गुरुशिष्यलक्षणम्

गुरुशिष्यलक्षणम्

श्रीगणेशाय नमः । अथ गुरुशिष्यलक्षणम् । अतः परं प्रवक्ष्यामि गुरोः शिष्यस्य लक्षणम् । शुश्रूषायाः क्रमञ्चाथ श्रुणुष्व चतुरानन ॥ १॥ सद्वंशजः सुपूर्णाङ्गः प्रशान्तः प्रियभाषणः । गम्भीरः सत्यवाग्वाग्मी सन्तुष्टः करुणास्पदः ॥ २॥ स्निग्धस्मितमुखो रागी प्रगल्भो निरहङ्कृतिः । शुचिः सुशीलो धर्मिष्ठः सदाक्षिण्यो बृहद्ध्वनिः ॥ ३॥ निर्मत्सरो गुणग्राही सुशान्तो विजितेन्द्रियः । वेदाङ्गेषु कृताभ्यासः पुराणस्मृतिवित्तमः ॥ ४॥ सर्वागमेषु कुशलः कुलीनश्च महामतिः । मन्त्रोद्धारप्रवीणश्च मन्त्रार्थप्रतिपादकः ॥ ५॥ शिवस्य च गुरोर्भक्तः शिवैकाहितमानसः । शिवार्चनासक्तचित्तः शिवध्यानैकतत्परः ॥ ६॥ एतल्लक्षणसंयुक्तो गुरुरित्यभिधीयते । निराकारं निरालम्बं निर्मलं निर्विकल्पकम् ॥ ७॥ निर्गुणं निश्चलं नित्यं परात्परपदं गुरुः । आधाराधेयस्वाधिष्ठानाद्यन्तरहितो गुरुः ॥ ८॥ मनसो वाचकस्यैव गुरोर्भावस्य गोचरः । गुरुमूर्तिः शिवः साक्षान्नान्यथा च सुरेश्वर ॥ ९॥ वसते पादयुग्मे तु त्रैलोक्यं सचराचरम् । अङ्गुष्ठाग्रे चाष्टषष्ठि तीर्थानि निवसन्ति वै ॥ १०॥ नक्षत्रग्रहवृन्दानि गुल्फे तस्य वसन्ति वै । सप्ताब्धयश्च पादाधस्तदूर्ध्वेऽष्टकुलानगाः ॥ ११॥ जङ्घयोर्वसते नित्यं षट्त्रिंशत्तत्वरूपधृक् । स्मर्तव्यः पठितव्यश्च गुरुः परमकारणम् ॥ १२॥ गुरुदेवं महादेवमेकीभावेन भाविताः । त्रिषु लोकेषु पूज्यन्ते ते नरा गुरुभक्तितः ॥ १३॥ हररूपं समादाय पूजां गृण्हाति सर्वदा । गुरुरूपं समादाय भवपाशं निकृन्तति ॥ १४॥ पशुनाथः शिवस्तस्मात्पशूनां पतिरित्यभूत् । पशुपाशविनिर्मुक्तो गुरोराज्ञां निरीक्षयेत् ॥ १५॥ त्रिसन्ध्यं तु गुरोः पूजा कर्तव्या हितमिच्छता । यो गुरुः स शिवः प्रोक्तो यः शिवः स गुरुः स्मृतः ॥ १६॥ यथा शिवस्तथा विद्या यथा विद्या तथा गुरुः । शिवविद्यागुरूणां च पूजया सदृशं फलम् ॥ १७॥ एषां चतुर्णां वर्णानां गृहस्थानां च योषिताम् । गुरुर्गृहस्थ एव स्यान्न कदाचिद्यतिर्गुरुः ॥ १८॥ अयमेव यतीनां स्याद्यतिर्गुरुरथापि वा । यथाहं सर्वलोकानां गुरुरम्बिकया सह ॥ १९॥ तस्मादयं समस्तानां गुरुराश्रमिणामज । अनेन याः प्रतिष्ठाद्याः किं याः स्युः सफलाः स्मृताः ॥ २०॥ एक एव गुरुर्ब्रह्मन् भ्रातृभार्यात्मजन्मनाम् । इत्थं तेषां च सर्वेषां यथाहं जगतां तथा ॥ २१॥ हायनैरधिको बालो गुरुराख्यातलक्षणैः । समस्तैः सहितः सम्यग्यः स एव गुरुर्भवेत् ॥ २२॥ वयसैव किमाधिक्यमाधिक्यं ज्ञानमेव हि । तस्मात् ज्ञानाधिकं शिष्यो गुरुमेव समाश्रयेत् ॥ २३॥ शिष्यस्तु शिक्षणीयत्वाद्गुरुर्गौरवकारणात् । तस्मात्सर्वप्रयत्नेन गुरुर्गौरवमाचरेत् ॥ २४॥ द्विजातिर्वा च सच्छूद्रः स्वस्वोक्ताचारवान् शुचिः । सत्यवाग्गुरुभक्तश्च दम्भाहङ्कारवर्जितः ॥ २५॥ रागद्वेषविनिर्मुक्तः शान्तःसर्वजनप्रियः । गुर्वाज्ञाचकितः सौम्यः शिष्य इत्यभिधीयते ॥ २६॥ उक्तलक्षणसम्पन्नो यस्मिन्देशे गुरुः स्थितः । तत्र शिष्यः स्वयं गत्वा प्रणमेद्दण्डवद्गुरुम् ॥ २७॥ ततः कुर्वीत शुश्रूषां सम्यगहरहर्गुरोः । अब्दास्त्रयो वैकोऽब्दौ वा मासषट्कमथापि वा ॥ २८॥ अथवा त्रिदशश्रेष्ठ गुरुर्यावत्प्रसीदति । तावच्छुश्रूषयेच्छिष्यो हृद्वाक्कायक्रियाधनैः ॥ २९॥ मनस्यनारतं सम्यग्गुरोराकारचिन्तनम् । शुश्रूषोपायचिन्ता च हृच्छुश्रूषेत्युदाहृता ॥ ३०॥ देव किं कर्म कर्तव्यं तथैवेत्युत्तरं पुनः । एवमादिक्रियोक्तिश्च सा वाक्च्छुश्रूषिका स्मृता ॥ ३१॥ समीपे वातिदूरे वा स्वशरीरनिवेदनम् । गत्यागत्यादिका या सा स्वभार्यानन्दनैस्तथा ॥ ३२॥ प्रदक्षिणनमस्कारं सम्यक्पादाब्जसेवनम् । पयसाज्येन दध्ना वा शुद्धेनाङ्घ्रिप्रलेपनम् ॥ ३३॥ ततः श्लक्ष्णैर्मुद्गचूर्णैश्चोष्णेन सलिलेन च । प्रक्षाल्याथ च वस्त्रेण तथार्द्रत्वप्रमार्जनम् ॥ ३४॥ शय्यासंस्तरणं सम्यक्केशसम्मार्जनं नखैः । तैलाभ्यङ्गक्रिया चाथ स्नानकर्म यथा शुभम् ॥ ३५॥ श्रीखण्डं घर्षणं पुष्पमालिका चारुचन्दनम् । शौचार्थं मृज्जलानीति तत्र योग्यप्रदेशनम् ॥ ३६॥ पूजास्थानानुलेपं च गोमयेन स वारिणा । पूजापुष्पजलानीति तत्र योग्यप्रदेशनम् ॥ ३७॥ एवमादीनि चान्यानि गृहकर्माणि यानि वै । तेषामहरहः कर्म कायशुश्रूषिका स्मृता ॥ ३८॥ धान्यस्वर्णपशुक्षेत्रदासीदासाम्बराणि च । पर्यङ्कभूषणापात्रत्रिपादिचषकादयः ॥ ३९॥ चन्दनाद्यनुलेपोक्तद्रव्याणि सुरभीणि च । केशानुलेपद्रव्याणि कस्तूर्यादीनि यानि च ॥ ४०॥ तुरङ्गमगजान्दोलस्यन्दनानि शुभानि च । तेषां प्रदानं सद्भक्त्या धनशुश्रूषिका स्मृता ॥ ४१॥ द्रव्यसामर्थ्यसम्पन्नो यः कश्चिच्छिष्यकः सदा । सर्वशुश्रूषिकां कुर्यात् स्वगुरोरेव भक्तितः ॥ ४२॥ शुश्रूषां कायकीमेकां विना नास्ति त्रिधा सदा । कुर्यान्नृपोऽन्याः शुश्रूषाः सर्वाः कुर्युः स्त्रियो भृशम् ॥ ४३॥ हीनवत्यपि ये जाता भक्ताश्चेदीश्वरे यदि । तेऽपि स्वयोग्यशुश्रूषां कुर्युरिष्टार्थसिद्धये ॥ ४४॥ आनीय भूपतिर्भक्त्या गुरुं देशान्तरे स्थितम् । स्वस्थाने स्थाप्य शुश्रूषां त्रिविधां कारयेत् सदा ॥ ४५॥ गुरोः प्रियाणि द्रव्याणि यानि कानि चिदन्वहम् । तानि भक्त्या प्रदेयानि शिष्येण सुलभानि च ॥ ४६॥ गुरुं दिदृक्षुर्यः शिष्यः सद्भक्त्यानुदिनं सदा । रिक्तपाणिर्न तं पश्येद्यथा राजा तथा गुरुः ॥ ४७॥ फलं प्रसूनं ताम्बूलमन्यत्किमपि वस्तु च । एष्वेकं गुरवे दत्त्वा नमस्कार्यस्ततो गुरुः ॥ ४८॥ गुरुं स्वगृहमायातं दृष्ट्वा भक्तिरतो नृपः । गत्वोन्नतासनं चाथ दत्वासीत्तदनुज्ञया ॥ ४९॥ ताम्बूलमुत्तमं तस्मै ततः पात्रेण दापयेत् । पश्चादिष्टानि वस्तूनि दत्वा नत्वा विसर्जयेत् ॥ ५०॥ *सम्भोजयित्वा स्वगुरुं पश्चाद्भुञ्जीत बुद्धिमान् । गुरोः पुरस्ताद्यो भुङ्क्ते गुरुद्रोही स उच्यते ॥ ५१॥ शिष्येण भोजनात्पूर्वं न भोक्तव्यं कदाचन । भोजनानन्तरेऽश्नीयात् स्वगुरोर्यः स पुण्यभाक् ॥ ५२॥ यानि भक्ष्याणि नव्यानि कन्दमूलफलानि च । अपूर्वाण्युपदंशानि गुरोः पूर्वं न भक्षयेत् ॥ ५३॥ यो भक्त्या स्वगुरोर्भुक्तं शिष्यः पात्रेऽन्नमुज्झितम् । भुङ्क्ते स सर्वदुरितैर्मुच्यते नात्र संशयः ॥ ५४॥ प्रदत्तं यत्स्वगुरुणा ताम्बूलं परिचर्वितम् । शिष्यस्तद्भक्षयेद्भक्त्या शुद्धान्तःकरणो भवेत् ॥ ५५॥ स्वाचार्यचरणद्वन्द्वप्रक्षालितजलं सदा । यः पिबेद्धारयेद्भक्त्या सर्वपापैः प्रमुच्यते ॥ ५६॥ शुभकार्येषु सर्वेषु विवाहादिषु भक्तितः । गुरुमभ्यर्च येच्छिष्यो वस्त्रहेमाङ्गुलीयकः ॥ ५७॥ तत्रापि च सभापूजाविधेः पूर्वं गुरुं यजेत् । ततः सभां यजेद्योग्यां क्रमेणैव यथा शुभम् ॥ ५८॥ सभान्तरे गुरुं धीमान् कदाचिदपि नार्चयेत् । आसनस्थं विशुद्ध्याङ्घ्रिं गन्धपुष्पाक्षतैर्यजेत् ॥ ५९॥ ततोऽर्पयत् स्वगुरवे वस्त्रहेमाङ्गुलीयकान् । कार्तिकस्य चतुर्दश्यां विषुयुग्मेऽयनद्वये ॥ ६०॥ ग्रहणे चार्चयेच्छिष्यो गुरुं वै मौक्तिकांशुकैः । दरिद्रश्चेद्धि तष्वेषु निजशक्तिमवञ्चयन् ॥ ६१॥ अवश्यमर्चयेच्छिष्यो गुरुं लब्धधनेन वा । दरिद्रश्चेत्स्वयं शिष्यः प्रतिसंवत्सरं यजेत् ॥ ६२॥ वासः प्रावरणे दद्यादवश्यं नेत्रवल्लभम् । चन्दनं चाक्षतं पुष्पं स्वर्ण ताम्बूलमम्बरम् ॥ ६३॥ पात्रे निधाय गुरवे शिष्यो दद्यान्न पाणिना । न्यायार्जितं स्थितं स्वर्णमुख्यं यद्यवहारतः?? ॥ ६४॥ तदेव देयं गुरवे देयं धामापि यद्वरम् । यन्नूनं व्यवहारे तु तच्च स्वर्णं कदाचन ॥ ६५॥ न दद्याद्गुरवे दानं मनुष्यः फलवाञ्छकः । नूतनं सदृढं स्निग्धं धवलं नेत्रवलभम् ॥ ६६॥ दद्यादाच्छादनं भक्त्या गुरवे सर्वदा बुधः । विशीर्णं तृटितं दग्धं प्राक्तनं स्वधृतं पुरा ॥ ६७॥ दष्टमारव्वादिभिर्वस्त्रं न दद्याद्गुरवे बुधः । परुषं दुष्क्रियायुक्तं नीलसूत्राविनिर्मितम् ॥ ६८॥ पट्टवस्त्रेतरं वस्त्रं विरलन्न प्रदापयेत् । पट्टदेवाङ्गचीनानि वासांस्यन्यानि यानि च ॥ ६९॥ चित्राणि दद्यान्नृपतिरितरो वा धनाधिपः । अपूर्वं पेशलं वासो वस्त्वन्यत्सुमनानि च ॥ ७०॥ स्वगुरोः पुरतः शिष्यो न कदाचित्स्वयं हरेत् । यदि रिक्तो गुरुः शिष्यः समृद्धः स्यात्स हायताम् ॥ ७१॥ यथाशक्ति गुरोः शिष्यः प्रकुर्वीतासनादिकम् । गुरुं भक्त्या नमस्कुर्याद्दर्शने परमे सदा ॥ ७२॥ सन्निधानं विना शम्भोरन्यत्रांवुरुहासनः । मातापित्रोः स्वबन्धूनां ब्राह्मणानां तपस्विनाम् ॥ ७३॥ नमस्कारं न कुर्वीत शिष्यः स्वगुरुसन्निधौ । गुर्वीश्वराग्रे योऽज्ञानात् ज्ञानाद्वा प्रणमेदिमान् ॥ ७४॥ स पापात्मा पतत्येव नरकेऽमीभिरन्वितः । श्रीमानपि तपोवेषी शास्त्रज्ञः कुलशौचवान् ॥ ७५॥ कृत्वा दण्डनमस्कारं निर्लज्जो गुरुसन्निधौ । गुरोः पत्नी गुरोर्भ्राता गुरोः पुत्रा गुरोः समाः ॥ ७६॥ गुरुः पिता गुरुर्माता गुरुदेवः स्वयं शिवः । अग्रजावरजा पत्यज्येष्ठश्रेष्ठतदङ्गनाः ॥ ७७॥ भार्या गुरोश्च वन्द्याः स्युरल्पसंवत्सरा अपि ॥ ७८॥ तद्योषाश्च नमस्कार्याः सदाल्पवत्सरा अपि । आराध्य कुलशास्त्राणि पूज्यानि स्थानकानि च ॥ ७९॥ निकेतने च त्रिः पूर्वं प्रणम्य परिकीर्तयेत् । दूरतोऽपि गुरुं दृष्ट्वा उदासीनोऽपि यो व्रजेत् ॥ ८०॥ श्वानयोनिशतं गत्वा भवेच्चण्डालवेश्मनि । ज्येष्ठा यदि क्षत्रियाद्या न वन्द्याः स्युर्द्विजोत्तमैः ॥ ८१॥ तथैव वैश्यैः शूद्राश्च जात्यनुक्रमशः स्मृताः । स्वजातेः श्रेष्ठजातौ च ज्येष्ठः स्यान्नियमो भवेत् ॥ ८२॥ स्वजातेर्हीनजातौ तु ज्येष्ठस्यापि कनिष्ठता । उपचारेषु सर्वेषु द्वावेवात्यन्तशोभनौ ॥ ८३॥ प्रियवाक् च प्रणामश्च तौ विनान्ये वृथा स्मृताः । प्रथमं द्वारमारभ्य द्वारावधि परिक्रमात् ॥ ८४॥ प्रदक्षिणाविधौ धीमान् न तु दीर्घपदं न्यसेत् । न गच्छेत्त्वरितं जल्पन्नितरैर्मानुषैः सह ॥ ८५॥ छायां न लङ्घयेदन्ते शिवधाम्नः सुबुद्धिमान् । पदे पदान्तरं न्यस्तं करौ चलनवर्जितौ ॥ ८६॥ स्तुतिर्वाचा हृदि ध्यानं चतुरङ्गं प्रदक्षिणम् । एवं शिष्यश्चतुर्भक्त्या सह कुर्यात्परिक्रमम् ॥ ८७॥ गुरुं शिवं प्रतिपदं सोऽश्वमेधफलं लभेत् । स्वामिभट्टारकाचार्यदेवश्रीगुरुनामभिः ॥ ८८॥ ब्रूयात्सदा गुरुं शिष्यो जातुचिन्नान्यनामभिः । त्वं शब्दं न प्रयुञ्जीत गुरौ शिष्यः कदाचन ॥ ८९॥ आज्ञां न लङ्घयेत्तस्य समं नोपविशेत्तथा । समस्तदेवतावासं सर्वमन्त्रास्पदं गुरुम् ॥ ९०॥ उपेक्षते स पापात्मा यः शिष्यो रौरवं व्रजेत् । हृदि नायं ममाचार्य इत्युपेक्षां करोति चेत् ॥ ९१॥ मयि भक्तिर्वृथा तस्य तथैव च समर्चनम् । स्वगुरोः पुरतः शिष्यो नेतरान् कीर्तयेन्नरान ॥ ९२॥ असह्यभावं न वदेन्न वदेदितरेतरम् । स्वमातृपितृभार्यासु भ्रातृबन्धुसुतेषु च ॥ ९३॥ ये गुरुद्वेषिणः शिष्याः प्रणेयांस्तान् परित्यजेत् । सन्मानं गुरुभाषां च गुरौ शिष्यो य इच्छति ॥ ९४॥ स महापातकी ज्ञेयः पतत्येव स दुर्गतौ । यस्मात्कस्माद्गुरुः शिष्यं यदि विद्वेषकारकः ॥ ९५॥ शुश्रूषयेत्स्वयं शिष्यः सद्भक्त्या पूर्ववत्सदा । यो गुरुं सर्वदा स्तौति तदिष्टं तस्य यच्छति ॥ १६॥ करोति स्नेहिभिः स्नेहं सदैव मुनिना समः । गुरुं निन्दति यः शिष्यो द्रव्यं हरति तस्य च ॥ ९७॥ करोति द्वेषिभिः स्नेहं स चाण्डाल समः स्मृतः । जुगुप्सितस्य चार्थस्य रोः शिष्योऽतियत्नतः ॥ ९८॥ अहेयवुद्ध्या यः कुर्याच्छुश्रूषामालभेत सः । गच्छन् तिष्ठन् स्वपन् भुञ्जन् यद्यत्कर्म समारभेत् ॥ ९९॥ समक्षं वा परोक्षं वा कर्तव्यं गुर्वनुज्ञया । रुगेहे समक्षं वा न यथेष्टासनो भवेत् ॥ १००॥ गुरुर्देवो यतः साक्षात्तद्गेहे शिवमन्दिरे । आसनं वाहनं वस्त्रं भूषणं शयनं तथा ॥ १०१॥ न कुर्याद्गुरुसादृश्यं गतिसिद्धेरपेक्षकः । शिष्यो गुरुस्थितग्रामे प्रविशन्वाहनादिकम् ॥ १०२॥ वर्जयेद्गेहसामीप्ये तथा वै पादुकानि च । नानृतं नाप्रियं वाक्यं न गुह्यं चापि भाषयेत् ॥ १०३॥ नापृष्टो नामुखे याद्गुरोरग्रे कदाचन । नोपतिष्ठो भवेदूर्ध्वं नोर्ध्वस्थानं विशेद्गुरोः ॥ १०४॥ पश्चात्पादेन निर्गच्छन्नमस्कृत्याग्रतो गुरोः । दीक्षाव्याख्याप्रमत्तादि गुरोरग्रे विसर्जयेत् ॥ १०५॥ अतिहास्यमवष्टम्भलीलामङ्घ्रिप्रसारणम् । विनोदोज्वलवेषं च पर्यङ्कं दन्तधावनम् ॥ १०६॥ पर्वस्फोटविकारं च पादप्रक्षालनं तथा । तद्वाक्यप्रतिकूलं च न कुर्याद्गुरुसन्निधौ ॥ १०७॥ पात्रस्नानजलछायामाल्योपकरणानि च । भक्तिहीनः स्वपादाभ्यां न स्पृशेन्नैव लङ्घयेत् ॥ १०८॥ पादुकासनशय्यादि गुरुणा यद्यधिष्ठितम् । न मस्कुर्वीत तत्सर्वं पादाभ्यां न स्पृशेत्क्वचित् ॥ १०९॥ देहलीं गेषणीं चुल्लीं तर्जनीं खण्डनीमपि । वर्धिनीं दीपकं शूर्पं खट्वामपि घरट्टकम् ॥ ११०॥ लेपनीं मुसलं चापि नैव पादेन संस्पृशेत् । नोल्बणं धारयेद्वेषं नालङ्कारांश्च कर्हिचित् ॥ १११॥ न कुर्यादाश्रमे तस्य ह्युपानत्परिसर्पणम् । ऊढा धृता च प्रीता च मूल्येन च समाहृता ॥ ११२॥ सकृत्कामगता चापि पञ्चधा गुरुयोषितः । वन्द्या पूज्या ह्यलन्ध्याश्च गुरुवद्गुरुशक्तयः ॥ ११३॥ न लिङ्गग्रहणं कुर्याद्बहिर्लिङ्गार्चनं नच । दुःसङ्गं च दुरुक्तिं च दुःशीलं दुर्गुणं तथा ॥ ११४॥ दुर्वाक्यं दुश्चरित्रं च दूरेण परिवर्जयेत् । स्वदेशे वान्यदेशे वा शिष्यो विंशतियोजनात् ॥ ११५॥ अभ्यन्तरस्थं स्वगुरुं सम्पश्येत्प्रतिवत्सरम् । गुरुयात्रा देवयात्रा तीर्थयात्रेति च त्रिधा ॥ ११६॥ आसां त्रिविधयात्राणां गुरुयात्रा फलाधिका । गुरुसन्दर्शनार्थं यो भक्त्या यात्रां करोति सः ॥ ११७॥ पुण्यदेहीति विज्ञेयः समस्तागमवल्लभः । यात्रां कर्तुमशक्तश्चेत् प्रियं द्रव्यं हि तस्य यत् ॥ ११८॥ तद्दत्वा स्वजनं तस्मै भक्त्या प्रहिणुयाद्बुधः । आदिष्टो वा नवा शिष्यो दूरे वापि समीपतः ॥ ११९॥ स्थितः स्वस्वगुरोः प्रीतिं स्नेहेनैव समाचरेत् । कार्यविज्ञापनार्थं यद्गुरूणां दूरवासिनाम् ॥ १२०॥ पत्रलेखावृतेः सङ्ख्या षडित्यभिहिता बुधैः । शिष्याणां ससमानां तु मित्राणां च महीभृताम् ॥ १२१॥ देयाद्वित्रिचतुःपञ्च वृतिसङ्ख्या यथाक्रमम् । तालपत्रं दृढं सौम्यमृजुः साग्रं द्विधाकृतम् ॥ १२२॥ मृदुलं तत्प्रशस्तं यद्यात्रालेखाविलेखने । कर्कशं कल्मषं वक्रं हीनाग्रं स्फुटितं युगम् ॥ १२३॥ तालपत्रमशस्तं स्यात्पत्रलेखाविलेखने । मात्राविसर्गानुस्वारैर्वर्णैः स्पष्टं यथा भवेत् ॥ १२४॥ तथैव लेखां विलिखेच्छिन्द्याद्वर्णं न जातुचित् । सन्दिग्धं छिन्नवर्णं च प्रशस्तेतरभाषणम् ॥ १२५॥ न कदाचिल्लिखेत्पत्रे स्वेनैवाभ्याशगं यदि । प्रशस्तभाषासंयुक्तं विनयस्तुतिपूर्वकम् ॥ १२६॥ विज्ञापनीयं गुरवे यापयेदन्तिकं गुरोः । यत्रोपविष्टः स्वगुरुः परितः पञ्चयोजनात् ॥ १२७॥ अन्तर्न कारयेद्दीक्षां प्रतिष्ठाद्यखिलक्रियाः । स्वगुर्वाज्ञां विना शिष्यो यः कुर्याच्छिष्यसङ्ग्रहम् । यददृष्टं कृतं पूर्वं तत्सर्वं प्रविनश्यति ॥ १२८॥ तथा भवेद्गुरुद्रोही स पापात्मा शिवस्य च । शरीरान्ते महाघोरे नरके विवशेच्चिरम् ॥ १२९॥ योग्यमाद्यं गुरुं त्यक्त्वा शिष्यः क्षुद्रक्रियावहम् । गुरुं समाश्रयेदन्यं यः प्रयाति स दुर्गतिम् ॥ १३०॥ मारणोच्चाटने द्वेषमोहनं स्तम्भनं तथा । द्वेषणाकर्षणे चैतत् षट्कं क्षुद्रमिति स्मृतम् ॥ १३१॥ ज्वरादिसर्वरोगाणां मन्त्रतन्त्रप्रतिक्रियाः । भूतप्रेतपिशाचानां क्षुद्राः स्युर्ब्रह्मरक्षसाम् ॥ १३२॥ नाचरेत्क्षुद्रकर्माणि गुरुः श्रेष्ठः कदाचन । मिथ्या गुरुः स शिष्याणां विहीनगुरुलक्षणः ॥ १३३॥ किमप्यपेक्षया दीक्षां कुर्वाणो याति रौरवम् । लिङ्गिनां शिवविप्राणां किं तत्कर्तव्यमुच्यते । गुरौ शरीरं सन्त्यज्य परलोकं गते सति ॥ १३४॥ कार्या परा या शुश्रूषा शिष्येण स्वाभिवृद्धये । गुरोः प्रयाणसमये शिष्याः पार्श्वे तु संस्थिताः ॥ १३५॥ तदा केशान् वपेयुस्ते श्रुत्वा दूरे स्थितास्तथा । तथा तस्य सुतैः सार्धं प्रकुर्युस्तर्पणादिकं (केशवपनं तर्पणादिकं विना लिङ्गिविप्राणामन्यत्सर्वं समम्) ॥ १३६॥ ततः पृथक् पृथक् पूजां प्रकुर्युः शङ्करस्य च । सद्भक्त्या गुरुसम्प्रीत्यै समृद्धो विभवैः सह ॥ १३७॥ समूहीकृत्य कुर्वीरन्नेकस्मिन्दिवसे धनम् । ततः प्रतिसमं शिष्या गुरुपर्वविधिं सदा ॥ १३८॥ पृथक् पृथक् प्रकुर्वीरंस्तदर्थं तीर्थसेवनम् । यस्मिन्मासे तिथौ यस्यां मुमोच स्वतनुं गुरुः ॥ १३९॥ तत्तीर्थं गुरुपर्वेति नामधेयं भविष्यति । भक्तान् भक्त्या यथा शक्त्या शिष्यस्य गुरुपर्वणि ॥ १४०॥ भोजयेत्परमान्नेन घृतापूपोपदंशकैः । भक्ता एकादश श्रेष्ठं दश मध्यं नवाधमः ॥ १४१॥ यथाशक्त्याथवा लाभे सम्भोज्या गुरुपर्वणि । शान्ताः सच्छीलवन्तश्च श्रोत्रियाः शिवपूजकाः ॥ १४२॥ गुर्वर्थं भोजने योग्या एते वै नेतराः स्मृताः । पूर्वरात्रौ द्विजानुक्तान् गत्वा तद्गेहकं प्रति ॥ १४३॥ हस्तेषु दत्वा ताम्बूलं भक्त्या शिष्यो निमन्त्रयेत् । कृतनित्यक्रियः शिष्यःकृतनित्याखिलाञ्जनान् ॥ १४४॥ निमन्त्रितांस्तानाहूय स्थापयेदासने दिने । ततः शुद्धप्रदेशे तु गोमंयालिप्तमण्डले ॥ १४५॥ गन्धपुष्पाक्षतैश्चैव षडङ्गैरपि पूजयेत् । तिष्ठतः प्राङ्मुखस्यादावेकस्य च। रणद्वये ॥ १४६॥ गन्धाद्यम्भोंऽजलिं दद्याद्भक्तस्य नियतात्मनः । ततः प्रक्षालयेत्तद्वदन्यान् भक्तान् यथाक्रमात् ॥ १४७॥ ततस्तु भोजनस्थाने शुभे चातिमनोहरे । प्राङ्मुखान् स्थापयेदेतानासनेषु यथाक्रमम् ॥ १४८॥ अथवोदङ्मुखान्वातु स्थापयेन्नान्यदिङ्मुखान् । वस्त्रोर्मिकाभ्यां गन्धाद्यैः समृद्धः पूजयेत्ततः ॥ १४९॥ असमृद्धो यथाशक्ति भक्त्या सह समर्चयेत् । पायसापूपसर्पिर्भिर्दध्यन्नाद्युपदंशकैः ॥ १५०॥ अखण्डैर्भोजयेद्विप्रान्यथापूर्वं यथा तथा । ततस्ताम्बूलकं दत्वा यथाशक्ति च दक्षिणम् ॥ १५१॥ कृत्वा प्रदक्षिणं नत्वा क्षमध्वमिति तान्वदेत् । गुर्वर्थमेवं यः शिष्यः प्रकुर्याद्भोजनादिकम् ॥ १५२॥ सर्वपापविनिर्मुक्त इहामुत्र सुखी भवेत् । भक्ताभावे महादेवं तदर्थं सम्प्रपूज्य तु ॥ १५३॥ भक्तार्थं पाकसकलं तस्मै प्रीत्यै निवेदयेत् । देशान्तरे स्थितः शिष्यो योजनान् गुरुपर्वसु ॥ १५४॥ रवौ कन्यागते दर्शे गुरुपर्वक्रियां चरेत् । यावच्छिष्योऽवनौ जीवेत्समृद्धो गुरुपर्वणि ॥ १५५॥ तावत्सद्भक्तितो भक्तान् भोजयेत् प्रतिवत्सरम् । गुरोरत्यन्तभक्तस्य शिष्यस्येह परत्नच ॥ १५६॥ न किञ्चिद्दुर्लभं ब्रह्मन् समस्तं सुलभं सदा । अथ किं बहुनोक्तेन गुरुदेवो महेश्वरः ॥ १५७॥ यः कश्चिद्गुरुभक्तश्चेत्स याति परमं पदम् । स्कान्दे गुरुशुश्रूषणं कार्यं गुरोर्वाक्यानुवर्तनम् ॥ १५८॥ सदा गुरुपरो नित्यं गुरोराज्ञां न लङ्घयेत् । गुरुपादोदकं पीत्वा गुरुच्छिष्टं तु सेवयेत् ॥ १५९॥ गुरुमूर्तिं सदा ध्यायेद्गुरुनाम सदा जपेत् । गुरुपादाम्बुजध्यानं कुर्याद्गौरि महेश्वरि ॥ १६०॥ तमेव यः स्मरेन्नित्यं स मुक्तो नात्र संशयः । तस्मात्सर्वप्रयत्नेन शिष्यः सेवेत सद्गुरुम् ॥ १६१॥ तत्सम्पर्के शिवार्चादौ स्वगतं वा परागतम् । यथैव वन्हिसम्पर्कान्मलं त्यजति काञ्चनम् ॥ १६२॥ तथैव गुरुसम्पर्कात्पापं त्यजति मानवः । पापीनां च यथा सङ्गात्तत्पापफलमश्नुते ॥ १६३॥ तद्वदाचार्यसङ्गेन सद्धर्मफलभाग्भवेत् । यथा प्रज्वलितो वन्हिः स्पृष्टं काष्ठं च निर्दहेत् ॥ १६४॥ गुरुस्तुष्टो दहत्येव पापं तन्मात्रचेतसाम् । इत्थमाचारवान्भक्तो नित्यं जपपरायणः । गुरुप्रियकरोमन्त्रविनियोगे सदार्हति ॥ १६५॥ ततशिष्यः समुत्थाप्य कुसुमैः पूरिताञ्जलिः । प्रविशेत्पादयुग्मे तु प्रणामं कारयेद्गुरोः ॥ १६६॥ अथाष्टमन्त्राः । चैतन्यं शाश्वतं नित्यं व्योमातीतं निरञ्जनम् । नादबिन्दुकलातीतं तस्मै श्रीगुरवे नमः ॥ १६७॥ ज्ञानशक्तिसमारूढं तत्वमालाविभूषितम् । भुक्तिमुक्तिप्रदातारं तस्मै श्रीगुरवे नमः ॥ १६८॥ ब्रह्मा विष्णुश्च रुद्रश्च ईश्वरश्च सदाशिवः । एते गर्भगता यस्य तस्मै श्रीगुरवे नमः ॥ १६९॥ गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुर्गुरुर्देवो महेश्वरः । गुरुरेव परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः ॥ १७०॥ अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया । चक्षुरून्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः ॥ १७१॥ अनन्तजन्म सम्प्राप्तं कर्मैधनविदाहकम् । ज्ञानानलप्रभावेन तस्मै श्रीगुरवे नमः ॥ १७२॥ अखण्डमण्डलाकारं व्याप्तं येन चराचरम् । तत्पदं दर्शितं येन तस्मै श्रीगुरवे नमः ॥ १७३॥ भवारण्यप्रविष्टस्य दिङ्मोहभ्रान्तचेतसः । येन मे दर्शितः पन्थास्तस्मै श्रीगुरवे नमः ॥ १७४॥ इत्यष्टमन्त्राः । प्रणम्य दण्डवद्भूमावष्टमन्त्रेण चार्चयेत् । गुरोः श्रीपादपद्मं च गन्धपुष्पाक्षतादिभिः ॥ १७५॥ गुरुपादयुतः शिष्यो मस्तके रचिताञ्जलिः । नासापुटं निरीक्षेत काष्ठमौनं समाचरेत् ॥ १७६॥ गुरोराज्ञां दिवानक्तं दासवत्सेवयेन्मुदा । अभिमानो न कर्तव्यो जातिविद्याधनादिभिः ॥ १७७॥ ततस्तेनैव गुरुणा शिष्यसन्तोषितेन च । दीक्षाविध्युक्तमार्गेण सम्यग्दीक्षां समाश्रयेत् ॥ १७८॥ ततोपदिष्टमार्गेण शिवार्चामनुवासरम् । त्रिकालमेककालं वा यथाशक्ति समर्चयेत् ॥ १७९॥ यो दीक्षाते गुरोर्भक्त्या ददाति स्वस्य विग्रहम् । भोगार्थं स्वार्जितं द्रव्यं त्यक्त्वा भोगं स्ववाञ्छितम् ॥ १८०॥ तेन लब्धं परब्रह्म श‍ृणु तात्पर्यसङ्ग्रहम् । सर्वपापविनिर्मुक्त सर्वैश्वर्यसमन्वितः ॥ १८१॥ ब्रह्मलोकादिलोकेषु यथेष्टमनुभूय च । मम प्रसादान्मल्लोके यथेष्टं विचरेत्सदा ॥ १८२॥ कर्मणा मनसा वाचा गुरूणां भक्तवत्सलः । शरीरमर्थं प्राणं च सद्गुरुभ्यो निवेदयेत् ॥ १८३॥ गुरुनिन्दाकरं दृष्ट्वा घातयेदथवा शपेत् । स्थानं वा तत्परित्यज्य गच्छेद्यद्यक्षमो भवेत् ॥ १८४॥ त्रिपुण्ड्रं चैव रुद्राक्षं नित्यार्चनजपं तथा । होमन्यासादि तत्सर्वं दीक्षाहीनेन निष्फलम् ॥ १८५॥ अदीक्षितश्च यो विप्रश्चतुर्वेदधरोऽपिवा । संस्पृशेद्यदि वा लिङ्गं शुनकात्परतो भवेत् ॥ १८६॥ अत्रोक्तमर्थं सकलं गुरुः शिष्यं प्रबोधयेत् । नो चेद्गुरोर्भवेत्पापं तेनाज्ञानेन यत्फलम् ॥ १८७॥ इति श्रीशैवरत्नाकरे गुरुशिष्यलक्षणकथनं नाम नवमोऽध्यायः ॥ मराठी अर्थ (१) आतां गुरुशिष्यांची लक्षणे सांगतो. तसेंच सेवाक्रमही सांगतो. हे ब्रह्मदेवा श्रवण कर. (२) कुलीन, रूपवान्, शांत, मधुरभाषी, गंभीर, सत्य भाषण करणारा, वक्ता, समाधानी, दयावंत, (३) स्नेहाळु, हास्यवदन, ममताळु, बोलका, अनभिमानी, पवित्र, सुस्वभावी, धर्मिष्ठ, सरलस्वभावी, गंभीर आवाजाचा, (४) निर्मत्सर, गुणग्राहक, अत्यंत शांत, इंद्रियनिग्रही, वेदांगांचे अध्ययन केलेला, पुराण स्मृति जाणणारा, (५) सर्व आगमग्रंथांत निष्णात, चांगल्या कुलांतला, मोठा बुद्धिमान्, मंत्रोद्धारांत हुषार, मंत्रार्थ सांगणारा, (६) शिव व गुरु यांवर भक्ति करणारा, शिवाचेच ठिकाणी मनोनिष्ठा ठेवणारा, शिवाच्या पूर्जेत रत असणारा, व शिवाचेंच एकान्त ध्यान करणारा, (७) अशा लक्षणांनी युक्त मनुष्यास गुरु असें म्हणतात. ज्यास आधार नाही, ज्यास आकार नाही, आणवादि मलरहित, निर्विकल्प, (८-९) निर्गुण, निश्चल, सर्वोत्तमपद असा गुरु होय, हे देवाधिदेवा आधाराधेयरहित गुरु आदि व अंतरहित आहे. मनाला, वाचेला, व भावाला गोचर असलेला तो गुरु साक्षात् शिवच होय अन्य नव्हे. (१०) त्याच्या पादव्दयाच्या ठिकाणी चराचर त्रैलोक्य आहे व त्याच्या आंगठ्याच्या टोकांत ६८ तीर्थे आहेत; (११) नक्षत्र व ग्रह यांचे समुदाय त्याच्या टांचांत आहेत; त्याच्या पायाच्या तळव्यांत सप्त समुद्र आहेत व त्याचे वरचे बाजूस आठ कुलपर्वत आहेत. (१२) छत्तीस तत्वे त्याचे पोटऱ्यांत राहतात. परमकारण गुरूचे स्मरण करावे व ध्यान करावें. (१३) गुरु व महादेव शंकर हे एकच होत अशा भावाचे लोक गुरुभक्तीने तिन्ही लोकांत पूज्य होतात. (१४) शिवस्वरूपधारण करून नेहमीं पूजेचा स्वीकार करितो व गुरुरूप धारण करून प्राण्यांचे भवपाश तोडितो. (१५) म्हणून पशुस्वामी जो शिव तो पशुंचा म्हणजे प्राणिमात्रांचा स्वामी होय. पशुपाशांतून मुक्त होऊन गुरूच्या आज्ञेची अपेक्षा करीत असावें. (१६) कल्याणाची इच्छा करणाऱ्यानें त्रिकाल गुरुपूजा करावी गुरु म्हणजे शिव व शिव म्हणजे गुरु असे मानिले आहे. (१७) जसा शिव तशीच विद्या व जशी विद्या तसा गुरु, शिव विद्या व गुरु या तिघांच्या पूजेचे फल सारखेच. (१८) चातुर्वर्ण्यामध्ये गृहस्थाश्रमी स्त्रीपुरुषांचा गुरु गृहस्थाश्रमीच असावा; यति कधीहि असू नये. (१९) व यतींचा यतिच गुरु होय. व पार्वतीसह मी शिवशंकर सर्व लोकांचा गुरु आहे. (२०) हे ब्रह्मदेवा, म्हणून हा सर्व आश्रम्यांचा गुरु होय. याने ज्या प्रतिष्ठा वगैरे क्रिया त्याजकडून करविल्या असता त्या सफल होतात. (२१) हे ब्रह्मदेवा भाऊ, बायका व मुले यांचा एकच गुरु असावा. जसा मी सर्व जगांचा गुरु आहे. (२२) मागे सांगितलेल्या सर्व लक्षणांनी योग्य प्रकारे युक्त असाच केवल गुरु होय, मग तो वृद्ध असो वा तरुण असो. (२३) वयाने महत्व येत नाही तर ज्ञानानेच महत्व येतें म्हणून जो