत आहे हे जाणून स्वतः ब्रह्मस्वरूप होते. ॥ ५॥ ब्रह्मभूतात्मनस्तस्मादेतस्माच्छक्तिमाश्रिताम् । अपञ्चीकृत आकाशः सम्भूतो रज्जुसर्पवत् ॥ ६॥ अर्थ - ह्या ब्रह्मभूत अर्थात् ब्रह्मस्वरूप शक्तिपासून हे आकाश निर्माण होते. आणि मग ते सर्प रज्जुच्या न्यायाने भ्रामक वाटते. ॥ ६॥ आकाशाद्वायसंज्ञस्तु स्पर्शोऽपञ्चिङ्कृतः पुनः । वायोरग्निस्तथा चाग्नेराप अद्भ्यो वसुन्धरा ॥ ७॥ अर्थ - आकाशापासून वायु उत्पन्न होवून त्याच्या स्पर्शाने हे अपंचीकृत रूप उत्पन्न होते. म्हणजे वायु पासून अग्नि, अग्निपासून जल आणि जलापासून पृथ्वीची उत्पत्ती झाली. ॥ ७॥ तानि सर्वाणि सूक्ष्माणि पञ्चिकृत्येश्वरस्तदा । तेभ्य एव विसृष्टं तत् ब्रह्माण्डादि शिवेन ह ॥ ८॥ अर्थ - त्या वेळेस ईश्वराने (शिव नामक शक्ति ने) पंचीकृत क्रियेने ही सर्व सूक्ष्ममहाभूते ब्रह्माण्डाच्या रूपाने निर्मित केली. ब्रह्माण्डस्योदरे देवा मानवा यक्षकिन्नराः । मनुष्याः पशुपक्ष्याद्यास्तत्तत्कर्मानुसारतः ॥ ९॥ अर्थ - ब्रह्माण्डाच्या उदरामध्ये देव, मानव, यक्ष किन्नर, मनुष्य, पशु, पक्षी आदि त्या -त्या क्रमानुसार निर्माण केले. ॥ ९॥ अस्थिस्ताय्वादिरूपोऽयं शरीरं भाति देहिनाम् । योऽमन्वमयो ह्यात्मा भाति सर्वशरीरिणः ॥ १०॥ अर्थ - सर्व प्राणीमात्रांमध्ये हे अस्थिर नाशवंत शरीर अवयवादि रूपाने दृश्यमान होते. आत्मतत्त्व अमन्वमय (अदृश्यरूपाने) प्रकाशित होते. ततः प्राणमयो ह्यात्मा विभिन्नश्चान्तरस्थितः । ततो विज्ञान आत्मा तु ततोऽन्यश्चान्तरस्थितः ॥ ११॥ अर्थ - तेव्हा हा प्राणमय आत्मा विभिन्न अंतरांमध्ये, शरीरांमध्ये प्रकाशित होतो. ज्याप्रमाणे आपण आपल्यांत आत्मतत्त्व (मी कर्ता मी भोक्ता) अनुभवतो तो तसाच इतर शरीरधारी तत्त्वांत पण तसाच असतो. आनन्दमय आत्मा तु ततोऽन्यश्चान्तरस्थितः । योऽयमन्नमयः सोयं पूर्णः प्राणमयेन तु ॥ १२॥ अर्थ - जसा आपला आनंदमय आत्मा असतो, तसाच तो अन्य धारकांचा पण असतो, जो हा अन्नमय आहे, तो प्राणमय पण आहे. ॥ १२॥ मनोमयेन प्राणोऽपि तथा पूर्णः स्वभावतः । ततो मनोमयो ह्यात्मा पूर्णो ज्ञानमयेन तु ॥ १३॥ अर्थ - स्वभावतः नैसर्गिकरीत्या मनोमय कोशामुळेच प्राणमयकोश पण पूर्ण भरलेला असतो. तेंव्हा मनोमय आत्मा पण प्राणमय आत्मतत्त्वामुळे अर्थात् ज्ञानमय आत्म्यामुळे समृद्ध असतो. ॥ १३॥ आनन्देन सदा पूर्णः सदा ज्ञानमयः सुखम् । तथानन्दमयश्चापि ब्रह्मणोऽन्येन साक्षिणा ॥ १४॥ अर्थ - जसे ज्ञानमय सुख नित्य आनंदाने ओतप्रोत भरलेले असते. तसेच ब्रह्मतत्त्वाच्या साक्षीभावाने आनंदमय तत्त्व ओतप्रोत भरलेले असते. सर्वान्तरेण पूर्णश्च ब्रह्मनान्येन केनचित् । यदिदं ब्रह्मपुच्छाख्यं सत्यज्ञानाद्वयात्मकम् ॥ १५॥ अर्थ - ब्रह्मतत्त्व आनंदरूपामध्यें संपूर्ण व्याप्त असते आणि जर त्यांत तुम्ही ब्रह्मानंदाचा अंत समजाल, तर ते जे परब्रह्मतत्त्व आहे, ते द्वैतभावाचे समजले जाईल. (अर्थात् ते तसे नसून एकच एक ब्रह्मतत्त्व अद्वय रूपाने सर्व अंतकरणात भरलेले आहे।) ॥ १५॥ सारमेव रसं लब्धवा साक्षाद् देही सनातनम । सुखी भवति सर्वत्र अन्यथा सुखता कुतः ॥ १६॥ अर्थ - हा अनादि परमतत्त्वरूपी आनंदमय आत्मा आहे, हा सारतत्त्व प्राप्त करुनच आनंदी होतो. अन्य कोठल्याही बाह्य तत्त्वामुळे नाही. ॥ १६॥ असत्यस्मिन्परानन्दे स्वात्मभूतेऽखिलात्मनाम् । को जीवति नरो जन्तुः को वा नित्यं विचेष्ट ते ॥ १७॥ अर्थ - हे परमात्मरूप तत्त्व जर आपल्यांत विद्यमान नसेल तर असा कोण मानव किंवा अन्य प्राणी जीवित राहील? आणि आपली जीवित चेष्टा करण्यास समर्थ राहील? तस्मात्सर्वात्मना चित्ते भासमानो ह्यसो नरः । आनन्दयति दुःखाढ्यं जीवात्मानं सदा जनः ॥ १८॥ अर्थ - त्यामुळे सर्वांच्याच मनामध्ये असलेले हे उपस्थित आनंदमय तत्त्व अर्थात् आत्मतत्त्व आपणांस नित्य आनंदमय ठेवते, जरी आमचे जीवन दुःखमय असले तरी (मनुष्य पुन्हा आनंदाच्या आशेवर जगतोच) ॥ १८॥ यदा ह्यवैष एतास्मिन्न दृश्यत्वादि लक्षणे । निर्भेदं परमाद्वैतं विन्दते च महायतिः ॥ १९॥ अर्थ - जरी ह्या आत्मतत्त्वात दृश्यस्वरूपाची कांही लक्षणे दिसत नसली तरी महान योगी निर्मलरूपाने त्यांतील अद्वैत आनंदाची प्राप्ती करुन घेतात. ॥ १९॥ तदेवाभयमत्यन्तं कल्याणं परमामृतम् । सद्रूपं परमं ब्रह्म त्रिपरिच्छेदवर्जितम् ॥ २०॥ अर्थ - तेच परब्रह्मतत्त्व जे अविनाशी, अनादि, अनंत ह्या रूपाने, तीन प्रकारे विद्यमान आहे. (त्रिपरिच्छेद विवर्जित) असे ते अत्यंत कल्याणप्रद, अभयकारी, परमामृतमय आणि सत् तत्त्व आहे. ॥ २०॥ यदा ह्येवैष एतास्मिन्नल्पमप्यन्तरं नरः । विजानाति तदा तस्य भयं स्यान्नात्र संशयः ॥ २१॥ अर्थ - जेंव्हाही मनुष्य आपणास ह्या आत्मतत्त्वापासून थोडा जरी विस्मृत करतो तेंव्हां त्यास भय उत्पन्न होईल, हे निश्चित असून ह्यात संशय नाहीं. ॥ २१॥ अस्यैवानन्दकोशेन स्तम्बान्ता विष्णुपूर्वकाः । भवन्ति सुखिनो नित्यं तारतम्य क्रमेण तु ॥ २२॥ अर्थ - ह्या सुखाचा तारतम्य रूपाने विचार केला तर, भ्रम दूर होतो आणि विष्णु तत्त्वामध्ये मति स्थिर झाल्याने साधक सुखी होतो. ॥ २२॥ तत्त्पदविरक्तस्य श्रोत्रियस्य प्रसादिनः । स्वरूपभूत आनन्दः स्वयं भाति परे यथा ॥ २३॥ अर्थ - त्या -त्या विषयांतून विरक्त झालेल्या श्रोत्रीय अर्थात् मनीषी साधकाच्या कृपाप्रसादाने साधक आनंदीत होतात. आणि स्वतः प्रमाणेच तो मनीषी दुसऱ्यास पण तेजोमय आनंद प्राप्त करवून देतो. ॥ २३॥ निमित्त किञ्चिदाश्रित्य खलु शब्दः प्रवर्तते । यतो वाचो निवर्तन्ते निमितानमभावतः ॥ २४॥ अर्थ - कोणा निमित्ताचे कारण बनून शब्द परिवर्तित होतात आणि जेंव्हां वाचा त्या शब्दांना बोलल्यानंतर निवर्तित होते तेंव्हा ते कारण निमित् हे आशीर्वाद स्वरूप (आशीर्वाद देणारे) होते. ॥ २४॥ निर्विशेषपरानन्दे कथ शब्दः प्रवर्तते । तस्मादेतन्मनः सूक्ष्मं व्यावृत्तं सर्व गोचरम् ॥ २५॥ अर्थ - निर्विशेष अश्या आनंदापासून शब्द कसे परत येतात? तर त्या ठिकाणी हे मन सूक्ष्म रूपाने त्या परम आनंदांत विलीन होवून सर्व दृश्य सृष्टी ही अदृष्य होते. ॥ २५॥ यस्माच्छ्रीत्रत्वगक्ष्यादि खादिकर्मेन्द्रियाणि च । व्यावृतानि परं प्राप्तं न समर्थानि तानि तु ॥ २६॥ अर्थ - त्या परमानंदापासून श्रोत्र -कर्ण, त्वक् -स्पर्श, अक्षी -नेत्र, नांकातील वायु पोकळी वगैर खं आदि इंद्रिय परतून येतात. (अर्थात् ते पंचेंद्रियांनी आणि वाणीने पण वर्णन केले जात नाहीं।) परमानंद प्राप्त झाल्यावर त्या आनंदांत न्हाऊन निघाल्यावर ते सर्व इंद्रिय कुचकामी (निरुपयोगी, असमर्थ) होतात. ॥ २६॥ तद्ब्रह्मानन्दद्वन्द्वं निर्गुणं सत्यचिद्घनम् । विदित्वा स्वात्मरूपेण न विभेति कुतश्च न ॥ २७॥ अर्थ - तो निर्द्वंद्व निर्गुण सत्+चित्+आनंद घनरूप आनंद प्राप्त झाल्यावर आपल्याला आत्मरूपप्राप्ती झाल्याने तो साधक निर्भय होतो. ॥ २७॥ एवं यस्तु विजानाति स्वगुरोरुपदेशतः । सं साध्वसाधुकर्मभ्यां सदा न तपति प्रभुः ॥ २८॥ अर्थ - आपल्या गुरुच्या उपदेशानुसार जो ह्याप्रमाणे ज्ञान प्राप्त करतो तो कोठल्याही सत् असत् कर्मामुळे लिप्त होत नाहीं. ॥ २८॥ ताप्यतापकरूपेण विभातमखिलं जगत् । प्रत्यगात्मतया भाति ज्ञानाद्वेदान्तवाक्यजात् ॥ २९॥ अर्थ - दुःख आणि दुःखदायक रूपाने हे संपूर्ण जगत् भरलेले आहे. परमात्मतत्त्वाशी आपले मिलन होण्याने (परमानंदाची प्राप्ती होण्याने) आपल्या मनांतील द्वैत तत्त्वाची कल्पना नष्ट होते. नंतर अद्वैतानंद प्राप्त होतो. ॥ २९॥ शुद्धमीश्वर चैतन्यं जीवचैतन्यमेव च । प्रमाता च प्रमाणं च प्रमेयञ्च फलं यथा ॥ ३०॥ अर्थ - ईश्वर हे शुद्ध चैतन्य आहे आणि जीव हा चैतन्याचा एक अंश आहे. ज्याप्रमाणे प्रमाण आणि फळ असते, तसेच हे आहे. ॥ ३०॥ इति सप्तविधं प्रोक्तं भिद्यते व्यवहारतः । मायोपाधिविनिर्मुक्तं शुद्धमित्यभिधीयते ॥ ३१॥ अर्थ - ह्या सात प्रकारांनी हे सांगितले गेले आहे. ते व्यवहार रूपाने भेद केले जाते. माया नामक उपाधिरहित जो असतो तो शुद्ध चैतन्य असे म्हटला जातो. ॥ ३१॥ मायासम्बन्धश्चेशो जीवोऽविद्यावशस्तथा । अन्तःकरणसम्बन्धात् प्रमातेत्यभिधीयते ॥ ३२॥ अर्थ - हा जीव माया संबंधामुळे अविद्याग्रस्त होतो, आणि अंतःकरणाच्या संबंधामुळे प्रमाता असे म्हटला जातो. ॥ ३२॥ तथा तद्वृत्तिसम्बन्धात् प्रमाणमिति कथ्यते । अज्ञातमपि चैतन्यं प्रमेयमिति कथ्यते ॥ ३३॥ अर्थ - आणि त्या अंतःकरण आणि माया ह्या संबंधामुळे प्रमाण म्हटला जातो. आणि अज्ञात असे चैतन्य प्रमेय असे म्हटले जाते. ॥ ३३॥ तथा ज्ञातञ्च चैतन्यं फलमित्यभिधीयते । सर्वोपाधिविनिर्मुक्तं स्वात्मानं भावयेत्सुधीः ॥ ३४॥ अर्थ - ज्ञात झालेले चैतन्य त्याचे फळ म्हटले जाते. सर्व विकार आणि उपाधिरहित आपले आत्मतत्त्व जे असते त्यामुळे सुधी म्हणजे महान् साधक सुशोभित होतो, तेजाने तळपतो. ॥ ३४॥ ज्ञात्वैवं प्रत्यगात्मानं बुद्धितद्वृत्ति साक्षिणम् । सोऽहमित्येव तद्वृत्या स्वान्यत्रात्ममतिं त्यजेत् ॥ ३५॥ अर्थ - ह्याप्रमाणे आपल्या परमतत्त्वाला जाणून त्या वृत्तिसाठी आपल्या बुद्धिला साक्षी ठेवून तेच तत्त्व माझ्यात आहे. सोऽहम् ह्या ज्ञानाने आपली मति अन्यत्र विषयांमध्ये दूषित होवू देवू नयें ॥ ३५॥ जन्ममृत्युप्रहाणिः स्याद्ब्रह्मरूपात्मवेदनात् । पुनरावर्तते नासौ पुनर्नेवाभिजायते ॥ ३६॥ अर्थ - जन्म -मृत्युचा नाश हा आत्मतत्त्वाचे ज्ञान झाल्यावर होतो. तो पुन्हा येत नाहीं आणि जन्म घेत नाहीं. ॥ ३६॥ निवृत्तायां वासनायां संसारस्य न कोऽपि हि । संसारयातनां दुःखं जन्म प्राप्नोति कुत्रचित् ॥ ३७॥ अर्थ - ह्या संसारिक वासनांपासून जो निवृत्त होतो, त्या पासून सुटतो तो ह्या जगांत पुन्हा वासनामय दुःखाचा ताप सहन करण्यास कोठल्याही योनीत जन्म घेत नाहीं. ॥ ३७॥ विषयाशाविषैर्दग्धः परमार्थेमृतः स्ततः । तस्य दुःख भागधेयं किं कृतं स्वात्मवैरिणा ॥ ३८॥ अर्थ - जो आपल्याच आत्मसुखाचा वैरी आहे. जो ह्या विषयरूपी विषारी आशामुळे होरपळून दुःखी होतो त्या अभाग्याला आत्मसुखाचे अमृत कोठून मिळणार? ॥ ३८॥ नाहं देहो न बुद्धिश्च न मनो नेन्द्रियाणि च । विषया आपि नैवाहं कर्ता भोक्ता तथैव च ॥ ३९॥ अर्थ - मी देह नाही, मी बुद्धि नाही, मी मन आणि इंद्रिय पण नाही, आणि मग विषय वासना पण माझ्याकर्ता आणि भोक्तारूपाला लागणार नाहीं. ॥ ३९॥ न किञ्चिचद् भावनाकारः स्वयमानन्दरूपकः । अद्वयब्रह्ममात्रोऽहं यो विद्यात्स हि मुक्तिभाक् ॥ ४०॥ अर्थ - कोठल्याही प्रकारची भावना नाहीं आणि स्वतःच्याच आत्मरूपांत (दूसऱ्या कोठल्याही कारणाशिवाय) आनंदित राहतो, मी अद्वय ब्रह्ममात्र असे समजतो तोच मुक्तिप्राप्त कर्ता आहे. असे समजावे. ॥ ४०॥ अहं ममेति यो भावो देहाध्यासादनात्मनि । अध्यायसोऽयं निरस्तव्यो विदुषा ब्रह्मनिष्ठया ॥ ४१॥ अर्थ - जो आत्मा नाही अश्या देहावर `मी’ व ‘माझी’ अशी भावना ठेवणे हा भ्रम (अध्यास) विद्वान अश्या ब्रह्मनिष्ठ साधकाने न ठेवता त्यास दूर केले पाहिजे. ॥ ४१॥ ब्रह्मणो निष्प्रपञ्चत्वात्त्यवक्ता ब्रह्म विन्दते । अतो नित्यं श्रुतिर्वक्ति न्यास एवात्परेच यत् ॥ ४२॥ अर्थ - ब्रह्मतत्त्वाच्या अकर्तृत्वाचे ध्यान ठेवून म्हणजे ते तसे नाही अर्थात् कर्ता व करविता असे नाही आणि अलिप्तपणा आहे, असे समजल्यावर, असे ज्ञात झाल्यावरच त्याची प्राप्ती होते. म्हणूनच मुनि आणि वेद नेहमीच सांगतात की ते तत्त्व सर्व ब्रह्माण्डाच्या पण वरचे सर्वव्यापी आहे. ॥ ४२॥ गृहीभूत्वापि संन्यस्य कार्यं यद् ब्रह्मचिन्तनम् । ब्रह्मचर्याश्रमादेव न्यासः श्रेष्ठो भवेत्तः ॥ ४३॥ अर्थ - ब्रह्मचिंतनाचे जे कार्य सन्यास घेवून संन्यसाश्रमांत जे केले जाते ते सर्वांत उत्तम असे मनावर ठसले जाते. त्याचे ज्ञान होते. (न्यास, ठसा, छाप हा अर्थ) ॥ ४३॥ प्रक्षालनाद्विपङ्कस्य दूरादस्पर्शनं परम् । किमर्थञ्च गृहीभृत्वा ततऊर्ध्वन्यसेद्बुधः ॥ ४४॥ अर्थ - चिखल अंगाला लागल्यानंतर त्यास साफ करण्यापेक्षा धुवून स्वच्छ करीत बसण्यापेक्षा, दुरुनच त्याला टाळणे हे बरे. कशाकरिता त्यास ग्रहण करुन, नंतर वरपासून शहाण्याने त्याचे प्रक्षालन करावे. ॥ ४४॥ यदि प्रवृतिधौरेयः सन्यस्तुं नेहते क्वचित् । अन्तस्त्यागी भवेत्स्य कार्य एवं हि मुक्तये ॥ ४५॥ अर्थ - जर अशी कठीण घोर प्रवृत्ति नसेल तर आणि संन्यास घेण्याची इच्छा नसेल तर मुक्तिसाठी त्याने अंतस्त्याग करावा. ॥ ४५॥ इन्द्रियार्थेषु मूढस्य दृढदेहाभिमानिनः । गृहस्थाश्रमस्वीकारो भ्रष्टताया वरो मतः ॥ ४६॥ अर्थ - इंद्रियसंतुष्टिसाठी मूढ अश्या देहाविषयी ममता बाळगणाऱ्याने गृहस्थाश्रम स्वीकारावा. कारण भ्रष्ट होण्यापेक्षा ते बरे ॥ ४६॥ निष्कामकर्मतः सोऽपि भक्त्या कर्तव्यबुद्धिना । ऋणत्रयमुपाकृत्य तदूर्ध्वन्यस्तुपर्हति ॥ ४७॥ अर्थ - तो गृहस्थाश्रमी सुद्धा निष्काम बुद्धिने कर्म करुन भक्ति संपन्न होवून तिन्ही प्रकारच्या ऋणापासून मुक्त होवू शकतों. ॥ ४७॥ तथा चेद्देहदौर्बल्यं स्वगृहस्य समीपतः । कुटिं बध्वा विरक्तःसन् ब्रह्मज्ञानं समाचरेत् ॥ ४८॥ अर्थ - ह्या अवस्थेत सुद्धा देह दुर्बल झाल्यावर आपल्याच घराजवळ एक कक्ष उपलब्ध करुन त्याने ब्रह्मज्ञानाचे चिंतन करावे ॥ ४८॥ श्रुत्वापि न त्यजेद्यस्तु विषपानं सुदुःखदम् । पीत्वा विषं चानुभूय दुःखं पश्चात्यजेद्धि तत् ॥ ४९॥ अर्थ - जे विषपान केल्यावर अत्यंत दुःखप्राप्ती होते. त्यास तो हे जाणून सुद्धा त्यजू शकत नाहीं तर मग त्या विषपानाने दुःख प्राप्त झाल्यावर ते भोगल्यावर तरी त्यास सोडावे. ॥ ४९॥ विषौषधं यथैवस्याद्विषनाशकरं द्रुतम् । संन्यासोऽयं मतस्तद्वद्विषयासक्तिनाशकः ॥ ५०॥ अर्थ - विषावरील उतरवयाचे जे विषनाशक औषध असते ते जसे त्याचा जलदगतीने नाश करते, त्याच प्रमाणे सन्यास हा त्या विषयासक्तिचा नाश करतों. ॥ ५०॥ न जातुः कामः कामानुपभोगन शाम्यति । हविषा कृष्णवत्मैव भूय एवाभिवर्धते ॥ ५१॥ अर्थ - केंव्हांही काम हा कामनांचा उपभोग घेऊन शांत होत नाही, ज्याप्रमाणे अग्निमध्ये आहूती टाकीत गेल्यावर तो जास्तच भडकतो, पण विझत नाहीं, तसेच हे वासनेचे शांत होणे आहे. ॥ ५१॥ चित्मूलो विकल्पोयं चित्ताभावेन कश्चन । चित्निर्मूलनं कार्य प्रत्यग्रूपे चिदात्मनि ॥ ५२॥ अर्थ - चित्ताचे मूळस्थानीच त्यास न्यावे लागते, म्हणजे शांति मिळते. आपल्या मूळरूपाशी त्याचे आत्ममिलन झाल्यावर त्यास शांति प्राप्त होते. ॥ ५२॥ अखण्डानन्दमात्मानं विज्ञाय स्वस्वरूपतः । बहिरन्तः सदानन्दरसास्वादनमात्मनि ॥ ५३॥ अर्थ - आपल्या स्वस्वरूपामध्येच अखण्ड आनंद आहे. बाहेर भौतिक आनंदाला क्षयच आहे. हे जाणून आपल्या आत्मस्वरूपातच त्या अखण्डानंदाचा आस्वाद घेता येतों. ॥ ५३॥ वैरागस्य फलं बोधो बोधस्यापरतिः फलम् । स्वानन्दानुभवाच्छान्तिरेषवोपरतेः फलम् ॥ ५४॥ अर्थ - वैराग्याचे फलबोध हे आहे. बोधाची समाप्ती ही फळच आहे. स्वानंदाचा अनुभव आल्यावर शांति प्राप्त होते. आणि ह्याच अनुभवानंतर साफल्याचा आनंद व शांति आहे. ॥ ५४॥ यद्युत्तरोत्तराभावो पूर्वरूपं तु निष्फलम् । निवृत्तिः परमा तृप्तिरानन्दोऽनुपमः स्वतः ॥ ५५॥ अर्थ - उत्तरोत्तर हा भाव एक -एक पायरी वर चढत गेल्यावर मागील सर्व राहिलेले अज्ञानरूप असते, ते निष्फल वाटते. निवृत्ति मध्येच अतिशय तृप्ती प्राप्त होवून त्याच स्थितीत अवर्णनीय आनंद प्राप्त होतो. ॥ ५५॥ वाञ्छाक्षणे तु या तृप्तिस्तत्र वाञ्छैव कारणम् । तुष्टिः स्वतुष्टिपर्यन्ता ततो वाञ्छां परित्यजेत् ॥ ५६॥ अर्थ - उत्पत्तिच्या वेळेस ती इच्छाच त्या तृप्तीसाठी कारणीभूत वाटते. मात्र तृप्ती ही स्वतःच तृप्त होते, तेंव्हा वांछा ही त्यागावीच लागते. (ब्रह्मानंदास बाह्य इच्छा ही कारण म्हणून लागत नाहीं ते स्वतःच स्वयंभू असे आनंदमय तत्त्व असतें।) ॥ ५६॥ मौर्ख्योन्मेषनिमेषाभ्यां कर्मणां प्रलयोदयौ । तन्नाशो यत्नतः कार्यो गुरुशास्त्रार्थसङ्गहैः ॥ ५७॥ अर्थ - कर्मरूपी महाप्रयलयी लाटा जेंव्हा मूर्खपणाच्या उदयामुळे क्षणार्धात उसळून वर येतात त्यावेळेस गुरु आणि शास्त्रार्थ ह्यांचा सहवास करुन त्यास नष्ट करण्याचा प्रयत्न करावा ॥ ५७॥ शास्त्रसज्जनसम्पर्केःशमदमादि गुणान्वितैः । आदौ संसारमूक्त्यर्थ प्रज्ञामेवाभिवर्धयेत् ॥ ५८॥ अर्थ - ह्या संसारापासून मुक्ति मिळावी म्हणून प्रथम सुरुवातीलाच आपली बुद्धि तत्प्रीत्यर्थ विकसित करावी. त्याकरितां शम दमादि गुणांनी आणि शास्त्र चर्चा आणि सज्जनसंगती ह्यांनी त्याला सिंचून त्याची पुष्टी करावी. ॥ ५८॥ गुरुशास्त्रोक्त मार्गेण स्वानुभूत्या च चिद्घनम् । ब्रह्मैवाहमिति ज्ञात्वा वीतशोको भवेन्मुनिः ॥ ५९॥ अर्थ - गुरु आणि शास्त्र यांच्या मार्गदर्शनाने त्या रस्त्याने जाऊन आणि स्वानुभूति घेतल्यावर ते अक्षय सुखदायक ब्रह्मतत्त्वच माझ्या आत्मतत्त्वामधे विद्यमान आहे, हे ज्ञान प्राप्त करुन घेऊन जो महान साधक आहे, त्याने शोकरहित व्हावें. ॥ ५९॥ स्वानुभूतेश्च शास्त्रस्य गुरोश्चैवैकवाक्यता । यस्याभ्यासेन तेनात्मा सतत चावलोक्यते ॥ ६०॥ अर्थ - स्वानुभूतिने गुरु आणि शास्त्र ह्यांतील एकवाक्यतेने ज्या साधकाचे मन सतत अभ्यास करुन सज्ज झालेले असते, त्यास आत्मतत्त्वाचे सतत अवलोकन होते. ॥ ६०॥ रूपस्य ग्रहणार्थाय यथां चक्षुर्हि साधनम् । तथा स्वरूपबोधाय वेद एव हि साधनम् ॥ ६१॥ अर्थ - ज्याप्रमाणे कोठलेही रूप आपण डोळयांनीच पाहतो, तसेच आपल्या स्वरूपाचे आत्मतत्त्वाचे बोधरूपाने दर्शन होण्यास ``वेद''हेच साधन आहे. ॥ ६१॥ वेदानुवचनेनैव विप्रा विविदिषन्तिच । ब्रह्मणः शास्त्रयोनित्वाञ्च्छास्यं वेदात् पर न हि ॥ ६२॥ अर्थ - वेदांतील अनुवचनाप्रमाणे ब्राह्मण ओळखले जातात. ``ब्रह्मं वेत्ति ब्राम्हणः'' ज्यास ब्रह्मतत्त्वाचे ज्ञान आहे तो, ब्राह्मण कुळांत जन्मला म्हणून नव्हें. हेच वेदवचन आहे, आणि वेदांहून दुसरे महान् शास्त्र नाहीं. ॥ ६२॥ द्वे विद्ये वेदितव्ये तु शब्दब्रह्म परं च यत् । शब्दब्रह्माणि निष्णान्तः परं ब्रह्मणिगच्छति ॥ ६३॥ अर्थ - दोन विद्या जाणल्या पाहीजेत. एक शब्दब्रह्म हे त्यांत परं म्हणजे मोठे मानले गेले आहे. जो शब्दब्रह्मनिष्णांत असेल तो परब्रह्माची प्राप्ती करुन घेतो. ॥ ६३॥ संन्यस्तसर्वसङ्कल्पः समः शान्तमना मुनिः । सन्यासयोगयुक्तात्मा ज्ञानवान्मोक्षवान्भवेत् ॥ ६४॥ अर्थ - सर्व संकल्पांचा कामनांचा त्याग करणारा आणि प्रशांत अश्या मनाचा मुनी सन्यास प्राप्त करुन घेवून आणि ज्ञानी होवून मुक्त होतो. (मोक्षप्राप्ति करितो) ॥ ६४॥ सर्वसङ्कल्पसंशान्तं प्रशान्तघनवासनम् । न किञ्चिद्भानकारं यत्तद् ब्रह्मपरम् विदुः ॥ ६५॥ अर्थ - सर्व इच्छा, वासना विरहित, अत्यंत शांत ज्या ठिकाणी कोठलीही भावना नाहीं, ते परब्रह्म समजावें. ॥ ६५॥ ब्रह्मतद्विदितादन्यत्तथैवाविदितादपि । यतो वाचो निवर्तन्ते अप्राप्य मनसा सह ॥ ६६॥ अर्थ - मनासहित जेथून वाचा परत फिरते, जे अनिर्वचनीय आहे ते परब्रह्म म्हणजे ज्ञान आणि जे प्राप्त न करताच अज्ञान परत फिरते ते परब्रह्म आहे. ॥ ६६॥ यस्यामतं मतं तस्य मतं तस्य न वेद सः । अविज्ञात विजानतां विज्ञातमविजानताम् ॥ ६७॥ अर्थ - त्याचे ज्ञान करुन घ्यावे म्हणावे तर त्या पदावरुन आपले मन परत फिरलेले असते आणि त्याचे अज्ञान म्हटले तर ब्रह्म प्राप्ति नंतर (न जाणणे -नेणीव) हे नष्ट होते कारण ते ज्ञानस्वरूप आहे. ॥ ६७॥ देवदत्तोऽहमित्येतद्विज्ञानं निरपेक्षकम् । तद्वद् ब्रह्मविदोऽप्यस्य ब्रह्महमिति वेदनम् ॥ ६८॥ अर्थ - मी परमेश्वराच्याच इच्छेनेच जन्मलो हे ज्ञान निरपेक्ष आहे. त्याचप्रमाणे मी ब्रह्म आहे (अहं ब्रह्माऽस्मि) हे पण ज्ञान निरपेक्षच आहे. (निरीच्छ -विरक्त -निरपेक्ष) ॥ ६८॥ भानुनेव जगत्सर्वं भास्यते तस्य तेजसा । अनात्मकमसतुच्छं किं नु तस्यावभासकम् ॥ ६९॥ अर्थ - सूर्यामुळेच सर्व जगत तेजोमय वाटते. त्याच प्रमाणे जे आत्म्याशिवाय अचेतन तत्त्व असते ते तुच्छ निर्जीव नाहीं कां भासत? (अर्थात आत्मतत्त्वाच्या उपस्थितीचे सर्व कांही चैतन्यमय भासते।) ॥ ६९॥ वेदशास्त्रपुराणानि भूतानि सङ्कलान्यपि । येनार्थवन्ति तं किं नु विज्ञातारं प्रकाशयेत् ॥ ७०॥ अर्थ - वेदशास्त्र पुराणे त्याच प्रमाणे सर्व प्राणीमात्र ज्यामुळे अस्तित्वमान् होतात, ज्यामुळे त्यांस अस्तित्वांत असण्याचा मान मिळतो त्या ब्रह्मतत्त्वामुळे ज्ञाता जो (विज्ञातृ) त्याला पण ``अहं ब्रह्मास्मि''हे ज्ञान कसे प्राप्त होणार नाही. (अर्थात् होइलच) ॥ ७०॥ ग्रन्थमभ्यस्य मेधावी ज्ञानविज्ञानतत्परः । पलालमिव धान्यार्थी त्यजेद्ग्रन्थमशेषतः ॥ ७१॥ अर्थ - ज्ञान आणि विज्ञान प्राप्त करणारा जो अभ्यासू आहे त्याने ज्याप्रमाणे धान्य गोळा करणारा त्यांतील काडया-कडबाकोंडा आदि त्याज्य पदार्थ वगळून अस्सल धान्यच गोळा करतो, तद्वत त्या अभ्यासूने ग्रंथातील सारतत्त्वच ग्रहण करावे बाकी सर्व त्याज्य समजून सोडावें. ॥ ७१॥ उल्काहस्तो यथालोके द्रव्यमालोक्य तां त्यजेद् । ज्ञानेन ज्ञेयमालोक्य पश्चात् तत्परिवर्जयेत् ॥ ७२॥ अर्थ - उल्का, आकाशांतील तारका तुटल्यावर खाली जमीनीवर येतात तेंव्हा त्या निखाऱ्यासारख्या उष्ण असतात म्हणून हातात स्पर्श झाल्याबरोबर ज्याप्रमाणे आपण त्यांना एकदम झटक्याने फेकून देतो तद्वतच (अवैध मार्गाने) येणारे धन हे पाहताच त्याचा अव्हेर त्याग करावा. तसेच साधकाने आपल्या ज्ञानशक्तिने ज्ञेय अर्थात परमतत्त्वाचे ज्ञान प्राप्त करुन जे अन्य व्यर्थज्ञान आहे, त्याचा त्याग करावा. ॥ ७२॥ शब्दक्षरं परम्ब्रह्म यस्मिन्क्षीणे यदक्षरम् । तद्विद्वानक्षरं ध्यायेद्यादिच्छेच्छान्तिमात्मनः ॥ ७३॥ अर्थ - शब्द परब्रह्म आहे. त्यांतील जे क्षर आहे त्याचा त्याग करुन जे अक्षय तत्त्व शिल्लक राहते, त्याचा अध्ययनपूर्वक स्वीकार करुन शांति प्राप्त करुन घ्यावी. ॥ ७३॥ श्रीकृष्णो भगवानेव महाभ्यासक्रमो यतः । मनसः शमनोपायमेव मेवाभ्यसेद् बुधः ॥ ७४॥ अर्थ - ``श्रीकृष्णच भगवान आहे'', हा महाअभ्यास आहे. अभ्यासक्रम आहे. ब्रह्मसंहितेत पहिलेच प्रारंभिक वचन आहेः - ``ईश्वरः परमः कृष्णः सच्चिदानंद विग्रहः'' म्हणून विद्वान पण्डिताने मनाच्या शांतिसाठी ह्याच उपायाचा अवलम्ब करवा. ॥ ७४॥ ज्ञातृज्ञानादिकं त्यक्त्वा न किञ्चिचदपि चिन्तयन् । आनन्दमात्र एवाहमितिमत्वा स्थिरो भवेत् ॥ ७५॥ अर्थ - ज्ञाता ज्ञान आदि सगळे सोडून इतर कोठलाही विचार न करता मी आनंदमात्रच आहे, असे चिंतन करुन मन शांत व स्थिर करावें. ॥ ७५॥ अनारोग्यं मनःक्षोभो यथा न स्यात्थाविधम् । सम्यगावरणं कृत्वा ध्यानाभ्यासस्थितिं चरेत् ॥ ७६॥ अर्थ - आरोग्यहीनता मनःक्षोभ आदि प्रतिकूल परिस्थिती नाही (नसे), असे चिंतन करावे, आणि योग्यप्रकारे अनुकूल वातावरण प्राप्त करुन घेवून ध्यानाभ्यास करावा. ॥ ७६॥ इति श्रीसमर्थरामदासानुगृहित श्रीरामपदपङ्कजभृङ्गायमान श्रीमत्परमहंस परिव्राजकाचार्य भगवता श्री श्रीधरस्वामिना विरचिते मुमुक्षुसखः ग्रन्थे ब्रह्माज्ञानेन परमानन्दप्राप्तिर्नाम चतुर्थं प्रकरणं सम्पूर्णम् ।

