निजात्माष्टकस्तोत्रम्

निजात्माष्टकस्तोत्रम्

(भुजङ्गप्रयात वृत्तं) अनेकान्तिकं द्वन्द्वशून्यं विशुद्धं नितान्तं सुशान्तं गुणातीतमेकम् । सदा निष्प्रपञ्चं मनोवागतीतं चिदानन्दरूपं भजेम स्वरूपम् ॥ १॥ (जे सर्वव्यापी व अतीन्द्रिय असल्यामुळे) ज्याचे निश्चितस्वरूप साङ्गता येत नाही; जे (सुख-दुःख, पाप-पुण्य, प्रेम-द्वेष इत्यादि) द्वन्द्वविरहित व विशुद्ध आहे; (अविद्याजन्य सुखदुःखाचा कधीहि स्पर्श न झाल्यामुळे) जे शान्तीच्या पराकोटीमध्ये असते; जे (सत्त्व, रज व तम) ह्या गुणाञ्च्या पलिकडे असते; जे एकमेवाद्वितीय आहे; ज्याला कधीहि संसाराची बाधा होत नाही; जे मनाला समजत नाही व वाणीने साङ्गता येत नाही, अशा चैतन्य रूप व आनन्दरूप आत्मरूपाला भजावे ॥ १॥ सदा स्वप्रभं दुःखहीनं ह्यमेयं निराकारमत्युज्ज्वलं भेदहीनम् । स्वसंवेद्यमानन्दमाद्यं निरीहं चिदानन्दरूपं भजेम स्वरूपम् ॥ २॥ जे नेहमी स्वयम्प्रकाशित व दुःखविरहित असते. (अनुभूतिशिवाय कोणत्याच प्रमाणाने) जे समजत नाही, जे निराकार, अति तेजस्वी व भेदरहित आहे (म्हणजे दुसऱ्या ज्ञात्याची ज्याला अपेक्षा नसते), जे आनन्दमय असून विश्वाचे मूळ-कारण आहे. (विश्वव्यापी विभुत्वामुळे व शरीरजन्य इच्छा वगैरे त्याच्या ठिकाणी सम्भवतच नसल्याने) जे निरीच्छ आहे अशा चैतन्यरूप व आनन्दरूप आत्मरूपाला भजावे ॥ २॥ अहं प्रत्ययत्वादनेकान्तिकत्वादभेदस्वरूपात् स्वतःसिद्धभावात् । अनन्याश्रयत्वात्सदा निष्प्रपञ्चं चिदानन्दरूपं भजेम स्वरूपम् ॥ ३॥ ``मी'', ``मी'' या जाणीवेमधून सतत ओळख पटत असल्यामुळे, अमुक तेवढेच ब्रह्म असे निश्चित साङ्गता येत नसल्यामुळे, भेदरहित स्वरूप असल्यामुळे, स्वयंसिद्ध असल्यामुळे (कोणत्याहि बाह्य कारणापासून उत्पन्न न झालेले असे स्वयम्भु, अनादि, असल्यामुळे) व दुसऱ्या कोणावरहि स्वतःच्या अस्तित्वासाठी अवलम्बून नसल्यामुळे, जे नेहमी संसारापासून दूर असते अशा चैतन्यरूप व आनन्दरूप आत्मरूपाची भक्ती करावी ॥ ३॥ अहं ब्रह्म भासादि मत्कार्यजातं स्वलक्ष्येऽद्वये स्फूर्तिशून्ये परे च । विलाप्यप्रशान्ते सदैवैकरूपे चिदानन्दरूपं भजेम स्वरूपम् ॥ ४॥ सर्व कार्य म्हणजे अखिल विश्व हे मी ब्रह्म आहे या जाणीवेने युक्त आहे (म्हणजे आत्म्यानेच सर्व विश्व भरलेले आहे). असे हे अखिल विश्व आपले प्राप्यध्येय असलेल्या द्वन्द्वविरहित, कार्यरूपाने न स्फुरणाऱ्या, शोकरहित व सदैव एकरूप असलेल्या ज्या परब्रह्मामध्ये असते, त्या चैतन्यरूप व आनन्दरूप आत्मरूपाची भक्ती करावी ॥ ४॥ अहं ब्रह्मभावो ह्यविद्याकृतत्वाद् विभिन्नात्मकं भोक्तृभोग्यात्मबुध्या । जडं सम्बभूवयि पूंस्स्त्र्यात्मना यत् चिदानन्दरूपं भजेम स्वरूपम् ॥ ५॥ (खरोखरच) जीवात्मा व परमात्मा याञ्चे ऐक्य असूनसुद्धा अविद्येमुळे (म्हणजे आत्म्यासम्बन्धी मिथ्या ज्ञान असल्यामुळे), हा भोक्ता, हे भोग्य अशा तऱ्हेनें निरनिराळ्या कल्पना निर्माण होऊन जे भेदायुक्त वाटते व अशा तऱ्हेनें हा पुरुष, ही स्त्री इत्यादि द्वन्द्वमय कल्पनेतून जे ब्रह्म जड म्हणून निर्माण झाल्यासारखे भासते त्या चैतन्यरूप व आनन्दरूप आत्मरूपास भजावे ॥ ५॥ अनित्यं जगच्चिद्विवर्तात्मकं यत् विशोध्य स्वतःसिद्धचिन्मात्ररूपम् । विहायाखिलं यन्निजाज्ञानसिद्धं चिदानन्दरूपं भजेम स्वरूपम् ॥ ६॥ जग स्वतःच्या (आत्मविषयक) अज्ञानामुळे निर्माण झाले आहे, व ते दोरीच्या ठिकाणी सर्पाचा भास व्हावा याप्रमाणे चैतन्यावरचाच अविद्याजन्य आभास असते व म्हणून ते अनित्य आहे. स्वयंसिद्ध चैतन्यमय अशा ब्रह्मरूपाच्या ज्ञानाने त्या जगाचा शोध करून म्हणजे जाणून घेऊन त्याचा त्याग करावा व चैतन्यरूप व आनन्दरूप आत्मरूपास भजावे ॥ ६॥ स्वभासा सदा यत्स्वरूपं स्वदीप्तं निजानन्दरूपाद्यदानन्दमात्रम् । स्वरूपानुभूत्या सदा यत्स्वमात्रं चिदानन्दरूपं भजेम स्वरूपम् ॥ ७॥ स्वतःच्या तेजामुळे ज्याचे स्वरूप नेहमी अखंड स्वयम्प्रकाशित असते, स्वतः आनन्दरूप असल्यामुळे जे केवळ निर्भेळ (म्हणजे उनदुल्तेरतेद्) आनन्दमय आहे (म्हणजे ज्यात दुःखाचा लवलेश नाही) व स्वतःच्या स्वरूपाच्या म्हणजेच आत्म्याच्या अनुभूतीमुळे जे एकमेव आपले आपणच अस्तित्वात असते अशा चैतन्यरूप व आनन्दरूप आत्मरूपाची भक्ती करावी ॥ ७॥ जगन्नेति वा खल्विदं ब्रह्मवृत्त्या निजात्मानमेवावशिष्याद्वयं यत् । अभिन्नं सदा निर्विकल्पं प्रशान्तं चिदानन्दरूपं भजेम स्वपरूम् ॥ ८॥ ``नेति नेति'' (केवळ हे नाही) या पद्धतीप्रमाणे, व हे सर्व जग ब्रह्म आहे या वृत्तीने, जगत् शेवटी ज्या अद्वितीय आत्मस्वरूपानेच शिल्लक रहाते त्या भेदरहित, निःसन्दिग्ध व अत्यन्त शान्तस्वरूपी असलेल्या चैतन्यरूप व आनन्दरूप आत्मरूपाला भजावे ॥ ८॥ निजात्माष्टकं ये पठन्तीह भक्ताः सदाचारयुक्ताः स्वनिष्ठाः प्रशान्ताः । भवन्तीह ते ब्रह्म वेदप्रमाणात् तथैवाशिषा निश्चितं निश्चितं मे ॥ ९॥ जे सदाचारी आत्म्यावर निष्ठा ठेवून म्हणजेच आत्मचिन्तनात रममाण होऊन व शान्ति ठेवून हे निजात्माष्टक स्तोत्र म्हणतात ते उपनिषदाञ्च्या साङ्गण्यावरून व त्याचप्रमाणे माझ्या आशीर्वादाने येथेच निश्चितपणे ब्रह्मस्वरूप होतात ॥ ९॥ (रचनास्थलं - श्रीकाशी क्षेत्रं रचनाकालः - द्वितीय चातुर्मास समाप्ति (कार्तिक शु ॥ १५ शके १८६५)) इति श्रीमत् परमहंस परिव्राजकाचार्य सद्गुरु भगवता श्रीधरस्वामिना विरचितं निजात्माष्टकं स्तोत्रं सम्पूर्णम् ॥ Proofread by Paresh Panditrao
% Text title            : Nijatmashtaka Stotram
% File name             : nijAtmAShTakastotram.itx
% itxtitle              : nijAtmAShTakastotram (shrIdharasvAmIvirachitam)
% engtitle              : nijAtmAShTakastotram
% Category              : deities_misc, gurudev, shrIdharasvAmI, aShTaka, stotra
% Location              : doc_deities_misc
% Sublocation           : deities_misc
% SubDeity              : gurudev
% Author                : Shridharasvami
% Language              : Sanskrit
% Subject               : philosophy/hinduism/religion
% Proofread by          : Paresh Panditrao
% Description/comments  : shrIdharasvAmI stotrANi.  shrIdharasandeshaH
% Indexextra            : (Marathi, Collection 1, 2, Selected)
% Latest update         : January 14, 2023
% Send corrections to   : Sanskrit@cheerful.com
% Site access           : https://sanskritdocuments.org

This text is prepared by volunteers and is to be used for personal study and research. The file is not to be copied or reposted for promotion of any website or individuals or for commercial purpose without permission. Please help to maintain respect for volunteer spirit.

BACK TO TOP
sanskritdocuments.org