ज्ञानाने वरिष्ठ आहे तोच शिष्याने गुरु करावा. (२४) गुरु शिष्यास ज्ञानदान करीत असल्यामुळे व शिष्यास गुरु सन्माननीय असल्यामुळें शिष्याने गुरूचा सन्मान करावा. (२५) शिष्यानें आपल्या वर्णास सांगितलेले आचार आचरण करावेत, मग तो द्विजाति असो वा शूद्र असो. त्याने पवित्र, सत्यभाषणी गुरुभक्त असे असावे व त्याचे ठिकाणी गर्व व अहंभाव नसावा. (२६) त्याने इच्छाद्वेषरहित असावें, शांत व सर्व जनांना आवडते असावें; व गुरूचे आज्ञेविषयीं तत्पर व सुशील असावें. या सर्व लक्षणांनी जो युक्त त्यास शिष्य म्हणतात. (२७) वर सांगितलेल्या लक्षणांनी मंडित असा गुरु जेथे असेल तेथें शिष्याने स्वतः जाऊन गुरूस साष्टांग नमस्कार घालावा. (२८) व नंतर प्रत्यहीं गुरूची योग्य सेवा करावी; ती सेवा तीन वर्षे किंवा एक वर्ष किंवा सहा महिने (२९) किंवा हे देवेंद्रा गुरु प्रसन्न होईपर्यंत मनाने, वाणीने, शरीराने व धनाने करावी. (३०) गुरुस्वरूपाचे मनांत सतत ध्यान करणे व कोणत्या उपायाने गुरूची सेवा करावी असें चिंतन करणे यास हृच्छुश्रूषा असें ह्मणतात. (३१) गुरुमहाराज काय आज्ञा आहे असे विचारून नंतर आज्ञानुसार कर्म करणे यास वाक्शुश्रूषा असें म्हणतात. (३२) आपल्या बायकामुलांसह वर्तमान समीप वा दूर असलेल्या गुरूकडे जाऊन येऊन आत्मशरीर निवेदन करणे; (३३) त्यास प्रदक्षिणा घालणे नमस्कार करणे, त्याच्या चरणकमलाची योग्य सेवा करणे शुद्ध दुधाने तुपाने वा दह्याने त्याच्या आंगठ्यांस लेप करणे, (३४) नंतर बारीक मुगाच्या पिठाने व ऊनपाण्याने धुवून नंतर वस्त्राने पाणी टिपणे, (३५) बिछाना घालणे, योग्य रीतीने श्रमपरिहार करणे, नखांनी तैलाभ्यंग करणे, शुभदायक स्नान घालणे, (३६) गंध उगाळणे, फुलें, माळा, सुंदर चंदन, शुद्धि करण्याकरितां मृत्तिका व पाणी आणून देणे. योग्य वसतिस्थान दाखविणे. (३७) पूजेची जागा शेणपाण्याने सारवणे. पूजेला फुलें, पाणी योग्य ठिकाणी आणून ठेवणे. (३८) अशी किंवा अशाच प्रकारची दुसरी गृहकृत्ये प्रत्यही करणे यास शारीरसेवा असें म्हणतात. (३९) धान्य, सुवर्ण, पशु, शेत, दासी, दास, वस्त्रे, पलंग, दुसरी भूषणें, आडणी (त्रिपादि), गिंड्या वगैरे (४०) तसेंच चंदनासारखी अंगास लावण्याची सुगंधि द्रव्ये, तशींच केशांस लावण्याची कस्तूरी वगैरे सुगंधि तैलें (४१) घोडे, हत्ती, पालखी, रथ व शुभवस्तु-ही गुरूला सद्भावाने अर्पण करणे यास धनसेवा असें म्हणतात. (४२) जो शिष्य श्रीमान् व सदृढ असेल त्याने आपल्या गुरूची भक्तिपुरस्सर सर्व प्रकारची सेवा करावी. (४३) शारीरिक सेवेवांचून तीन प्रकारची सेवा होत नाही. राजाने दुसऱ्या सेवा कराव्या व स्त्रियांनी सर्व सेवा चांगल्या कराव्यात. (४४) हीन कुलांत उत्पन्न झालेले जे जन गुरुभक्त झाले असतील त्यांनीही आपला हेतु पूर्ण व्हावा म्हणून आपल्या योग्यतेनुसार गुरुसेवा करावी. (४५) दूरदेशी असलेल्या गुरूला राजानें भक्तिपुरःसर आणून त्यास आपले स्थानी बसवून तीन प्रकारची सेवा करवावी. (४६) शिष्याने गुरूस ज्या ज्या प्रिय वस्तु असतील त्या व सुलभ असतील त्या दररोज अर्पण कराव्यात. (४७) गुरूस भेटण्याची इच्छा करणाऱ्या शिष्याने नेहमी त्याजकडे रिकाम्या हाताने जाऊन पाहूं नये. कारण जसा राजा तसा गुरु हे लक्षात असावें. (४८) फल, पुष्प, तांबूल किंवा दुसरी कोणतीही वस्तु एकेक गुरूला अर्पण करून नंतर त्यास नमस्कार करावा. (४९) भक्तिमान् राजाने गुरूला आपले घरी येतांना पाहिले असतां त्याने त्यास सामोरे जावे व उंच आसन द्यावे व त्याचे आज्ञेने आपण खाली बसावें. (५०) उत्तम तांबूल पात्रांत ठेऊन ते त्यास देववावे. नंतर त्यास इष्ट वस्तु देऊन त्याची बोळवण करावी. (५१) बुद्धिमानाने आपल्या गुरूस भोजन घालून मागून आपण जेवावें. गुरूच्या पूर्वी जो जेवतो तो गुरुद्रोही असें मानिले आहे. (५१ टीप : भोगार्थं यां स्त्रियं मोहाद्गुरुर्यद्यभिवांच्छति ॥ भक्त्या तेन गता सा चेत्सर्वपापै: प्रमुच्यते ॥१॥) (५२) जेवणाच्या पूर्वी शिष्याने जेऊं नये, जो शिष्य आपल्या गुरूच्या जेवणानंतर जेवतो तो पुण्यवान् होय. (५३) कंदमूल फळे वगैरे जी नवीं नवीं व अपूर्व तोंडीलावणी असतील ती गुरूच्या अगोदर कोणीहि खाऊ नयेत. (५४) जो शिष्य गुरूने जेवून पात्रांत टाकिलेले अन्न प्रीतीने खातो तो सर्व पापांपासून निःसंशय मुक्त होतो. (५५) गुरूने चाऊन दिलेला विडा शिष्याने आवडीने खावा म्हणजे त्याचे अंतःकरण शुद्ध होते. (५६) आपल्या आचार्याचे दोन्ही पाय धुतलेले पाणी जो सर्वकाल पितो व भक्तीने धारण करितो तो सर्व पापांतून मुक्त होतो. (५७) विवाहाप्रमाणे सर्व शुभकार्यांत शिष्यानें गुरूस वस्त्रे व सुवर्णाच्या अंगठ्या देऊन भक्तीने त्याची पूजा करावी. (५८) व तीहि सभापूजा करण्याचे पूर्वी करावी; नंतर क्रमवार योग्य सभासदांची पूजा करावी. (५९) बुद्धिमान् शिष्याने सभेमध्ये गुरूची पूजा कधीहि करूं नये. ज्याची बोटें शुद्ध आहेत व ज्यास आसनावर बसविले आहे अशा गुरूचे गंध, पुष्प, अक्षता यांनी पूजन करावें।( ६०) नंतर आपल्या गुरूला वस्त्रे व सोन्याच्या आंगठ्या द्याव्यात; कार्तिकी चतुर्दशीस, विषुयोगी, दोन्ही संक्रमणकाली (६१) ग्रहणसमयीं शिष्याने गुरूची मोत्यांनी व वस्त्रांनी पूजा करावी; दरिद्र्यानेही याप्रसंगी यथाशक्ति पूजन करावें. (६२) शिष्याने मिळालेल्या धनानें गुरूचे अवश्य पूजन करावे व शिष्य दरिद्री असेल तर त्याने वर्षातून एकदा तरी पूजन करावे. (६३) डोळ्यांस चांगले दिसणारे वस्त्र अंगावर घेण्यास द्यावे. चंदन, अक्षता, पुष्प, तांबूल, सुवर्ण (६४) वस्त्र ही पात्रांत ठेवून द्यावीत हाताने देऊ नयेत. न्यायाने व्यवहारांत मिळविलेले सुवर्णादि द्रव्य (६५-६६) उत्तम घर देखील गुरूला द्यावें, व व्यवहारामध्ये जे कमी किंमतीचे असेल तें सुवर्ण गुरूला फल इच्छिणाऱ्या शिष्याने कधीहि दान देऊ नये. नवीन, घट्टमूट, नरम पांढरें, दिसण्यांत चांगले असें, (६७) आच्छादनास वस्त्र जाणत्या शिष्याने गुरूला द्यावें; फाटके तुटके, जळालेले, जुनें, आपण वापरलेलें (६८) उंदरांनी वगैरे खाल्लेले वस्त्र जाणत्याने गुरूला देऊ नये. खरबरीत वाईट कर्माने