५. संसारस्य दुःखमूलत्व नाम प्रकरणं पञ्चमम् ।

(संसाराच्या दुःखाचे मूळ प्रकरण पाचवे) दुःखमूलं ही संसारी जीवितं क्षणभङ्गूरम् । परिणामे विषं भोगः शरीरं रोगमन्दिरम् ॥ १॥ अर्थ - सर्व दुःखांचे मूळ कारण म्हणजे हा संसार आहे. हे शरीर म्हणजे रोगाचे मंदिर असून ह्यातील सर्व भोग कार्य ही परिणामी विषाप्रमाणे हानीकारकच आहे. ॥ १॥ भोगदाहो विकारोऽपि नाशश्चाशाविवर्धनम् । खिन्नता दुःखशोकोच पापं जीवितमुच्यते ॥ २॥ अर्थ - ह्या जीवनामध्यें प्रत्येक भोग दाहकच होवून सर्वविकार हे नाश आणि आशा ह्यांचेच वर्धन करितात, अर्थात् त्यांचीच वाढ करतात. ॥ २॥ आधिभूतात्मकैस्तापैस्तथा चाध्यात्मिकैरपि । आधिदैविकतापैश्च जीविने किं सुखं भवेत् ॥ ३॥ अर्थ - आधि भौतिक (आग लागणे, अपघात होणे, आधिदैविक भूकंप, पूर इत्यादि आणि अध्यात्मिक म्हणजे मानसिक चिंता -मनाची अस्वस्थ्यता - अश्या ताप दुःखापासून जीवनांत कोठून सुख मिळणार? यत्र दुःख सुखं भाति सुन्दरत्रच जुगुप्सितम् । विकारतः समाधानं जीवनें कीदृशं सुखम् ॥ ४॥ अर्थ - व्यसनांतील गोष्टी सेवन करणे जसे दारु सेवन, अनैतिक संबंध, लांचलुचपत घेणे, ह्या गोष्टींचा परिणाम पण दुःखदायक असतो, आणि जे भ्रमाने सुंदर वाटते ते अमंगलच निघते. ते जीवनाला सुखदायक कसे असणार? ॥ ४॥ क्व शरीरमशेषाणां श्लेष्मादीनां महाचयः । क्व चाङ्गशोभासौभाग्यकमनीयादयो गुणाः ॥ ५॥ अर्थ - कोठे हे सुंदर आकर्षित करणारे भ्रामकरूपी शरीर आणि खरे तर कोठे त्यांतील श्लेष्मा कफ आदि मलांनी परिपूर्ण असणारे शरीर, आणि खरे तर कामना करावी असे सौंदर्य त्या शरीरांत निश्चित आहे? क्वचिद्वा विद्येत यैषा संसारे सुखभावना । आखुस्तम्बमिवासाद्य कालस्तामपि कृन्तति ॥ ६॥ अर्थ - क्वचित् कोठे ह्या संसारांत सुखाचा लवलेश आहे असे वाटलेच तर उंदीर ज्याप्रमाणे लाकडाच्या खांबाला कोरुन टाकतो त्याप्रमाणे हा काळ त्याचे सौंदर्य नष्ट करतों ॥ ६॥ अशना च पिपासा च शोकमोही जरामृतिः । एते षडूर्मयो ज्ञेयाः जीवने बहुदुःखदाः ॥ ७॥ अर्थ - भूक, तहान, शोक, दुःख, मोह, जरावस्था आणि मृत्यु ह्या अत्यंत दुःखदायक अश्या लाटा आपल्या जीवनरूपी महासागरात उसळत असतात. ॥ ७॥ रागद्वेषविमावत्र राक्षसाविव विक्रमो । छलतोऽहर्निशं पापौ शर्म नौ यच्छतः क्वचित् ॥ ८॥ अर्थ - राग, क्रोध आणि द्वेष हे राक्षसासारखेच शक्तिशाली आहेत. ह्या दुर्गुणांपासून दिवस रात्र छळ असताना सुद्धा किंचितही सुखप्राप्ती होत नाही. ॥ ८॥ दावानलावृतं दिव्य कमनीय वनं यथः । कामादिकैर्विकारैश्च जीवनं त्वावृतं तथा ॥ ९॥ अर्थ - दावानल अरण्यांत स्वयंभूच पेट घेवून फैलणारा अग्नि ज्याप्रमाणे सुंदर रम्य मोहक अश्या वनाचा नाश विध्वंस करतो व त्यावर सर्वत्र झडप घालतो त्याप्रमाणे काम आदि विकार जीवनाचा नाश करतात. ॥ ९॥ सर्वापदां पदं पापा भावा विभवभूमयः । अयः शलाकासदृशाः परस्परमसङिगनः ॥ १०॥ अर्थ - हे सर्व विकार म्हणजे आपत्ति असून पाप निर्माण करणारी अशी सुपीक वैभव संपन्न जमीनच आहे. आणि ही पापाचीच उत्पत्ति करते, हे सर्व विकार म्हणे काष्ट सळई प्रमाणे एकमेकांपासून थोडे वेगळे आहेत. ॥ १०॥ आद्ये नैव न चान्तेऽपि मध्ये देहाश्रयस्तुसः । वर्तते पथिकस्येव पादपस्योश्रयो यथा ॥ ११॥ अर्थ - ज्याप्रमाणे एखादा वाटसरु रस्त्यांत एखाद्या वृक्षाच्या छायेत आश्रय घेतो त्याप्रमाणे हे विकार देहाच्या मधे म्हणजे तारुण्यांत, मध्यम वयांत आश्रय घेतात अर्थात ते विकार तेंव्हाच बळावतात. ॥ ११॥ आयुःपल्लवकोणाग्रे लम्बिताम्बुवदधृवम् । कदा पतति देहोऽयं वक्तुं शक्तो न कोऽपिहि ॥ १२॥ अर्थ - पाण्याचा थेंब झाडाच्या पानावरुन केंव्हा खाली पडेल याचा नेम नसतो, तद्वैत कोणीही हा आपला देह केंव्हा पडेल हे जाणत नाहीं ॥ १२॥ न जानन्ति कदा कस्मात्कस्य मृत्युर्भवेदिति । मृत्योर्बिभ्यन्ति सर्वेऽपि जीवनं भयम्मन्दिरम् ॥ १३॥ अर्थ - कोणाचा कोठे आणि केंव्हा मृत्यु होईल हे कोणालाच माहित नसते, आणि जीवनामधील भयावह असे हे मृत्युभयरूपी मंदीर सर्वांसच भेडसावीत असते. ॥ १३॥ यतो ह्यन्नमया देहा एवैते भिक्षप्राणिनाम् । अन्नस्थानेच वर्तन्ते जीवो जीवस्य जीवनम् ॥ १४॥ अर्थ - ज्याप्रमाणे हा देह अन्नमय आहे आणि काही प्राणीमात्रांचे भोजन ही अन्नच आहे. तसेच एक जीव दुसऱ्या जीवाचे भक्षणही करतात, त्यावरुन असे दिसून येते की ते एक दुसऱ्याचे जीवनच आहे. ॥ १४॥ विषयाशा विषादानाद्व्यथितानामचेतसाम् । अप्राढात्मविवेनामायुरायासकारणम् ॥ १५॥ अर्थ - आयुष्यांतील सर्व (आयास कारणम्) कर्माचे उद्भवणारे कारण म्हणजे ह्या विषयांसाठी (पंचेद्रियांना खाद्य पुरविणे) धडपड आणि त्यांत विषाद (निराशा) हेच दुःखमनांचे कारण आहे. अविकसित अश्या आत्मदेंशेमुळेच हे सर्व कारणी भूत आहे. ॥ १५॥ युज्यते वेष्टनं वायोराकाशस्यच खण्डनम् । ग्रथनञ्च तरङ्गाणास्था नायुषि युज्यते ॥ १६॥ अर्थ - ज्याप्रमाणे वायु आणि आकाशाचे वेष्टन जोडले गेलेले दिसते त्याप्रमाणे जीवनांत आयुष्य आणि ह्या कामनाउर्मी ह्यांचे एकत्रीकरण झालेले दिसतें. शुद्धस्पर्शस्तथा रूपं रसो गन्धोऽर्थ पञ्चकम् । एभिरर्थेश्च माद्यन्तो न स्मरन्ति परं पदम् ॥ १७॥ अर्थ - शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध ह्या पंचेद्रियांच्या तन्मात्राने उन्मत्त मानाला परमेश्वराचा विसर पडतो. स्पर्शलुब्धो करीवात्र शुद्धलुब्ध कुरङ्गवत् । नश्येत्परवशो भूत्वा ततस्तौ परिवर्जयेत् ॥ १८॥ अर्थ - ज्याप्रमाणे स्पर्शाच्या मागे हत्ती, शब्द मंजूळ गीत, ध्वनिच्या मागे हरीण, मोहित होवून मार्ग भटकत जातो त्याप्रमाणे परवश न होता माणसाने मोहापासून दूर रहायला पाहिते. इंद्रिय तृप्तीच्या मागे लागून मनुष्य परवश होवून नष्ट होतो. ॥ १८॥ रूपलुब्धो भवेद्दग्धो दीपलुब्धः पतङ्गवत् । रसलुब्धी विनष्टः स्यादामिषे लुब्धमीनवत् ॥ १९॥ अर्थ - रूपाच्या मागे मोहित होवून पतंग कीटक दिव्याच्या ज्योतिवर जाऊन बसतो, आणि भाजून निघतो, तसाच खाद्याच्या मागे लागून अर्थात् जिह्वरसाने मोहित होवून मासा (मीन) अन्नगोळीला मोहित होवून फशी पडतो, नष्ट होतो तद्वतच मनुष्य मोहक वस्तुच्या मागे लागून नष्ट होतो. ॥ १९॥ यथैव गन्धलुब्धोऽहिर्गन्धलुब्धस्तथा पुमान् । मृत्युमेति यत्स्तस्मान्नेच्छेद् गन्धमपि क्वचित ॥ २०॥ अर्थ - ज्याप्रमाणे चंदनाच्या सुगंधाच्या मागे लागून सर्प त्यास वेष्टन घालून बसतो आणि माणूसपण त्या सुगंधासाठीच चंदनाजवळ जातो व सर्पदंशाने नष्ट होतो, तदनंतर (गर्दी गोळा होवून) माणसे सर्पाला मारतात. एकंदर गंधलुब्धतेमुळे सर्पनाश होतो, म्हणून गंधलुब्ध होवू नये ॥ २०॥ प्रमादो ब्रह्मनिष्ठायां विषयासक्तितो भवेत् । स हि मृत्युरिति प्रोक्तोनिखिलैर्ब्रह्मवेदिभिः ॥ २१॥ अर्थ - विषयांमध्ये (इंद्रियतृप्तिमागे) जाऊन ब्रह्मतत्त्वाचा शोध आणि अभ्यास ह्याचा नाश होतो, मनुष्याचा परमेश्वर विषयक चिंतन आणि अभ्यास नसल्याने आयुष्याचा नाश होतो, ह्यालाच वेदज्ञ व विद्वान मृत्यु असे म्हणतात. ॥ २१॥ यतो ब्रह्मात्मरूपस्य विस्मृत्यत्रानुभूयते । जीवनं मृत्युदुःखं हि मृत्युरेवात्मविस्मृतिः ॥ २२॥ अर्थ - ज्या पासून (विषयेंद्रिय तृप्तीसाठी प्रयत्न) ब्रह्मतत्त्वाची विस्मृति होते म्हणजे विसर पडतो ती स्थिती म्हणजेच मृत्यु होय. जीवन हे मृत्युकडे नेणारे दुःखमय असे सातत्यच होय! ॥ २२॥ देहाभिमानिनो ये च विषयासक्त चेतसः । सदा हि मृत्युदुःखं तैः सुखबद्ध्यानुभूयते ॥ २३॥ अर्थ - जे सतत आपल्या शरीराचाच अभिमान धरुन विषयांमध्येच गढलेले असतात, त्यांना सततच सुखासाठी म्हणून केलेल्या प्रयत्नांतून (सुखबुद्धया) मृत्युचे दुःखच पदरी पडते. ॥ २३॥ मरणोन्मुखस्य जिह्वाग्रे पतितं मधुबिन्दुवत् । विषयभोगसुखं तच्च कस्यानन्दाय कल्पते ॥ २४॥ अर्थ - जो व्यक्ती मरणाच्या अगदीच समीप दारांत गेलेला आहे, त्याच्या जीभेवर जर मधाचा थेंब टाकला तर तो जसा व्यर्थ आहे, तसेच विषयांपासून होणारे सुख सुद्धां व्यर्थच आहे. ॥ २४॥ शत्रुनाविकविच्चितं तनुःस्याद्भग्ननौरिव । विकारवायुनाक्षुब्धे किं सुखं जीवनीदधौ ॥ २५॥ अर्थ - शत्रुकडून भयभीत झालेले चित्त आणि शरीर हे एखाद्या फुटक्या नावेसारखे असून त्यातच विषयांच्या विकारांचा झझांवात (प्रचण्ड वादळ) अश्या स्थितीत त्याला जीवनसागरांत कोठले सौख्य मिळणार? ॥ २५॥ मनसा वञ्चते जीवः यथा राजा कुमन्त्रिणा । तेनाहितेन मार्गेण जीवो गच्छति नित्यशः ॥ २६॥ अर्थ - ज्याप्रमाणे एखादा राजा दुष्ट मंत्राच्या दुर्विचारी सल्ल्यामुळे फसविला जातो, त्याप्रमाणे हा जीव मनाच्या वाईट सल्ल्यामुळे फसविला जातो. नित्य अहिताच्या कुमार्गाने जीव मार्गक्रमण करतो. ॥ २६॥ भारोऽविवेकिनः शास्त्रं भारोज्ञानञ्च रागिणः । अशान्तस्य मनो भारं भारोऽनात्मविदो वपुः ॥ २७॥ अर्थ - सांसारिक विषयांत आसक्त अश्या लोकांना शास्त्र आणि शास्त्रज्ञान हे भारभूतच वाटते, ज्यांचे चित्त भिन्न विषयांमुळे चलविचल आहे, त्यांना मन हे पण भारी अर्थात ओझेच वाटते. जे आत्मज्ञान व आत्मसुख ह्यांनी रहित आहेत, त्यांना हे शरीर सुद्धा एक ओझेच वाटते. ॥ २७॥ यथोन्मत्गजारुढश्चाङ्कुशेन विना तथा । देहोऽहङ्कारारुढो जीवो ज्ञानाङ्नकुशाद्विना ॥ २८॥ अर्थ - ज्याप्रमाणे उन्मत् हाथीवरील सवार माणसाजवळ हत्तीला नियंत्रित करणारे अंकुश भाले जवळ नसेल तर हत्ती हेलकावे खाऊन दिशाहीन होईल त्याच प्रमाणे देहाचा अहंकार असणारा माणूस ज्ञानरूपी अंकुशाच्या अभावी जीवनांत हेलकावे खात राहील, व दिशाहीन होईल ॥ २८॥ देहाऽहङ्कारतः कामः क्रोधो लोभे मदोऽपिच । सर्वापि विषयासक्तिर्देहाऽह्ङ्कारतो भवेत् ॥ २९॥ अर्थ - देहाचा अंहकार निर्माण झाल्यावर देहावर काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर ह्या सर्वच विकारांची आसक्ती निर्माण होते. ॥ २९॥ अहङ्कारवशादापदहङ्काराद्दुराधयः । अहङ्कारवशादीहा नाहङ्कारात्परो रिपुः ॥ ३०॥ अर्थ - अहंकाराच्या आवरणामुळेच सर्व संकटे येतात. त्यामुळेच सर्व मनःस्ताप होतात. अहंकाराच्या कचाट्यांत सांपडल्यावर इच्छा उद्भवतात. अर्थात अहंकारापेक्षा मोठा महान शत्रू नाहीं. ॥ ३०॥ देहाऽहङ्कारतस्तृष्णा रजनीतस्तमो यथा । विवर्धते ततः कार्यं देहाऽहङ्कृतिनाशनम् ॥ ३१॥ अर्थ - देहामधील अंहकार आणि तृष्णा ही रात्रीच्या अंधःकारासारखी आहेत. त्यामुळे देह आणि अहंकार हे कार्य फोफावते, त्याची वृद्धि होते. ॥ ३१॥ ज्ञानं विना विरक्तिश्चेज्जीवो ह्याश्रयते मुदा । इमां कृन्तति तृष्णेयं तन्त्रीमिव कुमूषिका ॥ ३२॥ अर्थ - जीव हा ज्ञानविणा अर्थात अज्ञानाने आनंदाच्या शोधात असतो. त्याच्या मागे लागतो, पण ज्याप्रमाणे एखादी चुचूंद्री ही दोरीला कुरतडून टाकते, त्याप्रमाणे ह्या वासना, तृष्णा त्या आनंदाशी जोडणारे तार कुरतडून टाकून नष्ट करतात. ॥ ३२॥ शुष्क कासारवत् कामो गते वयसि शुष्यति । कालेन जीर्यते सर्वं तृष्णैका तरुणायते ॥ ३३॥ अर्थ - वय निघून गेल्यावर आटलेल्या तलावासारखा (सुकलेला तलाव) काम विकार पण शुष्क होतो. कालानुसार सर्वच क्षीण होते. पण वासना मात्र उफाळून तारुण्यांतच राहतात. ॥ ३३॥ आशा नाम मनुष्याणां काचिदाश्चर्यश‍ृङ्खला । यया बद्धाः प्रधावन्ति मुक्तास्तिष्ठन्ति पङ्गुवत् ॥ ३४॥ अर्थ - आशा नामक बेडी ही फारच आश्चर्यकारक आहे की जी पायांत पडल्यावर माणूस धावू लागतो आणि जर तिच्यापासून सुटला तर एखाद्या लंगड्यासारखा एके ठिकाणीच खिळलेला राहतो. ॥ ३४॥ जीर्यन्ति जीर्यतेःकेशादन्ता जीर्यन्ति जीर्यतः । जीवनाशाध्नाशाच जीर्यतोऽपि न जीर्यतः ॥ ३५॥ अर्थ - केस आणि दांत हे नष्ट होवू लागले गळूं लागले म्हणजे हळूं -हळूं क्षयच पावतात. पण जीवन आणि धनाची आसक्ति ही कांहीही झाले तरी आणि वय गेले तरी ही कमी होत नाहीं. ॥ ३५॥ पत्नी मे स्यात्सुती मे स्यात् धनं मे स्यात्थेतरम् । इति मे मेच कुर्वाणं हन्ति कालो वृकी बलात् ॥ ३६॥ अर्थ - मला पत्नी पाहिजे, पुत्र पाहिजे, धन आणि इतर सर्व हवे असे (मम, मे, माझे) मे -मे करणाऱ्या बक-यासारख्या जीवाला काळरूपी (यम) लांडगा घट्ट पकडून मारतो. ॥ ३६॥ इति श्रीसमर्थरामदासासानुगृहित श्रीरामपदपङ्कजभृङ्गायमान श्रीमत्परमहंस परिव्राजकाचार्य भगवता श्री श्रीधरस्वामिना विरचिते मुमुक्षुसखः ग्रन्थे संसारस्य दुःखमूलत्वंनाम पञ्चम प्रकरणं सम्पूर्णम् ।

६. मोक्षविघ्न कराः नाम प्रकरणं षष्ठम्

(मोक्षाला विघ्नकारक असे तत्त्व, कारणे) दारेषणा यथैव स्यात्त्थैव च सुतेषणा । वित्तेषणा तथाप्येवं मोक्षविघ्नकरा मता ॥ १॥ अर्थ - पत्निप्राप्तीची इच्छा, पुत्रप्राप्तीची इच्छा आणि धन संपादनाची इच्छा ह्या मोक्षप्राप्तीसाठी विघ्नकारकच आहेत. असे विद्वानांचे मत आहे. ॥ १॥ कामक्रोधी लोभमौहौ मदो मात्सर्यमेव च । एते विकारामरयो नारा एषां पर पदम् ॥ २॥ अर्थ - काम, क्रोध मद मत्सरादि विकार म्हणजे परमपद परमेश्वराप्रत जाण्यासाठी (मार्गातील) शत्रुच आहेत. ॥ २॥ यथा धूमावृतो वन्हिर्यथाऽऽदर्शो मलावृतः । ब्रह्मज्ञानं परं पुंसां कामाधैरावृतं तथा ॥ ३॥ अर्थ - ज्याप्रमाणे धूराने झांकलेला अग्नि, किंवा धूळीने माखलेला आरसा असतो त्याप्रमाणे कामादि विकारांचा पडदा पडून ब्रह्मतत्त्व विषयक ज्ञान हे झांकले गेले आहे. ॥ ३॥ सर्व प्रथम कामोऽयं सर्वश्रेष्ठी महानरिः । कामोऽहि नरकाग्नीनामिन्धनं चारु दारुणम् ॥ ४॥ अर्थ - सर्वात मुख्य आणि बलवान् म्हणजे हा कामवासनामय शत्रू आहे. नरकरूपी अग्निमध्ये वरुन सगळयांत मोहक चारु दिसणारे पण फारच दाहक असे इंधन जळण सरपण आहे. ॥ ४॥ विषमिश्रितमिष्ठान्नं यथा कर्षति स्वं प्रति । तथैव चारुतः कामः स्वं प्रत्याकर्षति स्वयम् ॥ ५॥ अर्थ - ज्याप्रमाणे (अजाणता) विषमिश्रित मोहक व मिष्ठान्न असते ते आपल्याला आकर्षित करते त्याप्रमाणे सुंदरतेने मोहित करुन हा काम विकार आपणांस स्वतःकडे आकर्षित करतो. ॥ ५॥ अयं मनसिजोऽनङ्गः प्रमाथा बलवत्तरः । महाहठी महापाप्मा दुष्पूरो दुष्ट एव च ॥ ६॥ अर्थ - हा मनामधे उद्भवणारा अमूर्त अजेय, दुष्ट अत्यंत बलवान कधीही तृप्त न होणारा अधाशी, महान पापी महाहट्टी असा कामशत्रू आहे. ॥ ६॥ बलादाकृष्य सर्वान्हि नियक्तुं पापकर्मसु । यततेऽहर्निशं नीचो निर्लज्जो दर्पवान् मलः ॥ ७॥ अर्थ - जोर जबरदस्तीने सर्वांना पापकर्मामध्ये ढकलून रात्रंदिवस नीच निर्लज्ज आणि घमेंडीनेयुक्त असा हा ``काम''म्हणजे जीवनाला एक कलंकच असतो. ॥ ७॥ सत्यविस्मारकं दुःखमपवित्रं जुगुप्सितम् । शोकमोहयुतं निन्द्यं जन्मद देहजं सुखम् ॥ ८॥ अर्थ - सत् तत्त्वाचे ब्रह्मरूपतत्त्वाचे विस्मरण करविणारा किळसवाण्या दुःखदायक अश्या अपवित्र शोक मोहकारक जन्मतः च शरीराबरोबर उत्पन्न होणाऱ्या ह्या देहज सुखाला धिक्कार असो. ॥ ८॥ विषसर्पो यथा कश्चिद्द्र्ष्टुमायाति वेगतः । वृत्तिवेगेन कामोऽयं याति दुष्टं तथैव च ॥ ९॥ अर्थ - विषारी सर्प जसा आपणांस दंश करण्यास एकदम वेगाने येतो, दिसत नाही आणि नकळतच येतो त्याप्रमाणे हा काम विकार आपल्याला नकळतच एकदम येवून दूषित करतो. ॥ ९॥ आकृष्यान्य यथा दुष्टो दुःखगर्ते निपातयेत् । तथैव देहगर्ते च कामो पातयति क्षणात् ॥ १०॥ अर्थ - दुष्ट मनुष्य ज्याप्रमाणे दुसऱ्याला फसवून खोल गर्तेमध्ये पाडतो त्याप्रमाणो काम विकार क्षणार्धात शरीरांत खोलवरपर्यंत दूषित वृत्ति रोपित करतो. ॥ १०॥ वपुःसमं नास्तिशोच्यं नीचं गुणविवर्जितम् । चर्भकुण्डं महाघोरं दुःखदौषैः समावृतम् ॥ ११॥ अर्थ - शरीरसमान दुःखदायक असे कांही नाहीं. हे एक घोर चर्मकुण्ड (चामड्याचे कुण्ड) दुःख आणि दोषांनी आवेष्टित असून गुणविहिन असे आहे. ॥ ११॥ त्वङ्मासरक्तरूपस्य दुर्गन्धेनावृतस्य च । जुगुप्साऽधर्मशीलस्य कैव देहस्य रम्यता ॥ १२॥ अर्थ - त्वचा मांस रक्तादिंनी युक्त असे असून दुर्गंधीने आवृत्त अश्या किळसवाण्या अधर्मप्रवृत अश्या शरीरात कोठली पवित्रता आहे. ॥ १२॥ क्षणभङ्गूरमत्यन्त तडिद्वत शरदभ्रवत । निःसारं देहसौख्यं हि तस्मान्नेच्छेद्वितद्बुधः ॥ १३॥ अर्थ - शरदऋतुतील अत्यंत क्षणभंगूर आणि क्षणैक चमकणाऱ्या वीजेप्रमाणे आणि अभ्राप्रमाणे, ढगाप्रमाणे असणाऱ्या अस्थित देहसुखाचा विचारवंत बुद्धजन विचार करीत नाहीं. ॥ १३॥ निकृष्टाशुचिदेहस्य दुःखपर्यवसानतः । सुखं भवति दुःखं हि यथाऽपथ्यस्य स्वादतः ॥ १४॥ अर्थ - अत्यंत हीन आणि अमंगल अश्या शरीराचे सुख म्हणून जे पहावे ते दुःखस्वरूपातच बदलते. ही क्रिया अगदी तशीच आहे कीं एखाद्या रोग्याला पथ्य म्हणून एखादा पदार्थ खाऊ नको म्हणून मना केल्यावर तो जिह्वा सुखासाठी तो खातो आणि नंतर त्याला दुःखच परिणामी भोगावे लागते. ॥ १४॥ स्वचित्बिलसंस्थेन नानाविभ्रमकारिणा । बलात्कामपिशाचेन विवशः परिभूयते ॥ १५॥ अर्थ - स्वतःच्या चित्तामध्येच ज्याने घर बनवून बिल संस्थितेने नाना प्रकारचे विभ्रम निर्माण करणारा असा बलात्कारी कामविकार त्याला आश्रय दिला तर तो मनुष्य विवश होवून हतबल होतो. ॥ १५॥ दैन्यदोषमयी दीर्घा नरे सम्भोगवासना । सर्वापदामेकसखी हृदिदाहप्रदायिनी ॥ १६॥ अर्थ - मनुष्यामध्ये कामवासना जी असते ती, सर्वदोषांनी संपूर्ण दीनता उत्पन्न करणारी, सर्वसंकटांची एकमात्र सखी (अर्थात हिच्या संगामुळेच सर्व संकटे येतात. ही अत्यंत दाहक अशी हृदयाला पीडा पोहचविते) ॥ १६॥ मांसपाञ्चालिका यश्च यन्यलोलाङ्गपञ्जराः । स्नाय्वस्थिग्रन्थिशालिन्यः तनवः किमु शोभनाः ॥ १७॥ अर्थ - मांसाची बाहुली, अस्थिपंजर ज्यामध्ये असते अशी अत्यंत चंचल त्याच प्रमाणे क्षणभंगूर अश्या स्नायू-अस्थि आणि वेगवेगळया गाठी यांनी निर्मित अशी ही शरीररूपी स्त्री काय पण मोहक असणार. ॥ १७॥ त्वङ्मांसरक्तबाष्पाम्म्बुपृथक्कृत्वा विलोचने । समालोयकतः कश्चिन्मोही न भवितुं क्षमः ॥ १८॥ अर्थ - डोळयांपासून ज्यांत कीं रक्त, मांस, वाष्प आणि पाणी असते, हे जर वगळले तर त्यांस नजर मिळवितांना (विलोयतः) कुणाचा मोह क्षम्य ठरेल. ॥ १८॥ केशकज्जलधारिण्यः दुःस्पर्शा लाचनप्रियाः । तनवोऽग्निशिखेवात्र दहन्ति तृणवद्भृशम् ॥ १९॥ अर्थ - काळेभोर केस आणि काजळ धारण केलेल्या, ज्यांचा स्पर्श हा असह्य असतो, अश्या नयनाकर्षक (स्त्रियां) अश्या शरीरधारी अग्निची ज्वाळा ज्याप्रमाणे गवताला त्वरित जाळून भस्म करते, त्याप्रमाणे दाहक असतात. ॥ १९॥ दूरतश्च नगो रम्यो दूरतःकण्टकं वनम् । दूरतोऽग्निशिखा रम्या तनू रम्या च दूरतः ॥ २०॥ अर्थ - दूरुनच डोंगर साजरे दिसतात, दूरुनच वन सुंदर दिसते आणि दूरुनच अग्निच्या ज्वाळा रम्य दिसतात. त्याप्रमाणे स्त्रीशरीर पण दुरुनच रमणीय दिसते. ॥ २०॥ नैवालिङ्गनयोग्या च सुन्दराग्निशिखा यथा । नैवालिङ्गनयोग्या च ज्वलत्कामतनुस्तथा ॥ २१॥ अर्थ - ज्याप्रमाणे अग्निज्वाला ह्या अलिंगन देण्यास योग्य नाहींत, त्याच प्रमाणे कामाग्निने पेटलेले शरीर अलिंगन देण्यास योग्य नाहीं. ॥ २१॥ जन्मपल्वलमत्स्यानां चित्कर्दमचारिणाम् । जीवानां वासनारज्जुस्तनुर्वडिशापिण्डिका ॥ २२॥ अर्थ - छोट्या तळयांत पल्वल उत्पन्न झालेल्या आणि त्याच चिखलांत वळवळणाऱ्या माशांचा देह हा (वर उडणाऱ्या) पक्ष्यांच्या वासनेला (भक्ष्य) म्हणून असतो. ॥ २२॥ सर्वेषां दोषरत्नानां वासना स्वर्णगुम्फिता । सुन्दराऽऽकर्षिकाप्येवं तनुःस्याद्दुःखश‍ृङ्खला ॥ २३॥ अर्थ - सर्वच वास दोषांना वासना ही रत्नांना सुवर्णाने गुंफावे तशी गुंफून टाकते. सुंदर आणि आकर्षक असली तरी ही तनु म्हणजे शरीर एक दुःखाची श्रृंखला, बेडीच आहे. ॥ २३॥ कामनाम्ना किरातेन विकीर्णेयमितस्ततः । तनुर्जीवविहङ्गानामङ्गबन्धनवागुरा ॥ २४॥ अर्थ - काम नामक पारध्याने इतस्ततः फेकलेले जाळे हे शरीररूपी विहंगांना बंधक बनविते. (पारधी म्हणजे पक्षी जाळयांत पकडणारे बहेलिया।) ॥ २४॥ अन्तर्निलीन एवायं भोगासक्तिं वृथैव हि । जनयित्वा मोक्षमार्गे परिपन्थी भवेत्यिपि ॥ २५॥ अर्थ - आपल्या अंतचित्तामध्ये दडून बसलेली ही वासनांची आसक्ति व्यर्थच आमच्या मोक्षमार्गंतील बाधादायक शत्रू होते. ॥ २५॥ अन्नोदाहरणीयानि गीतावाक्यानि कानिचित् । प्रसङ्गतो हितार्थाय बोधनाय मुमुक्षुणाम् ॥ २६॥ अर्थ - येथे कांही गीतेतील वाक्यें उदाहरणादाखल देत आहे. ते वेळप्रसंगी मुमुक्षुजनांच्या हितासाठी आणि बोध होण्यासाठी कामास पडतील ॥ २६॥ त्रिविधं नरकस्येदं द्वारं नाशनमात्मनः । कामःक्रोधास्तथा लोभस्तस्मादेतत् त्रयं त्यजेत् ॥ २७॥ अर्थ - आत्मनाश करणारी ही तीन प्रकारची द्वारे येथे आहेत. काम, क्रोध, लोभ ही तीन द्वारे असून त्यांचा नेहमी त्याग करावा. ॥ २७॥ एवैर्विमुक्तः कौन्तेय तमोद्वारैस्त्रिभिर्नरः । आचारत्यात्मनः श्रेयस्ततो याति परां गतिम् ॥ २८॥ अर्थ - हे अर्जुन ! ह्या तमोगुणांनी युक्त अश्या अंधःकारमय दारांनी अर्थात् मार्गांनी न जाता त्या तिन्ही मार्गांचा त्याग करुन, जो मनुष्य ``श्रेयस'' ह्या मार्गाने जातो, त्याला परम गति मिळते. ॥ २८॥ कामक्रोधवियुक्तानां यतीनां यतचेतसाम् । अभितो ब्रह्मनिर्वाणं वर्तते विदितात्मनाम् ॥ २९॥ अर्थ - काम, क्रोधरहित झालेल्या ज्ञानी योग्यांच्या प्रयत्नशीलत्वाने पवित्र अश्या चित्तांचा ब्रह्मतत्त्वाकडे लय होतो. ॥ २९॥ शक्नोतीहैव यः सोढुं प्राक्शरीरविमोक्षणात् । कामक्रोधोद्भवं वेगं स युक्तः स सुखी नरः ॥ ३०॥ अर्थ - ह्या ऐहिक शरीराचा त्याग करण्यापूर्वीच इह एव येथेच ते योगी त्या काम क्रोधाचा आवेग सहन करण्यास समर्थ होवून सुखी होतात. ॥ ३०॥ यतेन्द्रियमनोबुद्धिर्मुनिर्मोक्षपरायणः । विगतेच्छाभयक्रोधी यः सदा मुक्त एव सः ॥ ३१॥ अर्थ - मोक्ष इच्छु असे मुनी मन आणि बुद्धिला त्याच विषयाकडे (मोक्षेच्छेकडे) लावून भय व इच्छारहित होतात आणि ते सदा मुक्तच होत. ये हि संस्पर्शजा भोगा दुःखयोनय एव ते । आद्यन्तवन्तः कौन्तेय न तेषु रमते बुधः ॥ ३२॥ अर्थ - ज्याही भोगांच्या संपर्कात आपण येतो ते सर्व दुःखालाच कारण होतात. कारण ते आदि आणि अंत सहित असल्यामुळे क्षणिक नश्वर असतात. म्हणून पंडित लोक त्यांत रममाण होत नाहित. ॥ ३२॥ इत्युक्त्वा भगवान् कृष्णो ह्यन्ते च समुपादिशत् । ज्ञानं वैराग्यमेवं च कामनाशाय साधनम् ॥ ३३॥ अर्थ - असे म्हटल्यानंतर भगवान श्रीकृष्णांनी असा उपदेश केला आहे कि, ``हे ज्ञान आणि वैराग्यच कामाचा नाश करणारे आहेत. तेच कामनाशाचे साधन आहे।'' ॥ ३३॥ इन्द्रियाणि मनो बुद्धिरस्याधिष्ठानमुच्यते । एतैर्विमोहयत्येष ज्ञानमावृत्य देहिनाम् ॥ ३४॥ अर्थ - इंद्रिय मन आणि बुद्धि हेच त्या कामविकारांच्या आश्रयाचे स्थान आहे. माणसाचे ज्ञान झांकून टाकून त्याला ते मोहित करतात. कामशत्रू भुरळ पाडतात. ॥ ३४॥ तस्मात्वमिन्द्रियाण्यादौ नियम्य भरतर्षभ । पाप्मानं प्रजहि ह्येनं ज्ञानविज्ञाननाशनम् ॥ ३५॥ अर्थ - म्हणून हे अर्जना! तू या इंद्रिय आदि निर्बल स्थानांना नियंत्रित करुन ह्या पापी अश्या कामाला जो की आमच्या ज्ञान आणि विज्ञानाचा नाश करतो त्याला पराभूत कर ! ३५॥ इन्द्रियाणि पराण्याहुरिन्द्रियेभ्यः पर मनः । मनसस्तु परा बुद्धिर्यो बुद्धं परतस्तु सः ॥ ३६॥ अर्थ - इंद्रिय हे श्रेष्ठ आहेत. इंद्रियांपेक्षा मन श्रेष्ठ आहे. मनापेक्षा बुद्धि आणि बुद्धिपेक्षा जो श्रेष्ठ आहे, तोच आत्मा आहे. ॥ ३६॥ एवं बुद्धेःपरम्बुद्ध्वा संस्तभ्यात्मानमात्मना । जहि शत्रुं महाबाहो कामरूप दुरासदम् ॥ ३७॥ अर्थ - ह्याप्रमाणे बुद्धिहूनही श्रेष्ठ असे त्या ``आत्मतत्त्वास'' जाणून त्यातच स्वतः आत्मतत्त्वामध्ये स्थिरचित्त करुन कामरूपी महान् व अजेय अश्या शत्रूवर विजय मिळव. ॥ ३७॥ आत्मज्ञानवशाच्चापि देहात्मप्रत्ययादपि । नरो नारीति भानाद्धा कामोत्पत्तिः प्रजायते ॥ ३८॥ अर्थ - आत्मज्ञान वश (प्राप्त) झाल्यावर सुद्धा देहात्माचा प्रत्यय आल्यावर सुद्धा नर आणि नारी असे भान उत्पन्न होवून कामविकार उत्पन्न होवू शकतो. ॥ ३८॥ मैथुनोत्पत्तिसङ्कल्पात् पुत्रवासनयाऽपि च । समीचीन दृशावाऽपि कामोत्पत्तिः प्रजायते ॥ ३९॥ अर्थ - मैथुन करण्याची इच्छा आणि त्यापासून पुत्र उत्पत्तीची इच्छा सुद्धा केवल दृष्टी मिळविल्याने पण उत्पन्न होवूं शकते. ॥ ३९॥ अनेक जन्म संस्काराद्देहतारुण्यतोऽपि च । विषयीजनसंसर्गात् कामोत्पत्तिः प्रजायते ॥ ४०॥ अर्थ - अनेकानेक जन्मसंस्कारांमुळे देह तारुण्यावस्थेत आल्यावर कामी जनांच्या सान्निध्यांत आल्यावर कामविकाराची उत्पत्ति होते. ॥ ४०॥ रजसो रेतसश्चैव मिश्रणं देहकारणम् । तनोर्मैथुनजातत्त्वात् कामासक्तिः प्रजायते ॥ ४१॥ अर्थ - रजस् आणि रेतस् ह्यांच्या मिश्रणामुळे देह प्राप्त होतो. आणि शरीरांचे मैथुन झाल्यावर कामवासनेची आसक्ति (अनिवार्य सतत इच्छा) निर्माण होते. ॥ ४१॥ पितप्रकृतितश्चैवमुष्णपानान्नसेवनात् । पापेकर्मभिरप्येवं कामवृद्धिः प्रजायते ॥ ४२॥ अर्थ - पित्त प्रकृतिने तथा उष्ण पेय व अन्न सेवनाने तथा पापकर्माने कामविकारांची वृद्धि होते. ॥ ४२॥ रजोऽधिक्येन स्त्रीदेहो रेतोऽधिक्येन पुंस्तनुः । अन्योन्य देयोनी च ह्यन्योन्यच्छाततो भवेत् ॥ ४३॥ अर्थ - रज कण अधिक प्रमाणांत असल्यास स्त्रीदेह आणि रेत कण अधिकता असल्यास पुरुष देह उत्पत्तिस कारण होतात. आणि वेगवेगळया योनीमध्ये देह उत्पत्ती झाल्यानंतर परस्पर स्त्री -पुरुष देहामध्यें आकर्षणाची उत्पत्ती होते. ॥ ४३॥ सुखस्वरूप ज्ञानेन नष्टा देहात्मधीर्यदा । देहबुद्धौ विनष्टायां कामात्पत्तिर्न सम्भवेत् ॥ ४४॥ अर्थ - सुखाचे जे अक्षर रूप, अक्षय आनंदरूप त्याचे ज्ञान झाल्यावर आणि देहबुद्धि नष्ट झाल्यावर अर्थात् ``मी देह आहे'' ही अहं बुद्धि नष्ट झाल्यावर काम विकार उत्पन्न होत नाहीं. ॥ ४४॥ देहाभिमाने गलिते विज्ञाते परमात्मनि । यत्रयत्र मनो याति तत्रतत्र परामृतम् ॥ ४५॥ अर्थ - देह अभिमानाचा अस्त झाल्यावर परमात्मज्ञानाचा उदय होवून ज्या ज्या ठिकाणी मन जाते, त्या त्या ठिकाणी परमात्मतत्त्वामृत प्राप्त होतो. ॥ ४५॥ ह्याप्रमाणे श्रीसमर्थरामदासांनी अनुग्रह दिलेले श्रीरामाचे पदकमलावरी भृङ्गरूपाने गुञ्जन करणारे परमहंस परिव्राजकांचे आचार्य भगवान् श्रीधरस्वामी ह्यांनी रचलेले मोक्षविघ्नकराः हे सहावे प्रकरण समाप्तः ।

