हेडगवार केशवाष्टकम्

हेडगवार केशवाष्टकम्

हिन्दुर्विशाल गुणसिन्धुरपीहलोके बिन्दूयते विघटितो न करोति किञ्चित् सत्संहथिं घतयिथुं जननं यदीयं तं केशवं मुहुरहं मनसास्मरामि ॥ १॥ भव्यं वपुस्मित मुदारमुदग्रमोजः सस्नेह गद्गथवचो मधुरं हितं च । वात्सल्यपूर्णममलं हृदयं यदीयं तं केशवं मुहुरहं मनसास्मरामि ॥ २॥ सङ्घे कलौ भवति शक्ति रितिप्रसिद्धं जानति हिन्दुजनता नतु तत् कथञ्चित् । सम्यक् विनेतुमिहतत् हुतवन् वपुर्यः तं केशवं मुहुरहं मनसास्मरामि ॥ ३॥ शुद्रं न किञ्चिदिह नानुपयोगी किञ्चित् सर्वं हि सङ्घदितमत्र भवेत् भलय । इत्थं जनं विनयतिस्मनिरन्तरं यः तं केशवं मुहुरहं मनसास्मरामि ॥ ४॥ आर्याक्षितेरिह समुद्धरणाय दास्यत् दास्यमि देहमिह सन्खदनं विधातुम् । निश्चित्य भीष्ममचरत् सततं व्रतं यः तं केशवं मुहुरहं मनसास्मरामि ॥ ५॥ यो डाक्टरेति भिषजां पदमदधनो विज्न्जतवन् भरतभूमि रुजं निदानम् । सङ्घौषधं समुतपदि नवं च येन तं केशवं मुहुरहं मनसास्मरामि ॥ ६॥ एको बहु किल भवेयमितीश्वरेच्छा सैवभवेत् सततमेव परायदन्ताः । एकश्चयो विहितवानिह सङ्घसर्गं तं केशवं मुहुरहं मनसास्मरामि ॥ ७॥ ऐशं हि कार्यमिदमित्यवगत्य सम्यक् सङ्घ कृतौ घृतमिवर्पयदयुरज्यम् । यो जीर्नदेहमजहन्नवतं समेतुं तं केशवं मुहुरहं मनसास्मरामि ॥ ८॥ अष्टकं केशवस्येदं प्रातर्नित्यं पठन्तिये । सङ्घकार्येण काठिण्यं तेषां भवति कर्हिचित् ॥ मराठी भावार्थ हिंदूंच्या विशाल गुणरूपी सागराला जो या जगात बिंदूंप्रमाणे जोडतो आणि किंचितही विघटन करत नाही, सज्जनांचे संघटन करण्यासाठी ज्याचा जन्म आहे त्या केशवाचे मी पुन्हा पुन्हा मनाने स्मरण करतो ॥ १॥ भव्य शरीर, उदार स्मित, आत्यंतिक तेज; स्नेहपूर्ण , गद्गदीत, मधुर आणि हितकारक वाणी, वात्सल्यपूर्ण आणि निर्मळ हृदय ज्याचे आहे त्या केशवाचे मी पुन्हा पुन्हा मनाने स्मरण करतो ॥ २॥ कलियुगात संघटनाच शक्ती आहे, हे प्रसिद्ध आहे ते हिंदू लोकांना कसे बरे माहीत नाही? ते योग्यप्रकारे उपदेशन करण्यासाठी ज्याने शरीर धारण केले त्या केशवाचे मी पुन्हा पुन्हा मनाने स्मरण करतो ॥ ३॥ इथे काहीही शूद्र नाही, काहीही निरुपयोगी नाही इथे सर्वच संघाच्या उपयोगाचे आणि फलदायी होईल असे जो लोकांना नेहमी शिकवत असे त्या केशवाचे मी पुन्हा पुन्हा मनाने स्मरण करतो ॥ ४॥ आर्यभूमीचा पारतंत्र्यातून उद्धार करण्यासाठी मी हा देह संघटना करण्याकरिता अर्पण करेन असा निश्चय करून ज्याने भीष्मव्रताचे आचरण केले त्या केशवाचे मी पुन्हा पुन्हा मनाने स्मरण करतो ॥ ५॥ जो ``डाॅटर'' अशी वैद्यक पदवी धारण करणारा होता त्याने भरतभूमीच्या वेदनेचे निदान जाणले (आणि) संघरुपी औषध निर्माण केले व योजले त्या केशवाचे मी पुन्हा पुन्हा मनाने स्मरण करतो ॥ ६॥ ``एक असून अनेक होईन'' ही ईश्वराची इच्छा आहे शेवटपर्यंत लोकांची सेवा घडावी हा एक निश्चय करून (ज्याने)संघ निर्मिती केली त्या केशवाचे मी पुन्हा पुन्हा मनाने स्मरण करतो ॥ ७॥ ``हेच कार्य आहे'' (इतिकर्तव्य आहे) असे चांगल्या प्रकारे ओळखून संघरुपी यज्ञामध्ये तुपाप्रमाणे ज्याने आपल्या आयुष्याची आहुती दिली ज्याने जीर्ण झालेल्या देहाचा त्याग (जणू) नवीन देहप्राप्ती करता केला त्या केशवाचे मी पुन्हा पुन्हा मनाने स्मरण करतो ॥ ८॥ हे केशवाचे अष्टक रोज सकाळी जे पठण करतात त्यांना संघकार्यात कधीही काठीणता येत नाही NA
% Text title            : keshavAShTakam for RSS Adya Sarasanghachalak heDagevAra
% File name             : heDagevArakeshavAShTakam.itx
% itxtitle              : keshavAShTakam (heDagevAra)
% engtitle              : heDagevAra keshavAShTakam
% Category              : misc, sanskritgeet
% Location              : doc_z_misc_general
% Sublocation           : misc
% Language              : Sanskrit
% Subject               : philosophy/hinduism/religion
% Indexextra            : (Audio, Info)
% Latest update         : October 20, 2019
% Send corrections to   : (sanskrit at cheerful dot c om)
% Site access           : https://sanskritdocuments.org

This text is prepared by volunteers and is to be used for personal study and research. The file is not to be copied or reposted for promotion of any website or individuals or for commercial purpose without permission. Please help to maintain respect for volunteer spirit.

BACK TO TOP
sanskritdocuments.org