युक्त, निळ्यासूताचे केलेलें (६९) विरविरीत, पट्टवत्राहून दुसरे वस्त्र गुरूला कधीहि देऊ नये. पट्टदेवांग वगैरे जी दुसरी रेशमी वस्त्रे (७०) ती चित्रविचित्र वस्त्रे सावकाराने गुरूस द्यावीत. अत्युत्तम, बारीक वस्त्र, वा दुसरी वस्तु, आणि फुलें (७१) आपल्या गुरूच्या पुढे शिष्याने धारण करूं नयेत. जर शिष्य गरीब असेल व गुरु समृद्ध असेल तर त्याने त्याला सहाय्य करावें. (७२) शिष्याने यथाशक्ति गुरूला आसनादिक द्यावें व गुरूला पाहतांच भक्तीने नमस्कार करावा. (७३) हे चतुरानन शंकरसांनिध्यावांचून अन्यत्र गुरुसमक्ष शिष्याने आईबापांना आपल्या बांधवांना, ब्राह्मणांना, तपस्व्यांना, (७४) नमस्कार करूं नये. गुरु अगर शंकर यां समक्ष जो अज्ञानाने वा ज्ञानाने यांना नमस्कार करील. (७५) तो पापात्मा त्यांसह नरकांत पडतो. शिष्य श्रीमान तपोवेष धारण करणारा, शास्त्र जाणणारा, कुलीन, शुचि असला तरी (७६) त्याने न लाजतां गुरुसंनिध नमस्कार घालावा. गुरूची बायको गुरूचा भाऊ, गुरूचे पुत्र ही गुरुसमान होत. (७७) गुरु हाच बाप, गुरु हीच आई व गुरुच साक्षात् शिव होय. गुरूचे वडील भाऊ, धाकटे भाऊ, गुरूची मुलें, गुरूच्या घरच्या श्रेष्ठ स्त्रिया, (७८) व गुरूच्या बायका वयाने लहान असतांही शिष्यास वंद्य होत. (७९) गुरूच्या स्त्रिया वयाने लहान असतांही नमस्कारास योग्य होत. आपल्या पूज्य अशा मतशास्त्रांचे आराधन करून (८०) व घरांत गुरूस तीनवार नमस्कार करून त्याची स्तुति करावी. गुरूला दुरून पाहिले असतांही जो अनादराने चालता होईल. (८१) तो शंभर वेळां कुत्र्याचा जन्म पावेल व चांडालाच्या घरी वास करील. क्षत्रिय वगैरे वर्णांतील लोक वयाने थोर असतांहीं ब्राह्मणाला ते वंद्य नाहींत. (८२) त्याचप्रमाणे वैश्यास शूद्र वंद्य नाहीत असें जात्यानुक्रमाने मानिले आहे. श्रेष्ठ जातींतील मनुष्य स्वजातीपेक्षा श्रेष्ठ होयं असा नियम आहे. (८३-८४) स्वजातीपेक्षा हीनजातींतील पुरुष वयाने थोर असला तरी तो कनिष्ठच समजावा. सर्व उपचारांमध्ये प्रियभाषण व नमस्कार करणे हे दोन उपचार अत्यंत शोभादायक आहेत यांशिवाय बाकीचे सर्व व्यर्थ असे मानिले आहे. पहिल्या दारापासून आरंभ करून शेवटचे द्वारापर्यंत क्रमाने (८५) बुद्धिमान् मनुष्याने प्रदक्षिणा करीत असतां लांब पाऊल टाकू नये, जलद चालू नये; किंवा दुसऱ्या मनुष्यांशी बोलू नये (८६) चांगल्या बुद्धिमान् मनुष्याने शिवालयाची छाया ओलांडूं नये. पावलावर पाऊल टाकीत, हात न हालवितां (८७) तोंडाने देवाची स्तुति करीत, हृदयांत ध्यान करीत चतुरंग प्रदक्षिणा शिष्याने चार प्रकारच्या भक्तीने युक्त होऊन करावी. (८८) याप्रमाणे गुरूला व शिवाला जो प्रदक्षिणा करितो त्यास प्रतिपावलास अश्वमेध यज्ञाचें फल मिळते. स्वामि, भट्टारक, आचार्य, देव, श्रीगुरु या नांवांनी (८९) शिष्याने गुरूस संबोधावें. दुसऱ्या कोणत्याही नांवानों कधीही संबोधू नये. शिष्याने गुरूसंबंधी ᳚तूं᳚ या पदाचा कधीही उपयोग करूं नये. (९०) त्याची आज्ञा उल्लंघू नये. त्याजबरोबर बसू नये. सर्व देवतांचे वसतिस्थान गुरु होय व गुरु सर्व मंत्राचे स्थान होय. (९१) हा माझा आचार्य नाही असे मनांत जो उपेक्षापूर्वक वागवितो तो पापी शिष्य नरकाला जातो, (९२) माझ्या ठिकाणची त्याची भक्ति तसेच त्याचे पूजन ही व्यर्थ होत. आपल्या गुरूच्या पुढे शिष्याने दुसऱ्या पुरुषाचें गुणानुवर्णन करू नये. (९३) गुरूस असह्य असे कधीही भाषण करूं नये, अथवा दुसऱ्याशी गुरूसमक्ष परस्पर भाषण करू नये. आपली आई, बाप, बायको, भाऊ, संबंधी, मुलगा यांत (९४) गुरुद्वेष करणारे जे शिष्य असतील ते प्रियकर असले तरी त्यांचा त्याग करावा. गुरूच्या ठिकाणी मान अथवा गुरूकडून आपला भाषणगौरव व्हावा अशी जो शिष्य इच्छा करितो (९५) तो महापातकी जाणावा; तो दुर्गतीला जातो. कोणा एकाद्या कारणाने गुरु शिष्याचा द्वेष करूं लागला तर (९६) शिष्याने स्वतः पूर्वीप्रमाणे चांगल्या भक्तिभावाने त्याची चाकरी करावी. जो शिष्य गुरूची नेहमी स्तुति करितो व त्यास आवडती वस्तु देतो व (९७) गुरूच्या स्नेह्यांशी स्नेह करितो तो नेहमी मुनिसारखा होय. जो शिष्य गुरूची निंदा करितो व त्याचे द्रव्य हरण करितो (९८) व त्याच्या शत्रूंशी स्नेह करितो तो चांडालासम होय असें मानिले आहे. गुरूसंबंधी कोणत्याहि निंदित पदार्थाची मोठ्या यत्नाने (९९) त्यागबुद्धि मनांत न आणतां शुश्रूषा करावी व तसे केले असता त्या शिष्यास सुखप्राप्ति होते. जाणे, उभे रहाणे, निजणे, जेवणे, जे काय करणे ते (१००) मग तें परोक्ष असो वा अपरोक्ष असो गुरूच्या आज्ञेनें करावें. गुरुगृहीं गुरूसमोर आसनावर बसू नये. (१०१) कारण गुरु साक्षात् शिव शंकर होय; त्याचें घर म्हणजे शिवमंदिर होय. आसन वाहन (घोडे, गाडी वगैरे) वस्त्र अलंकार, बिछाना, (१०२) ही ज्या शिष्यास गति (मोक्ष प्राप्ति ) व्हावी अशी इच्छा आहे त्याने गुरूसारखी करूं नयेत; शिष्याने गुरु असलेल्या गांवांत प्रवेश केल्याबरोबर वाहन वगैरे सर्व (१०३) सोडावे व गुरुगृहाजवळ आल्याबरोबर पादुकाही सोडाव्यात; खोटें, अप्रिय, गुह्य भाषण करू नये. (१०४) विचारिल्यावांचून बोलू नये व बोलणे झाल्यास गुरूपुढे राहून बोलू नये. गुरूपेक्षा उच्चासनावर बसू नये व गुरूपेक्षां उच्चस्थानी जाऊ नये; (१०५)गुरूला नमस्कार करून तोंड न फिरवितां मागच्यामागे जावें. दीक्षा, व्याख्या, प्रमत्त भाषण वगैरे गुरूपुढे सोडून द्यावें. (१०६) अति हंसणे अवष्टंभ, खेळ, पाय लांब करणे, थट्टा, ऐटीचा पोशाख, पलंग, दांत घासणे, (१०७) टिचक्या वाजविणे, पाय धुणे, प्रतिकूल भाषण ही गुरुसंनिध करूं नयेत. (१०८) गुरूचे पात्र, स्नान जल, छाया, फुले, त्याची उपकरणे यांस शिष्याने भक्तिहीन होऊन पायाने स्पर्श करूं नये. किंवा ती ओलांडूं नयेत. (१०९) पादुका, आसन, बिछाना वगैरे ज्या ज्या वस्तूंचा गुरूनें स्वीकार केला असेल त्या सर्व वस्तूंस नमस्कार करावा. पायाने त्यांस कधीहि स्पर्श करूं नये. (११०) गुरुगृहांतील उंबरा, गेषणी, चूल, तर्जनी, खंडनी, मडकी, दिवा, सूप. खाट, जाते, (१११) लेपनी (पोतेरें), मुसळ यांस पायाने स्पर्श करूं नये. भपक्याचा