७. देहजुगुप्सितत्त्वं तथा कामनिन्दा प्रकरणं सप्तम्

(शरीराची शिसारी (घृणा) आणि कामवासनेची निन्दा - स्वदेहाऽशुचिगन्धेन न विरज्येत यःपुमान् । विरागकारणं तस्य किमन्यदुपदिश्यते ॥ १॥ अर्थ - स्वतःच्या शरीरामधील अशुद्धी आणि दुर्गंधी ह्यामुळे ज्या माणसाचे मन विटत नाहीं, त्यास आणखी काय उपदेश करणार की ज्या मुळे त्यास आपल्या शरीराचे हीनत्व पटेल. ॥ १॥ त्वङ्मांसरुधिरस्नायुमज्जामेदोऽस्थिसंहतौ । विण्मूत्रपूये रमतां कृमीणां कियदन्तरम् ॥ २॥ अर्थ - कातडे, रक्त, मांस, पू आणि विष्टा, मूत्र, हाडे, नसा आदि मध्येच आनंदाने वळवहणाऱ्या कीड्या मध्ये आणि ह्या माणसांत काय फरक आहे. ॥ २॥ मांसासृक्पूयविण्मूत्रस्नायुमज्जास्थिसंहतौ । देहेचेत्प्रीतिमान् मूढो भविता नरकेऽपि सः ॥ ३॥ अर्थ - मल मूत्र अस्थि मज्जा रक्त स्नायु नाडयांमध्ये ज्या मूढ व्यक्तिला अश्या अमंगळ देहामध्ये पण प्रीति उत्पन्न होते, तो नरकास पण प्रेम करु शकतो. ॥ ३॥ मलानां निचयो देहो नित्यामध्यो जुगुप्सितः । विना मूढं न कोप्यत्र देहेस्मिन् प्रीतिमान् भवेत ॥ ४॥ अर्थ - मळांचा निचरा म्हणजेच हा देह नित्यच घृणास्पद आहे. त्या देहाची प्रीति मूर्ख माणसाशिवाय कुणाला उत्पन्न होणार. ॥ ४॥ बहुदुःखालयं घोरं मातृपितृमलात्मकम् । मूत्रद्वाराच्च निष्क्रान्त वपुःकिमिव शोभनम् ॥ ५॥ अर्थ - अत्यंत दुःखाचे घर आणि माता पितांच्या मळापासून ज्याचा उद्भव आहे असा हा देह मूत्रद्वारातूनच तो उद्भवला आहे तो काय मोठा शोभायमान (सुंदर) आहे. ॥ ५॥ त्वङ्गमांसरुधिरास्थीनि मेदो मज्जा तथैव च । शुक्रश्लेष्माश्रुविण्मूत्रं वपुः किमिव शोभनम् ॥ ६॥ अर्थ - कातडे रक्त मांस हाडे मेद मांस नसा यांनी बनलेला तथा शुक्र, कफ, अश्रु, विष्टा, मूत्रांनी भरलेला हा देह काय बरे सुंदर आहे. ॥ ६॥ वातपित्तकफेर्युक्तं नानारोगसमन्वितम् । दुर्गन्धं दुर्गलोपेतं वपुः किमव शोभनम् ॥ ७॥ अर्थ - वात, कफ, पित्त युक्त नाना रोगांनी ग्रस्त, दुर्गंध आणि अत्यंत किळसवाण्या अश्या मलांनीयुक्त असा हा देह काय पण सुंदर आहे. ॥ ७॥ अन्त्रप्लीहायकृद्युक्तं स्नायूग्रन्थिभिरावृत्तम् । बहुकोशयूतञ्चापि वपुःकिमिव शोभनम् ॥ ८॥ अर्थ - आंतडे प्लीहा, त-हे त-हे चे मासयुक्त अवयच यांनी युक्त अनेक स्नांयू आणि सांधे गाठी यांनी व्यापलेले तथा अनेक कोशांनी युक्त असे शरीर काय फार चांगले म्हणावे. ॥ ८॥ बहुकोशैर्विभक्तं यद् रोमकूपै समावृतम् । दुष्प्रेक्ष्यं दूषिकाद्यैश्च वपुः किमिव शोभनम् ॥ ९॥ अर्थ - अनंत छिद्रांनीयुक्त तथा केशमूलांनी युक्त ओंगळ कंटाळवाणे हे शरीर कायशोभा देणारे आहे. ॥ ९॥ यदि विश्लेषणं जातं शरीरं शकटोपमम् । भिन्नद्रव्यैस्तथा चाङ्गैस्तन्नामेकं न सम्भवेत् ॥ १०॥ अर्थ - जर शरीराचे विश्लेषण केले तर ते एखाद्या गाड्यासारखे असून अनेक द्रव्य आणि विभागांनी भरलेले हे गाडे मोठे वाहन ह्याला एक नांव पण देता येणार नाहीं. ॥ १०॥ किमस्मिन्नुपभोगैश्च किमालङ्कृतिभिस्त था । किमाङ्गरागैः किं वस्त्रैः किं गतेन स्थितेन वा ॥ ११॥ अर्थ - अश्या ह्या शरीराला काय उपभोग द्यावा, पंचेंद्रियांस काय संतुष्ट करावे आणि काय वस्त्र अलंकारांनी नटवावे, काय त-हे त-हे चे विलेपन (प्रसाधने) वापरावीत, आणि ते (शरीर) राहिले काय, गेले काय सर्व व्यर्थ असून नश्वर आहे! ॥ ११॥ धिगेतान्विषयान्देहान् विकारांश्च विशेषतः । धिक् स्त्रीपुरुषभानं च धिगज्ञानंच जीवनम् ॥ १२॥ अर्थ - ह्या सर्व देहविषयांचा धिक्कार असो. ह्यातील स्त्री आणि पुरुष ह्या प्रकारे भान उत्पन्न होवून त्यांत भेदबुद्धि वाटणे ह्या सर्व अज्ञानाचा धिक्कार असो. ॥ १२॥ जातं मृतमिदं देहं मातापितृमलात्मकम् । सुखदुःखालयामेध्यं स्पृष्ट्वा स्नानं विधीयते. ॥ १३॥ अर्थ - हे मातापित्याच्या मलांनी युक्त तथा उत्पन्न शरीर जन्मल्यावर किंवा मृत झाल्यावर जर स्पर्श केला तर स्नान करावे लागते, हे शरीर दुःखाच्या विस्ताराचेच घर आहे. ॥ १३॥ धातुबद्ध महारोगं पापमन्दिरमध्रुवम् । विकाराकारविस्तीर्ण स्पृष्ट्वा स्नानं विधीयते ॥ १४॥ अर्थ - हे अनेक धातुंचे निर्मित तथा रोगांनीयुक्त सर्व पापांचे माहेरघरच. अश्या विकार आकारांनी फोफावले आहे कीं स्पर्श केल्यावर स्नानच करावे लागते. ॥ १४॥ नवद्वारमलस्त्रावं सदाकाले स्वभावजम् । दुर्गन्ध दुर्मलोपेतं स्पृष्ट्वा स्नानं विधीयते ॥ १५॥ अर्थ - नव द्वारांमधून मलाचा स्त्राव सततच चालूं असतो. (दोन डोळे दोन नासिका तथा कर्ण छिद्रे मुख तथा गुदा जनन द्वारे) आणि त्यास दुर्गंध असून स्पर्श केल्यास स्नान करावेच लागते. (पाण्याने स्वच्छ करावेच लागते।) ॥ १५॥ मातृसूतकसम्बध सूतके नैव नायते । मातृसूतकजं देहं स्पृष्टवा स्नानं विधीयते ॥ १६॥ अर्थ - माते संबंधी सूतक अशौच पाळले जात नाहीं. पण त्यापासून उत्पन्न देहाला स्पर्श केल्यास अंघोळ करावी लागते. ॥ १६॥ भोजनान्ते स्मशानान्ते मैथुनान्ते च या मतिः । यदि सा सर्वदैवस्यात् को न मुच्येत बन्धनात् ॥ १७॥ अर्थ - भोजन केल्यानंतर, स्मशानांत जाऊन आल्यांतर आणि मैथून क्रियेनंतर पाण्याने शुद्धीकरण करण्याची बुद्धि असेल तर ती तशीच शुद्धीकरणाची क्रिया सर्वच कार्यात ठेवली (अर्थात् मानसिक आसक्ति सोडून निर्विकार राहण्याची बुद्धि ठेवली) तर कोण मुक्त होणार नाही, अर्थात तो मुक्तच होईल. ॥ १७॥ देहसम्भोगतोप्सस्य शौचकूपे निमज्जनम् । वैराग्यजनकं शुद्ध मुनीनां मतमीदृशम् ॥ १८॥ अर्थ - देह संभोगानंतर स्नान करणे हे शौचकूपात जाऊन स्नान करण्यासारखे आहे. असे पण्डितांचे मत आहे. परंतु मनांतील आसक्ति दूर होणे, मन वैराग्यपूर्ण होणे म्हणजेच खरे निमज्जन स्नान आहे, असे ज्ञानी लोकांचे मत आहे. ॥ १८॥ पिशाचावेशवज्ज्ञेयावावेशौ कामक्रोधयोः । विस्मारयति चात्मानं हेय देय गुणास्तथा ॥ १९॥ अर्थ - काम आणि क्रोध यांचा झटका येतो तेंव्हा अंगांत पिशाच्च संचार झाल्यासारखाच असतो. त्यावेळेस ते विकार आपणास आपल्या आत्मबुद्धिचा विसर पाडून अत्यंत निंदनीय आणि हीन गुणांचे प्रदर्शन करतात. ॥ १९॥ अपकारिणि कोपश्चेत्कोपे कोपो हि सत्कृतः । जयेत्कोपेन कोपं हि श्रृत्या समुपदिश्यते ॥ २०॥ अर्थ - श्रुति म्हणजे आमचे वैदिक ज्ञान असा उपदेश करते की कांट्यानेच कांटा काढावा. त्याप्रमाणे क्रोधाचा क्रोध करुनच (अर्थात त्यास दूर करुनच पराजय करावा). अर्थात दुष्टभावनेचा त्याग सद्भावनेनेच करावा. ॥ २०॥ कोपः कामेऽपि कृत्वैवं जयेत्कामं सुबुद्धिमान् । कामो दग्धो शिवेनायं कोपेनैव यथा तथा ॥ २१॥ अर्थ - कामवासनेवर पण क्रोध करुनच त्यास जिंकावे. भगवान शंकराने सुद्धा कामदेवाचा नाश क्रोधानेच केला होता. तद्वत आपण ही ह्या कामवासनेचा त्याग (नायनाट) करावा. ॥ २१॥ कामात् कोपी वरो ज्ञेयो दुर्गुणांश्च देहद्यदि । कोपेन स्वान्विकारांश सन्दह्यैवं सुखी भवेत ॥ २२॥ अर्थ - कामवासनेपेक्षा क्रोध हा बरा. क्रोधाने जर आपल्यामधील दुर्गुण जाळले जातील तर ते स्वतः मधील दुर्गुण विकार दग्ध करुन सुखी व्हावे. ॥ २२॥ क्रोधेन कामं चोत्पाट्य कण्टकेनैव कण्टकम् । पश्चात् क्रोधोऽपि त्यक्तव्यः सोप्येवं कण्ट कायते ॥ २३॥ अर्थ - क्रोधाने कामाला उचकटून टाकून कांटयानेच कांटा काढावा. त्यानंतर क्रोधही काढून फेकावा. कारण तो सुद्धा काट्या सारखाच रुतुन बसणारा दुःखदायक आहे. ॥ २३॥ त्यक्त्वा कामश्च क्रोधश्च विश्वामित्रो महातपाः । ब्रह्मर्षिरभवच्चैवं सर्वेषां ज्ञातमेव हि ॥ २४॥ अर्थ - महान् तपस्वी विश्वामित्र सुद्धा काम आणि क्रोध ह्यांचा त्याग करुनच महान् झाले. ते ब्रह्मर्षि झाले. आणि ब्रह्मर्षि पदाला प्राप्त होते झाले. हे सर्व विदितच आहे. ॥ २४॥ वपुषःस्यात्सुखं मत्वा कामस्यायं बलिर्भवेत् । वपुषो न सुखं किञ्चिन्मत्वा कामं जयेद्वि सः ॥ २५॥ अर्थ - शरीरापासून सुख प्राप्त होईल असे जाणून काम हा वरचढ झाला. पण शरीरापासून सुख नाहीं. (खरे सुख नाही) हे समजल्यावर कामावर विजय मिळविता येतो. ॥ २५॥ वपुरसज्जडं दुःखं स्वात्मा सच्चित्सुखाद्वयः । सुखं स्यादात्मनो रूपं देहस्य न कदाचन ॥ २६॥ अर्थ - शरीर हे असत् दुःखदायक आणि जड असे आहे. आत्मा हा अक्षय सुखदायक आणि अद्वितीय आहे. सुख हे आत्मस्वरूपातच आहे. देहस्वरूपांत सुख हे टिकणारे नाहीं. ॥ २६॥ वपुरनेक युक्तं हि स्वात्मा नित्योऽद्वयः सदा । तयोरैक्यं प्रपश्चन्ति किम ज्ञानमतः परम् ॥ २७॥ अर्थ - शरीर हे अनेक तत्त्वांनी भरलेले असून आत्मा अद्वय आणि एकच एक आहे. त्याचे शरीराशी एकरूपत्व बघणे हे काय मोठे ज्ञान झाले. ॥ २७॥ वपुर्जुगुप्सितं हेयं स्वात्मा प्रियतमो शुचिः । तयोरैक्यं प्रपश्चन्ति कित ज्ञानमतः परम् ॥ २८॥ अर्थ - शरीर हे घृणास्पद आहे आणि आत्मा हा निर्मल आहे. त्याचे एकत्व मानणे हे काय ज्ञान झाले, अर्थात ह्यातच सर्व अज्ञान स्पष्ट झाले. ॥ २८॥ वपुर्जन्मजरायुक्त स्वात्माऽजोऽजड एव हि । तयोरैक्यं प्रपश्चन्ति किम ज्ञानमतः परम् ॥ २९॥ अर्थ - शरीर हे जन्म आणि वृद्धत्वाने युक्त आहे. आणि आत्मा हा अजन्मा आणि चैतन्यमय आहे. त्यांना एकच समजणे ह्यांत का शहाणपण आहे ॥ २९॥ वपुर्विकारयुक्तं हि स्वात्मा विकार वर्जितः । तयोरैक्यं प्रपश्यन्ति किमाश्चर्यमतः परम् ॥ ३०॥ अर्थ - शरीर हे विकारयुक्त आणि आत्मा हा अविकारी आहे. आणि त्यांना एकच समजणे हे किती आश्चर्यकारक आहे. ॥ ३०॥ वपुर्बाह्यं नियम्यञ्च स्वात्मा तस्य नियामकः । तयोरैक्यं प्रपश्यन्ति किम ज्ञानमतः परम् ॥ ३१ -३२॥ अर्थ - नियम्य म्हणजे ज्यावर नियंत्रण ठेवता येती ते. तर हे शरीर म्हणजे आपल्या नियंत्रणांत ठेवता येते. (अर्थात आत्म्याला त्यावर नियंत्रण ठेवता येते।) अर्थात आत्मा त्याचा नियंत्रक असतो. शरीर हे त्यांच्या ताब्यात असणारे एक यंत्र असते. साधन असते. ह्या दोघांचे शरीर व आत्मा ऐक्य आहे. असे समजणे हे काय मोठे ज्ञानी म्हणावे. ॥ ३१ -३२॥ वपुर्दृश्यं मृत्युयुक्तं स्वात्माऽदृश्य तदाव्ययः । तयोरैक्यं प्रपश्यन्ति किम ज्ञानमतः परम् ॥ ३३॥ अर्थ - शरीर हे मृत्यु सहित आहे. हे दृश्य स्वरूप आहे. आत्मा हा अदृश्य असून त्यातच राहणारा आहे. आणि आत्म्याला आणि शरीराला एकच समजणे हे काय शहाणपणाचे आहे. अर्थात नाहीं. ते मूढपणाचेच आहे. ॥ ३३॥ वपुस्त्वङ्मांसयुक्तं हि स्वात्माऽनन्दः स्वयं प्रभः । तयोरैक्यं प्रपश्यन्ति किमाश्चर्यमतः परम् ॥ ३४॥ अर्थ - शरीर हे त्वचा, मांसयुक्त आणि आत्मा हा स्वयंप्रकाशी आहे. त्या दोघांना एकच मानणे हे काय मोठ्या ज्ञानी पण्डिताचे काम आहे. ॥ ३४॥ सुखं न देहजं क्वापि स्वात्मैव सुखरूपकः । परस्पराध्यासतश्च सुखं देहाद्विभासते ॥ ३५॥ अर्थ - स्वात्मा हा स्वतः सुखरूप आहे आणि शरीरापासून मिळणारे सुख त्यांत कोठल्याही प्रकारे होत नाहीं. ते केवळ भ्रमाने तसे परस्पर एकत्व आहे, असे वाटते. ॥ ३५॥ अयोगोलो यथा नाग्नि देहो न सुखरूपकः । अयोगोलो ज्वलत्येव वाक्यवत्स्यात्सुखं वपुः ॥ ३६॥ अर्थ - एखादा लोहगोल हा तप्त ठेवून लाल झाल्यावर स्वतः अग्नि नसतो. पण अग्निच्या संपर्कात आल्यामुळे अग्निसारखा भासतो. त्याप्रमाणे हा देह सुखरूपच आहे, असे (आत्मसंपर्कामुळे) भ्रमाने वाटते ``लोखंडाचा'' गोळा जळतो, ह्या वाक्याप्रमाणे शरीराला सुखरूप असे म्हटले जाते. ॥ ३६॥ अन्नविकारतो जातं मलमांसैश्च रूपितम् । पञ्चभौतिकमेवेदं वपुरात्म सुखं न हि ॥ ३७॥ अर्थ - अन्न हे विकार उत्पन्न झाल्यावर स्वरूप बदलते. खाल्यानंतर अन्नाचे पचन होवून मल मांस आदि मध्ये रूपांतर होते. तसेच पंचमहाभूतांचे रूपांतर होवून हा देह बनतो. अर्थात ते विकारी आहेत. पण तसेच आत्मतत्त्व अविकारी असते. ॥ ३७॥ देह देहि विभागैक परित्यागेन भावना । देहमात्रे हि विश्वासः सङ्गोबन्धाय कथ्यते ॥ ३८॥ अर्थ - देह (शरीर) आणि देही (आत्मा) हे एकच आहेत असा भ्रम उत्पन्न होतो. देह हा संग उत्पन्न झाल्यामुळे त्याचा (आत्म्याचा) विळखा उत्पन्न होतो. तो बंधना सारखा असतो आणि आम्हास देह म्हणजेच आत्मा असे वाटू लागतो. ॥ ३८॥ देहे यावदहं भावो दृश्येऽस्मिन्यावदात्मता । यावन्ममेदमित्यास्था तावच्चित्तादि विभ्रमः ॥ ३९॥ अर्थ - जो पर्यंत ह्या देहामध्ये अहंभाव आणि दृश्यस्वरूपी देहामध्येच आत्मा आहे, एकत्वाची भावना आहे. तो पर्यंत मी आणि माझे ही भावना राहते. आणि तो पर्यंत चित्ताचा विभ्रम मी म्हणजे माझे शरीर अशी भावना दृढ होते. ॥ ३९॥ देहेन्द्रियेष्वहम्भाव इदं भावस्तदन्तिके । यस्य नो भवतः क्वापि स जीवन्मुक्त इष्यते ॥ ४०॥ अर्थ - देह आणि इंद्रियांमधील मोहयुक्त मी आणि माझे हा भाव ज्याचा नष्ट झाला तो जीवनमुक्तच झाला. त्याला हा भाव कोठेच उत्पन्न होत नाहीं. ॥ ४०॥ देहेन्द्रियेष्वहम्भाव इदं भावस्तदन्तिके । तावद्वि विषयासक्तिः कामोऽपि हि प्रजायते ॥ ४१॥ अर्थ - देह आणि इंद्रिये ह्या ठिकाणी अहंभाव, हेच मी आणि माझे अशी पक्की समजूत झाली की त्यातूनच काम आणि क्रोध उत्पन्न होतो. विषयांमध्ये आसक्ति निर्माण होते. ॥ ४१॥ कामेन विषयाकाङ्क्षा विषयात्काममोहितः । द्वावेव सन्त्यजेन्नित्य निञ्जन मुपाश्रयेत् ॥ ४२॥ अर्थ - काम उत्पन्न झाला म्हणजे सर्वच इंद्रियवासना निर्माण होतात. आणि मग सर्व विषयांचा भोग घेण्याचा मोह निर्माण होतो. परंतु ह्या दोन्ही मोहांचा त्याग करुन नित्य अक्षय अश्या ब्रह्मतत्त्वाचा आश्रय घ्यावा, त्याचे ध्यान करावें. ॥ ४२॥ देहस्याप्रिय दुर्गन्धो भवत्यति प्रियङ्करः । दुर्प्रेक्ष्यं हि सुरूपञ्च कामावेशोऽयमीदृशः ॥ ४३॥ अर्थ - काम विषयाचा प्रादुर्भाव उत्पन्न झाल्यानंतर अप्रिय असा दुर्गंध पण चांगला वाटू शकतो. आणि जे रूप अत्यंत साधारण असते ते सुद्धा चांगले वाटू लागते. असा कामाचा प्रभाव असतो. ॥ ४३॥ विषश्चामृतवद्भाति निर्मलञ्च मलं वपुः । भोग दुःखं सुखं चेति कामावेशोऽयमीदृशः ॥ ४४॥ अर्थ - विषसुद्धा अमृतासारखे वाटते आणि अमंगल असे शरीर पण अत्यंत निर्मल आणि सुंदर वाटते. भोग दुःख हे पण सुखाचेच वाटतात. असा हा कामाचा प्रभाव आहे. ॥ ४४॥ अधर्मो धर्मवद्भाति त्वन्यायो न्याय एव हि । आप्तेश्च शत्रुवद्भाति कामावेशोऽयमीदृशः ॥ ४५॥ अर्थ - अधर्म व कर्तव्यहीनता हेच धर्म आणि कर्तव्य वाटू लागतात. अयोग्य अन्याय हेच योग्य व न्याय वाटु लागतात. आप्तेष्ठ व नातेवाईक हे शत्रुसारखे वाटू लागतात. असा हा कामप्रभाव आहे. ॥ ४५॥ न भयं नापि लज्जाच बहृधैर्यं कुकर्मता । अतीवान्मत्ता चापि कामावेशोऽयमीदृशः ॥ ४६॥ अर्थ - भय लज्जा रहात नाहीं. दुष्कर्म करण्याची कांही लाज न वाटता तो बेधडक करतो व उन्मत्त मनाने धीट होतो. ॥ ४६॥ विस्मारयति सम्बन्धं भोगभोग्यं न वेत्ति च । विवेको लुप्यते यस्मात् कामावेशोऽयमीदृशः ॥ ४७॥ अर्थ - आपले संबंध कसे कोठे आहेत कसे योग्य आहेत हे विसरुन तो कसाही वागतो तसेच कोणत्या विषयाचा कसा उपभोग घ्यायचा हे विसरुन तो कसाही वर्तन करतो. असा हा कामप्रभाव आहे. ॥ ४७॥ भीषयन्संस्थितोऽप्यग्रे मृत्युश्चापि मृतायते । महिषी कामयेन्मूढः कामावेशोऽयमीदृशः ॥ ४८॥ अर्थ - परिणामी जे भीषण आहे, मृत्यु सुद्धा त्याला विस्मृत होतो. असा मूढ मृत्यु समीप आला तरी एखाद्या राणीची म्हणजे परत ग्रहस्थी बसविण्याची इच्छा करतो. ॥ ४८॥ सुपुण्यं हि स्वर्गोऽपि नरकायते । चाण्डाली चापि ग्राह्येव कामावेशोऽयमीदृशः ॥ ४९॥ अर्थ - चांगले पुण्यदायक कर्म जे मंगल आणि पावन असते, तेही त्यास नरकासमान हीन वाटू लागते आणि अगदी हीन चाण्डाल अशी व्यक्ती किंवा गोष्ट पण त्यास ग्राह्य वाटू लागते. ॥ ४९॥ यां प्रजार्थन्तु काम ईशेन निर्मितः । न विधिर्ननिषेधोऽस्य दुष्टानां स्थितिरीदृशी ॥ ५०॥ अर्थ - ज्या कल्पनेने की ``प्रजोत्पादन होईल''ह्या हेतुने ईश्वराने ``काम''निर्माण केला परंतु त्याचे विधि योग्य उपयोग आणि निषेध (अयोग्य उपयोग) ह्यांस छपरावर बसवून दुष्टांनी अशी स्थिति निर्माण केली. ॥ ५०॥ कामश्चार्धबलः स्याद्धि विधितस्तस्य सेवने । न्यासिनां ज्ञानवैराग्यात् समूलोऽयं विनश्यति ॥ ५१॥ अर्थ - काम हा अर्धविकसित अश्या बलाने विद्यमान होतो. जेंव्हा विधियुक्त रीतीने त्याचे सेवन केले जाते आणि अश्या संयमी व्यक्तिची साधनेने जेव्हां वैराग्य उत्पन्न होते, त्यानंतर त्याचे उच्चाटन होते. ॥ ५१॥ कार्यनाशाद्भवेच्चिन्ता नाशोऽस्माद्वासनाक्षयः । वासना प्रक्षयो मोक्षः सा जीवनमुक्ति रुच्यते ॥ ५२॥ अर्थ - कार्याचा नाश झाल्यानंतर चिंता उत्पन्न होते. कामनाश झाल्यावर वासनाक्षय होतो. वासनामुक्ति हीच मोक्षप्राप्ती आणि त्यालाच जीवन मुक्ति असे म्हणतात. ॥ ५२॥ निषिद्ध कर्मणा कामो दावाग्निर्वायुना यथा । विवर्धते परं भूयो दुर्गतेः कारणं भवेत् ॥ ५३॥ अर्थ - निषिद्ध कर्मे करुन काम तसाच फोफवतो ज्याप्रमाणे वायुमुळे दावानल - जंगलात लागलेली आग झपाट्याने फैलते आणि त्याच प्रमाणे तो मोठया भीषण दुर्गतीला जन्म देतो. ॥ ५३॥ नरकोप्यपकीर्तिश्च दारिद्रयं रोगः सम्भवः । वर्धिष्णुर्भोगदाहोऽस्य शामेन्नष्टेन्द्रियोऽपि नो ॥ ५४॥ अर्थ - नरक, दुर्गती, अपकीर्ति, रोगोत्पत्ति भोग ह्या पासून हा काम असा दाह निर्मित करतो की आपली इंद्रिये नष्ट झाली तरी हा शमित होत नाहीं. ॥ ५४॥ निस्तेजश्च निरुत्साही निरानन्दोऽति दुर्गतिः । अशान्तो दुर्जनश्चैवं भवति व्यभिचारतः ॥ ५५॥ अर्थ - व्यभिचार अवैध रीतिने कामवासनेची पूर्ति केल्यास त्या व्यक्तिची अशी दशा होते की तो निस्तेज, निरुत्साही, आनंदरहित, दुर्गतिप्राप्त, अशांत, क्रोधी दुर्जन असा होतो. ॥ ५५॥ कामो धावति सर्वत्र मदोन्मत्तगजेन्द्रवत् । ज्ञानाङ्कुशे समुत्पन्ने तीव्रं विभ्यत्यसौ तदा ॥ ५६॥ अर्थ - मदोन्मत हत्तीसारखा हा काम सर्वत्र सैरावैरा धावतो, ज्ञानरूपी अंकुश लावूनच त्याला नियंत्रित करता येते. ॥ ५६॥ गृहेस्थेविधि युक्तेऽसौ भ्रष्टेऽसाविहितो भवेत् । कीदृशोऽपि भवेत्याजस्तीव्रं सौम्य विषं यथा ॥ ५७॥ अर्थ - गृहस्थ सुद्धा विधियुक्त वागून सुद्धा जर भ्रष्टबुद्धि होवून कुमार्गाला लागला तर ते सुद्धा सौम्य विषपान केल्यासारखेच होइल. विष हे सौम्य असो किंवा तीव्र असो ते त्याज्यच आहे. ॥ ५७॥ विहाय विधिगस्यात्र वरं विध्युक्तसेवनम् । तस्मादपि वरस्त्यागस्त्यागात् कैवल्यमश्रुते ॥ ५८॥ अर्थ - अश्या अवैध सेवनापेक्षा विधियुक्त सेवन बरे ! आणि त्यापेक्षा त्यागच श्रेष्ठ आहे. आणि त्यागानेच कैवल्य सुखाचा आनंद घेता येतो ॥ ५८॥ अशेषेण परित्यागो वासनानां स उत्तमः । मोक्ष इत्युच्यते सद्भि स एव विमलक्रमः ॥ ५९॥ अर्थ - सर्व वासनांचा परित्याग करुन जेंव्हा त्या समाप्त होतात, तीच अवस्था उत्तम म्हटली जाते. संतानी त्यालाच पवित्र मार्ग म्हणून ``मोक्ष''असे संबोधिले आहे. ॥ ५९॥ स्त्रीकामौ द्रव्यकामश्च द्वावेतावेकलक्षणौ । कार्याकार्यविवेकस्य लोपस्यादुभयोः समः ॥ ६०॥ अर्थ - स्त्रीविषयक इच्छा दारेषणा आणि धनविषयक कामना ह्या दोन्हीही एक लक्षणीच आहे. ह्यांची इच्छा झाल्यानंतर कार्य आणि अकार्य न करण्यासारखे काय ह्यांना विचारच रहात नाहीं. त्या दोन्ही इच्छांमध्ये विवेकाचा लोप होतो. ॥ ६०॥ क्व धनानि महीपानां ब्राह्मणाः क्व जगन्ति वा । कोटयो ब्राह्मणा याता भूपा नष्टा परागवत् ॥ ६१॥ अर्थ - कोटयावधी धनवान राजे आणि अगणित ब्राम्हण ह्या जगांत आले आणि गेले. जसे असंख्य परागकण नष्ट होतात. तसे ते गेले. ॥ ६१॥ अन्यथेच्छा स्वरूपो हि कामः प्रोक्तो मनीषिभीः । सत्यस्वरूप बोधेन निरिच्छः सन जयेदिमम् ॥ ६२॥ अर्थ - विद्वान पण्डितांनी कामास अन्येच्छा - दुसऱ्यापासून सुख मिळविण्याची इच्छा ह्या स्वरूपाचा मानला आहे. आत्मज्ञानाचा बोध स्वयंप्रकाशी असून आत्मज्ञान झाल्यावर कामाचा पराभव करुन आपणास विजयी होता येते. ॥ ६२॥ गुरुतो ज्ञानवैराग्यं गुरुतस्तत्त्वदर्शनम् । गुरु ही मुक्तिदं मत्वा जयेत्कामं सुसाधकः ॥ ६३॥ अर्थ - गुरुंपासूनच आत्मज्ञान प्राप्त होते. वैराग्याचे ज्ञान होवून गुरुमुळेच तत्त्वज्ञानाचे सार कळते. गुरुच मुक्तिदाता असतात, म्हणून जो चतुर साधक आहे त्याने हे जाणूनच कामावर विजय प्राप्त करुन घ्यावा. ॥ ६३॥ तीर्थ गुर्वाश्रमें वासो गुरुसेवापरं तपः । गुरुकृपां गतिं मत्वा जयेत्कामं सुसाधकः ॥ ६४॥ अर्थ - गुरुंचे आश्रमांत निवास करणे हे तीर्थाटनच समजावे. गुरुंची सेवा करणे म्हणजे मोठे तपच मानावे. आणि गुरुकृपा झाली म्हणजे परमगतीच मिळाली असे समजून साधकाने कामशत्रुला जिंकावे. ॥ ६४॥ उष्णाहाराच्च पानाच्च तथैवात्यशनादपि । कामस्यास्य जनिं मत्वा जयेत्कामं सुसाधकः ॥ ६५॥ अर्थ - उष्ण आहार आणि उष्ण पेय तसेच अति आहार ह्यापासून काम उत्पन्न होतो, हे समजून सुजाण साधकाने आपल्या कामावर जय मिळवावा. ॥ ६५॥ सङ्कल्पप्रभवः कामो निःसङ्कल्पात् प्रणश्यति । निःसङ्कल्पं सुखं मत्वा जयेत्कामं सुसाधकः ॥ ६६॥ अर्थ - संकल्पातूनच म्हणजे कामना इच्छांमधूनच ``कामा'' ची उत्पत्ति होते आणि जर कामनारहितता उत्पन्न झाली तरच ``काम'' हा नष्ट होतो. म्हणूनच निःसंकल्प बनूनच चतुर साधकाने कामावर जय मिळवावा ॥ ६६॥ सप्तधातुमयं देहं विकाराकारदुःखदम् । शववच्च जडं मत्वा जयेत्कामं सुसाधकः ॥ ६७॥ अर्थ - सप्तधातुंपासून उत्पन्न हा जड देह आहे, असे जाणून आणि विकार आणि आकारापासून दुःख देणारा आणि ``शव'' म्हणजे मृतशरीराप्रमाणेच हा देह जाणून हुशार आणि जाणकार तापसाने कामावर जय मिळवावा. ॥ ६७॥ रजसो रेतसो जातं नकायतनं वपुः । तद्भोग नरकं मत्वा जयेत्कामं सुसाधकः ॥ ६८॥ अर्थ - रजस आणि रेतस् पासून उत्पन्न होणारी नरकाचे घर अशी ही तनु आणि त्यांत आनंद देणारे भोग म्हणजे नरकच, हे समजून चतुर साधकाने कामावर जय मिळवावा. ॥ ६८॥ समीचीनदृगुद्भूतो दोषदृष्ट्या विनश्यति । भोगं दोषास्पदं मत्वा जयेत्कामं सुसाधकः ॥ ६९॥ अर्थ - दृष्टी चांगली असतांना जर त्यांत दोष (काम विकार) उत्पन्न झाला तर त्या व्यक्तिचा कामामुळे नाश होतो. (काम हा दृष्टी टाकल्यावर उत्पन्न होतो) आणि भोग म्हणजे त्यापासून मिळणारा आनंद उत्पन्न झाला तर तो सुद्धा दोष पूर्णच कारक असतो, हे ताडून साधकाने तत्पर राहून त्यावर नियंत्रण ठेवून जय मिळवावा. ॥ ६९॥ अनित्यानि शरीराणि सुखभासो न शाश्वतः । अन्यन्नित्यं सुखं मत्वा जयेत्कामं सुसाधकः ॥ ७०॥ अर्थ - शरीरे ही नश्वर आहेत आणि त्यांतील हे सुख पण नश्वरच आहे. म्हणून अन्य जे शाश्वत नित्य चिदानंद रूप सुख आहे ते ते ओळखून साधकाने सुखी व्हावें ॥ ७०॥ आभासमात्रदेहोऽयं मिथ्यैव स्वप्नदेहवत् । नित्यानित्यविवेकाच्च जयेत्कामं सुसाधकः ॥ ७१॥ अर्थ - आभासरूपी देह हा जो आपणांस भ्रमामुळे अगदी आपला वाटतो, अगदी केवळ स्वप्नवत् म्हणजे स्वप्न आपल्याला कांहीकाळ दिसते आणि ते आपल्याला अगदी खरेच वाटते परंतु जाग आल्यावर ताबडतोब समजते कीं अरे ! ते तर अगदी खोटेच आपल्या डोळयांपुढे दिसते. (जेंव्हा कीं खरी नेत्रेंद्रिय ही ह्या शरीरात निद्रितावस्थेत बंदच असतात) आणि ते सर्व नुसते भासमात्रच होते! म्हणून नित्य आणि अनित्य अर्थात चिर आणि अचिर काय आहेत ह्याचा नीट विचार करुनच ह्या कामरूपी शत्रुवर विजय प्राप्त करावा. ॥ ७१॥ प्रजोत्पत्यर्थमेवाऽयं कामस्तु न हि मुक्तये । भिन्नमात्मसुखं मत्वा जयेत्कामं सुसाधकः ॥ ७२॥ अर्थ - प्रजोत्पत्तीसाठीच काम आहे. ह्यातून कांही मुक्ति मिळणार नाहीं. आत्मसुख हे वेगळेच आहे, हे जाणून चतुर साधकाने काम विकारास जिंकावें. ॥ ७२॥ दृश्यं नास्तीतिबोधेन स्वात्मानन्दस्वरूपतः । न स्त्री नैव पुमान्मत्वा जयेत्कामं सुसाधकः ॥ ७३॥ अर्थ - आपले आत्मज्ञान आत्म्याचे स्वरूप जाणून जो आनंद होतो तो दृश्यस्वरूपाचा नाहीं. म्हणून स्त्री किंवा पुरुष हा भेद आपल्या दृष्टीत न ठेवता, कुशल साधकाने कामावर विजय मिळवावा. ॥ ७३॥ दृश्यं ह्यदृश्यतां नीत्वा स्थित्वा स्वानन्दमात्रतः । भिन्नाभावं हि कृत्वैवं जयेत्कामं सुसाधकः ॥ ७४॥ अर्थ - आपल्या स्वानंदरूपात स्थित होवून आणि दृश्य जेआहे त्याला दृष्टीआड करुनच (समाधी अवस्थेत पाऊल ठेवून) एका वेगळयाच नीरव शांततेचा अनुभव घेवून कामविकारावर जय मिळवावा. ॥ ७४॥ कार्यभावात्कामजनिः कार्याभावाद्विनानम् । कार्यशून्यात्मभावेन जयेत्कामं सुसाधकः ॥ ७५॥ अर्थ - कार्यभाव म्हणजे एक प्रकारे अहं तत्त्वामध्ये लिप्त होणे. आसक्तियुक्त कार्य केल्याने काम विषयाची उत्पत्ती होते आणि आसक्ति रहित कार्य केल्याने विकाराची अनुपत्ति होते. म्हणून साधकाने कार्यशून्यत्व (मी हे केलेच नाही असे समजून म्हणजे कर्ता करविता तो परमेश्वर आहे) ह्या दृढभावनेने प्रत्येक हालचाल करून काम शत्रुवर जय मिळवावा. ॥ ७५॥ ब्रह्मचर्याद्विना नैव मोक्षप्राप्तिः कदाचन । छान्दोग्येस्पष्टमुक्तं यद् ``ब्रह्मचर्य'' सताङ्गतिः ॥ ७६॥ अर्थ - ब्रह्मचर्य पालन केल्याशिवाय कधीही मोक्षप्राप्ती होणार नाही. छांदोग्य उपनिषदांत हे स्पष्ट केले आहे, की ब्रह्मचर्य हीच संतांची गति आहे. ॥ ७६॥ ब्रह्मप्राप्तितरोर्मूलं ब्रह्मचर्यमितीयते । ब्रह्मचर्यं विना न स्यात् कस्यापि ब्रह्मधीः कदा ॥ ७७॥ अर्थ - ब्रह्मप्राप्तीरूपी वृक्षाचे मूळ हेच ब्रह्मचर्य आहे. ब्रह्मचर्य विना कुणाचीही बुद्धि ब्रह्मतत्त्वाचे ज्ञान प्राप्त करण्यासाठी क्रियाशील होणार नाहीं. ॥ ७७॥ ब्रह्मचर्येण सन्तिष्ठेदप्रमादेन साधकः । दर्शनं स्पर्शनं केलिः कीर्तनं गुह्यभाषणम् ॥ ७८॥ सङ्कल्पोऽध्यवसायश्च क्रियानिवृत्तिरेव च । एतन्मैथुनमष्टाङ्गं प्रवदन्ति मनीषिणः ॥ ७९॥ अर्थ - ब्रह्यचर्यपालन करतांना साधकाला कांही दोष अर्थात् चुका करण्यापासून सावधान रहावे लागेल. त्या म्हणजे स्त्रीयांचे दर्शन, स्पर्श, त्यांज बरोबर क्रीडा करणे, त्यां बरोबर एकांतात बोलणे, त्यांची इच्छा धरणे आणि त्यांचा संग करणे, तसेच त्याने गुणगान कीर्तन करणे हे आठ प्रकारचे मैथुन विद्वानांनी सांगीतले आहे. संकल्प इच्छा आणि त्या संधात दीर्धोद्योग अर्थात, अध्यवसाय ह्या पासून निवृत्ति झाली पाहिजे. ॥ ७८-७९॥ विपरीतं ब्रह्मचर्यमनुमष्ठेयं ममुक्षुभिंः । ब्रह्मचर्यं जीवनं स्यान्मोक्षमार्गानुगामिनाम् ॥ ८०॥ अर्थ - ममुक्षुसाधकांकडून ह्याच्या विपरित वर्तन करणे जरुरी आहे. ब्रह्मचर्य हेच त्यांचे जीवन आहे. ज्यांना मोक्षमार्गावर अग्रेसर होणे आहे. ॥ ८०॥ कायेन मनसा वाचा सर्वावस्थासु सर्वदा । स्त्रीमात्रे मातृभावो ही ब्रह्मचर्यमितीर्यते ॥ ८१॥ अर्थ - काया, वाचा आणि मनाने सुद्धां सर्व अवस्थांमधील स्त्रीयांविषयी एक मातृभावच असणे ह्यास ब्रह्मचर्य म्हटले आहे ॥ ८१ ॥ द्वितीयाभावतो नैव द्वितीया सम्भवः क्वचित् । द्वितीयाऽभावतः कुत्र स्त्रीभावस्य जनिर्भवेत् ॥ ८२॥ अर्थ - ?? ॥ ८२॥ ``सर्व पुरुष एवेद'' श्रुतिर्वक्तिः यतः स्वयम् । कुत्र स्त्री, कस्य तद्भावो भ्रान्तिरेव हि स्त्री मता ॥ ८३॥ अर्थ - श्रुतिने स्वतः हे वचन उधृत केले आहे कीं सर्व पुरुषाय इदं अर्थात् सर्व चैतन्यमयतत्त्वार्त पुरुष म्हणजे सच्चिदानंद तत्त्वच भरलेले आहे अर्थात विद्यमान आहे. तर मग कोठली स्त्री? आणि कोण कुठला भाव? सर्व भ्रांतिच आहे. ॥ ८३॥ अद्वयब्रह्मरूपोऽहं नित्यानन्दोऽखिलेष्विति । ब्रह्मभावे मनश्चारी ब्रह्मचर्यमितीर्यते ॥ ८४॥ अर्थ - अद्वय म्हणजे मी एकच, दुसरे कोठले तत्त्व नाही. असा भाव जो असतो त्यालाच नित्य आनंद सर्वत्र भरला आहे, असे म्हणतात. आणि ह्या ब्रह्मरूप भावनेने जो विचरण करतो त्यासच ब्रह्मचारी असे म्हणतात. ॥ ८४॥ इति श्रीसमर्थरामदासासानुगृहित श्रीरामपदपङ्कजभृङ्गायमान श्रीमत्परमहंस परिव्राजकाचार्य भगवता श्री श्रीधरस्वामिना विरचिते मुमुक्षुसखः ग्रन्थे देहजुगुप्सितत्त्वं तथा कामनिन्दानाम सप्तम प्रकरणं सम्पूर्णम् ।

