आरती योगेश्वरीची २
जयदेवी जयदेवी जय योगेश्वरी । महिमा न कळे तुझा वर्णिता थोरी ।
जय देवी जय देवी ॥ ध्रु.॥
धन्य अंबापूर महिमा विचित्र । पार्वती अवतार योगिनी क्षेत्र ।
दंतासुर मर्दोनी केले चरित्र । सिद्धांचे स्थळ तें महापवित्र ।
जयदेवी जयदेवी जय योगेश्वरी । महिमा न कळे तुझा वर्णिता थोरी ।
जय देवी जय देवी ॥ १॥
पतितपावन सर्वतीर्थ महाद्वारी । मायामोचन सकळ माया निवारी ।
साधका सिद्धी वाणेच्या तीरीं । तेथील महिमा वर्णू न शके वैखरी ।
जय देवी जय देवी जय योगेश्वरी। महिमा न काळे तुझा वर्णिता थोरी ।
जय देवी जय देवी ॥ २॥
सिद्धलिंग स्थळ परम पावन । नृसिंहतीर्थ तेथे नृसिंहवंदन ।
मूळ पीठ रेणागिरी नांदे आपण । संताचे माहेर गोदेवी स्थान ।
जय देवी जय देवी जय योगेश्वरी । महिमा न कळे तुझा वर्णिता थोरी ।
जय देवी जय देवी ॥ ३॥
महारुद्र जेथे भैरव अवतार । काळभैरव त्याचा महिमा अपार ।
नागझरी तीर्थ तीर्थांचे सार । मार्जन करिता दोष होती संहार ।
जय देवी जय देवी जय योगेश्वरी । महिमा न कळे तुझा वर्णिता थोरी ।
जय देवी जय देवी ॥ ४॥
अनंतरूप शक्ती तुज योग्य माते । योगेश्वरी नाम त्रिभुवन विख्याते ।
व्यापक सकळां देहीं अनंत गुण भरिते । निळकंठ ओवाळू कैवल्य माते ।
जय देवी जय देवी जय योगेश्वरी । महिमा न कळे तुझा वर्णिता थोरी ।
जय देवी जय देवी ॥ ५॥