राम कृष्ण हरि जय जय भावाने म्हणा
राम कृष्ण हरि जय जय भावाने म्हणा ॥ ध्रु.॥
स्थिती काल देश असो कांही कां ना ।
राम कृष्ण हरी जय जय भावाने म्हणा ॥ १॥
रूप वर्ण वेष असो कांही कां ना ।
राम कृष्ण हरि जय जय भावाने म्हणा ॥ २॥
जात पात गोत असो कांही कां ना ।
राम कृष्ण हरि जय जय भावाने म्हणा ॥ ३॥
आचार विचार उच्चार असो कांही कां ना ।
राम कृष्ण हरि जय जय भावाने म्हणा ॥ ४॥
नीति कीर्ति वृत्ती असो कांही कां ना ।
राम कृष्ण हरि जय जय भावाने म्हणा ॥ ५॥
योग भोग रोग असो कांही कां ना ।
राम कृष्ण हरि जय जय भावाने म्हणा ॥ ६॥
त्याग याग राग असो काही कां ना ।
राम कृष्ण हरि जय जय भावाने म्हणा ॥ ७॥
संग रंग ढंग असो कांही कां ना ।
राम कृष्ण हरि जय जय भावाने म्हणा ॥ ८॥
ऋद्धि सिद्धी बुद्धी असो कांही कां ना ।
राम कृष्ण हरि जय जय भावाने म्हणा ॥ ९॥
शक्ती युक्ती भक्ती असो कांही कां ना ।
राम कृष्ण हरि जय जय भावाने म्हणा ॥ १०॥
ध्येय देय गेय असो कांही कां ना ।
राम कृष्ण हरि जय जय भावाने म्हणा ॥ ११॥
ज्ञान ध्यान भान असो काही कां ना ।
राम कृष्ण हरि जय जय भावाने म्हणा ॥ १२॥
हाव भाव गांव असो कांही कां ना ।
राम कृष्ण हरि जय जय भावाने म्हणा ॥ १३॥
धर्म कर्म वर्म असो कांही कां ना ।
राम कृष्ण हरि जय जय भावाने म्हणा ॥ १४॥
धन जन मन असो कांही कां ना ।
राम कृष्ण हरि जय जय भावाने म्हणा ॥ १५॥
असाल तेथुन पुढती चला यत्न सोडा ना ।
राम कृष्ण हरि जय नित वाचेने म्हणा ॥ १६॥
काम क्रोध लोभ असो काही का ना ।
राम कृष्ण हरि जय जय भावाने म्हणा ॥ १७॥
माता पिता कांता असो काही का ना ।
राम कृष्ण हरि जय जय भावाने म्हणा ॥ १८॥
मित्र पुत्र सूत्र असो काही का ना ।
राम कृष्ण हरि जय जय भावाने म्हणा ॥ १९॥
अंत संत पंथ असो काही का ना ।
राम कृष्ण हरि जय जय भावाने म्हणा ॥ २०॥
लोक टोक शोक असो काही का ना ।
राम कृष्ण हरि जय जय भावाने म्हणा ॥ २१॥
खान पान मान असो काही का ना ।
राम कृष्ण हरि जय जय भावाने म्हणा ॥ २२॥
नाम काम धाम असो काही का ना ।
राम कृष्ण हरि जय जय भावाने म्हणा ॥ २३॥
यंत्र तंत्र मंत्र असो काही का ना ।
राम कृष्ण हरि जय जय भावाने म्हणा ॥ २४॥
अस्त्र शस्त्र शास्त्र असो काही का ना ।
राम कृष्ण हरि जय जय भावाने म्हणा ॥ २५॥
राज काज साज असो काही का ना ।
राम कृष्ण हरि जय जय भावाने म्हणा ॥ २६॥
व्याप ताप पाप असो काही का ना ।
राम कृष्ण हरि जय जय भावाने म्हणा ॥ २७॥
वय भय नय असो काही का ना ।
राम कृष्ण हरि जय जय भावाने म्हणा ॥ २८॥
असाल तेथुन वरती चढा यत्न सोडा ना ।
राम कृष्ण हरि जय नित भावाने म्हणा ॥ २९॥
रचयिता - स्वामी वरदानन्दभारती
Encoded and proofread by Arun Parlikar