८. जगन्मिथ्यात्वं नाम प्रकरणमष्टमम्

दृश्यं नास्तीति बोधेन मनसो दृश्यमार्जनम् । सम्पन्नं चेत्सदानन्दो योगी भवति केवलः ॥ १॥ अर्थ - हे दृश्य जगत् खरे नाही ह्या ज्ञानामुळे सदानंदयोगी जो असतो तो आपल्या दृष्टी समोरील जगताचे मार्जन करुन अर्थात् त्यापासून दृष्टी काढून घेवून मनामध्ये परमतत्त्वाचे ध्यान करतो आणि आनंदी होतो ॥ १॥ चैतन्यस्यैकरूपत्वाद् भेदो युक्तो न कर्हिचित् । जीवत्वञ्च तथाज्ञेयं रज्ज्वां सर्पग्रहो यथा ॥ २॥ अर्थ - चैतन्य स्वरूपाशी आपले एकरूपत्व न ठेवता त्यांत द्वंद्व म्हणजे दोन भाव ठेवणे, दुजाभाव करणे हे सर्वथा उपयुक्त नाही, तसे करणे म्हणजे एखाद्या दोरीला ``सर्प''समजून भ्रमित होणे आहे ॥ २॥ रज्ज्वज्ञानात् क्षणेनैव यद्वद् रज्जुर्हि सर्पिणी । भाति तद्वचितिः साक्षाद्विश्वाकारेण केवला ॥ ३॥ अर्थ - रज्जु म्हणजे दोरीच्या खऱ्या ज्ञानाशिवाय ती दोरी म्हणजे सापच आहे असा मनाचा गैर समज होतो, तसाच ह्या शाश्वत अश्या चिरचैतन्यावर आपण भ्रामक अश्या ह्या जगताचा भ्रम धरुन बसतो ॥ ३॥ उपादानं प्रपञ्चस्य ब्रह्मणोऽन्यन्न विद्यते । तस्मात्सर्वप्रपञ्चत्रोऽयं ब्रह्मैवास्ति न चेतरत् ॥ ४॥ अर्थ - उपादान म्हणजे (मूळ घटक द्रव्य) ह्या प्रपंचाचे ज्यावर आपल्याला रूप दिसते ते घटक द्रव्य, हे ब्रह्मतत्त्वच आहे दुसरे ब्रह्माशिवाय काही ही नाही, म्हणून हा सर्व प्रपंच म्हणजे ब्रह्मतत्त्वच आहे दुसरे काही ही नाही ॥ ४॥ व्याप्यव्यापकता मिथ्या सर्वमात्मेति शासनात् । इति ज्ञाते परे तत्त्वे भेदस्यावसरः कुतः ॥ ५॥ अर्थ - व्याप्य म्हणजे आपल्या अस्तित्वाच्या पांघरुणाखाली घेण्यास जे योग्य आहे ते, आणि व्यापले गेलेले जे आहे ते, म्हणजे सर्वच मिथ्या भ्रामक असून सर्व त्या परब्रह्मरूपाचेच शासनाखाली नियंत्रित आहे. हे जाणल्यावर परमतत्त्वाच्या पलीकडे आणखी काय वेगळे राहणार? ॥ ५॥ ब्रह्मणः सर्वभूतानि जायन्ते परमात्मनः । तस्मादेतानि ब्रह्मैव भवन्तीति विचिन्त्यताम् ॥ ६॥ अर्थ - परमात्मा -ब्रह्मतत्त्वापासूनच सर्व प्राणी उत्पन्न झाले आहेत असे समजल्यावर ते सर्व प्राणी ब्रह्मभूतच आहेत असा विचार करावा ॥ ६॥ ब्रह्मैव सर्वनामानि रूपाणि विविधानि च । कर्माण्यापि समग्राणि बिभर्तीति विभाव्यतत् ॥ ७॥ अर्थ - सर्व नामरूपांनी ब्रह्मतत्त्वच व्यापलेले आहे. आणि सर्व कार्ये सुद्धा त्यानीच भरलेली आहेत, असे जाणवे. ॥ ७॥ सुवर्णज्जायमानस्य सुवर्णत्वं च शाश्वतम् । ब्रह्मणि जायमानस्य ब्रह्मत्वञ्च तथा भवेत् ॥ ८॥ अर्थ - सोन्या पासून घडलेल्या सर्वच अलंकारात, वस्तूंमध्ये सोनेच असते हे जसे निश्चित आहे, तद्वत् हे सर्वच ब्रह्मतत्त्वाचेच विविध रूपें आहेत हे जाणणाऱ्याला हे सर्व जगत् ब्रह्मच वाटते ॥ ८॥ स्वल्पमप्यन्तरं कृत्वा जीवोच्चेत्परमात्मनः । यस्तिष्ठति विमूढात्मा भयं तस्याभिभाषितम् ॥ ९॥ अर्थ - थोडे से जरी अंतर परमात्मापासून ह्या जगताचे तुम्ही मानले तर तो मूढ (अज्ञानी) भयभीत होतो ॥ ९॥ यदज्ञानाद्भवेद्द्वौतमितरत्तत्प्रपश्यति । आत्मत्वेन तदा सर्व नेतरत्तत्र चाण्वपि ॥ १०॥ अर्थ - जो अज्ञानाने परमेश्वर आणि जगत् ह्यांत द्वैत भाव ठेवतो त्यास ते समजत नाही परंतु जो ब्रह्मात्म भावाने सर्व जगता कडे बघतो तो अणुरेणु पण त्याच तत्त्वाने भरलेले आहेत हे जाणतो ॥ १०॥ अनुभूतोऽयप्यं लोको व्यवहारक्षमोऽपिसन् । असद्रूपो यथा स्वप्न उत्तरक्षणबाधितः ॥ ११॥ अर्थ - ह्या जगतामध्ये अनुभव घेत असतांना सुद्धा तो ज्ञानी ब्रह्मात्मभावाने राहणारा साधुपुरुष व्यवहारांत सक्षम असून सुद्धा हे जग अगदी असत्य आहे, भ्रामक आहे , हे त्याप्रमाणेच जाणतो ज्याप्रमाणे एखादे स्वप्न बघता -बघता त्यांतून एकदम जाग येते व त्याच्या अंतिम क्षणाला आपले अहं तत्त्व जागृत होवून आपणास कळते की अरे! खरे तर आपण ह्या जगात जागे होवून वावरतो आहोत. ते तर सर्व असत्यच होते. अगदी त्याप्रमाणे ज्ञानी ह्या जगताला मिथ्या समजतो ॥ ११॥ स्वप्ने जागरितं नास्ति जागरे स्वप्नता न हि । द्वयमेव लये नास्तिलयोऽपि ह्यनयोर्नच ॥ १२॥ अर्थ - स्वप्नामध्ये जागृतावस्था नसते ती लय पावते. जागृतावस्था मध्ये स्वप्नावस्था नसते ती लय पावते. ती त्या वेळेस नसते. मात्र दोघींचा ही लय होत नाही. हंयाचा कुणाचाच लय नाश होत नाही. ॥ १२॥ त्रयमेव भवेन्मिथ्या गुणत्रयविनिर्मितम् । अस्य द्रष्टा गुणातितो नित्यो ह्यैष चिदात्मकः ॥ १३॥ अर्थ - त्या तिघींचा ही भ्रमवश नाश होतो. त्रिगुणांमुळे निर्मित अश्या स्थितीचा मात्र ह्या गुणांचा जो दृष्टा आहे तो नाश पावत नाही. तो सदा (नित्य) शाश्वत चिदानंद असतो ॥ १३॥ यद्वमृदि घटभ्रान्तिः शुक्तो हि रजतस्थितिः । तद्वदब्रह्मणि जीवत्वं वीक्षमाणे विनश्यति ॥ १४॥ अर्थ - ज्याप्रमाणे मृत्तिका (माती) आणि घट ह्या मध्यें भ्रांती उत्पन्न होते किंवा शिंपले पाहून चांदीचा भ्रम उत्पन्न होतो त्याच प्रमाणे ब्रह्मतत्त्वाचा जीव उत्पन्न झाल्यावर विसर पडून तो जीवभावच (चांदीच आहे हे जसे भ्रमाने वाटते) तसे वाटते. ॥ १४॥ यथा मृदि घटो नाम कनके कुण्डलाभिधा । शुक्तौ हि रजतख्यातिर्जीवशुद्धस्तथा परे ॥ १५॥ अर्थ - ज्याप्रमाणे मातीला घट हे नांव दिले जाते, सोन्याला कुण्डल असे म्हटले जाते तद्वतच ब्रह्मतत्त्वाला जीव शब्दाने म्हटले जाते (आणि शिंपल्याला चांदी म्हणून समजले जाते) ॥ १५॥ यथैव व्योम्नि नीलत्व यथा नीरं मरुस्थले । पुरुषत्वं यथा स्थाणौ तद्वद् विश्वं चिदात्मनि ॥ १६॥ अर्थ - ज्याप्रमाणे आकाशाला नीळेपणा भासतो, वाळवंटात पाणी वाहतांना दिसते (मृगजळ). एखाद्या खांबामध्ये कुणी माणूसच उभा आहे असा भ्रम होतो तद्वत् हे सर्व जग चिरस्थाई अश्या आत्मतत्त्वाचे असून सुद्धा भ्रमाने भासमान् होते. आत्मतत्त्वावर जगाचा भास होतो. ॥ १६॥ यथैव शून्ये वेदान्तो गन्धर्वाणां पुरं यथा । यथाकाशे द्विचन्द्रत्वं तद्वत् सत्ये जगत्स्थितिः ॥ १७॥ अर्थ - ज्याप्रमाणे यामध्ये वेदांत, गंधर्वनगर म्हटले जाते किंवा आकाशांत दोन चंद्र दिसतात असे म्हटले जाते (एखाद्याच्या डोळयांत फरक झाल्यावर त्याला दोन -दोन प्रतिमा दिसू लागतात किंवा बोटाने डोळा दाबल्यावर पण दोन दोन दिसते) त्याप्रमाणे हे जग खरेच आहे असे वाटते. ॥ १७॥ यथातरङ्गकल्लोलर्जलमेव स्फुरत्यलम् । अनेक नामरूपैश्च ब्रह्मैकं प्रविजृम्भतेम् ॥ १८॥ अर्थ - ज्याप्रमाणे तरंग आणि लाटा ह्या पाण्यामध्ये स्वयंस्फूर्तिनेच येतात तसेच हे ब्रह्मतत्त्व अनेक रूपाने प्रकट होते ॥ १८॥ घटनाम्ना यथा पृथ्वी पटनाम्ना हि तत्त्वतः । जगन्नाम्ना चिदाभाति सर्वं ब्रह्मैव केवलम् ॥ १९॥ अर्थ - घट ह्या नावाने ज्याप्रमाणे माती (अर्थात पृथ्वी तत्त्वच रूप बदलवून येते) किंवा वस्त्र ह्या नावाने पण तत्त्वतः जमीनीमधूनच कापूस येतो व त्याचे वस्त्र बनते. तद्वत हे एक ब्रह्मतत्त्वच सर्वत्र जगत् म्हणून चित् स्वरूपाने शाश्वत रूपामध्यें विद्यमान असून विराजित होते ॥ १९॥ यथा वन्ध्यासुतोनास्ति यथा नास्ति मरौजलम् । यथा नास्तिनभो वृक्षस्तथा नास्ति गत्स्थितिः ॥ २०॥ अर्थ - ज्याप्रमाणे वंध्य स्त्री चा पुत्र अस्तित्वांतच नसतो, ज्याप्रमाणे वाळवंटात पाणी नसते तो नुसता (मृगजळ) भ्रम असतो, ज्याप्रमाणे नभ नसते पण भासते त्यांत गंधर्व नगर व वृक्ष चित्ररूपाने भासतात त्याच प्रमाणे हे जगत् पण खरे अस्तित्वांत नाही. ॥ २०॥ गृह्यमाणें घटे यद्वन्मृत्तिका भाति चै बलात् । वीक्ष्यमाणें प्रपञ्चेतू ब्रह्मैवाभाति भासुरम् ॥ २१॥ अर्थ - घट घेतल्यानंतर ज्याप्रमाणे आम्ही मातीच (हातात) घेतली आहे असे वाटते त्याप्रमाणे ह्या प्रपंचाला बघितल्यावर त्या -त्या रूपाने ब्रह्मतत्त्वच प्रकाशित होत असते. ॥ २१॥ सदैवात्मा विशुद्धौऽस्ति ह्यशुद्धौ भाति वै सदा । यथैव द्विविधा रज्जुर्ज्ञानिनोऽज्ञानिनोऽनिशम् ॥ २२॥ अर्थ - त्याच प्रमाणे आत्मा सदैव शुद्धच असतो परंतु भ्रमाने तो अशुद्धच वाटतो. सर्प रज्जु भ्रम हा ज्ञानी आणि अज्ञानी माणसांमध्ये वेगळाच भासतो (ज्ञान झाल्यावर ती दोरीच आहे म्हणून भय वाटत नाही।) ॥ २२॥ यथैव मृण्मयः कुम्भस्तद्वद्देहोऽपि चिन्मयः । आत्मानात्मविवेकोऽयं वृथा क्रियते बुधैः ॥ २३॥ अर्थ - ज्याप्रमाणे कुंभ हा मृण्मय म्हणजे मातीचा आहे तद्वत् हा देह चिन्मयस्वरूपच आहे. आत्मा आणि अनात्मा हा विवके पंडित लोक व्यर्थच करतात. ॥ २३॥ सर्पत्वेन यथा रज्जू रजतत्त्वेन शुक्तिका । विनिर्णीता विमूढेन देहत्वेन तथाऽऽत्मता ॥ २४॥ अर्थ - ज्याप्रमाणे दोरीला सर्प मानणे, शिंपल्याला चांदी मानणे, त्याप्रमाणेच आत्म्याला मूढ मनुष्य देह समजतो. ॥ २४॥ घटत्वेन यथा पृथ्वी जलत्वेन मरीचिका । गृहत्वेन हि काष्ठानि खङ्गत्वेनैव लोहता ॥ २५॥ अर्थ - जलत्व (म्हणजे पाणी असणे) ह्यास मृगजळ, घटत्व म्हणजे घडा असणे म्हणजे माती आणि घर म्हटले म्हणजे लाकडी सामान आणि शस्त्र म्हटले म्हणजे लोखंड, त्याप्रमाणे आत्मतत्त्व म्हणजे हा देहच असे अज्ञानामुळे मूढ मनुष्यास वाटते. ॥ २५॥ हृदात्मनि देहत्वं पश्यत्यज्ञानयोगतः । नष्टेऽज्ञाने किमप्येव न्नो जातं नैव तिष्ठति ॥ २६॥ अर्थ - आत्मतत्त्व म्हणजे हा देहच असे अज्ञानामुळे मूढ मनुष्यास वाटते आणि अज्ञान नष्ट झाल्यावर कांहीच रहात नाही आणि नष्टही होत नाही. ॥ २६॥ सुखबुद्ध्या जगद्भानं जगद्वस्तुसुसङ्ग्रहः । जगत्पदार्थम्भोगेच्छा भोगेऽपि किल नो सुखम् ॥ २७॥ अर्थ - सुखप्राप्तीच्या आशेने जगाचे भान होते, जगातील वस्तूंचा संग्रह, आणि जगांतील सुखांच्या उपभोगाची इच्छा होते, पण भोगा मध्ये सुद्धा सुखप्राप्ती होत नाही. ॥ २७॥ कियोद्भवं सुखं न स्याद्यतः सो दुःखसम्भवः । अर्जनं पालनं भोगः कर्मणैवहि सिध्यति ॥ २८॥ अर्थ - क्रियेपासून उत्पन्न होणारे जे सुख वाटते ते (खरे) सुख मिळत नाही. म्हणून ते दुःख उत्पन्न करणारेच असते. सुख प्राप्त करणे, त्याला टिकविणे आणि त्याचा भोग होणे हे सर्व क्रिया केल्यानेच होते. ॥ २८॥ कर्मण भवति श्रान्तो देहतो मनसोऽपि च । चिन्ता च व्यवधानञ्च शक्ति-हासोऽथ दुःखिता ॥ २९॥ अर्थ - क्रिया केल्याने अर्थात् ते ते काम केल्याने शारीरिक आणि मानसिक थकवा येतो. चिंता, अडथळे आणि शक्तिपात होवून परिणामी दुःखच होते. ॥ २९॥ अर्थानामर्जने क्लेशस्तथैव परिपालने । नाशं दुःख व्यये दुःखं भोगे दुःख तथैव च ॥ ३०॥ अर्थ - धन मिळवताना पण श्रम, त्रास होतो, सांभाळतांना पण त्रास होतो आणि नाश झाला, खर्च झाला तरी पण ते धन दुःखदच ठरते. उपभोग घेतला तरी ते परिणमी दुःखदायकच ठरते. ॥ ३०॥ समूहोदृश्यवस्तूनां जगन्नाम्ना विबुध्यते । भोग्यं भोगश्च भोक्तेति त्रिपुट्या व्यवहार्यते ॥ ३१॥ अर्थ - दिसणाऱ्या वस्तूंचा समूह ह्यालाच जग म्हटले जाते. भोग घेण्यास लायक वस्तू, त्याचा आनंद आणि तो आनंद घेणारा हे मिळूनच त्या त्रिपुटीला (भोग्य, भोग, भोक्ता) जग असे म्हटले जाते. ॥ ३१॥ सुखाभासं विनिर्भांय दुःखदं यः सदैव हि । इतोऽपि दुःखदं किं स्यान्मिथ्याचापि च पञ्चकम् ॥ ३२॥ अर्थ - ह्या वस्तूंपासून मिळणारा आनंद नेहमीच सुखाचा आभासमात्र असतो, सदैव परिणामी दुःखदच (अर्थात् पंचेंद्रीयांपासून मिळणारा आनंद हा परिणामी दुःखदायकच असतो) त्याचापासून मिळणारे दुःख सुद्धा कसे असते तर ते सुद्धा मिथ्या आणि भ्रामकच असते. ॥ ३२॥ त्रिकालाबाधितं सत्यं जगद्वक्तुं न शक्यते । तथैव भोग्य भोक्त्रादि ज्ञातृज्ञेयादिकं च यत् ॥ ३३॥ अर्थ - हे जग त्रिकालाबाधित (वर्तमान, भूत आणि भविष्य ह्या तिन्ही काळांत जे टिकून राहते ते त्रिकाल अबाधित) सत्य आहे असे म्हणता येत नाही म्हणून भाग्य आणि भोक्ता ह्यांना नित्यत्व आणि अविनाशित्व नाही, जसे की ``ज्ञान''आणि ``ज्ञाता''ह्यांना अविनाशित्व आहे. ॥ ३३॥ आत्मेन्द्रियमनोयुक्तं भोक्तेत्याहुर्मनीषिणः । उपाधिना विहीनश्चेन्नो भोक्ताऽऽत्मा स्वभावतः ॥ ३४॥ अर्थ - आत्मा इंद्रियें आणि मनाने घेरलेला असतो. तो भोक्ता असा संबोधिला जातो. जो अनादि अनंत असतो तो उपाधिरहित अक्षररूप असतो. तो ``जाणणारा'' ``ज्ञाता'' हाच खरा ``आत्मा''असतो असे जाणकार ज्ञानी लोक सांगतात. ॥ ३४॥ असङ्गो ह्ययमात्मेति श्रुतिबोधो यतस्ततः । रक्तस्फटिकवज्ज्ञेयं भोक्ताऽऽत्मेति च यद्वचः ॥ ३५॥ अर्थ - हा आत्मा असंग म्हणजे निर्मल अविकारी असतो, ज्याप्रमाणे स्फटिक हे स्वच्छ असते परंतु त्यास एखाद्या रक्त म्हणजे लाल वस्तूवर ठेवले तर त्यावर लाल प्रभा पडते, आपल्या नेत्रेंद्रियाला तो लाल दिसतो. परंतु वास्तविक तो तसाच वर्णहीन आणि स्वच्छ आसतो. ह्याप्रमाणे ``आत्मा हा भोक्ता आहे''हे वचन समजून घ्यावे. ॥ ३५॥ भोक्ता सत्त्वगुणः शुद्धो भोगानां साधनं रजः । भोग्यं तमोगुणं प्नाहुरात्मा चैषां प्रकाशकः ॥ ३६॥ अर्थ - सत्त्वगुणंचा आत्मा हा भोक्ता ``शुद्ध आत्मा''असतो आणि (विविध गुणंचा) विविध भोगांचा साधक आत्मा हा रजोगुणी म्हटला जातो, आणि जो तमोगुणांचा ग्राहक आत्मा असतो त्यांस तमोगुणी आत्मा म्हटला जातो. ह्याप्रमाणे हा आत्मा विद्यमान असतो. ॥ ३६॥ आकाशो वायुरग्निश्च जलं भूमिस्तथैव च । सत्त्वं रजस्तम इति प्रोक्ता प्रकृतिरष्टधा ॥ ३७॥ अर्थ - पृथ्वी, आप, तेज, वायु, आणि आकाश ही पंचमहाभूते आणि सत्त्व, रज आणि तम हे मिळून अष्टधा प्रकृति होते. ॥ ३७॥ स्वर्गो मर्त्यश्च पातालश्चोतः प्रोतोऽनयैव हि । अस्या यत्सूक्ष्मरूपं तन्मायेति समुदीर्यते ॥ ३८॥ अर्थ - स्वर्ग मृत्यु आणि पाताळ यांतील तिन्ही लोक ह्या अष्टधा प्रकृतींनी काठोकाठ भरलेले आहेत. आणि ह्यांचे जे सूक्ष्मरूप आहे ते माया म्हणून म्हटले गेले आहेत. ॥ ३८॥ आसीद्ब्रह्मैकमेवाग्रं नासीद्भिन्नं ततः क्वचित् । अहं ब्रह्मेति स्वात्मानं तदवेत्तत एव हि ॥ ३९॥ अर्थ - ब्रह्म हे तत्त्वच त्याच्या सुरवातीस असते आणि त्या शिवाय दुसरे कांहीही नाही. आणि ``अहं ब्रह्म''ह्या शिवाय दुसरे तत्त्व तेथे नाही. ॥ ३९॥ सर्वमासीज्जगच्चति श्रुत्या निर्दिश्यते यतः । इयमेव हि मायाऽस्यां ब्रह्मतेजो महेश्वरा ॥ ४०॥ अर्थ - श्रुति म्हणजे वेदांनी असा निर्देश दिला आहे की हे सर्वच जगत् असे आहे आणि ही सर्व माया (भ्रम) म्हणजे भगवान महेश्वराचीच अगाध शक्ति आहे. ॥ ४०॥ मायामात्रमिदं द्वैतं माया नाम स्वकल्पना । ``अहं ब्रह्मास्मि''चैव या तया सर्वमिदं जगत् ॥ ४१॥ अर्थ - माया ही परमेश्वरापासून द्वैत म्हणजे दुसरी ही एक कल्पना आहे. जिच्या मुळे हे सर्व जग आभासित होते, परंतु ते ``अहं ब्रह्मास्मिच''आहे. अर्थात् सर्वत्र परमेश्वराचीच शक्ति आहे, जी एकमात्र विद्यमान् आहे. अर्थात् माये मध्ये ब्रह्मतेजच आहे. ॥ ४१॥ आभासरूप जगतः मूलाभासोऽयमीदृशः । अस्मिन् ब्रह्मप्रकाशो यो बिम्बितः स महेश्वरः ॥ ४२॥ अर्थ - ह्या भ्रामक (आभास रूप) जगताच्या मूळाशी हा मुख्य प्रकाशक अश्या रीतीने विद्यमान आहे. आणि ह्या मूळ ब्रह्मप्रकाशकाचे तेज प्रतिबिम्ब (आरश्यांत मुख दिसावे तसे) ह्या रूपाने दिसते. (ते स्वतः अगदी अविकारी आणि दूर आहे।) ॥ ४२॥ माया सा त्रिविधा प्रोक्ता सत्त्वराजसतामसी । ``अहं ब्रह्मास्मि''चेत्यत्र त्रिपुट्योद्गम ईदृशः ॥ ४३॥ अर्थ - माया जी आहे ती मात्र त्रिविधा ह्या तीन गुणांनी म्हणजे सत्त्व, रज, तम ह्यांनी नटलेली असून त्याचा उद्गम मात्र ``अहं ब्रह्माऽस्मि''ह्या एकच तत्त्वामध्ये आहे ॥ ४३॥ अहं भौक्ता ब्रह्म चान्यद् भोग्यं भोगोऽस्मि वेदनम् । अहं ज्ञाता ब्रह्म ज्ञेय ज्ञानमस्मीति वेदनम् ॥ ४४॥ अर्थ - मी भोगणारा असून जे भोग्य आहे भोगण्यास योग्य आहे ते दुसरे आहे असे समजणे म्हणजे ``अहं अस्मि''मी ज्ञाता म्हणजे ब्रह्म आणि जाणण्यालायक ज्ञेय ते दुसरे असा द्वैतभाव होईल. ॥ ४४॥ स्मरणं विस्मरणापेक्षं विस्मृतिस्तु निजावृतिः । अतोऽहं स्मरणात्पूर्वं स्वावृतिश्चानुमीयते ॥ ४५॥ अर्थ - स्मरण आणि विस्मरण ह्यांत विस्मरण म्हणजे स्मरणाची निवृत्ति म्हणजे (त्याचा विसर पडणे, मतिभ्रम) हा प्रकार आहे. म्हणून मी माझे स्मरण करीत असतांना (दूर कोठे तरी काळा आड) आपल्या स्व -पुनरावृत्तिला अनुमान करून जाणले पाहिजे. ॥ ४५॥ इदमावरणं प्रोक्तमसच्चापि तमस्तथा । तम आसीदसद्वेति चेदमग्नऽवदत् श्रुतिः ॥ ४६॥ अर्थ - हे आच्छादन असत् आणि तमस् म्हटले गेले आहे. श्रुति, वेदशास्त्रांनी सांगीतले आहे की हे असत् होतेच पण कसे? तर ते अस्तित्वांत नसलेलेच पण सुरवातीला भ्रमांने वाटले ॥ ४६॥ आकाशवत्तमो ज्ञानमथवाऽऽवरण तथा । तस्मिन्नहं ब्रह्म चेति विक्षेम्पश्चञ्चलोऽनिलः ॥ ४७॥ अर्थ - आकाशाप्रमाणेच तम आणि अज्ञान आवरण (की जे भ्रामकरीत्या असून खरे अस्तित्वांत नाहीच असे) हे पण भासले. ज्याप्रमाणे वायु चंचल असतो तो स्थिर नाही तद्वत् हे वाटणे की ``मी ब्रह्म नाही''हे उलटरूपानेच वाटते. ॥ ४७॥ आभासोऽनल इत्युक्तो रसास्वादोऽस्य तज्जलम् । इतःस्थूलानुभूतिर्या भूमिःसा सूक्ष्मरूपतः ॥ ४८॥ अर्थ - आभास हा अग्निरूप आणि रसास्वाद हा जलरूप असून भूमि ही स्थूल स्वरूपाची अनुभूति आहे. ह्या सर्व अनुभूति पंचमहाभूतांचे सूक्ष्मरूपच आहेत. ॥ ४८॥ अष्टधा प्रकृतेः सुक्ष्मं रूप मायेति यत् स्थितम् । माया साऽप्यष्टधा चैवं सूक्ष्मरूपेण बीजवत् ॥ ४९॥ अर्थ - अष्टधा प्रकृतिच्या स्वरूपांत मायाहीच उभी राहते. मायेचे सूक्ष्मरूप म्हणजे त्याच्या बुडाशी मायाच बीज रूपाने आहे. ॥ ४९॥ गुणसाम्या च मायेयं मूला प्रकृतिरूच्यते । ब्रह्मणोऽजानतो भाति ब्रह्मज्ञानाद्वि नश्यति ॥ ५०॥ अर्थ - गुणांचा (सत्त्व, रज, तम) साम्यरूपाने उदय झाल्यावर माया उत्पन्न होते हीच मूळ प्रकृति होय. ब्रह्मतत्त्वाला विस्मृत केल्यामुळे ती जाणवते, आणि त्याचे ज्ञान झाल्यावर ती नाश पावते. ॥ ५०॥ मूलप्रकृतिरेवेयं मूलमायेत्यपीर्यते । मूलाविद्येति च प्रोक्ता जगद्वृक्षस्य मूलतः ॥ ५१॥ अर्थ - मूल प्रकृति हीच मूलमाया म्हणून म्हटली जाते. जगत्वृक्षाची मूलतः जी विद्या तीच मूल विद्या होय. ॥ ५१॥ असङ्गं ब्रह्मनित्यं हि सच्चिदानन्दमद्वयम् । तस्मिन्न माया जीवेशौ ना विद्यां न जगत्तथा ॥ ५२॥ अर्थ - ब्रह्मरूप तत्त्व हे निर्विकार नित्य चिदानंदमय आणि चिन्मय आहे. त्यांत म्हणजे जगदीश्वरांत विद्या, माया आणि हे विनाशी तत्त्वपण नाहीं. ॥ ५२॥ मायाया पूर्वरूपं तु स्वात्माज्ञानं तमोऽपि वा । ततो ह्युपनिषद्ब्रुते माया सा तु महत्तमः ॥ ५३॥ अर्थ - आपल्या स्वात्मस्वरूपाविषयी अज्ञान आणि तम म्हणजे अंधकार हेच माया ह्या रूपाचे पूर्वरूप म्हणजे आदि रूप आहे. आणि म्हणूनच आमचे उपनिषद् सांगते की ``माया''ही महत्तम म्हणजे मोठ्यात मोठ्या स्वरूपाची आहे ॥ ५३॥ जगत्सर्जनसङ्कल्पादतिसूक्ष्मतयात्र हि । अस्ति प्रवृत्तिप्रारम्भः निवृत्तिब्रह्ममात्रता ॥ ५४॥ अर्थ - जगताची उत्पत्ति होण्यास ईश्वराचा जो संकल्प कारण झाला त्याचा अतिसूक्ष्मरूपाने प्रारंभ ``प्रवृत्ति प्रारंभ''हा ब्रह्मतत्त्वाची निवृत्तिच आहे ॥ ५४॥ यथाकाशस्थितो वायु तथैवावरणे स्थिता । अहं ब्रह्मास्मिरूपेयं वेदना बहुसूक्ष्मतः ॥ ५५॥ अर्थ - ज्याप्रमाणे आकाशांत स्थित वायु हा आवरणांत स्थित आहे, ``अहं ब्रह्माऽस्मि''ही ज्ञेयता अत्यंत सूक्ष्म रूपांत तशीच आहे ॥ ५५॥ आवरणेद्भवविक्षेपो ह्यतिसूक्ष्मोऽयमोदृशः । स्थूलस्थूलतया पश्चाद्भवत सृष्टिकारणम् ॥ ५६॥ अर्थ - आवरणांतून उत्पन्न झालेला वायु विक्षेपमात्राने अत्यंत सूक्ष्मरूप झाला. तदनंतर स्थूल हे सृष्टिरूपास स्थूलतेने कारण झाले ॥ ५६॥ यथातिशुभ्रो विरलो मेघो हि भवति क्रमात् । स्थूलस्थूलो घनः कृष्णः वृष्टेः साक्षाद्धिकारणम् ॥ ५७॥ अर्थ - ज्याप्रमाणे अतिशुभ्र असा मेघ विरळ होता होता कृष्णमेघ आणि क्रमाने घनदाट होतो आणि वृष्टिला साक्षात् कारण बनतो ॥ ५७॥ तथैवेयं ब्रह्मस्फूर्तिर्विरला शुभ्रा हि सा क्रमात् । स्थूलस्थूला घनीभूय जगः कारजं भवेत् ॥ ५८॥ अर्थ - त्याप्रमाणेच ही ब्रह्मतत्त्वाची स्फूर्ति सुरुवातीला (संकल्प रूप ईश्वराचे स्फुरण आदि क्रिया) अत्यंत विरल शुभ्ररूप होते नंतर ती हळू हळू स्थूल आणि स्थूल होता होता जगत् कारण बनली ॥ ५८॥ यथैव नावमाश्रित्य तीर्त्वाब्धिं तामपि त्यजेत् । ब्रह्मास्मि भावमाश्रित्य तीर्त्वा तमपि विसृजेत् ॥ ५९॥ अर्थ - ज्याप्रमाणे नांवेत बसून समुद्रावर तरंगत जाऊन शेवटी तो पार केल्यावर त्या नावेला सुद्धा सोडून देतात, त्याप्रमाणे ``अहं ब्रह्मास्मि''ह्याचा आश्रय घेवून भवसागराला तरून जाऊन त्यास पण अर्थात्, आपल्या ``अहं तत्त्वाला''विसर्जित करावे ॥ ५९॥ ॥ इति अष्टमो अध्यायः समाप्त ॥ ह्याप्रमाणे श्रीसमर्थरामदासांनी अनुग्रह दिलेले श्रीरामाचे पदकमलावरी भृंगरुपाने गुंजन करणारे परमहंस परिव्राजकांचे आचार्य भगवान् श्रीधरस्वामी ह्यांनी रचलेले मुमुक्षुसख ग्रंथातील जगन्मिथ्यात्वं नाम प्रकरण आठवे संपले