पोशाख धारण करूं नये; अलंकार कधीहि घालू नयेत. (११२) गुरूच्या आश्रमामध्ये जोडे आणूं नयेत. विवाहित, राखेली, प्रेमपात्र झालेली, विकत घेतलेली, (११३) एकवार संभोगिलेली; अशा पांच प्रकारच्या गुरुस्त्रिया शिष्यांस वंद्य, पूज्य व माननीय आहेत. कारण जसे गुरु सर्व प्रकारे सन्माननीय आहेत तशाच त्याच्या शक्तीहि आहेत. (११४) दुसऱ्याचे शिवलिंग धारण करूं नये व शिवलिंगाचे बाहेर पूजन करूं नये; वाईट संगति, वाईट भाषण, दुष्ट स्वभाव, दुर्गुण, (११५) दुराचरण ही दुरूनच त्याग करावीत. आपल्या देशांत किंवा दुसऱ्या देशांत वीस योजनांपर्यंत असलेल्या (११६) गुरूची प्रत्येक वर्षी शिष्याने भेट घ्यावी. यात्रा तीन प्रकारची आहे. गुरुयात्रा, देवयात्रा व तीर्थयात्रा. (११७) ह्या तीन प्रकारच्या यात्रांमध्ये गुरुयात्रा अधिक फलदायक आहे. गुरुभेटीकरितां जो भक्तीने यात्रा करितो (११८) तो पुण्यदेही व सर्व आगमांस प्रिय असा मानिला जातो. जर कोणी यात्रा करण्यास अशक्त असेल तर त्याने आपणांस जें द्रव्य प्रिय असेल (११९) ते आपल्या मनुष्याबरोबर देऊन त्या शहाण्या मनुष्याने भक्तीने त्यास आपल्या गुरूकडे पाठवावें. गुरूची आज्ञा असो वा नसो, शिष्य दूर असो वा जवळ असो, (१२०) शिष्याने आपल्या गुरूला प्रिय असे आचरण करीत असावे. दूर असलेल्या गुरूंना कार्यविज्ञापना करण्याकरितां पाठवावयाचे (१२१) पत्रास सहा घड्या असाव्या असे विद्वानांचे मत आहे. शिष्यांना, समानांना, मित्रांना, राजांना (१२२) पाठवावयाच्या पत्रांस अनुक्रमें दोन, तीन, चार, पांच घड्या असाव्यात. जें ताडपत्र बळकट, नरम, सरळ, साग्र, व दुप्पट केलेले (१२३) व मृदु असेल तें पत्राचा लेख लिहिण्यास योग्य होय. कडकडीत, मलीन, वांकडे, टोंक नसलेले, फाटलेले (१२४) ते पत्र लेख लिहिण्यास अयोग्य होय. मात्रा, विसर्ग, अनुस्वार, व अक्षरें ज्यांत स्पष्ट आहेत. (१२५) असें पत्र असावें. अक्षरे कधीही गाळू नयेत. संदिग्ध, अक्षरें गाळलेले, योग्य भाषण नसलेलें (१२६) पत्र कधीही लिहूं नये, ज्यांत पोक्त भाषा, विनय, स्तुति व प्रार्थना ही आहेत. (१२७) असे पत्र गुरूकडे पाठवावे. आपल्या स्थलापासून सभोंवार पांच योजनांच्या अंतरांत गुरु असल्यास (१२८) दीक्षा प्रतिष्ठादि सर्व क्रिया गुरुवांचून शिष्याने करवू नयेत. गुरूच्या आज्ञेवांचून जो शिष्य शिष्यसमूह जमवील त्याचे पूर्वीचे केलेले सर्व अदृष्ट नाश पावेल. (१२९) तो पापात्मा शिष्य गुरुद्रोही व शिवद्रोही होऊन मरणानंतर मोठ्या भयंकर नरकामध्ये सर्वदा वास्तव्य करील. (१३०) पूर्वीचा योग्य गुरु टाकून जो शिष्य क्षुद्रक्रिया करणाऱ्या दुसऱ्या गुरूचा आश्रय करील तो दुर्गतीला जाईल, (१३१) मारण, उच्चाटण, द्वेष, मोहन, स्तंभन. द्वेषाकर्षण, ही सहा क्षुद्रकर्मे मानिली आहेत. (१३२) ज्वर वगैरे सर्व रोगसंबंधी मंत्र, तंत्र, प्रतिक्रिया, भूत, प्रेत, पिशाच, ब्रह्मराक्षस (१३३) यांसंबंधी सर्व क्रिया क्षुद्र मानिल्या आहेत. श्रेष्ठ गुरूनें क्षुद्रकर्मे कधीही आचरण करूं नयेत. गुरुलक्षणहीन जो गुरु तो शिष्यांचा खोटा गुरु होय. (१३४) द्रव्यादि अपेक्षा धरून जो गुरु दीक्षा करितो तो रौरव नरकाला जातो. गुरु मरण पावला असतां लिंगधारण करणाऱ्या शैव ब्राह्मणांचे कोणतें कर्तव्य म्हणून सांगितले आहे. (१३५) आपल्या उत्कर्षाकरितां शिष्याने जी क्रिया करावयाची ती ही की, गुरु मरणकाली जवळ असलेल्या सर्व शिष्यांनी (१३६) केशवपन करावे. त्याचप्रमाणे दूर असलेल्यांनीही गुरुकाल झालेल्याचे ऐकून वपन करावे. तसेच त्याच्या मुलांसहवर्तमान तर्पण वगैरे करावें (केशवपन, तर्पणादिकांशिवाय बाकी सर्व क्रिया लिंगिब्राह्मणास इतरांसारख्या ). (१३७) नंतर सर्वांनी शंकराची वेगळाली पूजा करावी. ती पूजा चांगल्या भक्तीने गुरुप्रीत्यर्थ करावी. श्रीमंतानें ऐश्वर्याने पूजन करावें. (१३८) सर्वांनी एकत्र धनसंग्रह करून एके दिवशी गुरुतिथी पाळावी. ज्या महिन्यांत ज्या तिथीस गुरूचा काल झाला असेल (१३९) त्या दिवशी त्या करितां तीर्थसेवन निरनिराळे करावें. ज्या महिन्यांत ज्या तिथीस गुरु मरण पावला (१४०) त्या दिवसास गुरुपर्व असे नाव आहे. शिष्याने गुरुपर्वणीस यथाशक्ति भक्तीने भक्तांस (१४१) घृत, अपूप, तोंडीलावणी यांसह परमान्न भोजन घालावे. त्याप्रसंगी अकरा भक्तांस भोजन घालणे उत्तम, दहांस भोजन घालणे मध्यम व नवांस जेवण घालणें अधम असे मानिले आहे. (१४२) अथवा मिळतील तितक्या शांत, सच्छीलवंत, श्रोत्रिय शिवपूजकांना यथाशक्ति भोजन घालावे. (१४३) वरील प्रकारचेच ब्राह्मण गुरुप्रीत्यर्थ भोजनास योग्य मानिले आहेत व याहून इतर भोजनास योग्य मानिले नाहीत, पूर्वरात्री पूर्वोक्त ब्राह्मणाचे घरी जाऊन (१४४) त्यांचे हातांत विडा देऊन शिष्यानें भक्तिपूर्वक आमंत्रण द्यावे. आपले आन्हिक झाल्यावर शिष्याने ज्यांचे नित्यकर्म झाले आहे. (१४५) अशा सर्व आमंत्रण केलेल्या लोकांना बोलावून आणून शेणाने सारवलेल्या शुद्ध जागी आसनावर बसवावें. (१४६) गंध, पुष्प, अक्षता वगैरेनी षडंगपूजा करावी. पहिल्यांदा उत्तरेकडे तोंड करून बसलेल्या एकाच्या पायांवर (१४७) गंधादियुक्त ओंजळभर पाणी घालावे परंतु तो भक्त जितेंद्रिय असावा. नंतर क्रमशः दुसऱ्या भक्तांचे पादांगुष्ठ प्रक्षालन करावें. (१४८) नंतर अतिरम्य व पवित्र अशा जेवावयाचे जागी यांना यथाक्रम पूर्वेकडे तोंड करून आसनावर बसवावें. (१४९) अथवा उत्तरेकडे तोंड करून बसवावें. परंतु दुसऱ्या कोणत्याही दिशेकडे तोंड करवू नये. नंतर श्रीमंतानें वस्त्र, सुवर्णाच्या अंगठ्या, गंध वगैरेंनी पूजन करावे. (१५०) गरिबानें यथाशक्ति भक्तीने पूजन करावें, खीर, वडे, तूप, दही, भात, चटण्या (१५१) यांनी रगडून ब्राह्मणांना जेऊ घालावे. नंतर पूर्वीप्रमाणे विडे देऊन यथाशक्ति दक्षिणा द्यावी. (१५२) प्रदक्षिणा घालून नमस्कार करून, क्षमा करा असे त्यांना ह्मणावे. याप्रमाणे गुरु करिता जो शिष्य भोजन वगैरे घालतो तो (१५३) सर्व पापांपासून मुक्त होऊन इहपरलोकी सुखी होतो. भक्तांचा अभाव असेल तर त्याकरितां महादेवाचे पूजन करावें. (१५४) व भक्तांचे सर्व जेवण शिवार्पण करावे. दूरदेशी