आरती योगेश्वरीची १
जयदेवी जयदेवी जय योगेश्वरीमाते । जय योगेश्वरीमाते ।
कुलस्वामिनी जगदंबे करुणामृतसरिते ॥ ध्रु.॥
धर्माला ये ग्लानी, स्थिति केविलवाणी ।
असुरे पीडित जनता, त्राता तिज न कुणी ।
साद घाली तुज अंबे धाव धाव जननी ।
धावा पडता श्रवणी, घेशी धाव झणी ।
जयदेवी जयदेवी जय योगेश्वरीमाते ॥ १॥
असुराते निर्दाळुनि, धर्मा रक्षियले ।
सज्जनपालन केले, दुर्जन मर्दियले ।
विश्रांतीस्तव निर्जन स्थाना शोधियले ।
आंबग्रमानिकटी वास्तव्या केले ।
जयदेवी जयदेवी जय योगेश्वरीमाते ॥ २॥
वेदपुराणे थकली गाता तुज जेथे ।
काय पामरे गावे वद तव महिम्याते ।
दिगंत कीर्ती तव ही त्रिभुवनि दुमदुमते ।
भावे भजता भक्ते पावशि झणि त्याते ।
जयदेवी जयदेवी जय योगेश्वरीमाते ॥ ३॥
दुःसह भव हा तोडी या भव पाशाते ।
जनन-मरण हे तेची चुकवी झणि माते ।
मागत काहि न माते तव पदकमलाते ।
द्यावा तव पदि आश्रय नत अज्ञाताते ।
जयदेवी जयदेवी जय योगेश्वरीमाते ॥ ४॥