९. मायारूपसृष्टिक्रमः नाम प्रकरणं नवमम्

मायारूपसृष्टिक्रमः नाम प्रकरणं नवमम् (मायारूप सृष्टिक्रम नववा अध्याय -) ब्रह्मास्मीति प्रवाहस्य मूलं ब्रह्मैव शाश्वतम् । विस्तारश्च जगद्रूपः विविधत्वेन भासते ॥ १॥ अर्थ - ``ब्रह्माऽस्मि इति'' मैं ब्रह्म हू, ``मी ब्रह्म आहे'' ह्या विचार प्रवाहाचा मूल उद्गम म्हणजे ते शाश्वत् परब्रह्मच आहे. आणि त्याचा विस्तार म्हणजे हे जगत् रूपच आहे. ते विविधतेचे रूप घेवून नटलेले आहे. ॥ १॥ विश्वाभिमुखता या सा प्रवृत्तिरिति संज्ञिता । ब्रह्माभिमुखता या सा निवृत्तिरिति संज्ञिता ॥ २॥ अर्थ - जी जगत स्वरूपाकडे आकर्षित होते ती प्रवृत्ति म्हटली जाते आणि जी ब्रह्मतत्त्वाकडे आकर्षित होते, ती निवृत्ति म्हटली जाते. ॥ २॥ गुणसाम्यात्मिकायां स मायायां बिम्बितो ह्यजः । आदिनारायणः साक्षी महेशो वा सदाशिवः ॥ ३॥ अर्थ - त्रिगुणांची साम्यावस्था, म्हणजे समप्रमाणांत मिळवणी होते, मिसळ होते तेंव्हा ती ``माया'' ही निर्माण होते. ह्या शक्ति मध्ये ``अज'' म्हणजे ज्याचा कधीच आदि किंवा जन्म नाहीं, तो परमेश्वर प्रतिबिम्बित होतो आणि तोच साक्षी म्हणजे आत्मततत्त्वरूप आदि नारायण, महेश किंवा सदाशिव आहे. ॥ ३॥ सा पुनर्विकृतिं प्राप्य सत्त्वोद्रिक्ताऽभवत्ततः । अव्यक्ताख्या च तस्यां यो स ईश्वर इतीर्यते ॥ ४॥ अर्थ - ती साम्यरूपधारी त्रिगुणात्मक प्रकृति जेंव्हा त्यांत केवळ सत्त्वगुणाचाच उद्भव होऊन फोफावते, तेव्हा ईश्वरतत्त्व निर्माण होते. तो अव्यक्त असणारा त्याच मायारूपांत ``ईश्वर'' म्हटला जातो. मायोपाधिर्जगद्योनिः सर्वज्ञत्वादि लक्षणः । पारोक्ष्यशबलं ब्रह्म नामाऽस्पष्ट वपुस्त्वयम् ॥ ५॥ अर्थ - ``माया'' या तत्त्वापासून जन्म म्हणजे उत्पन्न होणारा तो अयोनिज परमात्मा सर्वज्ञता आदि लक्षणांनी युक्त चित्र -विचित्र अदृष्यरूपाने अस्पष्ट अदृश्य अश्या शरीराने भासतो. ॥ ५॥ रजोद्रिक्ता महन्नाम्नि जाता साङ्कुरता ततः । अङ्कुरात्पूर्वरूपा च कापि बीजस्थितिस्त्वियम् ॥ ६॥ अर्थ - रजोगुणांनी आधिक्य अश्या स्थितित तो आता (परब्रह्म रूप शक्तिमान परमेश्वर) अंकुरित होतो. आणि त्या अंकुरित होण्याच्या पूर्वी ही कोठली तरी एक स्थिति ही ``बीजरूप'' अशी नटली जातें. ॥ ६॥ एतस्यां बिम्बितो यत्सु स्वार्णगर्भः स एव हि । स्पष्टास्पष्टवपुश्चासौ बहुस्यामिति तप्यते ॥ ७॥ अर्थ - ह्या स्थिति मध्येच तो स्वर्णरूप गर्भधारक एक स्पष्ट आणि अस्पष्ट शरीरांनी ``बहु'' अनेक रूपाने तळपू लागतो, प्रकाशित होतो. ॥ ७॥ महतस्तु तमोद्रिक्ता चाहङ्कारभिदाऽभवत् । अस्यां यो बिम्बितस्तस्त विराड्नामेति विश्रुतम् ॥ ८॥ अर्थ - महत् तत्त्वामध्ये तमोगुणाचा विकास होवून अहंकार निर्माण होतो. आणि त्यांत जेंव्हां या तत्त्वाचा विराट् असा प्रतिबिम्बित भाव उत्पन्न होतो, तोच विराट म्हणून म्हटला जातो. ॥ ८॥ इतो व्यक्तानि भूतानि त्रिगुणाः विश्वसृष्टये । जगत्कारणमेवैतत्प्रत्यक्षं भाव्यते बुधैः ॥ ९॥ अर्थ - ह्याप्रमाणे ह्या सत्त्व, रज तमांनी ही सृष्टि उत्पन्न झाली. जे त्रिगुण व्यक्तरूपाने विद्यमान झाले असे विद्वान लोक मानतात. ॥ १०॥ विष्णुरस्याभिमानी च प्रधान पुरुषोत्तमः । इतो ब्रह्मायतः सृष्टीः सर्वेव सम जायत ॥ १०॥ अर्थ - मुख्य तत्त्व हे प्रधान तत्त्व विष्णुरूपच असून विष्णुतत्त्व आहे. ह्याप्रमाणे ही सृष्टि निर्माण झाली. आणि सर्वच ह्याप्रमाणे समरूपाने प्रकाशित झाले. ॥ १०॥ ललाटात् ब्रह्मणो रुद्रः सञ्जात इति कथ्यते । एतो त्रिमूर्तयो ज्ञेया सृष्टिस्थित्यन्तकारिणः ॥ ११॥ अर्थ - ब्रह्मतत्त्वाच्या ललाटामधून रुद्र तत्त्व निर्माण झाले असे सांगतात. ह्या पासूनच तीन तत्त्व निर्माण झाले. (१) उत्पत्ति (२) स्थिति (३) अंत, असे म्हटले जाते. ॥ ११॥ विष्णु सत्त्वाभिमानी च विधिश्च रजस स्तथा । तमसो रुद्र इत्येव मता त्रिगुणदेवताः ॥ १२॥ अर्थ - विष्णु हे सत्त्वगुण संपन्न, ब्रह्म हे (ब्रह्मदेव विधि) राजस तत्त्व संपन्न, रुद्र हे तामस तत्त्व संपन्न असे त्रिगुण देवता मानले जातात. ॥ १२॥ विष्णुतः सूक्ष्मसृष्टिश्च स्थूला सा ब्रह्मणः स्मृता । विष्णुरात्मा हि विश्वस्य सर्वा सृष्टिरितः क्रमात ॥ १३॥ अर्थ - विष्णु पासून सूक्ष्मसृष्टि, ब्रह्मापासून स्थूल सृष्टि आणि सर्व सृष्टिचा आत्मा हा विष्णुच आहे. ह्याप्रमाणे सर्व सृष्टि निर्मित झाली. ॥ १३॥ अयं विष्णुर्हि सम्प्रोक्तः श्रीनारायण इत्यपि । हेमगर्भोऽप्ययं ज्ञेयो निजपूर्वस्वरूपतः ॥ १४॥ अर्थ - हा विष्णुनारायण ह्या नावाने पण जाणला जातो. आणि आपल्या पूर्वस्वरूपावरुन पण त्यास ``हेमगर्भ'' हे पण म्हटले जाते. ॥ १४॥ सृष्टिकामाऽयमाकाशं सृष्ट्वा प्रथममेव हि । ततो वायुस्ततो ह्यग्निस्ततो निरञ्च भूस्ततः ॥ १५॥ अर्थ - ह्याप्रमाणे सृष्टि उत्पत्ति करण्याच्या कामनेने ह्या विष्णुने प्रथम आकाशाची निर्मिती केली तद्नंतर वायु, अग्नि, जल आणि भूमि निर्माण केली. ॥ १५॥ पञ्चतन्मात्र भूतानि त्रिगुणाश्च तथैव सः । प्रथमं सृष्टवान्देवः सूक्ष्मदेहविसृष्ट ये ॥ १६॥ अर्थ - हे पंचतन्मात्र भूत निर्माण करुन त्रिगुणांचे सृजन करुन नंतर देवाने प्रथम सूक्ष्म देह, निर्माण केले. ॥ १६॥ तन्मात्ररूपा आसन् ये पञ्चभूतांश्च तांस्ततः । तमोगुणमधिष्ठाय स्थूलीकर्तु स ऐक्षतः ॥ १७॥ अर्थ - हे पंचमहाभूत प्रथम ह्या -त्या तन्मात्रेच्या रूपांत प्रकाशित झाले. तमोगुणाच्या अधिष्ठानाने ते स्थूलरूपांत प्रथम दृश्यरूप झाले. ॥ १८॥ आकाशः शब्दगुणको शब्दस्पर्शात्मिकोऽनिलः । शब्दस्पर्शस्तथा रूपः चाग्निस्तु त्रिगुणात्मकः ॥ १८॥ अर्थ - आकाशापासून शब्द तन्मात्राची उत्पत्ती झाली. शब्द, स्पर्शात्मक वायू उत्पन्न झाला. शब्द स्पर्श तथा रूपात्मक त्रिगुणांनीयुक्त अग्नि उत्पन्न झाला. ॥ १८॥ शब्दस्पर्शस्तथा रूपं रसो नीरं चतुर्गुणम् । शब्दस्पर्शस्तथा रूपं रसो गन्धश्च पञ्च भूः ॥ १९॥ अर्थ - शब्द, स्पर्श, रूप तथा रस ह्यांनी युक्त जल उत्पन्न झाले. हे चार गुणांनी युक्त झाले. शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध ह्या पांच तन्मात्रे सहित ``भूमि'' उत्पन्न झाली. स पञ्चभूतसत्त्वांशन् रजोशांश्च तथैव हि । कृत्वा चतुर्धा तत्पश्चात् क्रमेणानेन सृष्टवान् ॥ २०॥ अर्थ - पंचमहाभूतांना आणि रजोगुणाला क्रमशः चार-चार भागांत त्याने विभाजित केले. आणि क्रमाने निर्मित झाली. त्यांच्या मिश्रणाने सृष्टि ची निर्मिती झाली. ॥ २०॥ भूत सत्त्वांशत्रितयादन्तः करणपञ्चकम् । मनो बुद्धिश्च चित्तञ्च तथाऽहंकार एव च ॥ २१॥ अर्थ - शरीरांतील सत्त्वांशाच्या तीन भागाने अंतःकरण उत्पन्न होते. त्यांत मन बुद्धि चित्त अहंकार ह्या गुणांचा समावेश असतो. ॥ २१॥ भूत सत्त्वतुरीयांशाज्ज्ञानेन्द्रियाणि पञ्च च । श्रोत्रं त्वकृचक्षुरित्येव जिह्वा घ्राणं निबोधत ॥ २२॥ अर्थ - आणि शरीरांतील भूत सत्त्वांशात्, सत्त्वांशाच्या चौथ्या भागापासून ज्ञानेंद्रिय पंचक (नेत्र, कर्ण, जिह्वा, स्पर्श, घ्राणोंद्रिय) उत्पन्न झाले. ॥ २२॥ स्फुरणञ्चानुसन्धानं ज्ञानं विषयोऽस्तरस्य च । सङ्कल्पश्च विकल्पश्च मनोविषय एव च ॥ २३॥ अर्थ - स्फुरण आणि ज्ञान हे अंतःकरणाचे विषय आहेत. संकल्प - विकल्प हे मनाचे विषय आहेत. ॥ २३॥ निश्चयश्च भवेद्बुद्धेः चित्तस्य स्मरणं तथा । विषयाऽहङ् कृतेस्तद्वदभिमानोऽवगम्यताम् ॥ २४॥ अर्थ - बुद्धिचा विषय म्हणजे निश्चय हा आहे. आणि चित्ताचा विषय स्मरण आहे. अहंकाराचा विषय अभिमान हा होय. हे जाणावे. ॥ २४॥ मनःस्थानं गलान्तञ्च बुद्धेर्वदनमेव च । अहङ्कारस्य हृदयं नाभिश्चित्तस्य च स्थलम् ॥ २५॥ अर्थ - मनाचे स्थान गळयामध्ये, बुद्धिचे स्थान वदन (मुख) येथे आहे. अहंकाराचे स्थान हृदयामध्ये आणि चित्ताचे स्थान नाभिमध्ये आहे. ॥ २५॥ मूलाधारं स्फुरणतो भ्रूमध्यं ज्ञानतस्तथा । अनुसन्धानतस्त्वैवमन्तः करणस्य वा स्थलम् ॥ २६॥ अर्थ - मूलाधारामध्ये स्फुरणाचे (उत्साह) स्थान, भ्रूमध्यांत म्हणजे दोन्ही भूवयांमध्ये ज्ञानाचे स्थान आणि अंतःकरणाचे स्थान अनुसंधानामध्ये आहे. ॥ २६॥ अन्तरस्य च कूटस्थो मनसश्चन्द्रमास्तथा । बुद्धेश्चतुर्मुखो ज्ञेयो बृहस्पतिरथापि वा ॥ २७॥ अर्थ - अंतराचा (मनाचा) देवता कूटस्थ (आत्मा) आहे. मनाचा देवता चंद्रमा म्हटला जातो. बुद्धिचा देवता चतुर्मुख म्हणजे ब्रह्मदेव असुन बृहस्पति सुद्धा मानला जातो. ॥ २७॥ चित्तस्य विष्णुर्विज्ञेयो नारायणः स इत्यपि । अहङ्कारस्य रुद्रोऽसावेतेन्तः करणाधिपः ॥ २८॥ अर्थ - चित्ताचा देवता विष्णु आणि तोच म्हणजे नारायण हा कर्ताधर्ता आहे. अहंकारचा अधिष्ठाता रुद्र (महादेव) असून तेच सर्वोंचे मुख्य साधनाधिकारी आहे. ॥ २८॥ श्रवणस्य दिग् त्वचो वातश्चक्षोः सूर्यस्तथैव च । जिह्वाया वरुणः प्रोक्तो घ्राणस्याविश्वकुमारकौ ॥ २९॥ अर्थ - श्रवणेंद्रियांची देवता दिशा, त्वक् -स्पर्शेंद्रियाची देवता वायु, नेत्रेंद्रियांची देवता सूर्य, जिह्वा रसेंद्रियाची देवता वरुण आणि घ्राणेंद्रियाची देवता अश्विनीकुमार हे मानले गेले आहेत. ॥ २९॥ शब्द श्रोत्रस्य विषयस्त्वचः स्पर्शस्तथैव च । अक्ष्णौरूपं रसश्चैव जिह्वायास्तु निबोधत ॥ ३०॥ अर्थ - श्रोत्राचा विषय शब्द, स्पर्शेंद्रियाचा विषय -स्पर्श, नेत्रेंद्रियांचा विषय -रूप, जिह्वेचा विषय -रस, ह्याप्रमाणे म्हटले गेले आहे. ॥ ३०॥ घ्राणस्य विषयो गन्धः सर्वेषां स्फुट एव हि । जीवानां बाधकं प्रोक्तं चैतद्विषयपञ्चकम् ॥ ३१॥ अर्थ - नाकाचा विषय -गंध, असून सर्व इंद्रियांचे विषय वेगळे -वेगळे आहेत. आणि हे सर्व विषय पंचक जीवांना बाधकच आहेत. ॥ ३१॥ भूतरजोंऽशत्रितयाद्विज्ञेयं प्राणपञ्चकम् । प्राणोपानः समानश्च व्यानश्चोदान इत्यपि ॥ ३२॥ अर्थ - पंचप्राण हे रजोगुणी भूतातील (तिन्हींची युति होवून) निर्माण झाले, ते म्हणजे प्राण, अपान, व्यान, उदान आणि समान हे होय. ॥ ३२॥ भूतरजस्तुरीयांशात्पञ्चकर्मेन्दियाणि वै । वाग् हस्तौ च पादौ च पायुश्चोपस्थ एव च ॥ ३३॥ अर्थ - रजोगुणी भूतांच्या चौथ्या भागापासून पंचकर्मेंद्रिय निर्माण झाले. वाक्, हात, पाय, पायु, उपस्थ हे ते होतांत. ॥ ३३॥ सत्त्वं समष्टि तस्त्वै वं सृष्टाश्चेन्द्रियपालकाः । एभिरेवेन्द्रियाणीत्थं स्वे स्वे कर्माणि कुर्वते ॥ ३४॥ अर्थ - सत्त्वगुणापासुन समविष्टतत्त्वरूपी इंद्रियपालक निर्माण होवून त्या -त्या इंद्रियांचे कार्य त्या -त्या कर्मात संपन्न झाले. ॥ ३४॥ नाग कूर्मश्च कृकरो देवदत्तो धनञ्जयः । उपवाताश्च पञ्चै ते प्रोक्ता उपनिषत्सु हि ॥ ३५॥ अर्थ - नाग, कूर्म, कुकर, देवदत्त, धनंजय, हे पांच उपप्राण वायु उपनिषदांमध्ये सांगितले आहेत. ॥ ३५॥ एषु प्राणादयः पञ्च मुख्याःपञ्चसु तेष्वपि । प्राणसंज्ञस्तथाऽपानः श्रेष्ठः प्राणस्तयोर्हि सः ॥ ३६॥ अर्थ - ह्या पंचप्राणांमध्ये प्राण आणि अपान वायु हे मुख्य सांगितले आहेत. त्यांत प्राण हा विशेष श्रेष्ठ सांगितला आहे. ॥ ३६॥ स्थिते यस्मिंश्च स्थास्यामि चोत्क्रान्तोऽहं तथैव च । इति मत्वाऽसृजत्प्राणं भगवान् भूतभावनः ॥ ३७॥ अर्थ - भूतभवन प्रजोत्पादक भगवान विष्णुने या मध्ये प्रविष्ट होवून सतत उत्क्राप्त होवून प्राण तत्त्व उत्पन्न केले. ॥ ३७॥ वायुष्वेतेषु सर्वेषु मुख्यश्चैकोऽभवततः । श्रेष्ठो ज्येष्ठश्च प्राणो हि जीवात्मानं विभर्तियः ॥ ३८॥ अर्थ - सर्व वायुंमध्ये त्या वेळेस एकच वायु मुख्य रूपाने उद्भवला. ज्येष्ठ श्रेष्ठ असे प्राणतत्त्व सर्व जीवात्म्यांमध्यें प्रविष्ट झाले. ॥ ३८॥ आस्य नासिकयोर्मध्ये हृदयं नाभिमण्डलम् । पान्दाङ्गुष्ठमिति प्राहुः प्राणस्थानानि च क्रमान्त ॥ ३९॥ अर्थ - तोंड आणि नाकामध्ये, हृदयात आणि बेम्बीत, पायाच्या अंगठ्यामध्ये ह्याप्रमाणे क्रमाने प्राण असण्याचे स्थान आहे. ॥ ३९॥ अपानो वर्तते नित्यं गुदमेण्ढ्रोरुजानुषु । उदरे सकले कट्यां नाभौजङ्घे च वा तथा ॥ ४०॥ अर्थ - अपान वायु हा नित्य गुदाद्वारी, शिश्नाग्रांत, गुडघे तथा मांडी ह्या ठिकाणी स्थित असतो. संपूर्ण उदरांत पोटांत आणि कटिस्थानी तथा नाभीमध्ये आणि जांघेमध्ये पण हा त्याप्रमाणेच असतो. ॥ ४०॥ व्यानः श्रोत्रोरुकट्याञ्च ककुद्भ्यां गुल्फयोरपि । प्राणस्थाने गलेऽक्ष्णोश्च व्याप्त सर्वत्र तिष्ठति ॥ ४१॥ अर्थ - व्यान हा वायु कान मांड्या, कंबर -नितम्ब घोटाद्वयांमध्ये स्थित आहे. प्राण स्थानामध्ये गळा, डोळे, ह्यांत असून, सर्वत्र व्यापला आहे. ॥ ४१॥ उदानः सर्वसन्धिस्थ पादयोर्हस्तयोरपि । नाभौ समानो विज्ञेयः सर्वत्रापि प्रवर्तते ॥ ४२॥ अर्थ - हातापायांच्या सर्व सांध्यांमध्ये उदान हा वायु स्थित असून नाभि मध्ये समान हा वायु असून तो सर्वत्र भ्रमण करतो. ॥ ४२॥ नागादि यायवः पञ्च त्वगस्थ्यादिषु संस्थितः । कर्माणि दशवायूनामित उर्ध्व प्रचक्षते. ॥ ४३॥ अर्थ - त्वचा आदि मध्ये नाग नामक वायु स्थित असून एकंदर दहा प्रकारचे वायु वर सांगीतले गेले आहेत आणि त्यांची कर्म पण उधृत केली गेली आहेत. ॥ ४३॥ निःश्वासोच्छवासकासाश्च प्राणकर्माणि प्रोच्यते । अपानख्यस्य वायोश्च विण्मुत्रादि विसर्जनम् ॥ ४४॥ अर्थ - श्वास निश्वास आदि प्राणवायुची कर्मे आहेत. अपानादि वायुंचे मलमूल विसर्जन हे काम आहे. ॥ ४४॥ समानः सर्वसामीप्यं करोति तनुपोषणम् । उदान उर्ध्वगमनं देहस्थोज्जीरणं तथा ॥ ४५॥ अर्थ - ``समान'' वायु हा सर्व शरीरांत भ्रमण करुन सर्वत्र सामीप्य प्राप्त करुन शरीर पोषण करतो. उदान हा वायु उर्ध्व गतीस जाऊन शरीराचे शेवट करण्याचे कार्य करतों. ॥ ४५॥ व्यानो विवादकृत्प्रोक्तश्चालनं सर्वसन्धिषु । पञ्चवायुक्रियाः प्रोक्ता उपवायुक्रिया इतः ॥ ४६॥ अर्थ - ``व्यान'' वायु हा सर्व सांध्यामध्ये भ्रमण करणारा असून सांध्यांचे वळणे, चालणे संपूर्ण शरीरात फिरणारा आहे. ह्याप्रमाणे पंच वायुंच्या क्रिया सांगीतल्या गेल्या आहेत. आता उपवायुंच्या क्रिया बघु ॥ ४६॥ उद्गारादिकरो नागः कूर्म उन्मीलनादिकृत । निद्रादिकृद्देवदत्तः कृकरः क्षुत्करस्तथा ॥ ४७॥ अर्थ - ढेकराचा उद्गार आदिकरणरा वायु ``नाग'' नामक आहे. कूर्म नामक वायु उन्मीलन कारक (डोळयांची उघड झांप होते) देवदत्त वायुमुळे निद्रासमयी जांभई येते, ``कृकर'' नामक वायुमुळे शिंका वगैरे येतात. ॥ ४७॥ धनञ्जयस्य शोभादि कर्मप्रोक्तं महात्मभिः । न जहाति मृतं वाऽपि शरीरञ्च धनञ्जय ॥ ४८॥ अर्थ - महात्मा लोकांनी, असे म्हटले आहे की -धनंजय नामक वायु हा शरीरास पुष्टी देऊन शोभाकारक आहे. आणि मृत्यु नंतर ही हा शरीरास फुगवतो आणि सोडीत नाहीं. ॥ ४८॥ अथ वर्णास्तु पञ्चानां प्राणादीनामनुक्रमात । अमृतनादाख्योपनिषद् वक्ति मन्या महेऽधुना ॥ ४९॥ अर्थ - प्रजादि पंचप्राणांचे असे अनुक्रमाने वर्णन ``प्राणोपनिषदांत''(अमृतनाद नामक उपनिषदात) आहे. असे मानले जाते. ॥ ४९॥ रक्तवर्णो मणिप्रख्यः प्राणवायुः प्रकीर्तितः । अपानस्तस्य मध्ये तु इन्द्रगोपसमप्रभः ॥ ५०॥ अर्थ - रक्तवर्ण अर्थात लालमण्याप्रमाणे हा प्राण वायु प्रसिद्ध आहे. ``अपान'' वायु त्यांत इंद्रगोप ह्या लाल मखमली कीड्याप्रमाणे दिसतो. ॥ ५०॥ समानस्तुद्वयोर्मध्ये गोक्षीरधवलप्रभः । अपाण्डुर उदानश्च व्यानो ह्यर्चिसमप्रभः ॥ ५१॥ अर्थ - गोदुग्ध वर्णाचा म्हणजे गाईच्या दुधासारखा शुभ्ररंगाचा त्या दोघांमध्ये समान वायु हा असतो. उदान वायु हा अपांडूर म्हणजे भूरकट रंगाचा असून व्यान हा वायु एखाद्या किरणा प्रमाणे चमकतो. ॥ ५१॥ अपानस्य विधिर्यद्वत्प्राणस्य हरिरुच्यते । उदानस्य यथा रुद्रः समानस्य तथेश्वरः ॥ ५२॥ अर्थ - अपान वायुचे अधिपति विधि अर्थात ब्रह्मदेव हे म्हटले जातात. आणि प्राणवायुचे अधिपति विष्णु भगवान हे सून उदान वायुचे रुद्र हे अधिपति, समान वायुचे ईश्वर हे अधिपति आहे. ॥ ५२॥ व्यानस्य भवतीत्यत्र त्वभिमानी सदाशिवः । एवं प्रोक्तानि पञ्चानां पञ्चाधिपतयः क्रमात ॥ ५३॥ अर्थ - व्यान ह्या वायुचे धिपति अभिमानी सदाशिव हे म्हटले जातात. आणि ह्याप्रमाणे हे पांच देव पंचाधिपति म्हणून म्हटले गेले आहेत. ॥ ५३॥ रजस्तुर्यंशभागेन कर्मेन्द्रियाणि चाभवत् । वाग् हस्तौ चरणावेवमुपस्थः पायुरेव च ॥ ५४॥ अर्थ - रजोगुणाच्या चौथ्या भागापासून कर्मेंद्रियांची उत्पत्ति झाली. वाक् (वाणी) हस्त, पाद, गुदा आणि जननेंद्रिय ही ती होत. ॥ ५४॥ वाचोऽग्निर्हस्तयोरिन्द्रः पादयोश्च त्रिविक्रमः । प्रजापतिरुपस्थस्य पायोर्मृत्युस्तथैव च ॥ ५५॥ अर्थ - वाणीचा अग्नि, हातांचा इंद्र, पायांचा त्रिविक्रम, जननेंद्रियाचा प्रजापति, गुदा इंद्रियाचा मृत्यु (यम) हे देवता होय. ॥ ५५॥ इमे कर्मेन्द्रियाणान्तु सन्त्यभिमानिनः क्रमान्त् । दानादाने तथा स्पर्शो हस्तयोः कर्मतत्स्फुडम् ॥ ५६॥ अर्थ - ह्या कर्मेंद्रियांच्या क्रमाने दान प्रदान करणे, स्पर्श करणे ह्याचे हाताद्वारे स्फुरण झाले. कर्मेन्द्रियाणि प्रोक्तानि यन्त्राणीव जडानि हि । वाण्येकैव हि सम्प्रोक्ता ज्ञानकर्मोभियात्मिका ॥ ५७॥ अर्थ - कर्मेंद्रिय हे जड यंत्राप्रमाणे झाले. पण वाणी हीच एक ज्ञान आणि कर्म ह्या दोन्हींची वाहक झाली. दोघांना प्रकट करती झाली. ॥ ५७॥ उद्गीरणं कर्म यस्याः यैव ज्ञानैकसाधना । नराणां भूषणं तर्दैज्जीवनं (?) लक्षणञ्च वा ॥ ५८॥ अर्थ - ``उद्गीरणं'' ध्वनि स्पष्ट करणे, स्पष्ट बोलणे, म्हणजे ज्ञानप्राप्तीचे साधन आहे. मनुष्यांचे एकमेव भूषण आणि मानवी जीवनाचे लक्षण आहे. ॥ ५८॥ परा पश्यन्ति मध्यमां वैखरी च चतुर्विधा । वाणीयं वर्तते देहे ज्ञातव्याऽन्त्र मुमुक्षुभिः ॥ ५९॥ अर्थ - परा - पश्यंति - मध्यमा आणि वैखरी ह्या चार प्रकारच्या वाणी शरीरांत असतात. हे मुमुक्षु साधकाने समजून घेतले पाहीजे. ॥ ५९॥ परायामङ्कुरी भूय पश्यन्त्या द्विदलीकृता । मध्यमायां मुकुलिता वैखर्यां विकसीकृता ॥ ६०॥ अर्थ - ``परा'' वाणी मध्ये ती अंकुरित होवून, ``पश्यंति'' मध्ये ती द्विदलीत होते नंतर ``मध्यमा'' वाणीमध्ये ती उन्मीलित होवून ``वैखरी'' मध्ये ती पूर्ण विकसित होते. ॥ ६०॥ विदितं पादयोःकर्म गमनागमनादिकम् । उपस्थस्य च पायोश्च मूत्रविष्ठाविसर्जनम् ॥ ६१॥ अर्थ - पायांमुळे जाणे -येणे आदि कर्म होते. उपस्थ द्वारा मल, गूदाद्वारे मूत्र मल विसर्जन क्रिया होते. ॥ ६१॥ पञ्चविंशतितत्त्वाख्यं सूक्ष्मं चैवातिवाहिकम् । लिङ्गशरीरमित्यवं वासनावासित जगुः ॥ ६२॥ अर्थ - पंचवीस तत्त्वांनी ह्या जडशरीरांत सूक्ष्म शरीर, आणि सूक्ष्म रूपाने लिंग शरीर म्हणून हे वासना स्थानी विराजमान असते. ॥ ६२॥ द्विधा विभज्य चैकैकं स्थाप्यैकन्तु तथैव च । द्वितीयञ्च पुनश्चैवं चतुर्धा कृतवान् प्रभुः ॥ ६३॥ अर्थ - त्याचे दोन -दोन विभाग करुन, त्याचे पुनर्स्थापन करुन अर्ध्या उरलेल्या विभागाचे चार भाग प्रभुने केले. (पंचीकरण) अर्थात पंचमहाभूतांचे विशिष्ट संम्मिश्रण. ॥ ६३॥ तत्तद्भूते प्रधानांशमेकं संस्थाप्यनन्तरम् । तदन्येषु चतुर्भागान् संयोज्य पञ्च -पञ्च ते ॥ ६४॥ अर्थ - त्या -त्या भूतांचे अर्धे भाग घेवून, बाकीच्यांचे एक -एक पाव हिस्से त्यास जोडून त्याचे पुन्हा पाच प्रकार केले. ॥ ६४॥ पञ्चभूतेभ्य एवं च तत्त्वानि पञ्चविंशति । आकारोदीक्षणादेव देवः स्वाचिन्त्यशक्तितः ॥ ६५॥ अर्थ - पंच महाभूतांपासून हे पंचवीस तत्त्वांचे आकार देवून देवाने स्वशक्तिने त्यांत चैतन्य ओतले. ॥ ६५॥ अन्तःकरणं व्यानः श्रोत्रं वाक्शब्दो नभ एव च । मनः समानस्त्वग्धस्तौ स्पर्शश्चेत्यनिलस्तथा ॥ ६६॥ अर्थ - अंतःकरणामध्ये व्यान, श्रोत्र आणि वादी मध्ये शब्दरूप, नभ, मनामध्ये समान हा वायुरूप आणि त्वचे मध्ये वायुरूप स्पर्श निर्माण केला. ॥ ६६॥ बुद्धिरुदानश्चक्षुषी पादौ रूपं तथाऽनलः । चित्तं प्राणश्च जिह्वैवं चोपस्थस्य रसोजलम् ॥ ६७॥ अर्थ - बुद्धिमध्ये उदान, डोळयांना रूप आणि पायांना अग्निदेवता, चित्तामध्ये प्राण, जिह्वा व जननेंद्रिय ह्यांत रसरूपी जलदेवता प्रकट झाल्या ॥ ६७॥ अहङ्कारस्तथाऽपानो घ्राणं गन्धस्तथैव भूः । पञ्चविंशति तत्त्वानि सूक्ष्मदेहस्य सन्त्यथ ॥ ६८॥ अर्थ - अहंकार, अपान, घ्राण गंध तसेच भू -पृथ्वी (गंधवती) हे पंचवीस तत्त्व सूक्ष्म देहाचे सांगीतले आहेत. ॥ ६८॥ पञ्चीकृत हि भूतानां लेशानादायचेश्वरः । व्यष्टिः समष्टिः स्थूलानि शरीराणि विनिर्ममे ॥ ६९॥ अर्थ - ईश्वराने पंचीकृत अश्या महाभूतांच्या मिश्रणांतून त्यांचे लेश (अंश) घेवून भूतें प्राणी उत्पन्न केलीत. ती व्यष्टि समष्टि रूपाने स्थूल शरीरे उत्पन्न केली. ॥ ६९॥ कामक्रोधौ लोभमोहौ भयं नभः इतीर्यते । चलर्नवलनञ्चैव प्रसारश्च निरोधनम् ॥ ७०॥ अर्थ - काम. क्रोध, लोभ, मोह, भय हे आकाशतत्त्वांत तसेच चालणे वळणे, प्रसार, थांबणे, रोकणे हे पण त्यातच आहे. ॥ ७०॥ तथैवाकुञ्चनं त्वैवं देने पवनः ईदृशः । क्षुत्तृष्णाऽऽलस्य निद्रा च मैथुनं चा निलस्तनौ ॥ ७१॥ अर्थ - -त्याच प्रमाणे आकुंचन होणे, मिटणे हे पण कार्य देहामध्ये आहे. ते पवन म्हणजे वायुचेच आहे. त्याच प्रमाणे भूक, तहान, आळस, निद्रा, मैथुन हे तेजतत्त्व अग्नितत्त्वाद्वारेच शरीरांत क्रियाशील होतात. मूत्र लाला तथा रक्तं शुक्रं स्वेदो जलं मतम् । अस्थि चर्मच नाडी च केशा मांसञ्च भूस्तनो ॥ ७२॥ अर्थ - मूत्र, लाल, रक्त, घाम, शुक्र हे सर्वत्र जलतत्त्वाचेच कार्य असून हाडे, कातडे, चर्म, नसा, केस मांस हे सर्व भूततत्त्वापासूनच होतात. ॥ ७२॥ पञ्चभूतात्मको देहो स्थूलः सूक्ष्मस्तथैव च । आनन्दघन आत्माऽहं विनिश्चित्य विमुच्यते ॥ ७३॥ अर्थ - हा पंचभूतात्मक देह स्थूल आणि सूक्ष्म रूपात आहे. आत्मा मात्र आनंदाचा कंद असून तो त्या देहास विसर्जित करतो. ॥ ७३॥ अहिंसासत्यमस्तेय ब्रह्मचर्याम्परिग्रहः । अक्रोधो गुरुशुश्रूषा शौच सन्तोष आर्जवम् ॥ ७४॥ अर्थ - ह्या निम्नलिखित सर्व अंतरमुख नित्य अश्या स्थिति आहेत. अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य, असंग्रह, अक्रोध, गुरुशुश्रुषा, शौच, संतोष सरलता असते. ॥ ७४॥ शमो मनोनिग्रहञ्च दमश्चेन्द्रियसंयमः । कर्मत्यागश्चोपरतिर्नित्यमन्तर्मुखा स्थितिः ॥ ७५॥ अर्थ - शम, दम, मनोनिग्रह, संयम, कर्मत्याग, उपरति ह्या सर्व आंतरिक प्रवृत्ति च्या स्थिति आहेत. ॥ ७५॥ तितिक्षा द्वन्द्वसहनं श्रद्धा विश्वास एव हि । तुष्टिरेव समाधानं पूर्णानन्द स्वरूपतः ॥ ७६॥ अर्थ - तितिक्षा सहनशक्ति द्वंद्व द्विधामनःस्थिति श्रद्धा, म्हणजे विश्वासच आहे. तुष्टी म्हणजे समाधान, पूर्ण आनंदस्वरूपाचे ते समाधान आहे. ॥ ७६॥ आत्मनित्वमदम्भित्वमास्तिकत्वमहिंसता । एते सर्वे गुणा ज्ञेयाः सात्त्विकस्य विशेषतः ॥ ७७॥ अर्थ - अमानवित्वं आपल्याकडे मान सम्मान न घेणे, अदांभिकत्व, ढोंगीपणा न करणे, आस्तिकता म्हणजे परमेश्वरावर श्रद्धा ठेवणे. अहिंसा कोणत्याही प्रकारची हिंसा न करणे ही सर्व सात्त्विकगुणांची लक्षणें आहेत. ॥ ७७॥ अहं कर्तास्म्यहं भोक्तस्म्यहं वक्ताभिमानवान् । एते गुणा राजसस्य प्रोच्यन्ते ब्रह्मवादिभिः ॥ ७८॥ अर्थ - मीच कर्ता आहे, मीच भोगण्याचा अधिकारी आहे, वक्तृत्वाचा अभिमान असणे, हे गुण राजस् प्रवृत्ति चे लक्षण आहेत. असे ज्ञाते लोक मानतात. ॥ ७८॥ निद्रालस्यमोहरागौ मैथुनं चौर्यमेव च । एते गुणास्तामसस्य प्रोच्यन्ते ब्रह्मवादिभिः ॥ ७९॥ अर्थ - निद्रा, आळस, आसक्ति, मोह, मैथुन आणि चोरी करणे, ही अवगुण तामस् प्रवृत्ति ची आहेत. असे ब्रह्मविद् साधकांचे मत आहे. ॥ ७९॥ उर्ध्व गच्छन्ति सत्त्वस्था मध्ये तिष्ठन्ति राजसाः । जघन्यगुणवृत्तिस्था अधो गच्छन्ति तामसः ॥ ८०॥ अर्थ - सत्त्वगुणी लोक उच्चलोकांत जातात. राजस प्रवृत्तिचे लोक मध्यम लोकांत जातात, तामस प्रवृत्ति चे लोक निम्न लोकांत जातात. ॥ ८०॥ बुद्धिकर्मेन्द्रियप्राणपञ्चकैर्मनसा धियाः । शरीरं सप्तदशभिः सुसूक्ष्मं लिङ्गमुच्यते ॥ ८१॥ अर्थ - बुद्धि, कर्मेंद्रिय, प्राणपंचक (पंचकर्मेंद्रिय, पंचप्राण, पंच उपप्राण, मन आणि बुद्धि ह्याप्रमाणे सतरा तत्त्व मिळून सूक्ष्म शरीर बनते. ॥ ८१॥ मनोबुद्धिरहङ्कारः स्वानिलाग्निजलानि भूः । एताः प्रकृतस्यत्वष्टौ विकाराः षोडशोपचारे ॥ ८२॥ अर्थ - मन, बुद्धि, अहंकार स्व -अहंकारतत्त्व अनिल (वायु) अग्नि, जल आणि पृथ्वी मिळून हे आठ विकार सोळा तत्त्वांच्याही पलीकडचे आहेत. ॥ ८२॥ श्रोत्रं त्वक्चक्षुषी जिह्वा घ्राणं चैव तु पञ्चकम् । पयूपस्थौ करौ पादौ वाक्चैव दशमी मता ॥ ८३॥ अर्थ - श्रोत्र, चक्षु, त्वचा, जिह्वा, व घ्राण हे पंचेद्रिय आणि पांच कर्मेंद्रिय हात, पाय, वाणी, पायु, उपस्थ हे मिळून दहा आहेत. असे सांगितले गेले आहे. ॥ ८३॥ शब्दस्पर्शश्च रूपञ्च रसो गन्धस्तथैव च । त्रयोविंशतिरेतानि तत्त्वानि प्राकृतानि तु ॥ ८४॥ अर्थ - शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध हे मिळून प्राकृतिक सर्व तत्त्व आहेत. ॥ ८४ ॥ जाग्रत्स्वप्नः सुषुप्तिश्च त्रयाऽवस्थाभिमानिनः । विश्वश्च तेजसश्चैव प्राज्ञश्चेति च ते त्रयः ॥ ८५॥ अर्थ - जाग्रत स्वप्न, सुषुप्ति ह्या आत्मतत्त्वाच्या तीन अवस्था मानल्या गेल्या आहेत. आणि विश्व तेजस आणि प्राज्ञ हे तीन ते रूप आहेत. ॥ ८५॥ विराड् हिरण्यगर्भश्च ईश्वरश्चेति ते त्रयः । ब्रह्माण्डं चैव पिण्डाण्ड लोका भूरादयः क्रमात् ॥ ८६॥ अर्थ - विराट् हिरण्यगर्भ आणिआ ईश्वर असे ते तीन आहेत. ब्रह्माण्ड पिण्डाण्ड आणि भूलोक असे ते क्रमाने आहेत. ॥ ८६॥ स्वस्वोपाधिलयादेव लीयन्ते प्रत्यगात्मनि । अण्डं ज्ञानाग्निना तप्तं लीयते कारणे सह ॥ ८७॥ अर्थ - प्रत्यगात्मा ह्या अवस्थेत ते आपापली स्वौपाधी लीन करुन ज्ञानाग्निने तप्त होवून अण्डकारणासहित विलीन होते. ॥ ८७॥ परमात्मनि लीनं तत्परं ब्रह्मैव जायते । ततः स्तिमित गम्भर न तेजो न तमस्ततम् ॥ ८८॥ अर्थ - परमात्म्यामध्ये लींन झाल्यावर फक्त ब्रह्म हेच तेथे विराजित राहते. आणि विस्मित होवून अशी स्थिती निर्माण होते कीं त्या ठिकाणी न अंधःकार राहतो न तेजस् रूप राहते. अर्थात एकमेव अद्वैत ब्रह्मानंदच अनुभूत होतो. ॥ ८८॥ अनाख्यमनभिव्यक्तं सत्किञ्चिदवशिष्यते । ध्यात्वामध्यस्थमात्मान कलशान्तरदीपवत् ॥ ८९॥ अर्थ - सत् तत्त्व असे काही शांत व तेजस्वी रूपांत शिल्लक राहते की ज्याप्रमाणे एखाद्या घटामध्ये स्थिर रूपाने ज्योती दीपक प्रकाशित रहाते. अर्थात कोठलेही कंपन नसून एक सारखे ती ज्योत स्थिरपणे प्रकाशित राहते, अर्थात् आपल्या मधील आत्मतत्त्वाचा स्वयंप्रकाशित असल्याच्या अनुभूतिचा आनंद घेतो. ॥ ८९॥ अङ्गुष्ठमात्रमात्मानमधूमज्योतिरूपकम् । प्रकाशयन्तमन्तस्थं ध्यायेत्कूटस्थमव्ययम् ॥ ९०॥ अर्थ - अधूमज्योतिस्वरूप म्हणजे अर्थात कोठल्याही प्रकारचा धूर त्या ठिकाणी नसून स्वच्छ प्रकाशच आहे, अश्या स्थितित ते आत्मतत्त्व आपल्या अंतरंगात जे सत् तत्त्व कुटस्थ आहे जो अविकारी आहे, त्याला कोठल्याही प्रकार संशय किंवा अज्ञानाचा धूर वेष्टिला गेला नाही. अश्या निर्मळ तत्त्वाचा अनुभव घेते. ॥ ९०॥ विज्ञानात्मा तथा देहे जाग्रत्स्वप्नसुषुप्तितः । मायया मोहितः पश्चाद्बहुजन्मान्तरे पुनः ॥ ९१॥ अर्थ - विज्ञानात्मा (पंचकोशात्मक देह) जाग्रत स्वप्न सुषुप्ति ह्या तीन अवस्थांनी माया शक्तिमुळे वेढला जातो, आणि पुन्हा बहुत जन्मांना प्राप्त करतो. ॥ ९१ ॥ सत्कर्मम्परिपाकात्तु स्वविकारं चिकीर्षति । कोऽहं कथमयं दोषः संसाराख्य उपागतः ॥ ९२॥ अर्थ - सत्कर्म करीत राहिल्यामुळे हा आत्मा स्वविकारांना विसर्जित करीत -करीत पुढे प्रगति पथावर जातो. अर्थात कोऽहं मी कोण आहे? आणि ``कथं अयं'' हे कसे आहे? हे सर्व विचार त्याला सतत पडतात आणि त्यामुळे त्या संसाररूपी दोषांपासून तो सुटत जातो. ॥ ९२॥ जाग्रत्स्वप्ने व्यवहरन्सुषुप्तौ क्व गतिर्मम । इति चिन्तापरो भूत्वा स्वभासा च विशेषतः ॥ ९३॥ अर्थ - जाग्रत स्वप्न आणि सुषुप्ति ह्या तिन्ही अवस्था मला कशा प्राप्त होतात? त्यांत माझी काय गति आहे? आणि हा आपला आपल्यालाच काय आभास आहे? असा तो विचार करतो. ॥ ९३॥ अज्ञानात्तु चिदाभासौ बहिस्तापेन तापितः । दग्धं भवत्येव तदा तूलपिडमिवाग्निना ॥ ९४॥ अर्थ - बाह्य तापामुळे तप्त होवून (दुःखाने दुःखी होवून) अज्ञानामुळे पोळल्यासारखे विदित होते. ज्याप्रमाणे अग्निमुळे तूल कापूस जळावा तसे होते. ॥ ९४॥ दहरस्थः प्रत्यगात्मा नष्टेज्ञाने ततःपरम् । विततो व्याप्यविज्ञानं दहत्येव क्षर्णन तु ॥ ९५॥ अर्थ - सूक्ष्म दहर प्रत्यगात्मा हा अज्ञान नष्ट झाल्यामुळे ज्ञानरूपी सर्वत्र व्यापक स्वरूपी होवून तो क्षणभरांत प्रज्वलित होतो. ॥ ९५॥ मनोमय ज्ञानमयान्त्सम्यग्दग्ध्वा क्रमेण तु । घटस्थ दीपवत्स्वच्छः स्वदन्तेव प्रकाशते ॥ ९॥ अर्थ - मनोमय ज्ञानमय कोशास क्रमाने दग्ध समाप्त करुन तो घटस्थ दीपाप्रमाणे स्वांतःकरणांत शांतपणे तेवत राहतो. ॥ ९६॥ स्वर्गेमृत्यौ च पाताले यत्किंञ्चित्स चराचरम् । पञ्चभूतात्मकं सर्वं षष्ठं किञ्चिन्न विद्यते ॥ ९७॥ अर्थ - स्वर्ग, मृत्यु, पाताल, आणि जे कांही चराचर जगत आहे ते पंचभूतात्मक असून त्याशिवाय सहावे कांहीही नाहीं. ईक्षणात्सृष्टवान्देवः पृथ्व्यप्तेजोऽनिलो नभः । स्थलसूक्ष्मशरीराणि चैतेरेवाऽसृजत् प्रभु ॥ ९८॥ अर्थ - ईक्षण दृष्टिक्षेप केवळ दृष्टिपात करुन परमेश्वराने पृथ्वि, आप, तेज, वायु आकाश ही पंचमहाभूते निर्मित केली. स्थूल आणि सूक्ष्म भूते प्राणी ही ह्यांपासूनच देवाने निर्मित केली. ॥ ९८॥ पञ्चतन्मात्रतः सूक्ष्मं स्थूलं तत्स्थूलभूततः । पञ्चभूतात्मके देहे स्त्री का सा कश्च पुरुषः ॥ ९९॥ अर्थ - पंचतन्मात्रापासून सूक्ष्म देह आणि स्थूल देह हे स्थूल भूतांपासून उत्पन्न केलीत. आणि ह्या पंचमहाभूतात्मक देहांत काय पुरुष देह आणि काय स्त्रीदेह? अर्थात सर्व एकच प्रकार आहे. ं ॥ ९९॥ सुषिरं व्योमयद्देहो प्रचारो वायुसंज्ञकः । उष्णताग्निर्द्रवं चापः पृथ्वी काठिन्यमित्यपि ॥ १००॥ अर्थ - शरीरांत आकाशरूपाने पोकळी रिक्त स्थाने वायुरूपाने चलन -वलन, अग्निमुळे उष्णता, जलामुळे द्रवता पातळपणा, पृथ्वीमुळे कडकपणा हाडे वगैरे निर्मित झाली. ॥ १००॥ प्राणोत्क्रमणतश्चोर्ध्व शवरूपात्तनुर्भवेत् । पृथ्व्यंश एक एवात्र वर्तते शवरूपतः ॥ १०१॥ अर्थ - प्राणोत्क्रमण झाल्यावर शरीर उर्ध्व गतिस जाऊन मृतरूपाने शव बनून राहते. पृथ्वीचा जो जड अंश असतो तो तेव्हढा येथे जमीनीवर राहतो. तो शिल्लक राहतो. ॥ १०१॥ पृथिव्यां स लयं गत्वा मृत्तिकैव क्रमाद्वदेत् । अवशिष्ठं किमत्र स्यात्को देहः कस्य सोऽभवत् ॥ १०२॥ अर्थ - पृथ्वीमध्येच त्याचा विलय होतो आणि त्याची मृत्तिका बनते. नंतर काय रहाते? कसचा देह आणि कोणचा तो रहायला? ॥ १०२॥ आकाशाद्वायुरुत्पन्नस्ततोऽग्निः समजायत । अग्नेरापस्ततः पृथ्वी पृथिव्योऽन्नं प्रजायते । अन्नाद्रेतो रजश्चैव ताभ्यां देहा इमे क्रमात् ॥ १०३॥ अर्थ - आकाशांत वायु उत्पन्न झाला त्याच्यापासून अग्नि उत्पन्न झाला. अग्निपासून पाणी आणि पाण्यापासून पृथ्वी उत्पन्न झाली. पृथ्वी पासून अन्न, त्यापासून रेत आणि रज उत्पन्न झाले. त्या पासून देह निर्मित झाला. ह्या क्रमाने सर्व उत्पन्न झाले. ॥ १०३॥ घटो यद्वन्मृत्तिकायाः पुल्लिङ्गत्वेन बुध्यते । स्त्रीलिङ्गत्वेन सा स्थाली मृत्तिकेकैव तत्र तु ॥ १०४॥ अर्थ - घटरूपाने जे निर्मित झाले ते पुरुषलिंग आणि स्थाली रूपाने जे उत्पन्न झाले ते स्त्रीलिंग. मात्र एकाच मातीचे सर्वकाहीं बनले आहे. ॥ १०४॥ तथैव स्त्री पुमान्देहो जडो मृण्मात्र मृद्भवः । का च नारी नरः कः स्याद् भ्रममात्रमिदं जगत् ॥ १०५॥ अर्थ - त्याप्रमाणेच सर्व स्त्री -पुरुष देह हे जड आणि एकाच मातीचे बनलेले आहेत. म्हणून त्यांत काय नारी आणि काय नर हा भेद भ्रममात्रच आहे. हे जग भ्रम मात्रच आहे. ॥ १०५॥ रजोऽधिक्याच्च यो देहः स्त्रीलिङ्गत्वेन बुध्यते । रेतोऽधिक्याच्च यो देहः पुल्लिङ्गत्वेन बुध्यते ॥ १०६॥ अर्थ - रजतत्त्वाच्या आधिक्याने म्हणजे बहुमात्रेने तो देह स्त्रीलिंग म्हटला जातो आणि रेत तत्त्वाच्या आधिक्याने पुरुष देह म्हटला जातो. ॥ १०६॥ अन्ने हि नरनारीति व्यवहारः प्रतीयते । नाऽपि भूमौ न नीरे च नाग्नौ वायो न खे तथा ॥ १०७॥ अर्थ - ह्यामुळेच व्यवहारात हा भेद नर नारी रूपाने गणला जातो. त्याप्रमाणे हा भेद त्या पंचमहाभूतांमध्ये नाही की ज्यापासून आपले मानवी शरीर मिश्रितरूपाने बनले आहे. पृथ्वी, आप, तेज, वायु, आकाश ही तत्त्वें सर्व शरीरांत सारख्याच प्रमाणांत असतात. ॥ १०७॥ अज्ञानोत्थ भ्रमाज्जाता वासनायाऽसदात्मिका । तस्यां पुंस्त्रीवदाभाति स्वप्ने मिथ्या यथा तथा ॥ १०८॥ अर्थ - अज्ञानामुळे भ्रम उत्पन्न होवून आणि असत् तत्त्वाषियी वासना उत्पन्न झाल्यामुळे हा नर नारी भेद जाणवतो पण तो ज्याप्रमाणे स्वप्न हे मिथ्या असते तद्वतच आहे. स्वप्न तेवढ्यापुरते खरे वाटते. पण जागृत अवस्था प्राप्त झाल्यावर ते सर्व मिथ्या (खोटे) होते हे पटते. ॥ १०८॥ अनेनैवां हिजीवत्वं बन्धो दुःखं जनिर्मृतिः । नात्मा नैव च भूतानि नान्प्नं नारी नरोऽपिच ॥ १०९॥ अर्थ - ह्या अज्ञानजन्य भ्रमामुळेच जीवत्व आणि त्याचे बंधन तसेच जन्म आणि मृत्यु हे प्राप्त होते. अन्यथा हे नर नारी भेद नाहीत. आणि आत्मा आणि जीव हे भेद नाहीत. ॥ १०९॥ जन्मदुःखाथमेवेयं भावना निर्मिता भवेत् । हीनमस्य भवेन्मोक्षो ग्रहणं बन्ध एक हि ॥ ११०॥ अर्थ - जन्म -दुःख ह्या साठीच ही भावना निर्मित होते आणि ह्या अज्ञानजन्य भ्रमरूपी अवस्थे पासून जो सुटला त्यास मोक्षप्राप्ती होते आणि ह्या भावनेत जो बांधला गेला त्याला संसार बंधन प्राप्त होते. ॥ ११०॥ न चर्मणो न रक्तस्य न मांसस्य न चास्थिनः । यतो नैव ततो ज्ञानं स्वात्मरूप तनुर्जडा ॥ १११॥ अर्थ - त्या भ्रमामुळे चर्म, रक्त, मांस, अस्थि रूप देहांमध्येच मीपणा वाटतो. ते सर्व जडरूप आहे. स्वात्मरूपाचे ज्ञान म्हणजे भ्रमरहित ज्ञान आहे. ॥ १११॥ यथा भानुः स्वप्रकाशस्तथा ह्यात्मा स्वयं प्रभः । चकास्ति सर्वदेहेषु निजानन्दस्वरूपतः ॥ ११२॥ अर्थ - ज्याप्रमाणे सूर्य हा स्वयंप्रकाशी आहे, त्याच प्रमाणे आत्मा पण स्वयं प्रकाशी आहे. तो सर्व शरीरांत जीवमात्रांत स्वतःरूपाने आनंद रूपाने प्रकाशित होतो. ॥ ११२॥ इति श्रीसमर्थरामदासानुगृहित श्रीरामपदपङ्कजभृङ्गायमान श्रीमत्परमहंस परिव्राजकाचार्य भगवता श्री श्रीधरस्वामिना विरचिते मुमुक्षुसखः ग्रन्थे मायारूपसृष्टिक्रमः नाम नवमं प्रकरणं सम्पूर्णम् ।