असलेल्या शिष्याने गुरुतिथीचे दिवशी, (१५५) सूर्य कन्याराशीस आला असतां, दर्शकाळी गुरुतिथि पाळावी. या पृथ्वीतलावर जितके समृद्ध शिष्य जिवंत असतील (१५६) तितक्यांनी प्रत्येक वर्षी चांगल्या भक्तीने भक्तांना जेऊ घालावें. जो गुरूचा दृढ भक्त आहे त्यास इहपरलोकी (१५७) हे ब्रह्मदेवा काहीहि दुर्लभ नाही सर्व काही सुलभ आहे. फार काय सांगावें. गुरुदेव हा साक्षात महेश्वर होय. (१५८) जो कोणी गुरूचा भक्त असेल तो उत्तम पदास जातो. स्कंदपुराणांत सांगितले आहे की, गुरूची सेवा करावी, गुरुवचनाप्रमाणे वागावें. (१५९) नेहमी गुरूवर चित्त ठेवून असावें. गुरूची आज्ञा उल्लंघन करू नये. शिष्याने गुरूच्या पायांचे पाणी पिऊन गुरूचे उष्टें खावें. (१६०) गुरुमूर्तीचे नेहमीं ध्यान करावें, गुरुनामाचा जप करावा व गुरुपादकमलाचे, हे महेश्वरी गौरि नेहमी ध्यान करावें. (१६१) जो त्याचेंच नेहमी स्मरण करितो, तो निःसंशय मुक्त होय. याकरितां शिष्याने सर्व प्रयत्नाने सद्गुरूची सेवा करावी. (१६२) शिवार्चनकाली त्याचा आपल्यास अगर आपला त्यास संपर्क झाला असतां सुवर्णाचा अग्नीशी संपर्क झाला असतां जसा सुवर्णाचा मल नाश होतो. (१६३) तसेच गुरुसंपर्कानें मनुष्याचे पाप नष्ट होते. पाप्यांचा संसर्ग घडल्यास जसें त्याच्या पापाचे फल भोगावे लागते (१६४) तद्वत आचार्यांचे संसर्गाने सद्धर्म फलप्राप्ति होते. जसा प्रदीप्त अग्नि स्पर्श झालेल्या लाकडास जाळतो. (१६५) तसा गुरु संतोषित झाला असता त्याचे ठिकाणी मन ठेवणाऱ्यांचे पाप जाळून टाकितो. याप्रकारे शिष्याने आचार पालन करून नेहमी जप करीत राहावे. व गुरूस इष्ट होऊन मंत्र दिला जाण्यास योग्य व्हावें. (१६६) नंतर शिष्याने उठून कुसुमांनी ओंजळ भरून गुरुपादाजवळ जावे व गुरूस नमस्कार करावा. (१६७) चैतन्यस्वरूपी, शाश्वत, नित्य, अनंत, निरंजन, नादबिंदुकला याहून अतीत अशा श्रीगुरूस नमस्कार असो. (१६८) ज्ञानशक्तीवर आरोहण केलेला, तत्वमाला धारण करणारा, भोग व मुक्ति देणारा, असा जो श्रीगुरु त्यास नमस्कार असो. (१६९) ब्रह्मा, विष्णु, रुद्र, ईश्वर, सदाशिव, हे ज्याचे गर्भवासी झाले, त्या श्रीगुरूस नमस्कार असो. (१७०) गुरु हाच ब्रह्मा, विष्णु, व तेजस्वी महेश्वर होय. व गुरु हेच परब्रह्म, त्या गुरूस नमस्कार असो. (१७१) अज्ञानरूपी अंधळ्याचा ज्ञानरूपी अंजनशलाकेने ज्याने डोळा उघडिला त्या श्रीगुरूस नमस्कार असो. (१७२) अनेक जन्मांचे कर्मरूपी इंधन (जळण ) ज्ञानरूपी अग्नीच्या प्रतापाने जाळून टाकणारा जो श्रीगुरु त्यास नमस्कार असो. (१७३) ज्याने हैं चराचर जग व्यापून टाकिलें आहे व जो तत्पदवाच्य आहे. त्या श्रीगुरूस नमस्कार असो. (१७४) भवरूपी अरण्यामध्ये शिरलेल्या व मोहाने भ्रान्तचित्त होऊन दिशाभूल झालेल्या मला ज्याने मार्ग दाखविला त्या श्रीगुरूस नमस्कार असो (१७५) हे आठ मंत्र होत. जमिनीवर साष्टांग नमस्कार घालून अष्ट मंत्रांनी व गंधपुष्पाक्षतादि करून गुरूच्या पायांचे पूजन करावें. (१७६) शिष्यास गुरुपायांची जोड झाल्यावर शिष्याने हात जोडून असावे व नाकाकडे दृष्टि द्यावी व मौन धारण करावे. (१७७) गुरूची आज्ञा अहोरात्र दासाप्रमाणे आनंदाने बजावीत जावी. व जाति, विद्या आणि धन यांचा अभिमान बाळगू नये. (१७८) नंतर त्याच गुरूने शिष्याकडून संतुष्ट होऊन दीक्षाविधींत सांगितलेल्या रीतीप्रमाणे योग्य दीक्षा द्यावी. (१७९) व शिष्याने नंतर सांगितलेल्या मार्गाने दररोज शिवार्चन तीन वेळां किंवा एक वेळां यथाशक्ति करीत असावें. (१८०) दीक्षा घेतल्यानंतर जो शिष्य आपला देह गुरुभक्तीने गुरूस अर्पण करितो किंवा आपले इच्छितभोग टाकून आपण मिळविलेले द्रव्य गुरूस भोगण्याकरितां देतो (१८१) तो परब्रह्म मिळवितो।तात्पर्य इतकेच की, तो सर्व पापांपासून मुक्त होऊन व सर्वैश्वर्यभरित होऊन (१८२) ब्रह्मादि लोकांत यथेष्ट सुख भोगून माझ्या कृपेने माझ्या लोकांत यथेष्ट संचार करितो. (१८३) कर्मानें, मनाने, वाणीनें गुरुभक्त शिष्याने स्वशरीर, अर्थ व प्राण सद्गुरूंना द्यावेत. (१८४) गुरुनिंदा करणारे काही दिसल्यास त्यांचा घात करावा किंवा त्यांस शाप द्यावा व असें करण्याचे सामर्थ्य नसल्यास स्थानत्याग करून जावें. (१८५) त्रिपुंड्र, रुद्राक्ष, नित्य शिवपूजन, जप, होम, न्यास वगैरे ही सर्व दीक्षा नसल्यास व्यर्थ होत. (१८६) चतुर्वेद जाणणारा ब्राह्मण असून जर तो दीक्षाविहीन असून लिंगास शिवेल तर तो कुत्र्याहूनही निंद्य होय. (१८७) येथे सांगितलेला सर्व अर्थ गुरुनें शिष्यास सांगावा. न सांगितल्यास त्याचे अज्ञानाने उत्पन्न होणारे पापरूपी फल गुरूस भोगावे लागेल. याप्रमाणे श्रीशैवरत्नाकरग्रंथांतील गुरुशिष्यलक्षणकथननामक नववा अध्याय पुरा झाला. Encoded and proofread by Manish Gavkar
% Text title            : Gurushishya Lakshanam, Qualities of a Guru and a Disciple
% File name             : gurushiShyalakShaNam.itx
% itxtitle              : gurushiShyalakShaNam (shivaratnAkarAntargaram sArtham marAThI)
% engtitle              : gurushiShyalakShaNam
% Category              : misc, advice, gurudev
% Location              : doc_z_misc_general
% Sublocation           : misc
% SubDeity              : gurudev
% Language              : Sanskrit
% Subject               : philosophy/hinduism/religion
% Proofread by          : Manish Gavkar
% Description/comments  : with Marathi meaning
% Indexextra            : (Scan)
% Latest update         : October 31, 2022
% Send corrections to   : (sanskrit at cheerful dot c om)
% Site access           : https://sanskritdocuments.org

This text is prepared by volunteers and is to be used for personal study and research. The file is not to be copied or reposted for promotion of any website or individuals or for commercial purpose without permission. Please help to maintain respect for volunteer spirit.

BACK TO TOP
sanskritdocuments.org