१०. गुरुकृपया देहाध्यसनाशः नाम प्रकरणं दशमम्

(गुरुकृपेने देहाविषयी भ्रान्तज्ञानाचा नाश -) देहध्यावशाच्चित्ते यद्यदाभाति तत्सदा । आत्मप्रकाशतः सर्व मृगतोयं यथाऽपते ॥ १॥ अर्थ - देहाध्यास शरीर म्हणजे मी ही पक्की चूक अशी - भ्रांत समजूत असते आणि त्या मोहामुळे जे -जे भासते ते -ते सर्व आत्मज्ञान झाल्यावर मृगजळाप्रमाणे नाहीसे होते. मृगजळ हे सूर्यतापामुळे भासते. ॥ १॥ अहं देहो ममायं वा भावनाऽज्ञानकल्पिता । नाहं देहो ममायं वा भावना ज्ञानकल्पिता ॥ २॥ अर्थ - मी म्हणजे माझे शरीर आणि हे माझे ही भावना अज्ञानामुळेच उत्पन्न होते. आणि आत्मज्ञानप्राप्तीनंतर हे माझे नाहीं अशी भवना उत्पन्न होते. ॥ २॥ अहं ममेति यो भावो देहाध्यासादनात्मनि । स भावो बन्ध इत्युक्तः स्तन्मुक्तिर्मुक्तिरुच्यते ॥ ३॥ अर्थ - मी आणि माझे ही भावना देहाध्यास लागतो तेंव्हा होते. आणि ह्या भावना पासून सुटका झाली की म्हणजे मुक्ति प्राप्त होतें. ॥ ३॥ देहोऽहमिति सङ्कल्पो महत् संसार उच्चते । देहोऽहमिति सङ्कल्पः स बन्ध इति चोच्यते ॥ ४॥ अर्थ - मी म्हणजे देह ही कल्पना म्हणजेच महान संसार असे म्हटले जाते आणि मी म्हणजे हे शरीर हा संकल्प बंधन उत्पन्न करतों. ॥ ४॥ देहोऽहमिति सङ्कल्पस्तदुःखमिति चोच्यते । देहोऽहमिति यद्भान स एव नरक स्मृतः ॥ ५॥ अर्थ - देह म्हणजे ``मी'' हा संकल्प दुःख उत्पन्न करतो आणि देह म्हणजे ``मी'' ही संकल्पनाच हे भान होणे म्हणजेच नरकवास होय. ॥ ५॥ देहोऽहमिति सङ्कल्पो जगत्सर्वमितीयते । देहोऽहमिति सङ्कल्पो हृदयग्रन्थिरीरितः ॥ ६॥ अर्थ - देह म्हणजे मी ही कल्पनाच म्हणजे सर्व जग आणि देह म्हणजे मी ह्यातच हृदयग्रंथी म्हटले जाते. ॥ ६॥ देहोऽहमिति यज्ज्ञानं तदेवाज्ञानमुच्यते । देहोऽहमिति यज्ज्ञानं तदसद्भावमेव च ॥ ७॥ अर्थ - देह म्हणजे ``मी'' असे वाटणे हेच अज्ञान आहे. आणि देह म्हणजे ``मी'' ही भावनाच ``असत् भावना'' म्हटली जाते. ॥ ७॥ देहोऽहमिति या बुद्धिः सा चाविद्येति भण्यते । देहोऽहमिति यज्ज्ञानं तदेव द्वैतमुच्यते ॥ ८॥ अर्थ - देह म्हणजे ``मी'' ही भावनाच अविद्या असे म्हटले जाते. आणि देह म्हणजे ``मी'' ह्यासच द्वैत ज्ञान म्हटले जाते. ॥ ८॥ देहोऽहमिति सङ्कङ्ल्पः सत्यजीवः स एव हि । देहोऽहमिति यज्ज्ञानं परिच्छिन्नमितीरितम् ॥ ९॥ अर्थ - ``देह हाच मी'' हा संकल्प म्हणजे खरा जीवभाव म्हटले जाते. देह म्हणजे मी हे ज्ञान परिच्छिन्न ज्ञान म्हटले जाते. ॥ ९॥ देहोऽहमिति सङ्कल्पो महापापमिति स्फुटम् । देहोऽहमिति या बुद्धि स्तृष्णादोषमया किल ॥ १०॥ अर्थ - देह म्हणजेच ``मी हा संकल्प'' महापाप म्हटले जाते. देह म्हणजे ``मी ही बुद्धि'' तृष्णादोषाने परिपूर्ण म्हटली जाते. ॥ १०॥ लोकवासनया जन्तोः त्रशास्त्रवासनयापि च । देहवासनाया ज्ञानं यथावन्नैव जायते ॥ ११॥ अर्थ - लोकेषण लोकप्रियता आदि मोहामुळे शास्त्रवासना म्हणजे बहुतसे ज्ञान प्राप्त करुनच तसे प्रदर्शन करणे ही इच्छा तसेच देहवासना ह्या मोहामुळे मनुष्याला खरे ज्ञान प्राप्त होत नाहीं. ॥ ११॥ इन्द्रियाभ्यां ह्यजय्याभ्यां द्वाभ्यामेव हृतं जगत । अहो उपस्थ जिह्वाभ्यां दुःखं समनुभूयते ॥ १२॥ अर्थ - अजेय अश्या दोन इंद्रियांकडून ह्या जगाचे संपूर्णपणे अपहरण केले गेले आहे. ते दोन इंद्रिय (की ज्यांना कोणी जिंकूच शकत नाही) म्हणजे एक तर रसेनेंद्रिये अर्थात कामवासना (ह्यांस अयोग्यरीतीने मोकाट सोडल्यामुळे) ह्यापासून परिणामी दुःखाचीच प्राप्ती होते. ॥ १२॥ विश्वं सर्वभ्रमापन्नं कान्तासु कनकेषु च । तासु तेष्वप्यनासक्तो धीरो वीरः सुखीकृती ॥ १३॥ अर्थ - कांता आणि कनके अर्थात स्त्री आणि सोने (धन) ह्यामुळेच सर्व जगत हे भ्रमित होवून दुःखाप्रत पोहोचले आहे. ह्या दोन्हीं मध्ये जो कोणी निःस्पृह राहील तोच खरा धीर आणि वीर आहे. ॥ १३॥ जनित्वा पूर्णतां यान्ति विकारा यौवने पुनः । तारुण्यं त्वब्धिवत् घोरं तत्र सत्सङ्गतिर्हिनो ॥ १४॥ अर्थ - यौवनावस्थेत विकार हे पूर्णपणे विकसित होवून उत्पन्न होतात. तारुण्य हे एखाद्या सागरासारखे अथांग असून सत्संगति शिवाय (मोकाट सुटलेले) असते. ॥ १४॥ दुर्लभो विषयत्यागो दुर्लभं तत्त्वदर्शनम् । दुर्लभा सहजावस्था सद्गुरोः करुणां विना ॥ १५॥ अर्थ - विषयवासनेचा त्याग हा अत्यंत दुर्मिळ असून तत्त्वदर्शन अर्थात् तत्त्वज्ञानाविषयी इच्छा पण क्वचितच आहे आणि सहज अवस्थापण दुर्लभ (मनुष्य म्हणून आपण काय केले पाहिजे असे वाटणे म्हणजे सहज अवस्था) ही सुद्धा सद्गुरु कृपेवाचून कठीण आहे. ॥ १५॥ गुरुरेव परंब्रह्म गुरुरेव परा गतिः । गुरुरेव परा विद्या गुरुरेव परायणम् ॥ १६॥ अर्थ - गुरु हेच परब्रह्म आहे. गुरु हीच परमगतीआहे. गुरु हीच पराविद्या आहे आणि गुरु हेच शरण जाण्यास योग्य असे स्थान आहे. ॥ १६॥ गुरुदेव पराकाष्ठा गुरुदेव परं धनम् । यस्मात्तत्त्वोपदेष्टाऽसौ तस्माद्गुरुतरो गुरुः ॥ १७॥ अर्थ - गुरु ही सर्वांत उच्च अशी स्थिती आहे. गुरु हेच परमधन आहे. गुरु हेच तत्त्वाचे उपदेशक असल्यामुळे श्रेष्ठ आहे. गुरु हेच सर्वश्रेष्ठ आहे. ॥ १७॥ गुकारश्चान्धकारो हि रुकारस्तेज उच्यते । अज्ञानग्रासकं ब्रह्म गुरुरेव न संशयः ॥ १८॥ अर्थ - गुरुशब्दांतील पहिल अक्षर जे ``गु'' ह्याचा अर्थ ``अंधःकार'' असा आहे आणि दुसरे अक्षर ``रु'' ह्याचा अर्थ ``तेज'' असे आहे, अज्ञानाचा (अंधःकाराचा) नाशक गुरु आहे. कारण अज्ञानाने ब्रह्मतत्त्व हे ग्रासले गेले आहे. आणि गुरु हेच त्या अज्ञानाचे निवारण करतात, करु शकतात. ॥ १८॥ गुकारस्याद् गुणातीतो रूपातीती रुकारकः । गुणरूपविहीनत्वाद् गुरुरित्यभिधीयते ॥ १९॥ अर्थ - गुकार हा गुणांच्याही पलीकडे म्हणजे अतीत असतो आणि रुकार हा रूपाच्या ही पलीकडे रूपातीत असतो. अर्थात त्याला कोठलेही रूप सांगता येणार नाहीं. आणि गुण -रूप विहीनत्वमुळे म्हणजे हे दोन्ही ही ज्यास नाही, त्या पलीकडील गुरु हे आहेत. त्यांचे आपण एकच लक्षण सांगू शकत नाहीं ॥ १९॥ गुकारः प्रथमोवर्णी मायादिगुणभासकः । रुकारोऽस्ति परब्रह्ममायाभ्रान्तिविमोचकः ॥ २०॥ अर्थ - मायेचा जो पडदा ब्रह्मरूपावर अज्ञानरूपाने आहे त्यांतील प्रथम (आवरण) ``भ्रम'' रूपी अंधःकार म्हटले पाहिजे. तो गुकार आहे. रुकार हा ज्ञानस्वरूप म्हणजे ब्रह्मरूपावरी अज्ञान (भ्रमाचा) नाशक आहे. ॥ २०॥ गुकारञ्च गुणातीतं रुकारं रूपवर्जितम् । गुणातीतमरूपञ्च योदद्यात्सदगुरुः स्मृतः ॥ २१॥ अर्थ - ``गुकार'' हा गुणतीत असून ``रुकार'' हा रूपातीत आहे. जो गुणातीत आणि रूपातील ज्ञान देतो त्याला सद्गुरु असे म्हटले जाते. ॥ २१॥ ध्यानमूलं गुरोर्मूर्तिः पूजामूलं गुरोःपदम् । मन्त्रमूलं गुरोर्वाक्यं मुक्तिमूलं गुरोः कृपा ॥ २२॥ अर्थ - ध्यान हीच गुरुची मूर्ति आहे. गुरुचरण म्हणजे पूजा करण्यातच आहेत. गुरुमंत्र म्हणजे गुरुवाक्य हेच गुरुमंत्र आहेत. आणि गुरुकृपा ही मुक्ती प्राप्त करण्यास मुख्य आधार (कारणच) आहे. त्या मुळेच मुक्ती मिळते. ॥ २२॥ शोषण पापपङ्कस्य दीपनं ज्ञानतेजसः । गुरोः पादोदकं सम्यक संसारार्णवतारकम् ॥ २३॥ अर्थ - पाप रूपी चिखलास दूर करणारे, ज्ञानरूपी तेज प्रज्वलित करणारे असे गुरु पादोदक अर्थात गुरुचे चरणामृत (म्हणजे त्यांची आज्ञा पालन करणे - गुरुवाक्यांवर विश्वास ठेवणे) हे भवसागर तरुन जाण्यास अत्यंत मोठे भक्कम साधन आहे. ॥ २३॥ यथा खनन्खनित्रेण नरो वार्याधिगच्छति । तथा गुरुगतां विद्या शुश्रुषुरधिगच्छति ॥ २४॥ अर्थ - ज्याप्रमाणे तहान लागल्यावर मनुष्य खणून खणून शेवटी जलप्राप्ती करुन घेतो (श्रम केल्यावरच फलप्राप्ती होणे) त्याप्रमाणे गुरुची सेवा करुन श्रमकरणाऱ्यास विद्या प्राप्त होते. ॥ २४॥ गुरोः परतर नास्ति त्रिषु लोकेषु किञ्चनः । गुरुरेव परंब्रह्म मोक्षसाम्राज्य दिक्षितः ॥ २५॥ अर्थ - गुरुपेक्षा श्रेष्ठ, असे तिन्ही लोकात कुणीही नाही गुरु हाच परब्रह्मरूप अभिषिक्त सम्राट आहे. ॥ २५॥ गुरुप्रसादतस्स्वात्मन्यात्माराम निरीक्षणात् । गच्छता मुक्तिमार्गेण स्वात्मज्ञानं प्रवर्तते ॥ २६॥ अर्थ - गुरुप्रसादामुळे स्वतःच्या अंतरंगांत आत्म्याचे निरीक्षण करुन मुक्तिमार्गाने पुढे वाटचाल करीत असतांना स्व आत्मज्ञान प्राप्त होते. ॥ २६॥ गुरुवाक्याधृते चित्ते ब्रह्मज्ञाने प्रकाशते । अभ्यासवासनाशक्त्या तरन्ति भवसागरम् ॥ २७॥ अर्थ - गुरु वचनें हृदयात साठविल्याने ब्रह्मज्ञान प्राप्त होते. आणि त्याचा अभ्यास करण्याची सतत इच्छा उत्पन्न होवून मनुष्य भवसागर तरुन जातो. ॥ २७॥ गुरुशिष्यादिभेदेने ब्रह्मैव प्रतिभासते । ब्रह्मैंव केवलं शुद्ध विद्यते तत्त्वदर्शने ॥ २८॥ अर्थ - गुरु शिष्य भेदामधून ब्रह्मतत्त्वच आभासित होते. तत्त्वदर्शन म्हणजे एकंदर तत्त्वज्ञान, वेदांत, विषयांत ``ब्रह्म'' हाच केवळ एक विषय आहे. ॥ २८॥ मोक्षद्वारे क्षरपालाश्चत्वारः परिकीर्तितः । शमो विचारः सन्तोषश्चचतुर्थः साधुसङ्गम् ॥ २९॥ अर्थ - मोक्षाच्या द्वारा मधे प्रवेश करावयाचा असल्यास चार द्वारपाल असतात. (१) शम (२) विचार (३) संतोष (४) साधुसंग. साधुसङ्गतिरेवाय कारणं प्रथमं ततः । युक्तिः सम्पाद्यते पुष्ठा दृढा नौरिवनाविकात् ॥ ३०॥ अर्थ - त्यांत साधुसंगति हीच प्रथम मोठे कारण आहे. ज्याप्रमाणे तरुन जाण्यासाठी नाव आणि नाविक दोन्ही लागतात, पण नाविकाची युक्ति (नैपुण्य) पण त्या नावेला दृढ पक्के ताब्यांत ठेवण्यास कारण बनून मार्ग क्रमण करते. आत्मज्ञानान्न क्षेत्रेण विरक्तिप्रपया पुनः । साधवः पालयन्तीह दयया जीवतां कृते ॥ ३१॥ अर्थ - केवळ शरीरभावनेने आत्मज्ञानाशिवाय विरक्ति प्राप्त होत नाही. आणि साधुसंत जीवांच्या कल्याणासाठी हे कार्य करुन त्यांचे पालन करतात. ॥ ३१॥ मरुभूमौ यथोद्यानं संसारे साधवस्तथा । शान्तिञ्च नवचैतन्यं यच्छन्ति हि महात्मनः ॥ ३२॥ अर्थ - वाळवंटांत एखादे उद्यान मिळावे व शीतलता प्राप्त व्हावी तद्वत संसारांत साधुसंतांची संगती ही शांति आणि नवचैतन्य प्रदान करते. ॥ ३२॥ संसारसागरे सन्तः सर्वसमृद्धद्वीपवत् । पथिको यत्र गत्वैवं पुनर्दुःख न विन्दति ॥ ३३॥ अर्थ - संसार सागरामध्ये संत हे सर्वसमृद्धिने युक्त असे एखादे द्विपच - जमीनीचा हिस्सा आहे. ते प्राप्त करुन संसारी मनुष्य पुनः दुःख प्राप्त करत नाहीं. ॥ ३३॥ नद्यो यथा परार्थाय फलवृक्षाणि वा यथा । परार्थाय हि जीवन्ति साधवो दीनवत्सलाः ॥ ३४॥ अर्थ - ज्याप्रमाणे नद्या परोपकरासाठीच वहात असतात, वृक्ष हे परोपकारासाठीच फळ प्रदान करतात, तद्वत संत हे लोकांसाठीच दीनवत्सल होवून दुःखितांवर प्रेमरूपी छाया घालण्यासाठी असतात. ॥ ३४॥ गङ्गा पापं शशी तापं दैन्यं कल्पतरुस्तथा । पापं तापञ्च दैन्यञ्च हरति सन्तसमागमः ॥ ३५॥ अर्थ - गंगा नदी ही पापक्षालन करते, चंद्रमा तापहरण करतो आणि कल्पतरु हा दारिद्र्य दूर करतो पण संत हे पाप, ताप, दारिद्र्य दूर करतात, तिन्हींचा नाश करतात. ॥ ३५॥ साधवो सुखो नित्यं परं ब्रह्मात्मरूपिणः । तत्र गत्वा न भिन्नःस्यात् प्रविष्टाब्धौ नदी यथा ॥ ३६॥ अर्थ - आत्मतत्त्वरूप ब्रह्मनिरूपण करुन साधुसंत हे सुखरूप करुन टाकतात (अर्थात साधुसंतांजवळ जाऊन त्यांचे ब्रह्मनिरूपण जो समजुन घेईल त्याला). ज्याप्रमाणे नद्या समुद्रांत जाऊन मिळाल्यावर समुद्र रूपच होतात. त्यांचे स्वतःचे वेगळेपण रहात नाहीं. ॥ ३६॥ आत्मज्ञानं ही सम्प्राप्य ब्रह्मैवात्मा सनातनः । अनित्यमसुखं लोकमिमं प्राप्य भजस्वमाम् ॥ ३७॥ अर्थ - आत्मज्ञान प्राप्त झाल्यावर हे सनातन आत्मतत्त्वच ब्रह्मच होवून एकरूप होते. ह्या क्षणभंगुर सुखहीन अश्या जीवनाला प्राप्त करुन त्या जीवाने माझे ईश्वराचे रूप प्राप्त होते. ॥ ३७॥ अव्यक्तं व्यक्तिमापन्नं मन्यते मामबुद्धयः । परं भावमजानन्तो ममाव्ययमनुत्तमम् ॥ ३८॥ अर्थ - मला अर्थात ``परं'' अखंडरूप अश्या परमतत्त्वाला जो आनंदरूप आहे अश्या मला न जाणल्यामुळे अज्ञानी लोक अदृश्य असे समजून (जे व्यक्त आणि दुःखमय आहे, त्यालाच फक्त समजतात।) ॥ ३८॥ अव्यक्तोऽक्षर इत्युक्तस्तमाहुः परमां गतिम् । यम्प्राप्य न निवर्तन्ते तद्धाम परमं मम ॥ ३९॥ अर्थ - अव्यक्त जे स्पष्ट रूपाने समजत नाहीं तसेच निराकार आणि निर्गुण आहे ते आणि जे अखण्ड अक्षर आहे असे स्वरूप म्हणजेच परमगती आहे. हे प्राप्त झाल्यावर जाणणारा पुनः जन्ममरणाच्या फे-यांत अडकत नाही आणि त्या स्थानावरुन परत येत नाही, तेच धाम म्हणजे माझे धाम आहे. ॥ ३९॥ आब्रह्मभुवनाल्लोकाः पुनरावर्तिनोऽर्जुन । मामुपेत्य तु कौन्तेय पुनर्जन्म न विद्यते ॥ ४०॥ अर्थ - ब्रह्मलोकापासून तो ह्या मर्त्यलोकापर्यंत सर्व लोकांतील प्राणी पुनर्जन्मप्राप्त करतात. परंतु माझ्या पर्यंत पोहचणारे जीव पुनर्जन्म घेत नाहींत. ॥ ४०॥ ज्ञेयं यत्तत्प्रवक्ष्यामि चन्ज्ञात्वाऽमृतमश्नुते । अनादिम्मत्परं ब्रह्म न सत्तन्नासदुच्यते ॥ ४१॥ अर्थ - जे जाणण्यास योग्य आहे ते मी तुला आता सांगतो, जे जाणल्यामुळे अमृत ग्रहण केले जाते, जे अनादि म्हणजे ज्याची सुरुवात. कधी केव्हा हे सांगता येत नाही, ते परब्रह्मरूप आहे. ते ``असत्'' असे म्हटले जात नाहीं. ``सत्'' म्हणजे चिरंतन अक्षर जे नव्हतेच ते आधी होते असे म्हणता येत नाहीं. म्हणून त्याला ``असत्'' आधी नव्हते असे म्हटले जाते. ॥ ४१॥ न तद्भासयते सूर्यो न शशाङ्को न पावकः । यद्गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमं मम ॥ ४२॥ अर्थ - त्या परम तत्त्वाला सूर्य प्रकाशित करीत नाहीं. चंद्र आणि अग्निपण त्यास प्रकाशित करीत नाहीत. ज्या ठिकाणी पोहोचल्यावर परत यावे लागत नाहीं (पुनर्जन्म नाहीं) ते माझे धाम आहे, असे समज. ॥ ४२॥ तद्विद्धि प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया । उपदेक्ष्यन्ति ते ज्ञानं ज्ञानिनस्तत्त्वदर्शिनः ॥ ४३॥ अर्थ - जे तत्त्वज्ञानी व महाबुद्धिमान मनीषी आहेत त्यांजपाशी जाऊन त्यास विनम्रतेने नमस्कार करुन, आणि शंका विचारुन (ब्रह्मज्ञान) प्राप्त करावे. यज्ज्ञात्वा न पुनर्मोहमेवं यास्यासि पाण्डव । चैत्र भूतान्यशेषेण द्रक्ष्यस्यात्मन्यथो मयि ॥ ४४॥ अर्थ - जे समजून घेतल्यावर मोहप्राप्ती होत नाही, तरी सर्व प्राणी तुला माझ्या अंतरात्म्यांत आता तुला दाखवितो ॥ ४४॥ इत्याह भगवान् कृष्णः साधकायर्जुनाय च । ब्रह्मज्ञानं परं पुंसा तत्प्राय गुरुणैव हि ॥ ४५ ॥ अर्थ - साधक अर्जुनाला भगवान श्रीकृष्णानी म्हटले आहे की, ब्रह्मज्ञान हे गुरु कडूनच घेतले पाहिजे. ब्रह्मज्ञानादृतेनस्यान्मोक्षः कस्यापि कुत्रचित् । गृही वापि च वृद्धोऽपि मुक्तःस्याद्ब्रह्मवेदनात् ॥ ४६॥ अर्थ - ब्रह्मज्ञानावाचून मोक्षप्राप्ती कधीही होत नाही. साधक तज्ञ आणि जरी वृद्ध असता तरी गुरु उपदेशारहित राहिल्यास त्यास ब्रह्मज्ञानप्राप्ती होत नाहीं. ॥ ४६॥ इति श्रीसमर्थरामदासानुगृहित श्रीरामपदपङ्कजभृङ्गायमान श्रीमत्परमहंस परिव्राजकाचार्य भगवता श्री श्रीधरस्वामिना विरचिते मुमुक्षुसखः ग्रन्थे गुरुकृपया देहध्यासनाः नाम दशमं प्रकरणं सम्पूर्णम् ।

११. श्रवणादीनां मोक्षराधनत्वं नाम प्रकरणमेकादशम्

(श्रवणादी मोक्षसाधन - प्रकरण अकरावें) श्रवणन्तु गुरोःपूर्वं मननन्तरदनन्तरम् । निदिध्यासनमेतद्धि पूर्णबोधस्य कारणम् ॥ १॥ अर्थ - प्रथम गुरुच्या उपदेशाचे श्रवण करुन नंतर त्याचे मनन (नीट विचार करुन, स्मरण करुन) त्यानंतर ``निदिध्यासनम्'' अर्थात गुरु किवा शास्त्र वचनांचे पुनःपुनः स्मरण करुन त्या ज्ञानाची वारंवार उजळणी करणे त्या ज्ञानांत ``असत्'' तत्त्वाचा निषेध आणि ``सत्'' तत्त्वाच्या अधिष्ठानाचा अभ्यास हे येते. हेच पूर्ण बोध प्राप्तिचे मुख्य साधन आहे. ॥ १॥ उत्पत्तिस्थितिसंहारस्फूर्तिज्ञानविवर्जितम् । प्रथमं त्वेकमेवासीद् ब्रह्मैवानन्दरूपकम् ॥ २॥ अर्थ - उत्पत्ति स्थिती आणि संहार ह्या जगताच्या तीन अवस्था सर्वप्रथम एकदम स्फुरण होण्यापूर्वी एकच स्थितीत होत्या त्या म्हणजे केवळ आनंदमय ब्रह्म हेच एकमेव अद्वितीय अवस्था होय. ॥ २॥ अधिष्ठानं प्रपञ्चस्य ब्रह्मणोऽन्यद्यतो न हि । ततः सर्वप्रपञ्चोयं ब्रह्मैव निजरूपतः ॥ ३॥ अर्थ - ब्रह्मतत्त्वाशिवाय दुसरे कोठलेच तत्त्व ह्या प्रपंचाच्या मुळाशी पार्श्वभूमीवर नाहीं. निजरूपाने म्हणजे हे सर्वच जगत् म्हणजे ब्रह्मरूपच आहे. ॥ ३॥ एतद्ब्रह्मस्वरूपं यो ज्ञात्वा तत्स्थितिमाप्नुयात् । सच्चिदानन्द ब्रह्मैव भूत्वा राराजतेऽद्वयः ॥ ४॥ अर्थ - ह्याप्रमाणे ब्रह्माची ही स्थिती जाणून जो त्या स्थितीला प्राप्त करुन घेतो, तोच सत् चित् आनंदरूप होवून ब्रह्मरूपाने झळकतो. ॥ ४॥ प्रपञ्चाभावतस्तस्य दुःखाभावोऽपि जायते । न तस्य किञ्चिदज्ञानं नित्यबोधस्वरूपतः ॥ ५॥ अर्थ - प्रपंचाचा म्हणजे (मी व ब्रह्म दोन आहोत, मी म्हणजे हे शरीर ह्या भावास प्रपंच (कल्पना) भाव म्हटले आहे।) द्वैत भावाचा जेथे अभाव आहे, तथे दुःख भावनेचा पण अभाव आहे. त्यास कोठल्याही अज्ञानाचा (मायेचा) स्पर्श होत नाही. आणि नित्यतत्त्वाचा बोध हा आनंददायक असतो. ॥ ५॥ मायाविद्ये विहायैवमुपाधीपर जीवयोः । अखण्ड सच्चिदानन्दं परं ब्रह्म विलक्ष्यते ॥ ६॥ अर्थ - ह्या माया अविद्येला सोडून जीव आपली (जन्म -मरणाची उपाधी दूर करुन) अखण्ड असे सच्चिदानंद स्वरूप जाणू शकतो. ॥ ६॥ इत्थं गुरुमुखाच्छुत्वा शिष्यैः शमदमान्वितैः । तद् वाक्यार्थानुसन्धानं क्रियते श्रवणं हितत् ॥ ७॥ अर्थ - ह्याप्रमाणे गुरुमुखांतून शिष्यांकडून (शम दमादि साधनानी म्हणजे इंद्रिय निग्रह आणि मनोनिग्रहादि साधनांनी सज्ज होवून गुरु वाक्याचे पुनःपुनः प्रयत्नपूर्वक श्रवण व मनन (अनुसंधान करुन) हितकारक श्रवण केले जाते. ॥ ७॥ अधिष्ठानाद्विनाकार्य न प्रतीयेत कर्हिचित् । कार्येकारण भानं हि तदस्तित्वमपि स्फुटम् ॥ ८॥ अर्थ - कोणचेही कार्य त्याचे अधिष्ठान जर योग्य असले तरच यशस्वी होते, अन्यथा नाही. कार्य कोणते आहे आणि त्याचे कारण हेतु काय आहे ह्याचे भान असणे आणि त्याचे अस्तित्व सुद्धा स्पष्ट होते, अर्थात ``तत् त्वं असि'' तेच तू आहेस ``तदस्ति त्वमपि स्फुटम'' अर्थात् ते आहे, तू पण आहे, हे स्पष्ट होते. दृश्यमानें घटे यदवन्मृत्तिका भाति सा बलात् । दृश्यमाने प्रपञ्चेऽपि ब्रह्मैवाभाति चित्सुखम् ॥ ९॥ अर्थ - ज्याप्रमाणे ह्या दिसणाऱ्या जगात आपल्याला घट दृष्टिस पडतो तेव्हां त्यातील मूळ तत्त्व मातीच आहे, असे आम्हास ज्ञात होते, तद्वतच ह्या दिसणाऱ्या सर्व प्रपंचामध्ये सुद्धा आम्हास ब्रह्म हेच सर्वत्र विराजमान आहे, असे भासते. ॥ ९॥ भाव्यते यदि चेत्कार्यं तदध्यस्तं हि कारण । स्वाधिष्ठानात्तदध्यस्तं भिन्नं न स्यात्कदाचन ॥ १०॥ अर्थ - जर हे कार्य त्यामागील खरे तत्त्व काय आहे, आणि वरुन आवरण कशाचे भ्रमित करते हे जाणवले तर आपल्या मधील (अंतरात्म्यांतीत ब्रह्मतत्त्व) स्वाधिष्ठान जे आहे त्या शिवाय दुसरे तत्त्व नाहीं असे सर्वत्र दिसेल. अर्थात ``सर्वं खलु ब्रह्म'' हे तत्त्व अनुभवास येईल. ॥ १०॥ रज्जुसर्वो यथा रज्जुर्ब्रह्मैवेदं जगत्तथा । अयमहं त्विदं सोऽहं ब्रह्मैवानन्दमद्वयम् ॥ ११॥ अर्थ - रज्जु दोरी हीच सर्पासारखी वाटली तसे ब्रह्मतत्त्व हेच दोरी आहे. पण जगत् हे सर्पाप्रमाणे भासते. परन्तु स्वाधिष्ठान जर उमगले तर ते भिन्नत्व भ्रमाने दुसरीच वस्तु वाटणे हे होत नाही. ह्यांत ``हा मी आहे'' हा तो आहे, असे न वाटता ``मी तर ब्रह्मचतत्त्वच आहे।'' असा मी अद्वय आनन्द वाटतो. ॥ ११॥ इत्थं युक्त्या निश्चयार्थ साधकैश्च समाहितैः । कृतं तत्त्वानुसन्धानं मननं तत्प्रकीर्यते ॥ १२॥ अर्थ - ह्याप्रमाणे साधक तपस्वी कडून युक्ति ने हा अर्थ निश्चितार्थ निवडून घेतला गेल्यास त्यासच तत्त्वानुसंधान, मनन असे म्हटले जाते. ॥ १२॥ घटाकाश महाकाशमिवात्मानं परात्मनि । विलाप्याखण्डभवेन योऽस्मि सोऽस्मि स्थिरोऽस्म्यहम् ॥ १३॥ अर्थ - घटामधील आकाश (पोकळी) आणि महा आकाशामधील पोकळी ह्याप्रमाणेच आत्मा आणि परमात्मा ह्यांचा परस्पर (बृहद आणि सूक्ष्म) असा संबंध आहे, आणि त्या पासून मी खण्डित असा तुकडा नसून अखण्ड ब्रह्मच आहे. असा गजर करुन तो आहे, मी आहे, आणि मी स्थिर आहे, असे समजावे. ॥ १३॥ यत्रैव जगदाभासौ दर्पणान्तः पुरं यथा । निर्विकल्पो निराकारो तद्ब्रह्मैवास्मि निष्क्रियम् ॥ १४॥ अर्थ - ज्याप्रमाणे आरशांतील प्रतिबिम्ब हे निष्क्रिय असते त्याप्रमाणे मी (आत्मतत्त्व) हे निराकर आणि निर्विकल्प असतें. ॥ १४॥ चिदात्मानि सदानन्दे देहारुढामह धियम् । निवेश्य लिङ्गमुत्सृच्य केवलोहं स्वमात्रता ॥ १५॥ अर्थ - चिदात्मरूप सदानंदामध्ये मी देह रूपावर ``अहं'' आणि बुद्धिरूपाने आरुढ होतो. आणि नंतर स्वात्मरूपास विसरुन लिंगमुसृज्य केवल अहं बुद्धिने मी असे म्हणू लागतो. ॥ १५॥ स्वप्रकाशमधिष्ठानं स्वयम्भूय सदात्मना । पश्यामि न स्तो भिन्नं केवलानन्दरूपतः ॥ १६॥ अर्थ - ``सदात्मना'' अर्थात् सत् स्वरूपी आत्म्याने मी स्वयंभू स्वयं प्रकाशित अश्या माझ्या अधिष्टान असणाऱ्या रूपाला बघतो तेंव्हा ते माझ्यापेक्षा अलग वेगळे असे कांहींच नसून केवळ आनंद स्वरूपच आहे, असे दिसते, अर्थात अनुभूत होते. ॥ १६॥ क्व गतं केन वानीतं कुत्र लीजमसज्जगत् । अधुना नैव पश्यामि स्थितोऽस्मि केवलात्मना ॥ १७॥ अर्थ - असत् रूपी नश्वर जग कोठे गेले? कुणी त्यास दृष्टीआड खेचून नेले? आणि कशामध्ये ते नश्वर जगत् विलीन झाले? असे मी आता कोठेच बघू शकत नाही. कारण आता मला सर्वत्र केवळ आनंदमय आत्मतत्त्वच अनुभूत होत आहे. ॥ १७॥ किं हेयं किमुपादेयं किमन्यत्किं विलक्षणम् । निजानन्दसुधासिन्धौ परिपूर्णे चिदात्मनि ॥ १८॥ अर्थ - काय हेय तिरस्करणीय आहे? काय उपादेय ग्राह्य आहे? काय दुसरे कांही आहे? आणि काय विलक्षण आहे? चित् तत्त्वाने परिपूर्ण आणि आनंदाचा समुद्रच की काय येव्हड्या मोठ्या आनंदात मी न्हाउन निघालो आहे. ॥ १८॥ न किञ्चदय पश्यामि न श‍ृणोमि न वेदम्यहम् । स्वात्मनैव सदैवास्मि चिदानन्दः स्वलक्षणः ॥ १८॥ अर्थ - न कि मी कांही बघू शकतोय न कि मी कांही ऐकू शकतोय, किंवा कांही जाणू शकतोय अशी आनंदमय स्थिती आहे कीं सतत आपल्या आपल्या मध्येच आनंदांत अखण्ड अश्या आनंदात जे कि स्वतःचेच लक्षण आहे, अश्या अवर्णनीय स्थितीत मी आहे. ॥ १९॥ इत्थं निर्विचिकित्स्येर्थे चेतसः स्थापितस्य यत् । एकतानत्वमेताद्धि निदिध्यासनमुच्यते ॥ २०॥ अर्थ - ह्याप्रमाणे आपल्या चित्ताला ह्या अवर्णनीय अश्या आनंदांत स्थापन करुन एकाच प्रकाराने त्याच स्थितीत राहण्याचा वारंवार अभ्यास करणे ह्यालाच निदिध्यासन म्हणतात. ध्यातृध्याने परित्यज्य क्रमाद्ध्यैयैकगोचरम् । निवातदोपवच्चितं समाधिरभिधीयते ॥ २१॥ अर्थ - ध्यानधारणेमध्ये क्रमाने एक -एक सोडून दृश्यस्वरूपांत जे आनंदमय स्वयंप्रकाशी तत्त्व दृष्टिगोचर होते त्यास निर्वात अश्या स्थळी दिव्याची ज्योत ज्याप्रमाणे स्थिर राहून प्रकाशित होत असते, तसे आपले चित्त त्या आनंदमय स्थितीत दृढ रहावे, यालाच समाधी असे म्हणतात. ॥ वृत्तयस्तु तदानीमप्यज्ञाता आत्मगोचराः । स्मरणादनुमीयन्त व्युत्थितस्य समुन्थिताः ॥ २२॥ अर्थ - त्या वेळेस आपणांस अजाणता, अनेक वृत्ति, कल्पना ज्या आपल्या आत्मतत्त्वांत साठलेल्या असतात, त्या दृष्यरूप होतात. आणि आपल्या स्मरणस्थलांतून उद्भवतात आणि भासू लागतात. (आपल्या चित्तामध्ये अनेक पूर्वजन्माचें संस्कार असतात. त्यांतून आपणास न कळत ते विचार दृष्यरूप घेवून उठतात). ॥ २२॥ अनादाविह संसारे सञ्चिताः कर्मकोटयः । अनेक विलयं यान्ति शुद्धो धर्मोऽभिवर्धते ॥ २३॥ अर्थ - अनादि अश्या ह्या संसारामध्ये कोट्यावधी कर्म संचित झालेले असतात. अनेक कर्मांचा विलय होतो. आणि शुद्ध कर्म जी असतात ते धर्माची वृद्धि करितात. ॥ २३॥ धर्ममेघमिमं प्राहुः समाधिं योगवित्तमाः । वर्षत्येष यथा धर्मोमृतधाराः सहस्रशः ॥ २४॥ अर्थ - योग्यांमधील महायोगी ह्या धर्ममेघाला ``समाधी'' असे म्हणतात. सहस्त्रधारांनी हा मेघ जणू अमृतवर्षाच करतो. ॥ २४॥ अमुना वासनाजाले निःशेषं प्रविलापते । समूलोन्मूलिते पुण्यपापाख्ये कर्मसञ्चये ॥ २४॥ अर्थ - वासनांच्या जाळयामध्ये ह्यांजकडून त्यांचा (वासनांचा) निपटारा झालेला दिसतो. आणि कर्म संचयामध्ये पाप आणि पुण्याचा समूल नाश झालेला असतो. ॥ २५॥ वाक्यमप्रतिबन्द्धं सत्प्राक्परोक्षावभासते । करामलकवद्बोधमपरोक्षं प्रसूयते ॥ २६॥ अर्थ - अप्रतिबंद्ध सत् वाक्य हे अज्ञात् न दिसणारे असे वाटते. हातावर ठेवलेल्या आवळयाप्रमाणे जे स्पष्ट व निश्चित असते ते दृश्यस्वरूपांत असते. ॥ २६॥ अन्यविद्यापरिज्ञानमर्वश्यं नश्वर भवेत् । ब्रह्मविद्यापरिज्ञानं ब्रह्म प्राप्ति करं स्थितम् ॥ २७॥ अर्थ - ब्रह्मविद्या सोडून अन्य विद्यांचे ज्ञान हे नश्वर आहे. बह्मविद्येचे ज्ञान मात्र (हातावर ठेवल्याप्रमाणे स्पष्ट) ब्रह्मप्राप्ति हेच निश्चित आहे. ॥ २७॥ यत्परं ब्रह्म सर्वात्मा विश्वस्यायतनं महत् । सूक्ष्मात्सूक्षमतरं नितयं तत्त्वमेव त्वमेव तत् ॥ २८॥ अर्थ - विश्वाचा आधार परब्रह्म हे सूक्ष्मांत सूक्ष्म असून नित्य सत् तत्त्व रूप असून तेच तुझ्यांत पण आहे. जाग्रत्स्वप्नसुषुप्त्यादि प्रपञ्चं यत्प्रकाशते । तद्ब्रह्माहमिति ज्ञात्वां सर्वबद्धैः प्रमुच्यते ॥ २९॥ अर्थ - जाग्रत स्पप्न सुषुप्ति हा प्रपंच ज्या -ज्या मुळे प्रकाशित होतो तेच ब्रह्मतत्त्व मी आहे, हे जाणून सर्व बंधनापासून मुक्ति प्राप्त होते. ॥ २९॥ एवमेवोपदेशो हि कैवल्योपनिषद्गतः छान्दोग्येऽपि स्फुटं वाक्यमेतत्तत्त्वमीतिच ॥ ३०॥ अर्थ - कैवल्य उपनिषदांतही हेच वाक्य स्पष्ट केले आहे, आणि छांदोग्य उपनिषदांतही हेच वाक्य कीं ``तत् तत्त्वं असि'' हे सांगितले आहे. ॥ ३०॥ अवगम्य गुरुत्व तत्त्वं नित्यमेव समाहितैः । साधकैश्चिन्तनं कार्यं शुकोपनिंशदि स्फुरम् ॥ ३१॥ अर्थ - गुरु पासून हेच ज्ञान साधकाने संचित करुन मिळवले पाहिजे. शुकोपनिषदांत सांगितले आहे किं साधकाने असे चिंतन करीत रहावें. ॥ ३१॥ येनक्षेते श‍ृणातीद जिघ्रति व्याकरोति च । स्वाद्वस्वादु विजानाति तत्प्रज्ञानमुदीरितम् ॥ ३२॥ अर्थ - ज्यामुळे बघणे, ऐकेणे, वास घेणे ह्या क्रिया स्पष्ट होतात, तसेच स्वाद घेणे समजते ते ``प्रज्ञान'' असे म्हटले जाते. ॥ ३२॥ चतुर्मुखेन्द्र देवेषु मनुष्याश्वर्गेवीदिषु । चैतन्यमेकं ब्रह्मातः प्रज्ञानं ब्रह्ममय्यपि ॥ ३३॥ अर्थ - चतुर्मुख ब्रह्मदेवांत, गाय-घोडे ह्यांत, एकच चैतन्य तत्त्व आहे. ते ब्रह्ममय चैतन्य आहे. ॥ ३३॥ परिपूर्णः परात्मास्मिन्देहे विद्याधिकारिणि । बुद्धेः साक्षितया स्थित्वा स्फुरन्न हमितीर्यते ॥ ३४॥ अर्थ - विद्या प्राप्त करुन घेण्याची अधिकारी बुद्धि हिच्या साक्षीने परिपूर्ण परमात्मा ह्या देहामध्ये स्फुरण पावतो. ॥ ३४॥ स्वतः पूर्ण परात्मात्रं ब्रह्मशब्देन वर्णितः । अस्मीत्ययेक्यं परामर्शतेन ब्रह्मभाम्यहम् ॥ ३५॥ अर्थ - स्वतः पूर्ण असा परमात्मा ``ब्रह्म'' ह्या शब्दाने वर्णित केला गेला आहे. ``अस्मि'' ह्या विचाराने स्पष्टीकरणाने मी ``ब्रह्म'' आहे हे स्पष्ट होते. ॥ ३५॥ एकमेवाद्वितीयं सन्नामरूपं विवर्जितम् । सृष्टेः पुराधुनाप्यस्य तादृक्त्वं तदितीर्यते ॥ ३६॥ अर्थ - नाम आणि रूपाने रहित असे एकच एक अद्वितीय ``सत्'' नामक तत्त्व हे सृष्टीच्या पूर्वी आणि आता सुद्धा त्याच प्रमाणे आहे, असे म्हटले जाते. ॥ ३६॥ श्रीतुर्देहेन्द्रियातीतं वस्त्वन्न तदितीर्यते । एकता ग्राह्यतेंऽयसीति तदैक्यमनुभूयते ॥ ३७॥ अर्थ - श्रोत्यांच्या देह -इंद्रियांच्या पण पलीकडील तत्त्व असे ब्रह्मतत्त्व त्यास म्हटले जाते. ते आणि शरीर ह्याची एकरूपता अनुभविली जाते. ॥ ३७॥ स्वप्रकाशापरोक्षत्वमयमित्युक्तितो मतम् । अहङ्कारादिदेहान्त प्रत्यगात्मेति गीयते ॥ ३८॥ अर्थ - आत्म तत्त्वास ``अयम'' म्हणजे ``हा'' असे म्हटले जाते. कारण ते तत्त्व परोक्ष म्हणजे स्वयंप्रकाशी आहे. अहंकार आदि तत्त्व जे देहाबरोबर नष्ट होतात व जे राहते त्यास प्रत्यगात्मा म्हणतात. ॥ ३८॥ दृष्यमानस्य सर्वस्य जगतस्तत्त्वमीर्यते । ब्रह्मशब्देन तद्ब्रह्मस्वप्रकाशात्मरूपकम् ॥ ३९॥ अर्थ - दृश्यमान अर्थात दिसणाऱ्या सर्वजगताचे तत्त्व म्हटले जाते. आणि ब्रह्म शब्दाने स्वप्रकाशित होणारे ते तत्त्व अयं असे म्हटले जाते. (अर्थात सर्व जग हे ब्रह्मतत्त्वाधिष्ठितच आहे हे सार) ऋग्वेदादिविभागेन महावाक्यार्थ एव हि । श्रीशिवेन शुकायैवमुपदिष्टः समासतः ॥ ४०॥ अर्थ - ऋग्वेद आदि विभागांनी महावाक्यां द्वारे हेच ज्ञान उधृत केले आहे आणि भगवान शंकरांनी पण शुकदेवांना हाच उपदेश दिला आहे. ॥ ४०॥ पूर्वसंस्कारतो यश्च बीजशुद्धस्तथापि च । विरक्तः स युवा धन्यः सन्तसङ्गतिद्विशेषतः ॥ ४१॥ अर्थ - पूर्व संस्कारांनी जो शुद्ध आहे त्याचे बीजच शुद्ध आहे आणि असा विरक्त युवक धन्य होय. आणि सत्संगामुळे तर तो विशेषच धन्य होतो. ॥ ४१॥ गृहित्वादि च वृद्धोऽपि मुक्ताः स्याद् ब्रह्मवेदनात् । प्रक्षालनाद्धिपङ्कस्य दूरादस्पर्शनं व्रजेत् ॥ ४२॥ अर्थ - वृद्ध माणूस पण ब्रह्मज्ञान प्राप्त झाल्यावर मुक्त होइल. चिखलाचे प्रक्षालन केल्यावर दुरुनच त्याला स्पर्शही न करिता जावे म्हणजे निर्मळ रहाता येईल. ॥ ४२॥ आश्रमादाश्रमं गच्छेदितिवच्चान्यथाति वा । ब्रह्मचर्यादपित्वेवं प्रव्रजेन्दाह सा श्रुतिः ॥ ४३॥ अर्थ - एका आश्रमांतून दूसऱ्या आश्रमांत जातांना असेच अलिप्त (मायेपासून जीव वाचवून) निर्मल रहावे. (ब्रह्मचर्याश्रम, गृहस्थाश्रम, वानप्रस्थाश्रम, संन्यासाश्रम ह्या एकांतून दुसऱ्यांत जाताना) सुरवातीला म्हणजे ब्रह्मचर्याश्रमा पासूनच असे निर्विकार अलिप्त राहून भ्रमण करावे असे श्रुति वेद सांगतात. ॥ ४३॥ यौवने यो विरक्तस्यातत्युणेन धरा वहेत् । जन्तुनां कुलकोटीनां विषयासक्तचेतसाम् ॥ ४४॥ अर्थ - जो तारुण्यांतच विरक्त होवून राहतो त्या युवकाद्वारे च पृथ्वी तोलली जाते. (तरंगते) अन्य कोट्यावधी जीवजंतु त्यावर विषयासक्त असून राहतात. ॥ ४४॥ भोग्येभ्यो भूरिभङ्गेभ्यो धाराभ्य इव पर्वतः । चलन्नैव च यो धीरः स वै पुरुष उच्यते ॥ ४५॥ अर्थ - पर्जन्याच्या अनेक धारा जरी पर्वतावर पडत असल्या तरी पर्वत हा अचलच राहतो. त्याप्रमाणे भोग्य अश्या अनेक मायावी रूपांना निवारण करुन धीर गंभीर योगी हा स्थिर मनाने राहतो. ॥ ४५॥ यस्य नाहङ्कृतो भावो बुद्धिर्यस्य न लिप्यते । यः समः सर्वभूतेषु जीवितं तस्य शोभते ॥ ४६॥ अर्थ - ज्याला अहंकारचा भाव लिप्त होत नाही, त्याची बुद्धि दूषित होत नाही. तो सर्व भूतमायांशी समबुद्धिने राहतो. त्याचे जीवन शोभून दिसते. ॥ ४६॥ यान्तःशीतलयाबुध्या रागद्वेषविमुक्तया । साक्षिवत्पश्यतीन्द हि जीवितं तस्य शोभते ॥ ४७॥ अर्थ - राग द्वेष ह्या पासून मुक्त असून ज्याची बुद्धि शीतलतेला प्राप्त झाली आहे तो ह्या सर्व जगताकडे केवळ साक्षी या भावाने पाहतो. त्यामुळे त्याचे जीवन शोभून दिसते व त्यामुळे तो झळकतो. (आत्मतेजाने). ॥ ४७॥ येन सम्यक्परिज्ञाय हे यो पादेयमुज्झता । चित्तेस्यान्तेर्पितः चित्तं जीवितं तस्य शोभते ॥ ४८॥ अर्थ - ज्याने सम्यक् रीतिने (चाणाक्षपणे) जाणून जे (हेय) पण घेण्यासारखे (अर्थात् मोहक) ते टाकून त्याचा त्याग करुन स्वचित्ताचा चित्तामध्येच लय केला तो साधक शोभून दिसतो. ॥ ४८॥ बुभुक्षोश्च मरुर्यद्वत्पिपासोर्मृगतृष्णिका । मुमुक्षोर्भोगश्रीस्तद्वत् नैवाकर्षेदनागपि ॥ ४९॥ अर्थ - भुकेने त्रस्त अश्या माणसाला वाळवंट, तहानेने व्याकुळ अश्या माणसाला मृगजळ ज्याप्रमाणे कांहीच आकर्षण आणि सुख देवू शकत नाही, त्याच प्रमाणे मोक्षाची इच्छा करणाऱ्याला ऐहिक भोग कांहीच मोहित करुं शकत नाहीं. ॥ ४९॥ आध्यात्मरतिरासीनः पूर्णः पावनमानसः । प्राप्तानुत्तमविश्रान्तिः न किञ्चिदिह वाञ्छति ॥ ५०॥ अर्थ - ज्याचे मन पूर्ण पावन पवित्र झालेले आहे आणि केवळ अध्यात्मामध्येच प्रेम उत्पन्न झाले आहे त्यास परमात्म तत्त्वाचा ध्यास लागून तो दुसरे कांहींच इच्छित नाहीं. ॥ ५०॥ तरवोऽपि हि जीवन्ति जीवन्ति मृगपक्षिणः । स जीवति निरातङ्को य आनन्दस्वरूपता ॥ ५१॥ अर्थ - वृक्षपण जीवित असतात आणि पशु -पक्षी पण जीवित असतात, परंतु तोच खरा जगतो की जो अक्षयानंदस्वरूप परमात्म्याच्याच सान्निध्यात आनंदात राहतो. ॥ ५१॥ जायते म्रियते लोको म्रियते जननाय च । जन्ममृत्युनाशयित्वा जाता ब्रह्मेह स कृती ॥ ५२॥ अर्थ - जन्मणे आणि मरणे हेच सामान्य लोंकांमध्ये आहे. सामान्यतः मरतो ते ही पुनःजन्म घेण्यासाठीच असे लोकांमध्ये दृष्टिस पडते. परंतु जन्म आणि मृत्यु चा त्याच्या पुनःपुनः फेरीचा नाश करुनच जो राहतो तोच खरा ब्रह्म आणि तो म्हणजे च परमेश्वराची खरी कृति होय. ॥ ५२॥ इहचेदशकद्बोद्धुं प्राक्शरीरस्य विस्त्रसः । ततःसर्गेषु लोकेषु शरीरत्वाय कल्पते ॥ ५३॥ अर्थ - जर कोणी आपले पूर्वजन्मीचे शरीर नष्ट झाले आहे हे समजण्यास असमर्थ असेल अर्थात आत्मा हा तोच अनंत आहे, हे ज्ञान त्यास नसेल तर त्याला जगांत पुनः जन्म घेवून शरीरप्राप्ती होईलच. आत्मा अमर असून तो शरीर बदलतो हे ब्रह्मज्ञान. ॥ ५३॥ योनिमन्ये प्रपद्यन्ते शरीरत्वाय देहिनः । स्थाणुमन्येऽनुसयन्ति यथा कर्म यथा श्रुतम् ॥ ५४॥ अर्थ - तो देहधारी अन्य योनीतील शरीर धारण करतो. ज्याप्रमाणे कर्म असेल त्याप्रमाणे त्याला अन्य -अन्य वृक्षादि पण योनी प्राप्त होते. ॥ ५४॥ इति श्रीसमर्थरामदासानुगृहित श्रीरामपदपङ्कजभृङ्गायमान श्रीमत्परमहंस परिव्राजकाचार्य भगवता श्री श्रीधरस्वामिना विरचिते मुमुक्षुसखः ग्रन्थे श्रवणादीनां मोक्षसाधनत्वं नाम एकादशं प्रकरणं सम्पूर्णम् ।

१२. सृष्टिस्वरूपं नाम प्रकरणं द्वादशम् ॥

मायोपाधि जगद्योनिः सर्वज्ञत्वादि लक्षणः । स ईश इति विख्यातोऽजद्यः सृष्टिरीक्षणात् ॥ १॥ अर्थ - ``माया'' या उपाधीने युक्त जगत् रूपी योनी अशी ही सृष्टि त्या ईश्वराने केवळ आपल्या दृष्टिपाताने उत्पन्न केली जो कि, (ईश्वर) सर्वज्ञ आदि लक्षणानी प्रसिद्ध आहे. ॥ १॥ मायातु प्रकृतिं विद्यान्मायिनं तु महेश्वरम् । तस्यावयवभूतैस्तु व्याप्तं सर्वमिदं जगत् ॥ २॥ अर्थ - माया म्हणजे ही पृथ्वी समजावी आणि ईश्वर हा मायिन (माया उत्पन्न करणारा) असे म्हणतात आणि त्याच्या अवयवांपासूनच उत्पन्न अशी ही भूते (प्राणी) असून त्यामुळे हे सर्व जग व्याप्त आहे. ॥ २॥ सृष्टवा बहुविधान्देहान् प्रविष्टोऽयं यदा तदा । देहाभिमानतश्चास्य ह्यविद्योपाधिरागता ॥ ३॥ अर्थ - अनेक प्रकार से शरीर निर्माण करुन ह्या ईश्वराने त्यात प्रवेश केला आणि देहाभिमान उत्पन्न होवून त्या प्राण्यांमध्ये अविद्या प्रकट झाली. ॥ ३॥ ईश एव ततो जीवोऽविद्योपाधित एव हि । देह दृष्टित एवायं किञ्चिचज्ञ इति कथ्यते ॥ ४॥ अर्थ - परमेश्वरच त्या अविद्या उपाधीने वेष्टित झाल्याने देह दृष्टिने हा किंचित् ज्ञाता असे म्हटले आहे. ॥ ४॥ देहाभिमानतश्चास्य सृष्टिर्मैथुनसम्भवा । स्वप्ने मानसिकी सृष्टिर्यथैवेशस्यसा भवेत् ॥ ५॥ अर्थ - देहाभिमानतः देह म्हणजेच मी ह्या कल्पनेने ग्रस्त ही सृष्टि मैथुनातूनच उत्पन्न झाली. ज्याप्रमाणे स्वप्न ही मनामुळेच रचली गेलेली सृष्टि आहे. ती ईश्वराच्याच सृष्टिप्रमाणे सत्य वाटते. ॥ ५॥ नैवैकत्वेन कार्यं स्यादिति मत्वा स ईश्वरः । सृष्टिकामो द्विधा जाता शक्तिश्च शक्तिमानता ॥ ६॥ अर्थ - एकटेपणाने हे कार्य होणार नाही असे जाणून त्या ईश्वराने सृष्टी उत्पन्न करण्याच्या इच्छेने शक्ति आणि शक्तिमान अशी दोन रूपे धारण केली. ॥ ६॥ द्वेधा विभज्य चात्मानमर्धेन पुरुषोऽभवत् । अर्धेन नारी तस्यां तु विराजमसृजत् प्रभूः ॥ ७॥ अर्थ - स्वतःस दोन भागात उत्पन्न करुन विभाजित करुन एकापासून पुरुष तत्त्व उत्पन्न केले आणि अर्ध्याभागाने नारी तत्त्व उत्पन्न केले. आणि त्यांत शोभा आणि तेज निर्माण केले. ॥ ७॥ प्रकृतिः पुरुषो भूत्वा स्वयमीशोऽमीदृशम् । ईक्षणेन जगत्सर्वं प्रजारूपेण सृष्टवान् ॥ ८॥ अर्थ - प्रकृति आणि पुरुष रूपाने स्वयं ईश्वराने ह्याप्रमाणे ईक्षणाने म्हणजे दृष्टिक्षेप करुन हे सर्व जगत् प्रजारूपाने निर्माण केले. ॥ ८॥ सङ्कल्पनं चेक्षणं वा तपः प्रकृतिरुच्यते । तत्संयोगेन विश्वंयत्स एवाभूत्स्वशक्तितः ॥ ९॥ अर्थ - संकल्प ईक्षण किंवा तप म्हणजेच प्रकृति असे म्हटले जाते. त्याच्या संयोगानेच हे जग स्वशक्तिने निर्माण झाले. ॥ ९॥ यच्चापि सर्वभूतानां बीजं तदहमर्जुन । न तदस्ति विनां यत्स्यान्मया भूतं चराचरम् ॥ १०॥ अर्थ - जे ही ह्या प्राणीमात्रांमध्ये मूळ बीज आहे. ते सर्व माझेच रूप आहे. (तूं अर्जुन जाण) असे भगवान श्रीकृष्ण म्हणाले. हे चर आणि अचर दिसणारे सर्व कांही जगत् माझ्यावाचून कांहीच नाहीं. ॥ १०॥ व्यक्ताव्यक्तस्वरूपेण प्रकृतिः सा द्विधा मता । ईक्षण भावतोऽव्यक्ता व्यक्ता चेक्षणतो हि सा ॥ ११॥ अर्थ - व्यक्त आणि अव्यक्त ह्या दोन रूपांनी ही सृष्टि विभागलेली आहे. ईक्षणाच्या भावाने अव्यक्त आणि व्यक्त ही सुद्धा ईक्षणानेच. ॥ ११॥ अव्यक्ताव्द्यक्तयः सर्वाः प्रभवन्त्यहरागमे । रायिआङ्गमे प्रलीयन्ते तत्रैवाव्यक्तसंज्ञके ॥ १२॥ अर्थ - दिवस उजाडल्याबरोबर जे अव्यक्त असते ते लगेच व्यक्त स्वरूपांत रूपांतरित होते. आणि रात्र झाल्याबरोबर जे व्यक्त स्वरूपांत असते ते अव्यक्त स्वरूपांत विलीन होवून जाते. ॥ १२॥ सर्व भूतानि कौन्तेय प्रकृतिं यान्ति मामिकाम् । कल्पक्षये पुनस्तानि कल्पादौ विसृजाम्यहम् ॥ १३॥ अर्थ - हे अर्जुन ! सर्व प्राणीमात्र ह्या प्रकृति रूपात जी माझ्यातूनच उत्पन्न आहे, त्यांत निर्माण होवून कल्पाच्या अंतीम समयी माझ्यातच विलीन होतात. आणि कल्पाच्या सुरुवातीला मीच त्यांचे सृजन (निर्मिती) कतो. ॥ १३॥ प्रकृतिं स्वामवष्टभ्य विसृजामि पुनःपुनः । भूतग्राममिमं कृत्स्नमवशं प्रकृतेर्वशात् ॥ १४॥ अर्थ - संपूर्ण दृश्य जगत् प्रकृति ही माझ्या अधीन असून मी त्यांत प्रवेश करुन पुनःपुनः तिला उत्पन्न करतो. आणि हा संपूर्ण प्राणी समुदाय परवश असून प्रकृतिच्या म्हणजे माझ्याच अधीन आहे. ॥ १४॥ महर्षयः सप्त पूर्वे चत्वारो मनवस्तथा । मद्भावा मानसा जाता येषां लोक इमाःप्रजाः ॥ १५॥ अर्थ - सात महार्षी आणि चार ही मनु माझ्या मनापासून, मानसपुत्र उत्पन्न झाले आणि त्यांजपासूनच हे लोक (प्रजा) उत्पन्न झाले. ॥ १५॥ भगवानुक्तवानेततत्प्रसिद्धं यतस्ततः । मनसी प्रथम सृष्टिर्जीवानां मैथुनात्तः ॥ १६॥ अर्थ - भगवान श्रीकृष्ण ह्याप्रमाणे बोलले हे प्रसिद्धच आहे कीं सर्व सृष्टि आदिसमयांत म्हणजे सुरुवातीला मनामुळे उत्पन्न झाली आणि नंतर मैथुनापासून उत्पन्न झाली. ॥ १६॥ प्रकृतिः पुरुषोरूपोऽसावीशः स्त्रीपुरुषस्तथा । भृत्वा गृही पतिः पत्नी प्रजां सृजति स क्रमान्त ॥ १७॥ अर्थ - प्रकृति आणि पुरुष अश्या रूपाने हा ईश्वर स्त्री पुरुष ह्या रूपाने उत्पन्न होवून घरामध्यें पति -पत्नि बनून क्रमाने प्रजा निर्माणकर्ता झाला. ॥ १७॥ मम योनिर्महद् ब्रह्म तस्मिन्गर्भ दधाम्यहम् । सम्भवः सर्वभूतानां ततो भवति भारत ॥ १८॥ अर्थ - माझी योनी म्हणजे महद्ब्रह्म असून त्यांत मी गर्भाधान करतो आणि सर्व प्राण्यांची उत्पत्ति त्यापासूनच संभव होते. ॥ १८॥ इच्छाद्वेषसमुत्थेन द्वन्द्वमोहेन भारत । सर्वभूतानि सम्मोहं सर्गे यान्ति परन्तप ॥ १९॥ अर्थ - इच्छा आणि द्वेष उत्पन्न झाल्यामुळे त्यां द्वंद्वात (दोघांच्या पकडी मध्ये दिशाभूल होवून किंकर्तव्यमूढ अवस्था) मोहा मुळे सर्व प्राणी मोहित व भ्रष्ट होतात. आणि कल्पांति हे महान् तप करण्याऱ्या अर्जुना ! हे सर्व जन्म घेतात. ॥ १९॥ सृष्टिक्रमोऽयमेवेति प्रसिद्धश्चेशजीवयोः । कर्म सर्व हि सृष्ट्यर्थ निर्वाहार्थ ततश्च तत् ॥ २०॥ अर्थ - हा सृष्टिक्रम प्रसिद्धच आहे. सर्व कर्मे ही निर्मिती आणि निर्वाहा साठीच केली जातात. असे हे आहे. ॥ २०॥ अव्यतं कारणं सूक्ष्म महत् तत्त्वो ततो विराट । स्थूल शरीरमीशस्य जगत्स्मिन्प्रतिष्ठितम् ॥ २१॥ अर्थ - अव्यक्त कारण हे सूक्ष्म असून महत् तत्त्व विराट रूपाने पसरलेले आहे. आणि ईश्वराच्या स्थूल शरीरा पासून जगत् त्यांत प्रतीयमान झालेले आहे. ॥ २१॥ राजते विविधत्वेन विराड् तेन स उच्यते । शरीरत्रयमेवं हि जानीयादीश्वरस्य च ॥ २२॥ अर्थ - विविध रूपाने हे विराट पुरुषाचे रूप पसरलेले आहे. आणि ते सुशोभित होते. आणि आपले शरीरत्रय (स्थूल -सूक्ष्म -कारण) हे ईश्वराचेच रूप आहे, हे जपावे. ॥ २२॥ अव्यक्तोपाधितश्चेशः स्वर्ण गर्भस्तथैव च । महदुपाधितश्चैवं चाहङ्कारी विराजतः ॥ २३॥ अर्थ - अव्यक्त असे तत्त्व उपाधिसहित स्वर्ण गर्भरूपाने व्यक्त होते व त्यांत महत् उपाधी म्हणजे अहंकार तत्त्व निर्माण होते. ॥ २३॥ अव्यक्त कारणे देहे बीजवत्सृष्टि वासना । ततः सैवाङ्कुरीभूय महत्त्वमितिस्फुटम् ॥ २४॥ अर्थ - अव्यक्त अश्या कारण देहामध्ये बीजरूपाने सृष्टिवासना अर्थात् सुप्तवासना असतात. मग त्याच अंकुरित होवून महत्तत्त्वरूपाने स्पष्ट होवून फोफावतात. ॥ २४॥ तस्मिन् हिरण्यगर्भः स बहुस्यामिति तप्यते । पुरुषप्रकृतिभावेन पतिः पत्नि ततस्तु सः ॥ २५॥ अर्थ - त्यांतच हिरण्यगर्भरूप बीज हे बहुस्याम् अश्या रूपाने म्हणजे मी बहुतश्या रूपांत उद्भवित होईन अश्या स्फुरणतत्त्वामुळे प्रस्फुटीत होते. ॥ २५॥ यत्किञ्चिन्मिथुनं सृष्टौ व्यक्तं तत्पञ्चभूततः । स एव सर्वं यद्भूत यच्च भव्यं विराडिति ॥ २६॥ अर्थ - जे काही मैथुनांतून उत्पन्न झाले ते सर्व पंच महाभूतांपासून व्यक्त झाले. त्यातूनच सर्व काहीं भूत उत्पन्न झालेले आणि उत्पन्न होणारे असे विराट् रूप आहे. ॥ २६॥ ईश एव हि जीवोऽयमविद्योपाधितः श्रुतः । कैवल्योपनिषच्छ्लोका उद्धृता के च नात्र तु ॥ २७॥ अर्थ - अविद्येमुळे उपाधी प्राप्त जीवही हा ईश्वरतत्त्वरूपच आहे. कैवल्योपनिषदांतील श्लोकांवरुन हे स्पष्ट केले आहे. ते कोणते तत्त्व आहे की जे ईश्वराच्या अधिष्ठानाशिवाय आहे? ॥ २७॥ हृत्पुण्डरीकं विरजं विशुद्धं विचिन्त्यमध्ये विशदं विशोकम् । अचिन्त्यमव्यक्तमनत्तरूपं शिव प्रशान्तममृतं ब्रह्मयोनियम् ॥ २८॥ अर्थ - आपल्या हृदयकमलामध्ये विराजित असलेल्या निर्मल शुद्ध, निर्विकार, शोकरहित, अचिंत्य ज्याचे चिंतन करणे कठिण आहे. अदृश्य, अमृतरूप, श्रीशंकराचे जे अत्यंत शांत आणि ब्रह्मयोनी म्हणजे ब्रह्मतत्त्वच आहे अश्या रूपामध्ये मुनि ध्यान करुन प्रविष्ट होतात. असा २९ क्रमांकाच्या श्लोकाला जोडून हा वाक्यार्थ पूर्ण होतो. ॥ २८॥ तथादिमध्यान्तविहीनमेकं विभुं चिदानन्दमरूपमद्भूतम् । उमासहायं परमेश्वरं प्रभु त्रिलोचनं नीलकण्ठ प्रशान्तम् । ध्यात्वामुनिर्गच्छति भूतयोनिं समस्तसाक्षिं तमसः परस्तात् ॥ २९॥ अर्थ - आदि मध्य व अंतरहित एक सर्वव्यापी (विभुं) तसेच सत् चित् आनंदमय अद्भुत असे श्री शंकरांचे रूप जे उमा पार्वती सह आहे तसेच त्रिनयन नीलकण्ठ प्रशांत आहे. अशांचे मुनी ध्यान करतात जे की (शिवशंकर) समस्त भूतयोनी म्हणजे प्राणीमात्रां मध्ये साक्षीरूपाने विद्यमान आहेत. अज्ञानरूप अंधःकाराला पार करुन (तो मुनी) परम तत्त्वामध्ये प्रविष्ट होतो. ॥ २९॥ स ब्रह्मा स शिवः सेन्द्रः सोऽक्षरः परमः स्वराट् । स एव विष्णुः स प्राणः स कालोऽग्निः स चन्द्रमा ॥ ३०॥ अर्थ - तो ब्रह्म आहे. तो इंद्र आहे. तोच शिव आहे, अविनाशी आहे, तोच परात्पर आणि प्रकाशरूप आहे. तो विष्णुप्राण आणि काल आहे. तो अग्नि आहे आणि चंद्रमा आहे. ॥ ३०॥ स एव सर्वं यद्भूतं यच्च भव्यं सनातनम् । ज्ञात्वा तं मृत्युमत्येति नान्यः पन्था विमुक्तयेम् ॥ ३१॥ अर्थ - जे कांही आतापर्यंत होवून गेले आणि होणार आहे, ते सनातन ब्रह्मच आहे. त्याला समजणाराच मृत्युला पार करुन जाऊं शकतो. पूर्णतः मुक्त होण्यासाठी त्याच्याशिवाय उपाय नाहीं. ॥ ३१॥ सर्वभूतस्थमात्मानं सर्वभूतानि चात्मनि । सम्पश्यन् ब्रह्म परमं यातिनान्येन हेतुना ॥ ३२॥ अर्थ - सर्व प्राणी आत्मतत्त्वामध्ये स्थिर आहेत आणि सर्व प्राणीमात्रांत माझ्यांत जे तत्त्व आहे तेच तत्त्व आहे. हे जो साधक अनुभूत करतो तोच परमतत्त्वाप्रत पोहोचतो ह्या शिवाय तो दूसऱ्या कोठल्याही मार्गाने जात नाहीं. ॥ ३२॥ आत्मानमरणिं कृत्वां प्रणवं चोत्रारणिम् । ज्ञाननिर्मन्थनभ्यासात् पाप दहति पण्डितः ॥ ३३॥ अर्थ - अंतःकरणाला अरणीचा वरचा भाग कल्पून प्रणवाला त्याचा खालचा भाग मानून मंथन करुन (दोन काष्टखण्डांना घेवून वर खाली ठेवून घासतात, व यज्ञाचा अग्नि प्रकट करण्यासाठी त्यांतून ठिणग्या पाडून अग्नि मंथन ही क्रिया होते व ती करुन यज्ञाची सुरुवात होते) ज्ञान मंथनाने ज्ञान ज्योति प्रकट करण्याच्या (अभ्यासा द्वारे) साधक जो बुद्धिमान, प्रयत्नशील असेल तो आपले अज्ञानरूपी बंधन जाळून नष्ट करेल. ॥ ३३॥ स एव मायापरिमोहितात्मा शरीरमास्थाय करोति सर्वम् । स्त्रियान्नपानादिविचित्रभोगैः स एव जाग्रत्परितृप्तिमेति ॥ ३४॥ अर्थ - तो आत्माच मायेने परिमोहित होवून मोहाने लपेटला जाऊन शरीराशी तादात्म्यभाव उत्पन्न करुन सर्व प्रकारचे कार्य करतो. तोच जागृत अवस्थेमध्ये स्त्री -अन्न -पान आदि भोग प्राप्त करुन परितृप्त होतो. ॥ ३४॥ स्वप्ने तु जीवः सुखदुःख भोक्ता स्वमाययाकल्पित विश्वलोके । सुषुप्तिकाले सकले विलीने तमोऽभिभूतः सुखरूपमेति ॥ ३५॥ अर्थ - तोच आत्मा आपल्याच मायेने स्वप्नामध्ये रचल्या गेलेल्या संसारांत सुख भोगतो. तो. सुषुप्तावस्थेत सर्व (इंद्रिये) काही विलीन झाल्यावर तमस् (अप्रतिति) ज्ञानाने आवृत्त होवून आपल्या मध्येच आनंदानुभूति घेतो. ॥ ३५॥ पुनश्च जन्मान्तरकर्मयोगात् स एवजीवः स्वपिती प्रबुद्धः । पुरत्रये क्रीडतियश्च जीवस्ततस्तुजातं सकलं विचित्रम् ॥ ३६॥ अर्थ - नंतर पुन्हा पूर्वजन्मकृत कर्माच्या संयोगाने जीव स्वप्न पाहतो आणि जागा होतो. तो जागृत स्वप्न सुषुप्ति रूपी अवस्थां मध्ये खेळतो आणि त्यामुळेच नानाविध नाविन्य उत्पन्न होते. त्याचा आधार अखण्ड बोध आणि आनंद स्वरूप आहे. त्यातच तिन्ही पुर अवस्था विलीन होवून जातात. ॥ ३६॥ आधारमानन्दमखण्डबोधं यस्मिन् लयं याति पुरत्रयञ्च । ज्ञयं परब्रह्म सुशान्तमेतत्स्वयं प्रकाशं तमसः परस्तात् ॥ ३७॥ अर्थ - अत्यंत प्रशांत असे परब्रह्मतत्त्व विदित केले पाहिजे, जे स्वयंप्रकाशी असून अज्ञानरूपी अंधःकाराच्या पलीकडे आहे. ॥ ३७॥ मायोपाधित एवास्य ब्रह्मणो नाम ``ईश्वरः''॥ अविद्यापाधितस्तस्य ब्रह्मणो नाम जीवकः ॥ ३८॥ अर्थ - माया उपाधि सहित जे आत्मतत्त्व त्यालाच ईश्वर म्हणतात. अविद्या उपाधि सहित त्या ब्रह्मतत्त्वाचे नांव जीव असे आहे. ॥ ३८॥ उपाधिभ्यां विहीनौ तौ ब्रह्मैवासङ्गरूपतः । घटाकाशो महाकाशो महदाकाशो एव हि ॥ ३९॥ अर्थ - उपाधीने विरहित असे ते दोन्ही ही (ईश्वर आणि जीव) हे असंग असे ब्रह्मतत्त्वच आहे. घटाकाश, महाकाश आणि महदाकाश हे सर्व एकच आहेत. ॥ ३९॥ शुभ्राभवच्च सा मायाऽविद्या कृष्णाभ्रवत्तयो । ब्रह्मसूर्यप्रकाशो यो बिम्बितः स इमाविति ॥ ४०॥ अर्थ - शुभ्र रूपाने जी असते ती शुभ्र अभ्राप्रमाणे (अभ्र -ढग) आणि अविद्या ही काळया मेघाप्रमाणे असते. विद्या म्हणजे ब्रह्मज्ञान हे सूर्याप्रमाणे असते. सूर्योदय झाल्यावर अभ्रे नष्ट होतात त्याप्रमाणे ब्रह्मज्ञानप्राप्ती झाल्यावर (कृष्णवर्णीय) अविद्या नष्ट होते. ॥ ४०॥ असङ्गो ब्रह्मसूर्यो हि तत्प्रकाशोऽपि तादृशः । सङ्गीव मन्यते भ्रान्त्या तदेवाज्ञानमुच्यते ॥ ४१॥ अर्थ - सूर्याप्रमाणे तत्त्वज्ञान हे स्वच्छ निर्मल स्वयंप्रकाशी असून त्याचा प्रभाव (प्रकाश) पण तसाच निर्लिप्त स्वच्छ स्पष्ट असतो. भ्रांतिच्या संगतीने, भ्रांति मुळे उत्पन्न झालेले ते अज्ञान म्हणूनच संबोधिले जाते. ॥ ४१॥ जीवेशो भवतोऽज्ञानात् मायाऽविद्ये तथैव च । ब्रह्माण्डमपि पिण्डाण्डपुंस्त्रीसर्जनकल्पने ॥ ४२॥ अर्थ - जीव हा अज्ञानापासून आणि माया ही अविद्येपासून उत्पन्न होते. ब्रह्माण्ड पण पुरुष -स्त्री लिंगाच्या उत्पत्तिने त्याच कल्पनेने उत्पन्न होते. ॥ ४२॥ प्रवृत्तौ सर्जनं कार्यं पुंस्त्री चेति विभावनम् । निवृतौ सर्जनं काय्रं नापि पुंस्त्रीविभावनम् ॥ ४३॥ अर्थ - प्रवृत्ती रूपाने ते सृजनाचे कार्य पुरुष -स्त्री आदि विभागांत उत्पन्न होते आणि निवृत्ति रूपाने ते सृजनाचे कार्य असते, त्यांत पुरुष -स्त्री हा अभेद आहे. ॥ ४३॥ अक्षरं ब्रह्म परमं स्वभावोध्यात्म उच्चते । भूतभावोद्भवकरो विसर्गः कर्मसंज्ञितः ॥ ४४॥ अर्थ - अक्षर अखण्ड परब्रह्म हे स्वभावतः अध्यात्म म्हणून ओळखले जाते. भूत आणि भाव ह्याप्रमाणे झालेले कर्म हे ``कर्म'' म्हणूनच ओळखले जाते. ॥ ४४॥ प्रवृत्तिलक्षणं कर्म ज्ञानं निवृत्तिलक्षमणम् । प्रवृत्तिस्सा गृहिणाञ्च निवृतिःसाच न्यासिनाम् ॥ ४५॥ अर्थ - प्रवृत्तिरूपी केलेले कर्म हे ``कर्म'' आहे आणि निवृत्ति रूपाने होणारे ते ज्ञान म्हटले जाते. भौतिक सुखासाठी कर्म हे प्रवृत्ति रूपी कर्म आणि हे लिप्त करते व त्याचे परिणाम भोगावे लागतात परंतु निवृत्ति रूपी कर्म हे आपल्याला ठेव ठेवल्यासारखे कल्याणकारी असतात. ॥ ४५॥ प्रवृत्तौ देहसम्बन्धाद्देहाहङ्कारतोऽपि च । ईषणावतशतः कार्यं निवृत्तौ नेदृशं क्वचित् ॥ ४६॥ अर्थ - देह संबंध, देहबुद्धि आणि अहंकार ह्या मुळे प्रवृत्तिरूप कार्य होते. इच्छावश होवूनच कार्य होतात. मात्र निवृत्ति मार्गात ह्याप्रमाणे इच्छावश होवून कांहीच कार्य होत नाहीत. ॥ ४६॥ जनिमत्पदार्थस्वीकारः सङ्ग्रहश्च दिवानिशम् । तत्सुखेच्छाप्रवृत्तौ च निवृत्तौ नेदृशं क्वचित् ॥ ४७॥ अर्थ - उत्पत्ति मुळेच पदार्थांचा हव्यास असतों. आणि रात्रंदिवस संग्रही वृत्ती ठेवली जाते. त्यापासून सुख मिळविण्याची, मिळण्याची इच्छा असते. तसे निवृत्ति मध्ये निरीच्छताच असते. पुत्रेच्छया भवेत्कामः पतिपत्नीत्वभावनम् । गृहं धन प्रवृतौ च निवृत्ती ने दृशं क्वचित् ॥ ४८॥ अर्थ - पुत्राच्या इच्छेमुळे कामवासना उत्पन्न होते. आणि पति-पत्नि ही भावनापण उत्पन्न होते. घर आणि धन ह्यांच्या प्रवृत्ति मध्येच ती प्रवृत्त होते. मात्र निवृत्त प्रवृत्तिला हे काहींच नको असते. ॥ ४८॥ तारतम्यञ्च वैविध्यं भिन्नत्वं स्वेतरं सुखम् । कार्यदृष्टिः प्रवृत्तौ च निवृत्तौ नेदृशं क्वचित् ॥ ४९॥ अर्थ - विविध रूपामध्ये त्या ``तर'' ``तम'' भावाने तो सुख बघतो. प्रवृत्ति रूपी विचारकाचे माझे व परक्याचे (अशा स्वार्थ बुद्धिने) सुख चिंतले जाते. मात्र निवृत्ति विचारक असे कांहीच चिंतन करीत नाहीं. ॥ ४९॥ उत्पत्तिः सृष्टिनिर्वाहः कार्यादृष्ट्येव जीवनम् । रागद्वेषौ प्रवृत्तौ च निवृत्तौ नेदृशं क्वचित् ॥ ५०॥ अर्थ - निर्मिति, सृष्टिमध्ये जीवनासाठी कार्य करणे (जीविकोपार्जन) ह्या हेतुने कार्य करणे आणि त्याच बरोबर राग (आसक्ति) आणि द्वेष हे विकार असणे ह्याप्रमाणे प्रवृत्तिमार्गीय माणसाचे जीवन असते. मात्र जो निवृत्ति मार्गी असतो त्याने राग द्वेषादि सर्व भावांवर जय मिळविलेला असतो. त्याच्या वागण्यांत त्या सारखे कांहींही नसते ॥ ५०॥ अहं कर्ता तथा भोक्ता फलदाता महेश्वरः । पुनर्जन्म प्रवृत्तौच निवृत्तौ नेदृशं क्वचित् ॥ ५१॥ अर्थ - मी कर्ता, मी भोक्ता, फळ देणारा ईश्वर असे प्रवृत्ति मार्गी माणसाचे विचार त्यास पुनर्जन्माची प्राप्ती करवतात आणि निवृत्तिरूप जो साधक असतो त्याचे असे विचार नसतात. ॥ ५१॥ भोगतोऽयज्ञानवृद्धिश्च भोगेच्छायाविवर्धनम् । अतृप्तिहिं प्रवृत्तौच निवृत्ति नेदृशं क्वचित् ॥ ५२॥ अर्थ - भोगापासून अज्ञानाची वृद्धि होते. आणि भोग भोगल्याने इच्छा ह्या वृद्धिंगत होतात. प्रवृत्ति मार्गाने अतृप्ति प्राप्त होते. मात्र निवृत्ति मार्गामध्ये साधकाला इच्छाच नसतात. भोगेच्छा नसतात. ॥ ५२॥ इच्छाप्राप्तपदार्थानां चिन्ता तद्रक्षणस्य च । प्राप्ततृप्तिः प्रवृत्तौच निवृत्तौ नेदृशं क्वचितम् ॥ ५३॥ अर्थ - इच्छा ही अप्राप्त वस्तुंसाठी असते. आणि प्राप्त झालेल्या वस्तुंच्या रक्षणासाठी चिंता असते, एकंदर प्रवृत्तिशाली जीवाला तृप्ती हवी असते. ॥ ५३॥ भोगादनन्तरं दुःखं जुगुप्सांऽशुचिता तथा । विषादेर्ष्ये प्रवृत्तौच निवृतौ नेदृशं क्वचित् ॥ ५४॥ अर्थ - तसे निवृत्तीमार्गी साधकास भौतिक सुखप्रदायक वस्तुंची प्राप्ती आणि तत्सम धडपड नसते. ॥ ५४॥ प्रवृत्तिश्च निवृत्तिश्च भिन्नमार्गो परस्परौ । ब्रह्माज्ञानात्प्रवृत्तिः स्यान्निवृत्तिर्ब्रह्मवेदनात् ॥ ५५॥ अर्थ - प्रवृत्ति आणि निवृत्ति हे परस्पर भिन्नमार्ग आहेत. ब्रह्मतत्त्वाच्या अज्ञानामुळे मनुष्य प्रवृत्ति मार्गी होतो. उलट ब्रह्मज्ञानाने त्याला निवृत्ति मार्ग प्रिय वाटतो. ॥ ५५॥ प्रपञ्चतः प्रवृत्तिः स्यान्निवृत्तिर्निष्प्रपञ्चतः । कर्मतश्च प्रवृत्तिः स्यान्निवृत्तिः कर्मत्यागतः ॥ ५६॥ अर्थ - प्रपंचात रस आसक्ति निर्माण झाल्यामुळे माणूस प्रवृत्ति मार्गाचा होतो. निवृत्ति मार्गी हा प्रपंचापासून दूर जातो. कर्मबाहुल्यामुळे (अधिक कर्म प्राप्त झाल्याने) प्रवृत्तिमार्गी होतो. कर्मातील नीरसतेने तो निवृत्तिमार्गी होतो. ॥ ५६॥ कार्याभानात्प्रवृत्ति स्यान्निवृत्तिः स्तदभावतः । प्रवृत्तिर्बोधयेत्कर्म निवृत्तिर्निष्क्रियात्मताम् ॥ ५७॥ अर्थ - कार्याचे भान झाल्यामुळे ``मी कर्ता आहे'' ह्या भावनेचा उदय झाल्यामुळे अहं बुद्धिने तो प्रवृत्ति मार्गी होतो. आणि ती बुद्धि नसते (मी कर्ता आहे ही बुद्धि) तेव्हां तो निवृत्ति मार्गी होतो. ॥ ५७॥ स्वभिन्नं वस्तुभोगो हि कर्मणा फलमीदृशम् । ब्रह्मस्वरूपप्राप्तिस्तु कर्मणा न कदाचन ॥ ५८॥ अर्थ - आपल्यापासून सर्व भोग व आनंद वेगळे आहेत (म्हणजे आनंदप्राप्तीचे स्थान अंतःकरणांत नसून ते बाहेरील भौतिक वस्तु -पदार्थांमध्ये आहे।) ही प्रवृत्ति असल्याने कर्माचे फळ प्राप्त होते. परंतु ब्रह्मतत्त्वच सर्वत्र अंतरबाह्य भरलेले असून त्यांतच सुखबुद्धि असणे म्हणजे निवृत्तिमार्ग असून त्या पासून कर्मफलाने लिप्तता होत नाहीं. ॥ ५८॥ स्वान्यस्य हि सम्प्राप्तिः यतः कर्मफलं भवेत् । स्वप्राप्तिः कर्मणा नैव स्पष्टं कस्य नस्यादिदम् ॥ ५९॥ अर्थ - माझ्यापासून दुसरे हे वेगळे तत्त्व आहे आप पर भाव हे वाटणे म्हणजे कर्मफल लिंपिले जाते ते भोगावे लागते. परंतु स्वतःचीच आत्मप्राप्ती झाली म्हणजे दुसरे तिसरे कांहीच न राहता स्पष्टपणे एकच एक तत्त्व शिल्लक राहते. ॥ ५९॥ कार्यान्तर्भूतमेवं हि कर्मणा प्राप्यते यतः । कार्यशून्यपरं ब्रह्म कारणं नैव प्राप्यते ॥ ६०॥ अर्थ - कार्य केल्याने तदनंतरच त्याचे फळ परिणाम हे निर्माण होते. परंतु ज्याच्याकडून निर्लिप्त भावाने फलाशा न ठेवता कार्य हे केवळ कर्तव्यभावाने केल्यास त्यास त्याचे फल चिकटत नाही. ते ब्रह्मभूत होवून त्याचे कारण फल माथी पडत नाहीं. ॥ ६०॥ यदानन्दपरं ब्रह्म जगत्कारणमीदृशम् । तदज्ञानाज्जगत्कार्य तद्विरुद्धं सुदुःखदम् ॥ ६१॥ अर्थ - ह्याप्रमाणे परमानंदादायक ब्रह्मच जगत् उत्पत्तिचे कारण आहे, तेंव्हा त्याच्या ज्ञानामुळे जगत्कार्य समजते. त्या उलट त्याच्या अज्ञानाने अतिदुःखाची प्राप्ती होते. ॥ ६१॥ जगदन्तरर्गतं वस्तु कर्मणा प्राप्यते यतः । दुःखाय हि भवेत्कर्म सुखाय न कदाचन ॥ ६२॥ अर्थ - जगतामधील वस्तु ही कर्मामुळेच प्राप्त होते. हे जसे खरे आहे त्याप्रमाणे दुःखासाठीच कर्म होते आणि सुखासाठी ते घडत नाहीं. ॥ ६२॥ कर्मणा बध्यते जन्तुर्विद्यया च वियुज्यते । तस्मात्कर्म न कुर्वन्ति यतयः पारदर्शिनः ॥ ६३॥ अर्थ - कर्मामुळे प्राणी हा बंधनांत पडतो परंतु ज्ञानप्राप्तीने तो मुक्त होता म्हणून जे परमचिंतक असे यती असतात ते महान् योगी असतात. ते कर्म करीत नाहीं अर्थात सकाम कर्म अहंकारयुक्त होवून करीत नाहीत. ॥ ६३॥ अनिष्टमिष्टं मिश्रञ्च त्रिविधं कर्मणा फलम् । भवत्यत्यागिनां प्रेत्य न तु संन्यासिनां क्वचित् ॥ ६४॥ अर्थ - इष्ट -अनिष्ट आणि मिश्र असे कर्माची विविध प्रकारची फळं असतात. ही फळं प्रवृत्ति मार्गीयांना कोठलाच अहं प्रवृत्तिचा त्याग न करण्याने प्राप्त होतात आणि चिकटतात. परंतु सन्यासी लोकांना ती चिकटत नाहींत. ॥ ६४॥ अजीवेशात्मकं ब्रह्म मायाऽविद्याविशून्यतः । नामरूपविशून्यं तत्जगच्छून्यमजं ध्रुवम् ॥ ६५॥ अर्थ - जीवभाव रहित ब्रह्मरूप, माया आणि अविद्या या पासून निर्लिप्त नामरूप रहित ते शून्य असे जगत् अनादि व अनंत नित्य असे आहे. ॥ ६५॥ जगत्सङ्कल्प शुन्यं तत्पुमान्नैव न प्रकृतिः । नापि नारी नरो नैव प्रपञ्चाभावतः क्वचित् ॥ ६६॥ अर्थ - संकल्पशून्य जगत् म्हणजे त्यांत प्रकृति आणि पुरुष हा विभागच नाहीं न कि तेथे नर नारी हा भेद आहे, ज्या पासून हा प्रपंच निर्मित होतो. ॥ ६६॥ कामादिदोषशून्यं यन्निर्विकल्पं निराकुलम् । आनन्दघनमत्यच्चं ब्रह्मैकं प्रविजृम्भते ॥ ६७॥ अर्थ - काम आदि दोषांपासून अलिप्त, अद्वितीय आणि सुखमय आनंदाची अति उच्च सीमाच असे ``ब्रह्म'' हेच तत्त्व एकच एक अत्यंत विशाल आणि असीमरूपाने फैललेले असते, पसरलेले असते. ॥ ६७॥ या मा मिथ्येति सा माया मिथ्यायाश्च जनिः कुतः । विद्यते या न साऽविद्या सा कुतोऽत्रावशिष्यते ॥ ६८॥ अर्थ - ``या मा इति सा माया'' जी नसतेच (''मा'' हे संस्कृतमध्ये निषेधात्मक अव्यय आहे, जी मुळी अस्तित्वातच नाही ती माया) ती माया, मिथ्या खोटी अशी स्थिती तिचा जन्मच तो कोठला? (विद्यते या न सा इति अविद्या) जी अस्तित्वांतच नाहीं ती येथे कोठून शिल्लक राहणार? ॥ ६८॥ वन्ध्या पुत्रकथैवात्र जीवेशादिप्रकल्पना । प्रजाया सृष्टिकार्यं तं सर्वंहि वितथं तथा ॥ ६९॥ अर्थ - वंध्या स्त्रीचा पुत्र कोठला? जीवेश वगैरे ह्या कल्पना तद्वतच आहेत. प्रजोत्पत्ति आदि सृष्टिकार्य ही तसेच व्यर्थ आहे. ॥ ६९॥ कार्यात्पूर्वन्न कार्य स्यात् नाधिष्ठानाद्विता ततः । अन्ते नैव यतःकार्यं तदेतच्छशश‍ृङ्गवत् ॥ ७०॥ अर्थ - कार्याच्या पूर्वी जे कार्य नसेल, ज्याला अधिष्ठान नसेल, आणि अंतिम अवस्थेत जे कार्य शिल्लकच रहात नाही, ते सशाच्या शिंगाप्रमाणे असंभव आहे. ॥ ७०॥ आदावन्ने जगन्नास्ति वर्तमानेऽपि तत्तथा । आदावन्ते वर्तते यत् वर्तमानेऽपि ब्रह्म तत् ॥ ७१॥ अर्थ - आदि समयी आणि अंतिम समयी जगत् रहात नाही. वर्तमानांत सुद्धा ते तसेच आहे. जे आदि अंती आणि वर्तमानांत राहते ते ब्रह्मतत्त्वच आहे. ॥ ७१॥ सिद्धान्तोऽध्यात्मशास्त्राणां सर्वापन्हव एव हि । नाविद्यास्तीह नो माया सर्व ब्रह्मेदमक्लवम् ॥ ७२॥ अर्थ - अध्यात्म शास्त्राचा सिद्धांत हाच आहे की जे कांही सर्व सत्य आहे, ते आवृत्त म्हणजे झाकलेलेच राहते. मायेने वेष्टित होते. येथे अविद्या पण नसते आणि माया पण नसते. सर्व काहीं ब्रह्मच निष्कलंक असते. ॥ ७२॥ अतद्वयावृत्तिरूपेण नेति नेतीतिवाक्यतः । बुधौर्निरस्यते सर्वं ब्रह्मैकं प्रविलक्ष्यते ॥ ७३॥ अर्थ - बुध म्हणजे पण्डित लोकांकडून ते ब्रह्मतत्त्व ``नेति - न इति'' असे हे नाही -हे नाही असे म्हणून अद्वय आवृत्ति रूपाने ते दुसरे तत्त्व निरस्त केले जाते. जे कांही ब्रह्मच आहे. (सर्वं खलु इदं ब्रह्मम् !) असे सिद्ध केले जाते. ॥ ७३॥ सर्वं हि खल्विदं ब्रह्म नेंह नानास्ति किञ्चन । सच्चिदानन्दब्रह्मैव सर्वन्नैवं समीक्षते ॥ ७४॥ अर्थ - ``सर्वं हि खलु इदं ब्रह्म'', हे सर्वच खरे म्हणजे ब्रह्मतत्त्वाधिष्ठित आहे आणि विविध वेगळे असे कांहीही नाही. सत् चित् आनंदमय ब्रह्मच सर्वत्र विराजित आहे. ॥ ७४॥ व्यतिरेकेण यद्वत्स्यानदन्वये नापि तत्तथा । एकमेवाद्वयं ब्रह्म नेंह नानास्ति किञ्चन ॥ ७५॥ अर्थ - व्यतिरेक निषेधात्मक पद्धति नेति-नेति अश्या रीतीने जे असते, ते व्यतिरेक (हे असे -हे असे) अश्या रीतीने ब्रह्मतत्त्वाचे वर्णन सांगता येत नाहीं. ते एकमेव अद्वितीय ब्रह्म असल्याने त्याच्या सारखे काहींच नाही. ते अनुपमेय आहे. ॥ ७५॥ प्रपञ्चसत्यभानेन तत्यागे दोष ईक्ष्यते । प्रपञ्चभावतः कस्य तत्यागे दोष सम्भवः ॥ ७६॥ अर्थ - प्रपंच हेच सत्य आहे, असे समजणाऱ्यासच त्याचा त्याग करणे ह्यांत दोष संभवतो पण ज्याला प्रपंच हा असत्यच आहे, असे वाटते त्यास कसला त्याग आणि कसला दोष? सन्यासी भावनेने सारे जगच मिथ्या आहे, त्यांत कसला त्याग आणि कसला दोष? ॥ ७६॥ शिवःक्षरति लोकान्वै विष्णुः पाति जगत्रयम् । ब्रह्मा सृजति लोकान्वै एवमादिक्रियादिकम् ॥ ७७॥ अर्थ - शिव हा या लोकाचा (जगाचा) अंत करतो. विष्णु हा पालनकर्ता आहे. आणि ब्रह्मा हा सृजनकर्ता आहे. ह्याप्रमाणे आदि क्रिया मानली जाते. ॥ ७७॥ यद्यदस्ति पुराणेषु यद्यद्वे द्वेषु निर्णयम् । सर्वोपनिषदां भावं सर्वं शशविषाणवत् ॥ ७८॥ अर्थ - जे -जे पुराणांत आहे, ते -ते विद्वानांचे म्हणणे आहे, उपनिषदांतही हाच भाव आणि निर्णय आहे. की सर्व जगत हे शशश‍ृंगवत (जे असंभव असे सश्याच्या शिंगाप्रमाणे) असे आहे व्यर्थ आहे. ॥ ७८॥ नित्यानन्दमयं ब्रह्म केवलं सर्वदा स्वयम् । अनन्तमव्ययं शान्तमेकरूपमनामयम् ॥ ७९॥ अर्थ - नित्य सदा आनंदमय ब्रह्म हे स्वतःच स्वयं प्रकाशी असून अनंत आणि अखण्डरूपात्मक, शांत, एकतत्त्वरूपाने आणि नाम रूपाविरहित असे आहे. ॥ ७९॥ वन्ध्याकुमारवचने भतिश्चेदस्ति किञ्चन । सशश‍ृङ्गेण नागेन्द्रो मृतश्चेज्जगदस्ति तत् ॥ ८०॥ अर्थ - वंध्य स्त्रीच्या मुलाच्या वचनांनी कांही कोठे कुणाला भयभीत व्हावे लागते का? (ते अशक्यच आहे) आणि सश्याच्या शिंगानी नागांचा महाराजा सर्प मारला गेला, हे जसे असंभव आहे, तद्वतच हे जग पण मिथ्या आहे. ॥ ८०॥ मृगतृष्णाजलं पीत्वा वृप्तश्चेदस्त्विदञ्जगत् । नरश‍ृङ्गेण नष्टश्चेत्कश्चिदंस्त्विदमेव हि ॥ ८१॥ अर्थ - मृगजळांतील पाणी पिऊन हे जग तृप्त झाले असे जर म्हटले तर, माणसाच्या शिंगाने हे जगत नष्ट होईल, असे म्हणण्यासारखे व्यर्थ आहे. ॥ ८१॥ गगने नीलिमा सत्यं जगत्सत्यं भविष्यति । शुक्तिका रजतं सत्यं भूषणं चेज्जगद्भवेत ॥ ८२॥ अर्थ - गगन म्हणजे आकाश, हे खरेच नीळे आहे, असे म्हटले तर हे सारे जग पण सत्यच आहे, असे म्हटले जाईल. आणि शिंपले हे खरच चांदीचे आहे, असे म्हटले तर हे जगत् पण एक आभूषणच होईल. ॥ ८२॥ रज्जुसर्पेण दंष्टश्चेन्नरो भवतु संसृतिः । चित्रस्थदीपैस्तमसो नाशश्चेदस्त्विदं जगत् ॥ ८३॥ अर्थ - रज्जु म्हणजे दोरी आणि तिलाच सर्प मानून बसला (कोण एक अज्ञानी आणि त्या सर्पाच्या दशाने एक मनुष्य मेला आणि त्याला सत्गति मिळाली हे म्हणणे जसे अशक्य व कल्पित वाटते त्याप्रमाणे चित्रामधील दिव्याच्या उजेडाने खरोखरच अंधार केला असे म्हणणे सुद्धा जसे अशक्य आणि व्यर्थच बालिशपणाचे वेडेपणाचे आहे, तद्वच हे जग खरेच आहे असे म्हणणे होईल. (अर्थात पण्डितांचे मत हे जग म्हणजे सुद्धा स्वप्नवत् असत्यच आहे, हे तात्पर्य।) ॥ ८३॥ सर्व हि खल्विदं ब्रह्म तज्जलानीर्ति नित्यशः । सत्त्वा शान्तमुपासीत श्रुत समुपन्दिश्यते ॥ ८४॥ अर्थ - खरे तर सर्वच (हे चराचर जगत्) हे ब्रह्म आहे. (सर्वं खलु इदं ब्रह्म) असे दृष्टिने पाहून त्याप्रमाणे शांतपणे त्या ब्रह्म तत्त्वाची उपासना करावी, असे आमचे श्रुति वेदशास्त्र सांगते. ॥ ८४॥ यत्तदद्रेश्यमग्राह्यमगोत्रं सर्वतोमुखम् । परिपश्यन्ति धीरा ये भूतयोनिं तदव्ययेम् ॥ ८५॥ अर्थ - जे जे सर्वत्र अग्राह्य अगोत्र म्हणजे ज्याचे ज्याचे आम्हास ज्ञान नाही ते सुद्धा सर्व चराचर जगत हे ब्रह्मतत्त्वाचेच अविनाशी रूप आहे, असे पण्डित ज्ञानी लोक मानतात. ॥ ८५॥ लोकान्कर्मचितानेवं परीक्ष्य ब्राह्मण स्वयम् । आयान्निर्वेदपत्यन्त नास्त्यकृतः कृतेन यत् ॥ ८६॥ अर्थ - अशातर्हेने कर्म करणाऱ्यांचे परीक्षण करुन ब्रह्मदेव जो स्वतःच वैराग्याचा अधिपती आहे, त्यांस कर्मफलाने लिप्त होवू देत नाही. (जरी त्यांनी कर्मे केलीत तरी।) ॥ ८६॥ पराञ्चि खानि व्यतृणत्स्वयम्भूस्तस्मात्पराङ्पश्चयति नान्तरात्मन् । कश्चिद्धीरः प्रत्यगात्मानमैक्षदावृत्यचक्षुरमृतत्त्वमिच्छन् ॥ ८७॥ अर्थ - ह्या उलट तत्त्वाचे जे लोक असतात (कीं जे सर्वत्र एकच ब्रह्मरूप तत्त्व भरलेले आहे, असे मानत नाहीत।) ते स्वतःला आणि दुसऱ्याला खूप वेगळेपणाने समजतात. त्यांस आपल्या अंतरतत्त्वाप्रमाणे मानीत नाहीत. कोणी धीरपुरुषच परमात्मतत्त्वाला आपल्या नयनांभोवतीच वेष्टित असा समजतो. (म्हणजे सर्वत्र ब्रह्मतत्त्व भरलेले त्याला दिसते।) ॥ ८७॥ पराचःकामाननुयन्ति बालास्ते मृत्योर्यन्ति विततस्यच पाशम् । अथ धीरा अमृतत्त्वं विदित्वा ध्रुवमध्रुवेष्विह न प्रार्थयन्ते ॥ ८८॥ अर्थ - प्रतिकूल प्रवृत्तिचे कामनांची इच्छा करणारे व त्यानुरूप चालणारे बालबुद्धिचे लोक मृत्युच्या विशाल दीर्घ पाशास बांधले जातात आणि धीर अर्थात् ज्ञानी अमृतत्त्वास जाणून निश्चित अनिश्चित असे ह्या भौतिक जगांत इच्छित नाहीं. ॥ ८८॥ पाशबद्धः स्मृतो जीवः पाशमुक्तः सनातनः । तुषेण बद्धो व्रीहिस्यातुषा भावेनःतण्डुलः ॥ ८९॥ अर्थ - पाशबद्ध जो असतो तो जीव म्हटला जातो आणि पाशमुक्त जो असतो त्याला सनातन म्हटले जाते. कोड्यांने वेष्टित तसे तांदूळाचे अन्न (रूप) साळ, त्यास ``ब्रीहि'' असे म्हणतात. आणि कोंडा काढून टाकल्यावर साळीच्या वरचे तांदूळाचे कडक टरफल भुरकट रंगाचे जे असतात, त्यास तांदूळ असे म्हणतात. ॥ ८९॥ ध्यायन्नास्ते मुनिश्चैवमासुप्तेशमृतेस्तुयः । जीवन्मुक्तः स विज्ञेयः स धन्यः कृतकृत्यवान् ॥ ९०॥ अर्थ - जो साधक मुनी सतत ध्यान करीत रात्रंदिवस झोप येईपर्यंत ईशतत्त्वाचेच ध्यान करतो, सत्य, मंगल ह्या विषयीच ध्यान करतो, तोच धन्य समजावा, तोच कृतकृत्य आणि जीवन्मुक्त झाला असे आहे. ॥ ९०॥ जीवन्मुक्तपदं त्यक्त्वा स्वदेहे कालसात्कृते । विशत्यदेशमुक्तत्त्व पवनो स्पन्दताविव ॥ ९१॥ अर्थ - -जीवनमुक्त पदाचा त्याग करुन, आपला देह कालवश झाल्यावर तो मुनि कोठल्याही सीमेमध्ये न राहता अदेशत्वं म्हणजे कुठलेच स्थान सीमित न राहता, तो वायुप्रमाणे सर्वत्र फैलत प्रसारित होतो. ॥ ९१॥ देवद्विजगुरुप्राज्ञपूजनं शौचमार्जवम् । ब्रह्मचर्यमहिंसा च शारीरं तप उच्यते ॥ ९२॥ अर्थ - देव, ब्राह्मण, गुरु आणि विद्वान ह्यांचे पूजन, पावित्र्य, सरलता हे ``शारीर तप'' असे म्हटले जाते. त्याच प्रमाणे ब्रह्मचर्य आणि अहिंसा हे पण ``शारीर तप'' असे म्हटले जाते. ॥ ९२॥ अनुद्वगकरं वाक्यं सत्यं प्रियहिततञ्च यत् । स्वाध्यायाम्यसनं चैव वाङ्मयं तप उच्यते ॥ ९३॥ अर्थ - उद्वेग न उत्पन्न करणारे सत्य आणि हितकारके प्रिय वाटणारे असे वाक्य बोलणे, सतत अध्ययनरत राहून स्वाध्याय करुन राहणे हे वाङ्ममय तप आहे. ॥ ९३॥ मनः प्रसादः सौम्यत्वं मौनमात्मविनिग्रहः । भावसंशुद्धिरित्येतत् तपो मानसमुच्यते ॥ ९४॥ अर्थ - मन हे प्रसन्न ठेवणे, सौम्य भाषा बोलणे, मौन धारण करणे, आत्मनियंत्रण करणे, हे भाव जे असतात (विचार तरंग) त्यांस शुद्ध ठेवणे ह्यास मानस तप असे म्हणतात. ॥ ९४॥ विविधम्पत इदं नित्य जीवनञ्च मुमुक्षुणाम् । अनेनैव मुमुक्षुस्यात्साधको मान्य इत्यपि ॥ ९५॥ अर्थ - असे नानाविध तप हेच मुमुक्षु साधकांचे तपस्वी जीवन आहे. ह्यामुळेच मुमुक्षु मोक्षाची इच्छा करणाऱ्याचे जीवन साधक म्हणून म्हटले गेले आहे. ॥ ९५॥ स्ववर्णाश्रमधर्मेण तपसा गुरुतोषणात् । सधनं प्रभवेत्पुंसां वैराग्यादि चतुष्टयम् ॥ ९६॥ अर्थ - आपल्या वर्णाश्रमाच्या धर्माचे पालन करुन, तपाने गुरुचे संतुष्टीकरण करुन ``वैराग्य चतुष्टय'' हे साधन साध्य केले जाते. ॥ ९६॥ परमात्मन एवायं मोक्षधर्मप्रसूरितः । सर्वप्रथममे वातो गुरुमार्गादिमस्तु सः ॥ ९७॥ अर्थ - परमात्म्या कडे जाणारा हा मोक्ष मार्ग आणि त्याचा प्रवाह हा प्रथम गुरुराजांकडे जाणारा मार्ग आहे. ॥ ९७॥ गुरुरेव हरिः साक्षान्नान्य इत्यब्रवीत् श्रृतिः । तद्भक्त्यापि च मुक्तिःस्यात्कृता चेद्गुरुभावतः ॥ ९८॥ अर्थ - श्रुति अर्थात वेदांनी हेच सांगीतले आहे कीं गुरु हेच साक्षात हरि म्हणजे परमेश्वर आहेत. दुसरे कोणी नाहीं. त्यांची गुरुची भक्ती केल्यानेच मुक्ती मिळते आणि ती गुरुभावनेने भक्ती केली पाहिजे. ॥ ९८॥ योमामजन्मादिञ्च वेति लोक महेश्वरम् । असम्मूढ स मर्त्येषु सर्वपापैः प्रमुचयते ॥ ९९॥ अर्थ - जो मला अनादि, अजन्मा असा लोक महेश्वर म्हणून जाणतो, तो असंमूढ अर्थात् दृढ बुद्धि असलेला मूढबुद्धि ज्याची नाही असा, साधक ह्या मर्त्य लोकांमध्ये सर्व पापांपासून मुक्त होतो. ॥ ९९॥ इत्यत्रापीशभक्तिस्तु ब्रह्मरूपेण बोधिता । ब्रह्मरूपेणेंशभक्तिः कार्यतो वा मुमुक्षुभिः ॥ १००॥ अर्थ - ह्याप्रमाणे येथे ईशबुद्धि ही ब्रह्मरूपाने स्पष्ट केली आहे ब्रह्मरूपाने ईशभक्ती कार्यरूपाने मुमुक्षु साधका कडून झाली पाहिजे. ॥ १००॥ नित्यानित्यविवेकोऽयमिहा मुत्र विरागता । शमादिषट्कसम्पत्तिः मुमुक्षुत्वं हि साधनम् ॥ १०१॥ अर्थ - नित्य आणि अनित्य ह्यातील विवेक, आसक्ती रहित राहणे आणि शम दमादि षट्संपत्ति हीच मुमुक्षुसाधकाची साधने आहेत, असे येथे सांगितले आहे. षट्संपत्ति -(१) शम -इंद्रियनिग्रह (२) दम -मनोनिग्रह (३) तितिक्षा - सहनशील (४) उपरति -संसारात रस नसणे (५) श्रद्धा -गुरुशास्त्र (६) शांति -शंकानिवृत्ति. ह्या विषयी पूज्यभाव असला पाहिजे. ॥ १०१॥ इति श्रीसमर्थरामदासासानुगृहित श्रीरामपदपङ्कजभृङ्गायमान श्रीमत्परमहंस परिव्राजकाचार्य भगवता श्री श्रीधरस्वामिना विरचिते मुमुक्षुसखः ग्रन्थे सृष्टिस्वरूपं नाम द्वादशं प्रकरणं सम्पूर्णम् ।

१३. श्रीसद्गुरुस्तुतिर्नाम प्रकरणं त्रयोदशम्

(श्री सद्गुरुस्तुतिनामक तेरावे प्रकरण) श्रीगुरुं परमानन्द वन्दे आनन्दविग्रहम् । यस्य सन्निधिमात्रेण चिदानन्दायते मनः ॥ १॥ अर्थ - परम आनंदरूप आणि मूर्तिमंत आनंदोल्लासच अश्या श्री गुरुंना मी वंदन करितो, ज्यांच्या केवल सान्निध्यानें निःसीम अखण्ड आनंदच प्राप्त होतो. ॥ १॥ नमस्ते नाथ भगवन्शिवाय गुरुरूपिणे । विद्यावतारसंसिध्यै स्वीकृतानेक विग्रहः ॥ २॥ अर्थ - गुरुरूपी भगवान् शंकरांना नमस्कार असो ज्यांनी विद्येच्या ज्ञानप्राप्तीसाठी अनेक मूर्तिमंत अवतार धारण केले आहेत. अर्थात् नानाविध विद्या कलांचे जे श्रेष्ठ गुरु आहेत, ते परमेश्वरी अवतारच होते. ॥ २॥ अच्युताय नमस्तस्मै गुरवे परमात्मने । स्वारमोक्तपदेच्छूना दत्तं येनाच्युत पदम् ॥ ३॥ अर्थर् - त्या परमगुरुला अच्युताला नमस्कार असो, जो आत्मारामामध्येच रममाण होवूं इच्छिणाऱ्या साधकांला अच्युत पद अढळ पद प्राप्त करुन देतो. ॥ नमोऽच्युताय गुरवेऽज्ञानध्वान्तैक भानवे । शिष्यसन्मार्गपटवे कृपापीयूषसिन्धवे ॥ ४॥ अर्थ - त्या अच्युत कधीही पराभूत न होणाऱ्या अश्या गुरुला, अज्ञानरूपी पापांधःकाराचे नाश करणाऱ्या सूर्याला नमस्कार असो. शिष्यांना सन्मार्ग दाखविण्यात प्रवीण असणाऱ्या त्याच प्रमाणे कृपारूपी अमृताचा सागरच की काय अश्या महाकनवाळू गुरुस नमस्कार असो. ॥ ४॥ नमोऽच्युताय गुरवे शिष्यसंसारसेतवे । भक्तकार्येकसिंहाय नमस्ते चित्सुखात्मने ॥ ५॥ अर्थ - त्या गुरुस जो अच्युत आहे आणि शिष्यांना संसारसागरांतून पार करण्यास सेतुचाच अवतार धारण करतो अश्या अक्षय आनंदरूपी भक्त कार्य करण्यास सिंहासारखा (मोठा सामर्थ्यशाली असून) वाटा उचलतो, त्यास वंदन असो. ॥ ५॥ नानायुक्त्युपदेशेन तारिता शिष्यसन्ततिः । यत्कृपासारवेदेन गुरुश्चित्पदमच्युतम् ॥ ६॥ अर्थ - शिष्यरूपी पुत्रांना नाना प्रकारच्या उपदेशांनी युक्त अश्या वेगवेगळया युक्त्या वापरुन (त्यांस सज्ञान करुन) त्यांजवर जो गुरुकृपा करितो त्यामुळे गुरु हे त्यास अविनाशी अच्युतपदाची प्राप्ती करुन देतात. ॥ ६॥ सच्चिदानन्दरूपाय व्यापिने परमात्मने । नमः श्रीगुरुनाथाय प्रकाशनन्दमूर्तये ॥ ७॥ अर्थ - श्रीगुरुनाथांना नमस्कार असो. जे परमात्मरूपाने सर्वत्र व्याप्त झाले आहेत आणि ते ज्ञान प्रकाशरूपाने आनंदाची केवळ मूर्तिच आहेत. ॥ ७॥ सत्यानन्दस्वरूपाय बोधैकसुखकारिणेम् । नमो वेदान्तवेद्याय गुरवे बुद्धिसाक्षिणे ॥ ८॥ अर्थ - त्या सत्-चित्-आनंदरूपाने ज्ञान हे एक कारण आहे कीं ज्यामुळे खरे सुख प्राप्त होते. त्या गुरुला वंदन आहे कीं ज्यामुळे वेदांचे सार ज्ञात होण्यास बुद्धिरूपाने साक्षीभाव उत्पन्न होण्यास ते कारक आहेत. ॥ ८॥ नमस्ते गुरवे तुभ्यं सहजानन्दरूपिणे । यस्य वागमृतं हन्ति विषं संसारसंज्ञिकम् ॥ ९॥ अर्थ - सहज आनंद हेच एकरूप आहे अश्या गुरुला वंदन असो. संसारनामक विषाचे जे हनन करते, अश्या वाणीरूपी अमृताचे दाते अश्या गुरुंना नमस्कार आहे. ॥ ९॥ गुरुरेको जगत्सर्वं ब्रह्मविष्णुशिवात्मकः । गुरोः परतरं नास्ति तस्मात्सम्पूजयेद्गुरुम् ॥ १०॥ अर्थ - गुरु हेच एक सर्वविश्वात्मक प्रतीकरूप आहेत. ब्रह्मा, विष्णु आणि शिवरूपांत ते गुरुरूप समाविष्ट आहे. गुरुपेक्षा वरचढ कोणी नाही, म्हणून त्या गुरुलाच वंदन आहे. ॥ १०॥ सर्वश्रुतिशिरोरत्न विराजितपदाम्बुजम् । वेदान्तार्थप्रवक्तारं तस्मात्सम्पूजयेद्गुरुम् ॥ ११॥ अर्थ - सर्व वेदांच्या शिरावरील रत्नमणि, ज्यांचे पदकमल शोभिवंत आहेत. वेदांचा अर्थ समजावून सांगणारे म्हणून गुरुचे सर्वप्रकारे सुपूजन करावे ॥ ११॥ यस्य स्मरणमात्रेण ज्ञानमुत्पद्यते स्वयम् । स एव सर्वसम्पत्तिस्तस्मात्सम्पूजयेद् गुरुम् ॥ १२॥ अर्थ - ज्यांच्या केवळ स्मरण करण्याने ज्ञान, स्वयंभूपणे प्रकट होते, तेच सर्व प्रकारांनी वरिष्ठ अशी संपत्ति आहेत म्हणून त्यांचे सर्वप्रकाराने मनःपूर्वक पूजन करावे. ॥ १२॥ गुरुभक्तिं सदा कुर्याच्छ्रेयसे भूयसे नरः । गुरुदेव हरिः साक्षान्नान्य इत्यब्रवीच्छ्रतिः ॥ १३॥ अर्थ - गुरु हेच ब्रह्म, गुरु हेच विष्णु, आणि गुरु हेच शिव आहेत. तिन्ही लोकांत गुरुशिवाय पूज्य कोणीच नाही, म्हणून त्यांस वंदन करावे. ॥ १३॥ इति श्रीसमर्थरामदासानुगृहित श्रीरामपदपङ्कजभृङ्गायमान श्रीमत्परमहंस परिव्राजकाचार्य भगवता श्री श्रीधरस्वामिना विरचिते मुमुक्षुसखः ग्रन्थे श्रीसद्गुरुस्तुतिर्नाम त्रयोदशं प्रकरणं सम्पूर्णम् । समाप्तोऽयं ग्रन्थः । लेखन १९७० वरदपुर Total 757 verses Proofread by Manish Gavkar
% Text title            : Mumukshu Sakhah
% File name             : mumukShusakhaH.itx
% itxtitle              : mumukShusakhaH (shrIdharasvAmIvirachitaH)
% engtitle              : mumukShusakhaH
% Category              : major_works, vedanta, shrIdharasvAmI, upadesha, advice
% Location              : doc_z_misc_major_works
% Sublocation           : major_works
% Author                : Shridharaswami
% Language              : Sanskrit
% Subject               : philosophy/hinduism/religion
% Proofread by          : Manish Gavkar
% Description/comments  : shrIdharasvAmI stotraratnamAlikA
% Indexextra            : (Marathi, Scan, Collection 1, 2)
% Acknowledge-Permission: Upendra Shripad Dasare,  https://shridharamrut.com/
% Latest update         : July 1, 2023
% Send corrections to   : Sanskrit@cheerful.com
% Site access           : https://sanskritdocuments.org

This text is prepared by volunteers and is to be used for personal study and research. The file is not to be copied or reposted for promotion of any website or individuals or for commercial purpose without permission. Please help to maintain respect for volunteer spirit.

BACK TO TOP
sanskritdocuments.org